फुक्कटचे पाटील

टारझन's picture
टारझन in काथ्याकूट
27 Jun 2008 - 1:42 am
गाभा: 

रामराम मित्रांनो,
"पाटील" .... खेड्या-पाड्यातली एक मानापानाची पदवी. आपल्या महाराष्ट्रातील खेड्यांत 'पाटलां'ना फार आदराने
संबोधलं जातं. लग्न असो वा मयत, शालेय समारंभ किंवा गावची जत्रा..." पाटील" लोक नेहमी पूढाकार घेत अलेत आणि
जनताही हेच अपेक्षित करते. थोडक्यात काय तर "पाटलां"शिवाय पान हालत नाही.
पण हे झाले मानाचे 'पाटील' .....

पाटलांची अजुन एक जमात आहे . हे आपल्या कर्माने 'पाटील' होतात. त्यासाठी , खालिल अटी लागु होतात,
थोड्याश्या स्तुतीने हूरळून जाऊन टग्या लोकांना चहा मिसळपाव खाऊ घालणे, "ढूंगणा"ला ठिगळ लागलेले
असले तरी निवडनूकीला ऊभे राहुन स्वता:चा आण्णू गोगोट्या करुन घेणे, जमिनी विकून स्कोर्पियो घेणे
(या पाटलांना "गुंठामंत्री" असे स्पेशल नाव आहे )
आता त्या स्कोर्पियोचा एवढा पानऊतारा झालायं यांच्या मुळे की , तुम्ही जर स्कोर्पियो घेतली तर लोक आधी विचार करतात
याने जमिन काढली वाट्ट. यांना 'अ' म्हणता 'ढ' लिहिता येत नाही ... पण खिश्याला पार्करचं पेन असतं.
हे 'पाटील' आपल्या आजूबाजूला सहज सापडतील...
मला एक असाच 'पाटील' आठवतो.

इंजिनियरींग ला कॉलेजात असताना, असाच एक पाटील होता ( योगायोगानं 'अडं'नावाने आणि कर्मानं)
राजू पाटील , मू.पो. जळगाव. यांच्या घरची परिस्थिती बेताचिच... वडिलांनी पोटात पोट काढून चिरंजीवांना इंजिनियरींगला
टाकलं. पहिल्यांदाच पूण्यात आलेले. ऊन्हाळ्यात घामाच्या धारा वाहील्या तरी 'गरमागरम' चहा ढोसू शकणारे महा'भाग'.
यांना पोरी पटवायचा नाद.मध्यम उंची, रंग अतिकाळा (यांच्या मता प्रमाणे पोरी काळ्यांवरंच फिदा होतात,
"उगाचं नाय आपण आपल्याला आसा ठीवला" असा अभिमानाने सांगणारा , तरीही फेअर & हँड्सम फासणारा)...
वजन; कपडे,पायतान आणि तेरेनाम स्टाईल केस धरुन ३७ किलो ३४७ ग्राम.
आख्ख्या होस्टेल वर "दानपेटी" म्हणून प्रचलित /प्रसिद्ध काय ते. कारणे सांगून, भावनाविवश करुन पैसे काढून घेण्यात निपूण,
आणि बाता आसल्या मोठ्या हाणाव्यात की आपल्याला एवढ्या महान व्यक्तीचा सहवास लागल्याचा अत्यानंद होऊन ह्रुदयविकार
व्हावा. यांनी आक्ख्या इंजिनियरींग मधे कधी चारचौघात खिशात हात घातल्याचे स्मरणात नाही.
झालं. कॉलेजच्या एका पोरीशी चुकून जवळीक झाली... पाटलांचा खिसापैसा त्यांनाच पूरत नव्हता.. त्यात हे हायफाय
पोरीला फिरवायचे स्टंट करु लागले. नेहमी हक्काने अस्मादिकांची यामाहा घेऊन जात (अति घनिष्ट मैत्रि असल्याने विचारने म्हणजे
तो दोस्तीचा अपमान होतो अशी पाटलांची समजूत ) आता यामाहाच ती.. तीची तहान मोठीच... यावर पण पाटील एक बकरा
शोधून तिची तहान भागवत. मग पोरीला स्वखर्चाने (?) सिनेमे दाखवणे, आता पोरगी ऊच्चअपेक्षा आणि यांचा स्वभावच मोठा
असल्या कारणाने अलका, मंगला, लक्ष्मीनारायण असल्या लो लेव्हल च्या सिनेगग्रुहात न जाता , ई-वर्ग(e-square),
शहर-अभिमान(city pride) किंवा आयनॉक्स थेटरात सूवर्णवर्गाचंच टिकीट काढलं जाई. जोश्यांकडे न जाता , चकाचक
काचांच्या मॅकडोनाल्ड काकांच्या जोरात्-अन्न ग्रुहात 'पाटील' मोठ्या थाटानं जात. आठ्वड्याला उसणं-पासणं करून का होईना
एक गिफ्ट घेतलं जाई. आणि पोरीने मलप्रुष्टावर लाथ हाणली की पाटील वरच्या आवाजात "आमू लै पूरी फिरवल्या भो " अशी
सिंहगर्जना करणारे आमचे पाटील ,,,, आयुष्यभर लक्षात रहातील.....

अशी पाटीलकी करणारी माणसं आपणं रोज आजुबाजुला बघतो...
"खिशात नाही आना.. अन बाजिराव म्हणा" काय असले पाटील आपल्या परीचयात आहेत ?
असल्यास लिहायला लाजू नका !!

आपला
कुबड्या पाटील

प्रतिक्रिया

लेखन आवड्ल्यास एक चांगला शब्द किंवा ते भंगार असल्यास सताठ शिव्या घालण्याची मिपाकरांनी क्रुपा करावी....

चातक) कुबड्या


तू भारी ...तर मी लई भारी...


http://picasaweb.google.com/prashants.space

पिन्ट्यासर्किट's picture

27 Jun 2008 - 6:47 pm | पिन्ट्यासर्किट

पश्या अगदी पू.ल. शोभलास..................................

दिल खुश हुआ........................

जय महाराष्ट्रा!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!

अभिज्ञ's picture

28 Jun 2008 - 4:35 pm | अभिज्ञ

पश्या अगदी पू.ल. शोभलास..................................
:SS
कशाला राव उगाच पू.लं. ना कमीपणा आणताय?
कुबड्या खवीस जी,
काहि मुद्दे सांगावेसे वाटतात, तरी राग मानू नये...
लेख चांगला जमला आहे,तरी सुध्दा अजून सुधारणेला भरपूर वाव आहे.
असले लेखन हे कुठल्याहि "आडनाव,जात,धर्म,पंथ,व्यक्ती" सापेक्ष नसावे,असे वाटते.

असो,
पुलेशु.

अभिज्ञ.

पुलंच्या बाबतीतली वरील भाषा आता सुधारली आहे. त्यांच्याबाबतीत शब्द जपून वापरवेत! -- जनरल डायर.

काय मारताय?

तात्या काय हे?
आपल्या प्रिय भाईकाकांबद्दल असं मी वाचू शकत नाही?
या माणसाचं मत बाकी काहीही असू दे.. मला हा प्रतिसाद या वाक्यामुळे आवडला नाही..

विसोबा खेचर's picture

29 Jun 2008 - 8:09 am | विसोबा खेचर

सुधारणा केली आहे...

लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद..

तात्या.

एक's picture

30 Jun 2008 - 11:39 pm | एक

कालच्या प्रतिसादात सांगायचं राहून गेलं..

कु. ख. चा लेख पण आवडला. आमच्या वर्गातल्या एका नावाने आणि कामाने पण पाटील असलेल्या एकाची आठवण झाली..

टारझन's picture

1 Jul 2008 - 2:35 am | टारझन

श्रीमान एक ...
आपल्या प्रतिक्रीयेबद्दल आभार... आपल्याला असे पाटील आठवावे आणि ते आपन मिपावर खरडावेत यासाठी हा काथ्याकूट.


तू एक ...तर मी एकावर एक ;)...


http://picasaweb.google.com/prashants.space

टारझन's picture

29 Jun 2008 - 5:33 am | टारझन

अभिज्ञ दोस्ता ,

......... ईथे लिहीलेला लेख पूलंची बरोबरी किंवा कॉपी करणारा नाही,पुलंचा एकच शब्द फक्त वाक्प्रचार म्हणून वापरला आहे. त्यावर आलेली प्रतिक्रीया ही वैयक्तिक आहे.
-------------- प्रतिक्रीया **** वाट्ली. हे विधान करुन आपणच विधानातले कर्म केले आहे,,, असो..
>>> असले लेखन हे कुठल्याहि "आडनाव,जात,धर्म,पंथ,व्यक्ती" सापेक्ष नसावे,असे वाटते.
आपला जर मराठी समाजात वावर असता तर सहज लक्षात आलं असतं की लिखान हे कुठल्याहि "आडनाव,जात,धर्म,पंथ,व्यक्ती" 'टार्गेट' करून लिहीले नाहीये त्यामूळे हेही चुक.

>>>>तरी सुध्दा अजून सुधारणेला भरपूर वाव आहे.
हे मी मान्य करतो. सुधारणेला खुप खुप वाव आहेच. माझा १लाच 'ट्राय' असल्याने आपण थोरांनी पामरांना थोडंस समजुन घ्यावं

आपल्या प्रतिक्रीयेबद्दल मनस्वी आभार ..मला कोणाचाही राग येत नाही. प्रतिक्रीया मूद्देसूद असावी. यातुन आम्ही लेखन ऊत्तमोत्तम करण्याचा प्रयत्न करू

आपला नम्र
खविस


तू भारी ...तर मी लई भारी...


http://picasaweb.google.com/prashants.space

~X( :T

बाय द वे ...अगदी पूल शोभलास?? म्हात्रे पूल की लकडी पूल? :))
-अघळ पघळ

टारझन's picture

2 Jul 2008 - 3:05 pm | टारझन

फारंच अघळ-पघळ प्रतिक्रीया.....मी खरं तर पोलादी पूल. आजमावयाचं असंल तर येतोस का रिंगणात....
अरे बाळा/अहो अघळ-पघळराव(वयानुसार घ्या) ती वैयक्तिक प्रतिक्रीया आहे. ज्याला जे वाटलं ते लिहीलं. तुम्हाला मिरची झोंबलेली समजू शकतो. मी स्वता:ला पुलंसारख्या(हे माझे लाडके पुल देशपांडे.. आता यांवरही जर काही बोलणार असाल तर दंतविमा उतरवा) दैवी प्रतिभा लाभलेल्या महापूरूषाशी बरोबरीचा विचार पण नाही करू शकत रे/हो.

सडेतोड) कु.ख.


तू भारी ...तर मी लई भारी...


http://picasaweb.google.com/prashants.space

शैलेन्द्र's picture

27 Jun 2008 - 2:43 pm | शैलेन्द्र

आवडला लेख, अशांचे अजुन किस्से सांगता येतील.

अवि's picture

27 Jun 2008 - 6:55 pm | अवि

सुदॅवाने म्हणा किंवा दुरदॅवाने म्हणा आमच्या नशिबाला ही असेच पाटिल आणि त्यांचे काही सहकारी आले आहेत.
त्यांच्या गंमती जमती लवकरच आपणास सांगणार आहे.

चिखलू's picture

27 Jun 2008 - 7:11 pm | चिखलू

लेख चांगला आहे पण हे फक्त पाटलांसाठीच मर्यादीत नाही असे वाटते...

टारझन's picture

27 Jun 2008 - 7:29 pm | टारझन

>>> लेख चांगला आहे पण हे फक्त पाटलांसाठीच मर्यादीत नाही असे वाटते...

मालंक ... जे काही नमूद केले आहे त्यात सगळे सामावले आहे... जे आडनावाचे पाटील नाहीत पण आपली ल क्षणे दाखवतात ... त्यानां "कर्मा"चे पाटील
संबोधन्यात आले आहे


तू भारी ...तर मी लई भारी...


http://picasaweb.google.com/prashants.space

प्रसन्न.कुलकर्णी's picture

27 Jun 2008 - 7:11 pm | प्रसन्न.कुलकर्णी

आवडल बर का... उत्तम

लिखाळ's picture

27 Jun 2008 - 10:07 pm | लिखाळ

मजेदार...
कॉलेजमध्ये असताना माझ्या वर्गात सुद्धा असा एक मुलगा होता. तो खूप श्रीमंत होता, फॅशनेबल कपडे वगैरे असायचे..पण चहा-वडापावच्या वेळेस मात्र पैसे मागयला यायचा.. तेंव्हा २रु मध्ये काम व्हायचे.. असे पाच साहा वेळा झाले.. मी कुठून दर वेळी पैसे देणार ! त्याच्या श्रीमंतीच्या गप्पा चालूच.. मग एकदा त्याला मी म्हटले की मागच्या वेळी घेतलेले पैसे दे मग यावेळचे देतो.. त्यावर दोन रुपयासाठी काय कंजुषपणा करतोस असे तोच मला म्हणाला. हा हा हा ! पहा कसे लोक असतात..
-- (अचंबित) लिखाळ.

विसोबा खेचर's picture

28 Jun 2008 - 8:07 am | विसोबा खेचर

लेखन आवड्ल्यास एक चांगला शब्द किंवा ते भंगार असल्यास सताठ शिव्या घालण्याची मिपाकरांनी क्रुपा करावी....

शिव्या घालण्याची गरज नाही, लेख आवडला..! :)

तात्या.

टारझन's picture

28 Jun 2008 - 11:47 am | टारझन

तात्या ,
आपली प्रतिक्रीया इथे चिकटली ... लई आनंद झालायसा....
शिया घालन्या इकत वंगाळ नसंल तरी काहीबाही त्रुती हायेत .... त्ये फूड्चे पाटील दूर करत्याल......

तात्या (विंचु?!?)चा ऊजव्या हाताचा आंगठा
०००००००००००० कुबड्या खविस


तू भारी ...तर मी लई भारी...


http://picasaweb.google.com/prashants.space

शैलेन्द्र's picture

28 Jun 2008 - 4:05 pm | शैलेन्द्र

पाटलांची अजुन एक जमात आहे. ही जमात, त्यांचे वेगवेगळे नातेवाईक, राजकारण आणि प्रशासनात कसे मोठ्या पदांवर आहेत, ते अईकवते.

शैलेन्द्र's picture

28 Jun 2008 - 4:09 pm | शैलेन्द्र

आयनॉक्स= आयना + ऑक्स.. आरसा बैल..........

शैलेन्द्र's picture

28 Jun 2008 - 4:10 pm | शैलेन्द्र

आय नो ऑक्स= मी बैल नाहि.........

टारझन's picture

28 Jun 2008 - 5:07 pm | टारझन

भारी रे शैल्याभाई.....
>>>आय नो ऑक्स= मी बैल नाहि.........
एक नंबर ... मी त्या आयनॉक्स वर टाळू खाजवून वैताग्लो होतो////

आणि हो ... तू वर्णन केलेले पाटील लवकरच पूढच्या भागात येत आहेत.


तू भारी ...तर मी लई भारी...


http://picasaweb.google.com/prashants.space

शैलेन्द्र's picture

28 Jun 2008 - 10:25 pm | शैलेन्द्र

आभरि आहे

वेताळ's picture

29 Jun 2008 - 2:26 pm | वेताळ

पाटिल ही एक गावकामगाराला पुर्वीच्या काळी दिलेली पदवी होती. फारतर ३००/३५० वर्षापासुन पाटिल हा शब्द प्रचलित आला.परंतु पाटलाची जोड ज्या वेळी गावातल्या भटाबरोबर जमली ,त्यावेळेपासुन ह्या दुकडीने बाराबलुतेदाराना ठगायला सुरुवात केली.तेच ठगणे आजही वेगवेगळ्या पध्दतीने चालु आहे. मस्त लेख लिहिला आहे. पण तुम्हाला भेटलेले सर्वच पाटिल नालायक नसतील असे मला वाटते. पुढच्या लेखाची वाट पाहात आहे.
वेताळ

शैलेन्द्र's picture

29 Jun 2008 - 6:44 pm | शैलेन्द्र

काहीतरी गडबड होतिय,

हा लेख नावाच्या पाट्लांसाठी नसुन कर्माच्या पाटलांसाठी आहे.

अनन्त जोशि's picture

1 Jul 2008 - 11:46 pm | अनन्त जोशि

>>>>असले लेखन हे कुठल्याहि "आडनाव,जात,धर्म,पंथ,व्यक्ती" सापेक्ष नसावे,असे वाटते.
आपला जर मराठी समाजात वावर असता तर सहज लक्षात येते की लिखान हे कुठल्यातरी "आडनाव,जात,धर्म,पंथ,व्यक्ती" 'टार्गेट' क रु न लिहीले आहे....असे असने योग्य नाही..............

टारझन's picture

2 Jul 2008 - 1:15 am | टारझन

सर्वप्रथम लेखाची दखल घेऊन प्रतिक्रीयेचे काबाडकष्ट घेतल्याबद्दल मनस्वी आभार
जोशीबुवा मला एक सांगा....मराठी बोलण्यात जर एखादा पैशाचा मिजास करत असेल तर आपण सहज म्हणून जातो " काय बाजीरावकी करतोंय !!" नाही का? एखादा जर फार स्वच्छतेची काळजी घेत असेल तर आपन त्याला बामंन ऊल्लेखतो... अशावेळी आपण त्याला .. बाजीराव नावाच्या लोकांचा अवमान किंवा ब्राम्हण जातीचा अवमान म्हणाल काहो?
...........ही ऊगाच ताणायची प्रतिक्रीया काय पटली नाही बुवा ....
आमच्या मराठीत तरी उगाच मोठेपणा दाखवणार्‍याला ऊपहासाने 'पाटील'म्हणतात. यात कून्नालाही कुठेही 'टार्गेट' करण्याचा मला ५०० आकाशगंगा दूरपर्यंत तरी संबंध दिसत नाही.
आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो.. आमची पण पाटीलकी आहे गावाकडे...
आणि याऊपरही आपल्या (कारण नसताना) भावना दूखावल्या असंतील तर मी अत्ता जो पाटील-२ लिहीतोय ही फाईल शिफ्ट्+डीलीट करतो....

लहान-थोरांचा मान ठेवण्याची, जातीभेद न मानन्याची लहानपणापासूनंच शिकवण मिळालेला
अतिनम्र
कुबड्या खवीस

तू भारी ...तर मी लई भारी...


http://picasaweb.google.com/prashants.space

मुक्तसुनीत's picture

2 Jul 2008 - 1:28 am | मुक्तसुनीत

खवीस राव,
सार्वजनिक स्थळांवर वावरताना, तुम्ही जे लिहीता त्यावर उलटसुलट प्रतिक्रिया या येणारच ! त्यांचा विचार करणे योग्यच , शक्य होईल त्या मुद्द्यांचा प्रतिवादसुद्धा करावा. पण आपले लिखाण "डीलीट" करण्याइतपत कडेलोटाला जायची काय गरज आहे ? तुमचे दिल साफ आहे ना ? झाले तर ! शेवटी तुमचे लिखाण वाचून आपले मत काय , हे सांगण्याचा सर्वाना हक्क आहेच की. एकमेकांचा अपमान, शिवीगाळ न करता कुणी काही बोलत असेल , तर एकूण सगळ्या व्यवहाराकरता ही बाब पोषकच म्हणायला पाहिजे.

तेव्हा तुम्ही आपले लिखाण करा, स्तुतीचा स्वीकार करा, विरोधी मुद्द्यांचा प्रतिवाद करा, स्वतःचे काही चुकले असे वाटल्यास आपल्या लिखाणतला तेव्हढा भाग "डिस्-ओन" करा किंवा खोडा. याहून जास्त टोकाचे काही करण्याची/वाटून घेण्याची आपल्याला काय गरज , नाही का ?

टारझन's picture

2 Jul 2008 - 1:44 am | टारझन

पण टीका जरा पर्सनलं झाली ..ध्यानी ना मनी.. आलं कानी (आमचं क्रियेशन) असं झालं बघा. माझ्या लिखानातल्या त्रूटी कितीही ऊपहासाने सांगा मला राग नाही येत ऊलट मीच हसतो गालात. पण ईथे हेतूवरच प्रश्नचिन्ह लागलं. आता मन जरी साफ असलं .. पण तरीही 'ध' चा 'मा' आधीपासंनच होणार हे माहीत असताना लिहीण्या हूरूप वाटत नाही. लिखाणात भरपूर त्रूटी असल्याचे मला आपण थोरांनी अगदी साफ मनाने सांगितलं.. मला फार आनंद झाला.मी नेहमी स्वता:ला अजून चांगले कसे करता येईल याचा विचार करतो. जे काही करतो ते १० वेळा विचार करून करतो. पण जर कोणी माझ्या हेतूवरंच (?) ठेवलं तर नाही रहावलंजात.
माफी असावी. हे माझं मत आहे.


तू भारी ...तर मी लई भारी...


http://picasaweb.google.com/prashants.space

धमाल नावाचा बैल's picture

2 Jul 2008 - 9:51 am | धमाल नावाचा बैल

एखादा जर फार स्वच्छतेची काळजी घेत असेल तर आपन त्याला बामंन ऊल्लेखतो...

=)) =))
कुबड्या तुज्या पायांचा फोटो असेल तर एक चिकटव बाबा इथ!

्रतिक्रीयेचे काबाडकष्ट घेतल्याबद्दल मनस्वी आभार

मनस्वी नाही रे राजा..मनापासून. बाकी चालू दे!

(स्वछतेची काळजी घेनारा बामन) बैलोबा!

टारझन's picture

2 Jul 2008 - 11:27 am | टारझन

प्रिय बैल .. आपली प्रतिक्रीया आमच्या डोक्याच्या वरुन गेली.. एका साध्या वाक्यावर आपण हसून गोठ्यात खड्डा केलात आणि आमच्या उलट्या पायांचा फोटो मागितला.... कळालं नाही पामराला.

रायला प्रस्न सूद्लेकनाचा..... मनस्वी मनापासून ...... आमाला नाय कळत बा ते ...
आमी आसूदच लिवनार.... मिपाचे माझ्यापेक्षा जूने सदस्य दिसता.... तरीही ?
असो...

अस्वच्छ आणि असूद् लिवनारा
कू.ख.


तू भारी ...तर मी लई भारी...


http://picasaweb.google.com/prashants.space

टारझन's picture

2 Jul 2008 - 12:47 pm | टारझन

०००

लेखामधे आलेला "पाटील" हा पदार्थ "विशेषण" म्हणून चालवण्यात आला आहे .. "नाम" म्हणून नव्हे.
वाचकांना नम्रविनंती. विपर्यासाने आमचा ऊष्मा प्रचंड वाढतो आणि ........अर्रे विज्ञान सूरू झालं


तू भारी ...तर मी लई भारी...


http://picasaweb.google.com/prashants.space

वेताळ's picture

2 Jul 2008 - 11:42 am | वेताळ

आम्ही पण पाटिलच आहोत,राग नाही आला आम्हाला.असे खुप लोक आहेत बाबा. पाटिल आहे म्हणुन बाई,बाटली ह्यात रमणारे आणि आता देशोधडीला लागलेले.लिखाण चालु ठेव अवगुणावर बोट ठेवले कि राग येतोच प्रत्येकाला.
वेताळ

>>>>अवगुणावर बोट ठेवले कि राग येतोच प्रत्येकाला.
.... कोणाचे अवगूण ? माझे ? प्लिज सांगा मला.... अवगूण कळाले तर मी अवश्य मझ्यात सूधारणा करेल.
मला आजपर्यंत कधीही माझ्या अवगुणांवर बोट ठेवल्याने राग नाही हो आला


तू भारी ...तर मी लई भारी...


http://picasaweb.google.com/prashants.space

अनिल हटेला's picture

2 Jul 2008 - 12:29 pm | अनिल हटेला

ये कुबड्या !!!

आपल्यला आवडल रे तुझ लिखाण !!!

आनी असच लिहीत राहा.....

ज्याला त्याला वैयक्तीक मत असतात....

आणी माझ वैयक्तीक मत आहे की, तुमच लिखाण छान आहे...

उत्तरोत्तर अजुन सुधारना होत जातील....

बाकी लहान तोन्डी मोठा घास पन आपल खविस लोका सोबत चान्गल जमत ,

बर का?

-- ऍनयू उर्फ बैल
~~~ आमची कोठेही शाखा नाही~~~

टारझन's picture

2 Jul 2008 - 12:44 pm | टारझन

लिखाण आवडल्याबद्दल आभार. मी प्रत्येकाच्या मताचा आदर करतो. प्रॉबलेम तेंव्हा येतो जेंव्हा माझ्या हेतूवर कोणी ? करतो.
मी शेंगा खाल्ल्या नाही... मी टरफले ऊचलायचा प्रश्नंच येत नाही, असे म्हणनार्‍या टिळकांना कोणी जर उर्मट्/ऊद्धट म्हणाला तर आपल्या पैकी कोणीही हे सहन करणार नाही ... करेल ?

>>>बाकी लहान तोन्डी मोठा घास पन आपल खविस लोका सोबत चान्गल जमत ,
नक्कीच ... आपल्याशी दोस्ती करण्यास ऊत्सूक !


तू भारी ...तर मी लई भारी...


http://picasaweb.google.com/prashants.space

अनन्त जोशि's picture

2 Jul 2008 - 5:14 pm | अनन्त जोशि

मी फक्त सुचना केली होती ......चर्चा जास्तच होतेय...

बबलु's picture

9 Jul 2008 - 4:35 am | बबलु

बरोबर आहे. प्रातिनिधीक उदाहरण आहे हे.
anyway...कुबड्या चे observation छान आहे.
मीही असे नमुने पाहेलेत कोलेजात.
कॉलेज ची आठ्वण झाली.
धन्यवाद...

आपला,
बबलु-अमेरिकन

टारझन's picture

9 Jul 2008 - 12:34 pm | टारझन

आभरी आहोत सगळ्यांचे... प्रत्येक चांगल्या वाईट प्रतिक्रीयेचे स्वागत आणि आभार ....


तू भारी ...तर मी लई भारी...


http://picasaweb.google.com/prashants.space

मिसंदीप's picture

5 Sep 2008 - 8:17 pm | मिसंदीप

मुळ लेखकाने लिहिलेल्या व्यक्तिरेखा आपल्याला स्वतःच्या आयुष्यात सुद्धा अनुभवास येतात.
हि लोके स्वतःकडे काही नसताना सुद्धा बरेच काही असल्याचा आव आणतात. सर्वात मोठी चरफड होते जेव्हा या असल्या दिखाऊ लोकांच्या नादाला या "सुंदर्‍या" लागतात. बाकि तर काय सुज्ञ मंडळी जाणतातच.. त्या मुळे ते न लिहिलेलेच बरे..

सखाराम_गटणे™'s picture

1 Oct 2008 - 1:28 pm | सखाराम_गटणे™

पुढचा भाग टाकरे लवकर

-----
वाहनचालक मुली पाहिल्या की मी पाय सुरक्षित ठिकाणी ठेवतो आणि मेडीक्लेम कार्ड व्यवस्थीत आहे का ते पाहतो.

वैशाली हसमनीस's picture

1 Oct 2008 - 2:06 pm | वैशाली हसमनीस

मला वाटत हा लेख जाति-धर्म वाचक नसून स्वभाववैशिष्ट्य दाखविणारा आहे.अशी माणसे आपल्याला सगळीकडे भेटतात.त्यात जाति धर्माचा संबंध येतो कोठे?

विनायक प्रभू's picture

1 Oct 2008 - 3:28 pm | विनायक प्रभू

http://vipravani.wordpress.com/
हे टार्झटा,
मी काय म्हणतो आहे समजतय ना तुला.
vi प्र