ग्रील्ड अ‍ॅपल अँड व्हेज सॅलॅड

सानिकास्वप्निल's picture
सानिकास्वप्निल in अन्न हे पूर्णब्रह्म
21 Nov 2012 - 3:30 am

साहित्यः

१ वाटी पातळ उभा चिरलेला कोबी (तुम्ही हिरवा, पांढरा कुठलाही कोबी वापरु शकता, मी जांभळा वापरला आहे)
१ वाटी पातळ उभे चिरलेले गाजर
१ मोठ्या सफरचंदाचे पातळ स्लाईस
४-५ लाल मुळ्याचे पातळ स्लाईस
अगदी थोडासाच पातळ चिरलेला पांढरा कांदा
७-८ पुदीन्याची पाने
७-८ अक्रोड

लेमन ड्रेसींगसाठी साहित्यः

१ टेस्पून लिंबाचा रस
१ टेस्पून ऑलिव्ह ऑईल
मीठ चवीनुसार
ड्राईड हर्ब्स आवडीनुसार

.

पाकृ:

सफरचंदाच्या स्लाईसेस ना ग्रील पॅनवर दोन्ही बाजूने ग्रील करुन घ्या.
सॅलॅड ड्रेसींगचे सर्व साहित्य एकत्र करुन फेटून घ्या.
एका बाऊलमध्ये कोबी, गाजर, कांदा, मुळा व पुदीना घालून एकत्र करा.
त्यावर तयार लेमन ड्रेसींग ओता व हलक्या हाताने एकत्र करा.

.

सॅलॅड तयार आहे :)

.

सर्व्ह करतेवेळी वरुन अक्रोड घाला व खायला सुरु करा हे पौष्टीक सॅलॅड :)

.

नोटः

ह्यात तुम्ही आवडत असेल तर लेट्युसची पाने, पालकाची पाने, Arugula ही घालू शकता.
आवडीप्रमाणे ह्यात बदाम, मनुके किंवा पाईन नट्स ही वापरु शकता.
लेमन ड्रेसींगऐवजी अ‍ॅपल साईडर व्हिनेगर, दालचिनीपूड आणी मधाचा ही वापरु शकता.

प्रतिक्रिया

मैत्र's picture

21 Nov 2012 - 4:05 am | मैत्र

--/\--
अजून काय बोलणे!

छानच. अगदी रंगीबेरंगी! नक्की ट्राय करणार.

ऋषिकेश's picture

21 Nov 2012 - 10:38 am | ऋषिकेश

वॉव!

मी_आहे_ना's picture

21 Nov 2012 - 10:55 am | मी_आहे_ना

झकास

मोदक's picture

21 Nov 2012 - 12:11 pm | मोदक

मस्त... नेहमीप्रमाणेच.

सस्नेह's picture

21 Nov 2012 - 12:29 pm | सस्नेह

मला दाट संशय आहे की सानिकातैच्या घरात एक स्पेशल फोटो थिएटर आहे, ज्यात रंगीबेरंगी भांडी अन चमचे ठेवले आहेत अन special light effet ची सोय आहे !

नक्शत्त्रा's picture

21 Nov 2012 - 12:47 pm | नक्शत्त्रा

छान..कौतुक करावे तेवढे कमीच.
दीवाळी चे फराळाचे पदार्थ खाएचे झाल्यावर ..ओर्गनिच आनि पौष्टिक कॉंबिनेशन आहे छान पण लागतं सॅलॅड.
लाल मुळ्आ कुथे मिलेल???????????
शोधायला हवा....

जयवी's picture

21 Nov 2012 - 1:10 pm | जयवी

एकदम सही :)
तुझे प्रेझेंटेशन बघून अगदी लगेच पदार्थ उचलून तोंडात टाकावासा वाटतो गं :)

मस्तच एक्दम.... ग्रील्ड अ‍ॅपलची आईडिया आवडली.

स्वाती दिनेश's picture

21 Nov 2012 - 3:12 pm | स्वाती दिनेश

मस्त आहे रंगीत सॅलड..
स्वाती

मदनबाण's picture

22 Nov 2012 - 9:50 am | मदनबाण

मस्त !
ऑलिव्ह ऑईलमुळे एक वेगळीच चव येते. :)

प्रत्यक्ष खाण्यापेक्षच,पाहूणच मन त्रुप्त झाले....:)

अत्रुप्त आत्मा's picture

22 Nov 2012 - 3:09 pm | अत्रुप्त आत्मा

यहिच बोल्ता है...! :-)

कच्ची कैरी's picture

22 Nov 2012 - 1:43 pm | कच्ची कैरी

डोळे सुखावले ,मस्तच !

त्रिवेणी's picture

22 Nov 2012 - 8:51 pm | त्रिवेणी

मी मि. पा. ची वाचनमात्र सदस्य असल्या पासून सानिकाजी, गणपाजी चे पदार्थांची मांडणी पाहते आहे. खरच खूप छान आणि त्यांची भांडी पण छान छान आहेत.

प्रभाकर पेठकर's picture

25 Nov 2012 - 9:56 am | प्रभाकर पेठकर

वजन कमी करण्यासाठी, आहार नियंत्रणांत, जेवणाऐवजी एक छान, चविष्ट पर्याय.

पैसा's picture

25 Nov 2012 - 8:07 pm | पैसा

अगदी रंगीबेरंगी आणि हेल्दी पर्याय. धन्यवाद या पाकृसाठी