चाकवतची ताकातली पातळ भाजी

अनन्न्या's picture
अनन्न्या in पाककृती
19 Mar 2013 - 6:58 pm

रोज रोज आमटी करून कंटाळा येतो. काहीतरी कढी, सार असा बदल छान वाटतो. याच उद्देशाने केलेली ही चाकवतची ताकातली पातळ भाजी!! चाकवत ऐवजी पालक वापरूनही याच क्रुतीने ही भाजी करता येते.
साहित्यः एक जुडी चाकवत, अर्धा लीटर दह्याचे ताक, दोन-तीन चमचे बेसन, आठ-दहा लसूण पाकळ्या, अर्धी वाटी ओले अगर भिजवलेले काजूगर(ऐच्छीक), मीठ, साखर, वाट्लेली ओली मिरची अर्धा चमचा अगर लाल तिखट, दोन-तीन चमचे तूप, अर्धा चमचा जीरे, सुक्या मिरच्या दोन-तीन्, मेथी दाणे दहा-बारा.
क्रुती: प्रथम चाकवत निवडून, धुवून, चिरून कुकरला वाफवून घ्यावा. दही मिक्सरला घुसळून घ्यावे. चाकवत आणि बेसन पीठ एकत्र मिक्सरला थोडे फिरवून घ्यावे. घुसळलेले दही, फिरवलेला चाकवत एकत्र करावे. पाणी घालून कढी इतपत किंवा आपल्या आवडीप्रमाणे पातळ करावे. त्यात मीठ, साखर, तिखट किंवा मिरचीचे वाटप चवीनुसार मिसळावे. या सिझनला आमच्याकडे ओले काजूगर मिळतात त्यामुळे ते बय्राच पदार्थात वापरले जातात. त्या ऐवजी सुके काजूगर गरम पाण्यात भिजवून घातले तरी चालतील. याने चवीत काहीच फरक पडत नाही. जिभेचे चोचले फक्त!!
तूपाची मेथी दाणे, जीरे, लसूण आणि सुक्या मिरच्या घालून खमंग फोडणी करावी आणि तयार मिश्रणाला द्यावी. एक उकळी काढावी. सुक्या मिरचीने तिखट्पणा येत नाही म्हणून लाल तिखट किंवा ओल्या मिरचीचे वाटप वापरले आहे.

chakvat bhaji

प्रतिक्रिया

फोटो काढलाय पण टाकता येत नाही.

बाद्वे - आवडीची भाजी.....

चुका, चाकवत या भाज्या फार आवडतात मला. गेले कित्येक वर्षात चव घेणे राहू द्या पण जुडीही बघायला मिळालेली नाही. तुम्ही फोटू एक्सपर्ट किसन, गणपा, वल्ली यांच्याशी संपर्क साधलात तर काम होईल.

अनन्न्या's picture

19 Mar 2013 - 7:22 pm | अनन्न्या

chakvat bhaji

रेवती's picture

19 Mar 2013 - 7:31 pm | रेवती

वाह!!

तर्री's picture

19 Mar 2013 - 7:23 pm | तर्री

वाह ! क्या बात है !!

दिपक.कुवेत's picture

19 Mar 2013 - 7:38 pm | दिपक.कुवेत

मस्त दिसतेय भाजी. काजुगरांचा सीजन आहेच तर ओल्या काजुबीयांची पण भाजी येउदे :)

सानिकास्वप्निल's picture

19 Mar 2013 - 8:00 pm | सानिकास्वप्निल

फोटो बघून तोंपासू
ताकातली भाजी म्हणजेच चविष्ट असणार ह्यात शंकाच नाही :)

सस्नेह's picture

19 Mar 2013 - 9:50 pm | सस्नेह

चाकवत म्हणजे आवडती भाजी !

प्यारे१'s picture

19 Mar 2013 - 10:20 pm | प्यारे१

>सूड मोड< खोबर्‍याचे काप घातले तर जास्त चांगले लागतात. >सूड मोड<

चाकवत शेपू हा स्त्रीवर्गाला आंदण दिल्याचा प्रकार आहे काय?
अळू/पालकाची भाजी अशीच करतात ना? :)

चौकटराजा's picture

20 Mar 2013 - 4:47 am | चौकटराजा

एकदा चाकवताची भाजी मडईत विकत घेत असताना शेवटची एकच गड्डी शिल्लक होती. मी " कमी करा" चा काही पाढा न वाचता ताबडतोब घेतली. त्याने विचारले " साहेब तुम्ही बामण ना? बामणाला लय आवडती ही भाजी ! " खरे आहे.
पुण्यात हमखास हवी असेल तर बामणं राहाणार्‍या वस्तीच्या कोपर्‍यावरच्या दुकानात चाकवत मिळतोच मिळतो ..आमच्या प्रोफाईल मधे या भाजीचा उल्ल्लेख आहे.मी स्वत: ही भाजी मस्त तयार करू शकतो. पण लसूण न घालता.

मुळात ताक हाच प्रकार आवडता, कढी हा देखील, घरी अशी पालकाची वगैरे भाजी बनते,आता चाकवत हुडकावा लागेल रविवारी.

बाकी, चौराकाका, कधी बोलावताय बिनलसणाची भाजी खायला ?

प्रचेतस's picture

20 Mar 2013 - 8:50 am | प्रचेतस

मलाही बोलवा.

बाकी पाकृ मस्तच.

पण सासरी सर्वाना आवड्त असल्याने घालावी लागते.
सर्वांचे आभार!!

स्पंदना's picture

20 Mar 2013 - 5:00 am | स्पंदना

बाई बाई वर्ष झाली हा चाकवत पाहुन.
मस्त. मला याच गरगटं माहीती आहे, पण हा प्रकार पहिल्यांदाच ऐकला.
फोटो अतिशय सुरेख. अना भाजी पालक वापरुन केली जाईल.

चाकवताची भाजी नारळाचे दूध घालून केलेली आहे. आता हा प्रकार सुद्धा करुन बघायला हवा.

मस्त फोटो आणि सोप्पी पाककृती.

स्मिता.'s picture

20 Mar 2013 - 2:40 pm | स्मिता.

पाकृ आवडली. आमच्याकडे थोड्याश्या फरकाने असा ताकातला पालक करतात.

अवांतरः चाकवत म्हणजे नेमकी कोणती भाजी? ती फक्त पुण्याकडे मिळते का?

बॅटमॅन's picture

20 Mar 2013 - 2:46 pm | बॅटमॅन

चाकवत ही सांगली-मिरज-कोल्लापूर या भागात तरी कमीतकमी मिळते. नेमकी कुठली तेवढं विचारू नका =))

फोटो टाकलाय. आंतरजालावरून साभार!!

राही's picture

20 Mar 2013 - 7:46 pm | राही

विकीवर एक-दोन लिंक्समध्ये चाकवत या नावाखाली टाकळा या भाजी किंवा तणाची माहिती आहे. यालाच तराट म्हणतात असेही म्हटले आहे. पण चाकवत म्हणजे टाकळा नव्हे. तराटही नव्हे. आणखी एक लिंक सापडली.
http://en.wikipedia.org/wiki/Chenopodium_album
पण या भाजीलाच बटवा(चंदनबटवा)म्हणतात असेही दिले आहे. कन्फ्युजन. आता जागूताईचे धागे उघडून बघावे लागतील.

अनन्न्या's picture

20 Mar 2013 - 8:03 pm | अनन्न्या

chakvat

स्मिता.'s picture

20 Mar 2013 - 8:14 pm | स्मिता.

अनन्न्या, बॅटमॅन आणि राही, माहितीकरता आभार!

२१ वी सदी की नारी असं म्हणणार होतो... पण जाऊ दे! ;)

स्पंदना's picture

21 Mar 2013 - 8:17 am | स्पंदना

बरोबर हा चाकवत.
चंदनबटवा थोडासा गुलाबी रंगावर अन त्याच्या पानांना लव असते. तो ही फार छान चविला.

तुमचा अभिषेक's picture

20 Mar 2013 - 8:38 pm | तुमचा अभिषेक

ताकच आपल्या आवडीचा प्रकार.. मग ते वापरून काहीही बनवा...
तसेच पालेभाजी आणि जोडीला तांदळाची किंवा ज्वारीची किंवा दोघांची मिक्स भाकरी सुद्धा आपल्या फेवरेट कॅटेगरीमध्ये..

हा प्रकार देखील भाकरीबरोबर खायला मजा येईलसे वाटतेय..:)

बॅटमॅन's picture

20 Mar 2013 - 10:03 pm | बॅटमॅन

+१११११११११११११११११११.

ताक आपल्यालाही प्रचंड आवडतं. इंद्रालासुद्धा दुर्लभ असलेले ताक पिताना काय मजा येते आहाहाहा... :)

चाकवत दिसला तरी ओळखता येईल की नाही शंका त्यामुळे पालकाचीच अशी भाजी करुन बघते.

चौकटराजा's picture

21 Mar 2013 - 6:19 am | चौकटराजा

अशा रीतीने पालकाची ताकतली भाजी करतो आम्ही. पण त्याला चाकवताची मजा नाही.मग त्या मानाने चवळाई ची ताकातली
भाजी काही प्रमाणात चाकवताच्या जवळ जाते. पण ती अगदी बारीक चिरली नाही तर "चोथापाणी" होण्याची शक्यता जास्त. अळू काय , चाक्वत काय पालक काय सर्व भाज्या एकदम बारीक चिरून घेतल्या तरच चांगल्या तयार होतात. बाकी चाकवताचे बोटनिकल नोमिनक्लेचर शीधायचा प्रयत्न करतोय. ही भाजी बिटा कॅरोटेन चा उत्तम स्त्रोत आहे हे माहीत आहे .

राही's picture

21 Mar 2013 - 5:45 pm | राही

मला वाटते Chenopodium album हे नाव असावे.

चौकटराजा's picture

21 Mar 2013 - 6:57 pm | चौकटराजा

जालवरून काही माहिती आपण शोधशब्द दिल्याने मिळाली. बॉटनिकल नाव केनोपोडेयम अल्बम एल असे आहे. त्याला उत्तरेत
बटुआ. संस्कृतात वास्तुक, पंजाबीत लुनक् , दख्खनात वास्तुक , हिंदीत चंद्रिल व बथुवा ई नावे आहेत.
सदर वनस्पती सर्वसाधारण इम्ग्रजीत व्हाईट गूज फूट म्हणून ओळखली जाते.

पैसा's picture

20 Mar 2013 - 10:04 pm | पैसा

सोप्पी पालेभाजी. पण ताकामुळे मूळ भाजीची चव लपते.

पण आमच्याकडे करताना बहुतेक वेळा लसुण न घालता केली जाते.

त्याच प्रमाणे ह.डाळ आणि दाणे आधी भिजत घालुन चाकवताबरोबर शिजवुन भाजीत घालतात.

साजुक तुपाची आणि जि-याची फोडणी घातलेली भाजी गरम गरम भुरकणे आणि गरम भाताबरोबर खाणे म्हणजे स्वर्गसुख.

चिंतामणींशी अगदी सहमत. फोडणीत सुकी लाल मिरची मात्र ह्वीच.

करून/ खाउन खुप वर्ष झाली. पण पाक्रु आणि फोटो पाहुन चव मात्र पुन्हा आठवली, आहाहा!

धन्यवाद आणि पुलेशु.

कच्ची कैरी's picture

21 Mar 2013 - 12:59 pm | कच्ची कैरी

माझ्यासाठी हा प्रकार नविनच :)

कच्ची कैरी हे नाव माझ्यासाठी नवीनच ! कच्ची असते तिलाच कैरी म्हणतात ना ? पिकलेली कैरी म्हणजे आंबा ना ?
मी जर खालील नाव घेतले तर काय मजा येईल ना
थंडगार बर्फ

अनन्न्या's picture

17 Feb 2014 - 6:48 pm | अनन्न्या

ताकातली ही चाकवतची पातळ भाजी आठवली, म्हणून हा धागा वर काढत आहे.