पाऊस पाणी

kanchanbari's picture
kanchanbari in कलादालन
4 Jan 2013 - 7:13 pm

नमस्कार, मी मिपावरची नविन सदस्या आज माझ पहिल कलादालन सादर करत आहे. मी सध्या साऊथ अफ्रिकेत आहे माझ्या यजमानांसोबत. मी इथे काही फोटो काढली आहेत. मला फोटोग्राफीची आवड इथेच निर्माण झाली. त्यातलीच काही फोटो मी इथे टाकत आहे.

१. पाणी ही जगाच्या काही भागात खुप मोठी समस्या आहे पण अशा या समस्येपासुन विलिप्त असा हा तहानलेला कबुतर एका छोटयाश्या पाण्याच्या खडग्यावर बसुन तहान भागवत आहे.

kabutar

२. पाऊस येण्याच्या आधी आकाशात काळेभोर ढग दाटून येतात,गार वारा सुटायला लागतो,सुन्दर असा निसर्ग मनाला आनंद दयायला लागतो,अशाच निसर्गाचा आनंद पिवळी चिमनी जिला साऊथ अफ्रिकेत विवर बर्ड म्हणजे सुगरन पक्षी म्हणतात ती पण घेते आहे.

sparrow

३. साऊथ अफ्रिकेत पिलानेसबर्ग म्हणून एक जंगल आहे. आम्ही तिथे स्वतःच्या कार मधे बसून एखादा प्राणी दिसावा आणी त्याची फोटो घ्यावी याची वाट बघत होतो. त्या दिवशी आभ्र पडलेल होत. बराच वेळ झाला होता काही दिसत नाही होत. तेवढयात हरिणांचा कळ्प दिसला. अचानक ती पळायला लागली,कळल नाही की काय झाल पण तेवढयात मला त्यांच्या मागे एक सिंह येतांना दिसला. हळू हळू तो आमच्या खुप जवळ आला. त्याला त्याची शिकार तर मिळाली नाही पण आम्हाला तो खुप जवळुन बघायला मिळाला आणी आम्ही त्याची भरपुर फोटो काढली. प्रत्यक्षात अस दॄश्य बघुन छान वाटल. हा खुप छान अनुभव होता.

lion

छायाचित्रण

प्रतिक्रिया

चित्रा's picture

4 Jan 2013 - 8:35 pm | चित्रा

मिपावर स्वागत.
फोटो छान आहेत.
असेच अजून लिहीत चला.

दादा कोंडके's picture

4 Jan 2013 - 9:00 pm | दादा कोंडके

फोटो मस्तच. तिथले अनुभव वगैरे वाचायला आवडतील.

बाकी मिपावर आपण नविनच आहात त्यामुळे खत्रुड प्रतिसादांची सवय व्हावी म्हणून एक सँपल प्रतिसाद लिहितोय. :)

_______________________________________________

मी सध्या साऊथ अफ्रिकेत आहे

अरे वा आपण साउथ अफ्रिकेत असता का? चान चान.

माझ्या यजमानांसोबत.

यजमानांसोबत का यजमानांच्या मागे मागे?

मला फोटोग्राफीची आवड इथेच निर्माण झाली

हो ना हल्ली पैकेवाली मंडलींला यसयलआर वगैरे क्यामेरे घेतले की लगेच फोटोग्राफीची आवड निर्माण होते म्हणे आणि ते फोटोग्राफर होतात म्हणे.

आम्ही तिथे स्वतःच्या कार मधे बसून एखादा प्राणी दिसावा

अरे वा, तुमच्याकडे कार पण आहे का? परत एकदा चान चान.

kanchanbari's picture

4 Jan 2013 - 10:24 pm | kanchanbari

धन्यवाद.

ह भ प's picture

7 Jan 2013 - 5:38 pm | ह भ प

=)

ह भ प's picture

7 Jan 2013 - 5:41 pm | ह भ प

अन सलाम फोटोग्राफीला...
पुरक वर्णन.. चांगली वातावरणनिर्मिती..
लेखाचे शिर्षक पटेश..
कीप ईट अप..साउथाफ्रीका बघायला आवडेल तुमच्या कॅमेर्‍याच्या लेन्स मधून..

कवितानागेश's picture

4 Jan 2013 - 10:03 pm | कवितानागेश

छान. :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 Jan 2013 - 10:10 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मिपावर स्वागत आहे. छायाचित्र अगदी व्यावसायिक फोटोग्राफरने काढल्यासारखे आले आहेत. फोटो आवडले.
नियमित येत चला, लिहित चला.

-दिलीप बिरुटे

मराठे's picture

4 Jan 2013 - 10:29 pm | मराठे

फोटो छान आहेत. पहिल्या फोटोमधे पाणे असं कसं दिसतंय? आणि शीर्षक 'पाऊस पाणी' असं का दिलंय?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

4 Jan 2013 - 10:32 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

पण, नवीन सदस्य आहेत, नाराज व्हायला नको म्हणून गप्प बसलो. पाऊस पाण्याचा काहीच संबंध वाटला नव्हता.
कबूतरानं पाण्यात चोच घातली आहे, आणि फेवीक्विकला बोट चिकटावं तसं चोच चिकटल्यासारखी वाटते.

फोटोबरोबर काही स्पष्टीकरण असलं ना जरा मजा येते.

-दिलीप बिरुटे

>> पण, नवीन सदस्य आहेत, नाराज व्हायला नको म्हणून गप्प बसलो.
हं म्ह्णजे बंदूक आमच्या खांद्यावर का? ;-)

पैसा's picture

4 Jan 2013 - 10:34 pm | पैसा

असेच आणखी अवश्य लिहा!

५० फक्त's picture

5 Jan 2013 - 8:21 am | ५० फक्त

फोटो मस्त आहेत, आणि नविन कुणीतरी काढलेले आहेत, बाकी तांत्रिक माहिती वगैरे असो.

सस्नेह's picture

5 Jan 2013 - 1:35 pm | सस्नेह

कबूतर कशातून पाणी पीत आहे ते मलाही समजले नाही.

पहिल्यांदा फोटो पाहिल्यावर मलाही आश्चर्य वाटलं होतं की पाण्याचा थेंब (कबुतराच्या आकाराच्या मानाने) येवढा मोठा कसा काय?
नंतर नीट निरखुन पाहिल्यावर लक्षात आलं की दगडातून कारंजा वजा पाण्याचा स्त्रोत आहे त्याततुन ते पाणी टिपतय.
बाकी फोटो काढण्याचा क्षण अचुक टिपलाय. काही मायक्रोसेकंदासाठी त्या पक्षाने पापणी मिटली असावी.
सिंह मात्र होतकरू वाटला. :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

5 Jan 2013 - 5:09 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>> निरखुन पाहिल्यावर लक्षात आलं की दगडातून कारंजा वजा पाण्याचा स्त्रोत आहे त्याततुन ते पाणी टिपतय.

च्यायला, आत्ता कुठे मला कबुतराच्या फोटोचं कोडं सुटलं. धन्स.

-दिलीप बिरुटे

अमोल केळकर's picture

5 Jan 2013 - 1:55 pm | अमोल केळकर

छान आलेत फोटो :)

अमोल केळकर
मला इथे भेटा

अनिल तापकीर's picture

5 Jan 2013 - 4:38 pm | अनिल तापकीर

खुप सुंदर

मिसळलेला काव्यप्रेमी's picture

5 Jan 2013 - 5:16 pm | मिसळलेला काव्यप्रेमी

मिपावर स्वागत.
फोटो मस्त आहेत.

अनन्न्या's picture

6 Jan 2013 - 6:36 pm | अनन्न्या

प्रयत्न चांगला आहे.

वपाडाव's picture

7 Jan 2013 - 6:00 pm | वपाडाव

और आंदो....

जयू कर्णिक's picture

16 Jan 2013 - 8:36 am | जयू कर्णिक

छायाचित्रे अप्रतिम. महिती देण्याची कलाही अवगत. पण टायपिंगची जरा संवय करावी लागेल. जे लिहायचे तेच टाईप करता यायला हवे. माझी ही पहिलीच प्रतिक्रिया आहे. पण नेटाने चुका सुधारत लिहिले.

जयू कर्णिक's picture

16 Jan 2013 - 8:43 am | जयू कर्णिक

तरीही एक चूक झालीच बघा. माहिती ऐवजी महिती झाले. प्रकाशित करण्याची घाई केली मी सुद्धा.

चौकटराजा's picture

16 Jan 2013 - 9:04 am | चौकटराजा

मिपावर स्वागत . पहिलाच धागा मस्त आहे.
एक सूचना- प्रतिसादांच्या संख्येपेक्षा " वाचने" किती यावर लक्ष र्ठेवा म्हणजे निरूत्साही व्हायला होणार नाही.
इथे " ओळख" असेल तर प्रतिसाद जास्त येतात असे निरिक्षण आहे अतः लिहिले हो ! काही वेळेस मात्र आपला धागा
" त्यात प्रतिसाद काय तो देणार , वाचनच ठीक आहे "असा असतो. काही आयडी वाचना साठीच इथे येतात लेख व प्रतिसाद दोन्ही टाळतात. मला वाटते येवडं पुरेसं हाय ! पुन्ना शुबेच्च्या !