झाडांची आवड तर बहुतेकांनाच असते पण ती लावायला कधी जागा नसते, तर कधी त्यांची जोपासना करायला वेळ नसतो. मुंबईत तर ग्रिल मध्ये, बालकनी असेल तर त्यात झाडं लावून लोकं आपली आवड जोपासतात. मग जर आपण शोभेच्या झाडांबरोबर भाज्या, मसाले (मिरच्या कोथिंबीर पुदीना, पाती चहा) लावले तर आपल्याला घरच्या घरी ते मिळतील. त्याचा आनंद काही वेगळाच असतो. त्याचा अनुभव मी घेत आहे. तुम्ही पण तो अनुभव घेऊन बघावा. त्यासाठी काही जास्त पैसे खर्च होत नाहीत. तुम्ही बाजारातून कधी पुदीना आणलात त्याच्या काड्या फेकून न देता त्या मातीत खोचून ठेवा. तुम्हाला भरपूर पुदीना मिळेल. कढीपत्ता पण कोणाकडून रोप आणून लावू शकता. लसूण सोलून त्याचा निमुळ्ता भाग वर ठेवून बाकीचा भाग मातीत खोचला तर सुंदर लसणाची पात चटणी साठी मिळेल. मी लावलेल्या झाडांचे काही फोटो संलग्न करीत आहे. तुम्ही पण नक्की प्रयत्न करुन बघा.
प्रतिक्रिया
18 Dec 2012 - 11:44 am | ह भ प
चांगली निगा राखा.. प्रमाणात खतपाणी द्या.. व्यवस्थीत सुर्यप्रकाश मिळेल असं करा..
तुमची बाग चांगली फुलो हिच सदिच्छा..
18 Dec 2012 - 11:56 am | गवि
घरात जी काही जागा असेल तेवढ्यात बसेल अशी बाग केली तरी घर बंद करुन तीनचार दिवस किंवा त्याहून जास्त बाहेरगावी जायचं असेल तर समस्या येते. जाताना जास्तीचं पाणी घातलं तर कुजण्याची शक्यता, आणि समजा तरीही जास्त पाणी घातलं तरी एकाच्या जागी दोन दिवस जातात. त्यानंतर मात्र रोपं मरतात किंवा हाय खातात (पाण्याअभावी). मग परत येऊन कितीही पाणी घातलं तरी उपयोग नाही होत.
यावर काही उपाय आहे का? मधे एक जेलीसारख्या गोऴ्या आल्या होत्या, पाणी धरुन ठेवणार्या, पण त्या कितपत विश्वासार्ह आहेत माहीत नाही.
18 Dec 2012 - 12:24 pm | राही
छोट्या कुण्ड्या असतील तर काही दिवस पाणी घालण्यापुरत्या शेजार्यांमध्ये वाटून देता येतील. त्यासाठी आधी खतपाणी वगैरे पुरवून चांगले शेजारी/शेजारणी/शेजार निर्माण करणे गरजेचे आहे.
18 Dec 2012 - 1:13 pm | गवि
धन्यवाद. हे आदर्श आहे पण ऑलरेडी अनुभव घेऊन झाले आहेत.
इथे असं उलट आहे की एरवी खतपाणी घालून जोडलेले शेजारी असलं काही लोढणं गळ्यात पडलं की दुरावतात. खुराड्यासारख्या फ्लॅटांमधे दुसर्याच्या कुंड्या आणि त्यांच्या गळक्या पाण्याची मॅनेजमेंट करण्याइतकी जागा नसते. स्पष्टवक्तेपणा हा गुण खूप वाढीला लागला आहे मेट्रो सिटीजमधे.
म्हणून शक्यतो शेजार्याला तसदी न देणं हाच शेजारीप्रेम टिकवण्याचा मार्ग असल्याचा साक्षात्कार झाला आहे.
18 Dec 2012 - 1:38 pm | बाळ सप्रे
आम्ही कुंड्या घराबाहेर जिन्यात ठेवतो आणि वॉचमनला पाणी घालायला सांगतो. अजुनतरी सगळं बरं चाललय. :-)
18 Dec 2012 - 12:44 pm | गणपा
अगदी खरं गवि.
यावर उपाय म्हणुन माझ्या आई-बाबांनी घरगुती ठिबक सिंचन केलं होतं. एक लांब (रबरी) पाईप सर्व कुंड्यांतून खेळवला होता आणि त्याला प्रत्येक कुंडीच्या तोंडाशी सुक्ष्म भोक पाडलं होतं. बाहेर जाताना नळ अगदी लहान (उघडा) ठेउन जायचे, जेणेकरुन एक एक थेंब ठराविक काळाने पाणी सोडेल.(पाईपचं एक तोंड नळाला लागलेलं तर दुसरं टोक दुमडून बंद केललं) (आमच्या सोसायटीत २४ तास पाण्याची सोय असल्याने हे शक्य होतं. नसल्यास घरात टाकी असेल तर त्याची जोडणी घ्यावी.) ज्या कुंड्या फार लांब होत्या त्यात २ लिटरची मोठी बाटली सलाईन सारखी टांगुन ठेवायचे. त्यालाही अगदी बारीक भोक असायचं.
सध्या सोसायटीने बाल्कनीत कुंड्या ठेवायला मज्जाव केल्याने सगळी बागच गावाला न्यावी लागली. एके काळी वांगी मिरच्या, टॉमेटो (कलिंगडं खालच्या मोकळ्या जागेत.) आणि अनेक फुलझाडं यांनी बाल्कनी भरलेली असायची.
फळ झाडांना कळ्या लागल्या पासुन त्यांचा फळा पर्यंत होणारा प्रवास पहाताना कस प्रसन्न वाटायचं.
18 Dec 2012 - 1:19 pm | गवि
हा उपाय चांगला वाटतो. फक्त बारीक नळ नेमका आणि सतत बारीक वाहात राहील किंवा नाही अशी कुशंका येते. इथे सर्व सोसायट्यांमधे कोणाच्या बंद घरात नळ वाहात राहिला (बारीकसादेखील) तर कुठूनसा डिटेक्ट होतो आणि नोटीससह दंड होतो.
बारीक सोडून गेलेला नळ पाण्याच्या बदलत्या प्रेशरने भसाभसा वाहायला लागू शकतो. यावर उपाय म्हणजे ती सलाईनसारखी स्टोरेज सिस्टीम योग्य वाटते. लिमिटेड रिस्क... :)
18 Dec 2012 - 1:32 pm | गणपा
नळाचा कै प्रॉब्लेम नव्हता हो. कुंडीतुन गळणारं लाल पाणी ईमारतीचा रंग खराब करतो म्हणुन फतवा निघाला होता. :(
18 Dec 2012 - 11:42 pm | मराठे
गवि, ठिबक सिंचनासारखाच पण जरा चांगला दिसणारा हा (http://www.aliexpress.com/item/Free-shipping-AQUA-GLOBES-HAND-BLOWN-GLAS...) प्रकार इथे बघायला मिळतो. या काचेच्या फुग्यात पाणी भरून तो कुंडीतल्या मातीत खोचून ठेवल्यानंतर हळूहळू झाडाला पाणी मिळत राहतं.
18 Dec 2012 - 1:45 pm | अन्जलि
३/४ दिवसासाठि जायचे असेल तर कुण्डिच्या खालि गोणपाटावर खुप पाणि घालुन ठेवावे म्हण्जे झाडे त्याना हवे असलेले पाणि शोशुन घेतात. वाळत नाहित प्रयत्न करुन बघा.
18 Dec 2012 - 2:15 pm | neeta
तुमच्या सर्वांच्या प्रतिसादाबद्द्ल धन्यवाद, तुमच्यामुळे मला पण काही नवीन उपाय कळले. अजून एक उपाय म्हणजे प्लास्टीकच्या नको असलेल्या बाटल्या घेऊन त्याला छोट भोक पाडावे व त्यात पाणी भरुन ते प्रत्येक कुंडीत आडवे करुन ठेवावे अथवा टांगून ठेवावे म्हणजे थोडे थोडे पाणी पड्त राहील. भोक जास्त मोठे नसावे. व पाणी पड्त आहे ना हे तपासून पहावे. ईछा असेल तर मार्ग सापडतो.
18 Dec 2012 - 2:17 pm | श्री गावसेना प्रमुख
माझ्या बागेतल एक फुल मि पा करांना
18 Dec 2012 - 11:15 pm | प्यारे१
तुम्ही रोज फूल करता मिपाकरांना आणि त्यात हे फुल कशाला? ;)
19 Dec 2012 - 9:11 am | श्री गावसेना प्रमुख
कुणाला फुल केलय बर मी,नाहीतरी आमच्या सारखे सज्जन आम्हीच आहोत.
19 Dec 2012 - 10:42 pm | केदार-मिसळपाव
काय मस्त कोवळ वान्ग लागलय...भरलेल्या वान्ग्याची भाजी अणि भाकरी होउन जाउ देत....