साहित्य--दोन वाट्या बासमती तांदूळ,प्रत्येकी पाव वाटी चणा डाळ्,उडीद डाळ व शेंगदाणे,जिरे, कढीपत्ता,लिंबाएवढी चिंच,मोहोरी,हिंग,मीठ,तेल
कृति --प्रथम बासमती तांदूळाचा भात शिजवून घ्यावा,नंतर तेल गरम करून त्यात मोहोरी ,हिंग,जिरे,कढीपत्ता टाकून फोडणी करून त्यातच चणा डाळ,उडीद डाळ व शेंगदाणे तळून घ्यावेत. नंतर भात त्यात घालावा, त्यात चिंचेचे पाणी व मीठ घालून सर्व मिश्रण वरखाली हालवून एक वाफ आणावी. हा भात रसम किंवा सांबार बरोबर खावा.
प्रतिक्रिया
25 Jun 2008 - 6:46 pm | अभिरत भिरभि-या
कर्नाटकात यालाच पुलियोगारे असे म्हण्तात ...
या पदार्थाची आम्ही करतो ती सोप्प्प्प्पी कृती:
प्रथम नेहमी सारखा कुकरवर भात लावावा. तो झाल्यावर एका पातेल्यात पुलियोगारेचा तयार मसाला भातासोबत तेलात परतावा ... शिळा भात ही टेष्टी लागतो
इकडे हा दह्याबरोबर देतात. बाकी वरिजनल कृतीसाठी वैशाली ताईंचे आभार
26 Jun 2008 - 8:14 am | विसोबा खेचर
पुलिहोराची पाकृही नेहमीप्रमाणे मस्त!
अजूनही येऊ द्या.....
तात्या.
17 Jul 2008 - 12:28 am | अन्या दातार
पुलिहोरा का पुलिहारा? मी तरी आंध्रात पुलिहारा असे ऐकले आहे! कृपया खुलासा व्हावा.
17 Jul 2008 - 3:10 am | प्रियाली
साध्या सरळ भाषेत याला टॅमरिंड राईस म्हणतात. ;)
पण आल्याचं (जिंजर) काय झालं? मिरची+कढीपत्ता+आल्याशिवाय या भाताला चव येणार नाही.
(दाक्षिणात्य) प्रियाली