रोठ

वैशाली हसमनीस's picture
वैशाली हसमनीस in पाककृती
8 Jul 2008 - 1:17 pm

:SS साहित्य--एक वाटी बारीक रवा,बारीक चिरलेला कांदा,मिरची व कोथिंबीर,एक वाटी आंबट ताक,मीठ,पाव टी स्पून खायचा सोडा(पूड),एक चमचा तेल,निर्लेपचे भांडे
कॄती---रवा घेऊन त्यात ताक व थोडे पाणी घालून फेटावे, नंतर कांदा,मिरची व कोथिंबीर घालावी.अर्धा तास मिश्रण तसेच ठेवावे.भांड्याला थोडे तेल सर्व बाजूने लावून घ्यावें. नंतर मिश्रणात सोडा घालून ते एकवार फेटून लगेच भांड्यात ओतावे.ओव्हनमध्ये किंवा गॅसवर १० ते १५ मि.ठेवावे.मिश्रण फुगून येइल.ताटात ते घेऊन वड्या पाडाव्यात.कोणत्याही पातळ चटणीबरोबर खावे. झटपट नाश्ता तयार!