Skip to main content

टोमॅटो साल्सा/ चटणी

लेखक खादाड अमिता यांनी बुधवार, 19/12/2012 15:42 या दिवशी प्रकाशित केले.
tomato salsa सामग्री: १ किलो टोमॅटो ५ लसुन पाकळ्या, बारीक चिरलेल्या १ टेबलस्पून टोमॅटो केचप १ टीस्पून काश्मिरी मिरची पाउडर १ लवंग १ टीस्पून ड्राईड हर्ब्स १ टेबलस्पून साखर मीठ आणि मिरपूड चवीनुसार कृती: - टोमॅटो उकडून/ ब्लांच करून, त्याची साले काढून ते मिक्सर मध्ये वाटून घ्या. - एका जाड बुडाच्या भांड्यात सर्व सामग्री आणि टोमॅटो चा गर एकत्र करून थोडं उकळा, हे मिश्रण उकळून जर दाट झालं कि गार करून एका काचेच्या बाटलीत भरून फ्रिज मध्ये ठेवा. हे १५ दिवस चांगले टिकते - आयत्या वेळी चटणी करायची असल्यास ह्याला तूप, जिरं ची फोडणी द्या. - हे साल्सा म्हणून पण वापरू शकता. एका छोट्या वाटीत काढून चीप एन्ड डीप म्हणून सर्व्ह करू शकता. - मी हेच सॉस पास्ता करायला पण वापरते. ह्यात शिजवलेला पास्ता ओलीव ओइल वर परता किंवा त्यात थोडं क्रीम मिसळून 'साल्सा रोसे' पास्ता तयार करा. झटपट आणि चविष्ट!

वाचने 25685
प्रतिक्रिया 15

प्रतिक्रिया

पास्ता लगेच खावासा वाटतोय...

पुन्हा वेगळे १ टेबलस्पून टोमॅटो केचप कशासाठी घालायचे ते कळले नाही. पण एकंदरीत चव मस्तच होईल. :)

In reply to by गणपा

ह्याचे मेक्सिकन साल्सात रूपांतर करायचे असेल तर ह्यात बारीक चिरलेला कांदा, लाल बेल पेपर्स आणि कोथिम्बिर घालावी.

त्रिवेनि, अत्रुप्त आत्मा, तर्री , रेवती, दिपक्.कुवेत, श्रुती कुलकर्णी - धन्यु!

टोमॅटो केचप घातल्याने वेगळ्याने व्हिनेगर घालावे लागत नाही आणि स्वाद छान लागतो!

बधूनच तोंपासु.