टोमॅटो पुरी

स्वाती दिनेश's picture
स्वाती दिनेश in अन्न हे पूर्णब्रह्म
26 Mar 2013 - 10:18 pm

साहित्य- टोमॅटो प्युरी १ वाटी किवा मोठे २ चांगले लालबुंद टोमॅटो,
मिरपूड, धनेजिरे पूड, ओवा - प्रत्येकी १ लहान चमचा,
तिखट व मीठ - स्वादानुसार
कणिक, तेल
कृती- टोमॅटो पाण्यात घालून उकळणे, ते शिजत आले की चाळणीवर घालणे आणि जरा कोमट झाले की साले काढून उरलेला गर कुस्करणे व नंतर मिक्सर मधून फिरवून घेणे.
किवा- तयार प्युरी घेणे. त्यात तिखट, धनेजिरे पूड, मिरपूड, ओवा, तिखट, मीठ घालणे.चमचाभर तेल घालणे. त्यात मावेल एवढी कणिक घालून घट्टसर भिजवणे.१५-२० मिनिटे झाकून ठेवणे.
तेल तापत ठेवणे.
पुर्‍या लाटून मध्यम आचेवर तळणे.
हिरव्या चटणीबरोबर खाणे.
चटणी- २-३ मिरच्या चिरुन, कोथिंबिर,२ लसूणपाकळ्या, एका पेराएवढं आलं, मीठ चवीनुसार, १/२ चमचा साखर हे सगळे एकत्र करुन मिक्सर मधून फिरवणे, थोडे पाणी घालणे.

.

प्रतिक्रिया

ख ला स! स्वातीताई, तूच गं तूच!

रमेश आठवले's picture

26 Mar 2013 - 10:26 pm | रमेश आठवले

प्युरी पासून पुरी.

तुमचा अभिषेक's picture

26 Mar 2013 - 10:34 pm | तुमचा अभिषेक

नाश्तासाठी चहापुरी म्हणजे माझा ऑलटाईम फेवरेट प्रकार.. १५-१६ सहज जातात..

हा प्रकार सुद्धा मस्तच दिसतोय.. फोटो खासच आहे ... पुर्‍या गरमागरम असल्यासारखा इफेक्ट जाणवतोय बघूनच.. :)

कस्स्स्स्सल्या भारी फुगल्यात! ;)

सूड's picture

29 Mar 2013 - 4:34 pm | सूड

मस्त फुगल्यात पुर्‍या. पुर्‍या अशा नीट फुगणं म्हणजे कणिक मळण्यापासून ते त्या लाटण्यापर्यंत सगळं व्यवस्थित झाल्याचं लक्षण आहे. नाहीतर कणिक जरा जास्त पातळ झाली तर पुर्‍या कितीही नीट लाटल्या तरी फुगत नाहीत किंवा कणिक व्यवस्थित आहे पण सगळीकडे सारख्या लाटल्या गेल्या नाहीत तरी त्या फुलत नाहीत.

एकच मोठी पोळी लाटून वाटीने त्यातून छोट्या पुर्‍या कातून काढण्याचा एक विचित्र प्रकार काही ठिकाणी वेळ वाचवण्यासाठी करताना पाह्यला आहे. अशा लोकांनी पुर्‍या करण्याचे कष्ट घेऊ नयेत असं माझं स्पष्ट मत आहे.

प्यारे१'s picture

29 Mar 2013 - 5:03 pm | प्यारे१

१. सूडच्या होणार्‍या बायकोचे हाल होणार.
२. सूड स्वतः स्वैपाक करुन तिला जेवायला घालणार. :)

५० फक्त's picture

30 Mar 2013 - 12:51 pm | ५० फक्त

सुड, काळजी करु नको, अशा सगळ्या त्रासदायक शक्यतांवर उपाय आहेत माझ्याकडे.

मस्त दिसतायत पुर्‍या एकदम.. टम्म फुगल्यात अगदी.. :D

मस्त प्रकार. मला आधी टोम्याटो पुर्‍या माहित नव्हत्या. छानच दिसतायत.

स्पंदना's picture

27 Mar 2013 - 5:48 am | स्पंदना

लाल पूर्‍या हिरवी चटणी!!
काय कॉम्बीनेशन आहे. मस्ताड।

सुरेखच दिसतायत पुय्रा!!

जयवी's picture

27 Mar 2013 - 11:29 am | जयवी

मस्त :)

निवेदिता-ताई's picture

27 Mar 2013 - 11:40 am | निवेदिता-ताई

झकासच

सानिकास्वप्निल's picture

27 Mar 2013 - 12:48 pm | सानिकास्वप्निल

रंग ही सुंदर आला आहे :)
मस्तचं

जबरी पुर्‍या बनल्या आहेत..

nishant's picture

27 Mar 2013 - 3:56 pm | nishant

मस्त दिसतायत पुर्या..

सस्नेह's picture

27 Mar 2013 - 4:10 pm | सस्नेह

फोटो पाहून तोंपासु......

पैसा's picture

27 Mar 2013 - 8:28 pm | पैसा

रंग अगदी सुरेख आलाय. चटणीबरोबर कॉम्बिनेशन झकास दिसतंय. चटणीमधे खोबरं नाही का घातलं?

अत्रुप्त आत्मा's picture

28 Mar 2013 - 12:17 am | अत्रुप्त आत्मा

पाहातक्षणीच भूक खवळली..... http://www.sherv.net/cm/emoticons/hungry/smiley-face-is-hungry.png स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स http://www.sherv.net/cm/emoticons/eating/eating-cookie.gif

कच्ची कैरी's picture

28 Mar 2013 - 1:03 pm | कच्ची कैरी

पिझ्झा पुरीनंतर आता टोमॅटो पुरी ,वाह मस्तच !!!

परिकथेतील राजकुमार's picture

29 Mar 2013 - 4:15 pm | परिकथेतील राजकुमार

पुढच्या वेळी येताना बनवुन घेऊन येणे.

प्रभाकर पेठकर's picture

29 Mar 2013 - 4:54 pm | प्रभाकर पेठकर

व्वा टोमॅटो पुर्‍या मस्त दिसत आहेत.

टोमॅटो प्युरी बनविताना अर्ध्या लिंबाच्या आकाराचे बीट (सालं काढून) त्यात मिसळले तर अधिक चांगला रंग येईल.

आज्जेच्या वरच्या मता प्रमाणेच म्हणतो. :)
आवडेश... :)

(श्रीखंड-पुरी प्रेमी) :)