आवाज साळुंख्यांचा

जागु's picture
जागु in कलादालन
19 Jul 2012 - 1:00 pm

आमच्या आवारात बर्‍याच साळुंख्या येतात. त्यांचे सततचे अस्तित्व जाणवुन देत असतो त्यांचा आवाज. त्यांच्या वेगवेगळ्या परिस्थितीनुसार त्यांचे आवाजही वेगवेगळे ऐकू येत असतात. त्यांचा जेंव्हा चांगला मुड असतो, सर्वसामान्य परिस्थितीत असतात तेंव्हा त्यांचा गोड आवाज ऐकू येतो.

त्यांचा एक कर्कश्य आवाज निघतो तो साप दिसल्यावर. ह्या साळुंख्या इतकया शुर असतात की साप कुठे दिसला रे दिसला की सापाला धुडकाउन लावण्यासाठी कर्कश्य आवाज करत अगदी त्याला टोचायला जातात. ह्यांच्या जोडीला एखादा कावळाही असतो. आधीच त्याचा आवाज कर्कश्य असतो त्यात अजुन कर्कश्य आवाज तोही काढतो. शिवाय तो धुर्तच फक्त त्यांना साथ देतो पण सापाला टोचण्याचे अभय त्याच्यात नाही.

आश्च्यर्य म्हणजे सापही साळुंख्यांना पाहून गवतात वगैरे जाउन लपतो. जरा सापाचा थोडा भाग जरी दिसला की लगेच ह्या साळुंख्या जाऊन टोच मारतात. मग सापही गायब होउन जातो. अशा ह्या धाडसी साळुंख्या. ह्यांचे हे सापाबरोबरचे थरार नाट्य आम्ही खुप वेळा पाहतो.

परवाच संध्याकाळी आंब्याच्या झाडावर साळुंख्यांचा भांडण्याचा आवाज येत होता. आवाज भांडणाचा आहे हे मी ओळखले. कारण गोडही नव्हता आणि कर्कश्यही नव्हता नुसता किलकिलाट होता म्हणून कॅमेरा घेउन लगेच बाहेर जाउन पाहिले तर त्यांची अगदी मध्येच फायटींग होत होती तर मध्येच एकमेकांच्या अंगावर खेकसत होत्या. तस कारण कळल नाही. इतकच कळल की झाडाच्या ढोलीत काहीतरी आहे त्यावरून भांडण सुरु आहे. कदाचीत बाळही असेल. ढोलीत घरटे आहे असे वाटत होते. एकाच वेळी ४-५ साळुंख्या ह्या ढोलीवर बसुन आत पाहून ओरडत होत्या. हा आवाज त्यांच्या भांडणाचाच होता. ढोलीवरून शेकटावर जाऊन दोनदा दोन साळुंख्या एकमेकांशी कुस्तीही खेळल्या. फोटो घेई पर्यंत त्यांची कुस्ती परत हमरी तुमरीवर येत होती. मी फोटो काढते ह्याची परवाही नव्हती त्यांना. हे त्यांचे भांडण चालू असतानाचे फोटो.

१) ही साळुंखी ढोलीत जात होती आणि बाजुच्या ओरडत होत्या. त्यांना प्रतिकार करताना किती तिचा चेहरा रागिट झाला आहे पहा.

२) ढोलीत घरटे दिसत आहे.

३) ढोलीत घुसलेली सा़ळुंखी.

४) दुसरी साळुंखी आत डोकावतेय व त्यांचे भांडण चालू होते.

५) त्यांची हमरा तुमरी.

६) हे भांडणाचे पुर्ण दृष्य.

छायाचित्रण

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

19 Jul 2012 - 1:36 pm | प्रचेतस

जबरी निरीक्षण.

अत्रुप्त आत्मा's picture

19 Jul 2012 - 1:38 pm | अत्रुप्त आत्मा

निसर्गाचे हितंगूज कळते जयांना
निसर्ग भरून पावतो तयांना

--^--^--^--

नंबर

मृगनयनी's picture

19 Jul 2012 - 2:02 pm | मृगनयनी

छान गं जागु! मस्त फोटो!!! :)

या साळुन्क्यांचा सम्बन्ध शकुन-अपशकुनाशीही लावला गेलाये!..

वन फॉर सॉरो, टू फॉर जॉय, थ्री फॉर लेटर, फोर फॉर बॉय! ;)

१ साळुन्की दिसली.. काहीतरी मनाविरुद्ध घटना घडते...२ साळुन्क्या दिसल्या...की काहीतरी चांगले घडते...३ दिसल्या की अपेक्षित मेल / पत्र येते. आणि ४ साळुन्क्या दिसल्या.. की आपला प्रियसखा त्याच्या हेक्टीक स्केड्यूलमधून वेळात वेळ काढून आपल्याला भेटतो!! ;) हाऊ स्वीट्ट ना! =)) =))

बाकी साळुन्क्यांची हवेतून जमीनीवर उतरण्याची स्टाईल मला खूप आवडते! त्यांनी आपले सुन्दर पांढरे चॉकलेटी पंख पंख पसरून अति अलगदपणे पॅरॅशूटसारखं जमिनीवर लॅन्डिन्ग होणं... हे बघायला खूप छान वाटतं!.. नुकत्याच येऊन गेलेल्या पावसानन्तर संध्याकाळी पडलेल्या चमचमत्या उन्हात ४-५ साळुंक्यांनी किन्वा त्यांच्या थव्याने एकदम असं आपलं पॅरॅशूट जमिनीवर उतरवणं.. म्हणजे खरंच्च निसर्गाचा एक मोहक आविष्कार असतो!!! :)

मृगनयनी ते शकुन अपशकुन पुर्वी आम्ही आमच्या भावंडांसोबत खेळायचो. तेव्हा सगळ खर वाटायच.

वल्ली, अतृप्त आत्मा धन्यवाद.

स्मिता.'s picture

19 Jul 2012 - 3:21 pm | स्मिता.

जागुताई म्हणजे वनराणीच आहे. निसर्गाचं कोणतं रूप दाखवेल काही सांगता येत नाही. साळुंख्यांचं भांडण आणि फोटो मस्तच. मीसुद्धा साळुंख्यांचा तो सापाला बघून केलेला कर्कश्य गोंगाट ऐकलाय... आपल्यालाच भीती वाटते तो आवाज ऐकून!

बिपिन कार्यकर्ते's picture

19 Jul 2012 - 9:51 pm | बिपिन कार्यकर्ते

अगदी!! अगदी!!!

RUPALI POYEKAR's picture

19 Jul 2012 - 3:43 pm | RUPALI POYEKAR

सहमत

मस्तच !! साळुंक्यांचा कलकलाट ऐकून धावत गेल्यानंतर दोन-तीन वेळा साप पाह्यलाय सोसायटीच्या कंपाऊंडमध्ये. पण येवढं निरीक्षण कधी केलं नव्हतं ब्वॉ.

मदनबाण's picture

19 Jul 2012 - 7:22 pm | मदनबाण

वा ! मस्त फोटु... :)

पैसा's picture

19 Jul 2012 - 7:27 pm | पैसा

काय भारी आलेत फोटो!

रुपाली, सुड, मदनबाण, पैसा धन्यवाद.

जाई.'s picture

19 Jul 2012 - 9:58 pm | जाई.

वाह मस्तच

जेनी...'s picture

19 Jul 2012 - 11:12 pm | जेनी...

मस्त ..मला फोटो बघुन असं वाटलं ,

जणु एका घरातल्या बाई च्या मुलाने बाहेर मारामारी केलिय आणि ते कार्ट पळुन घरी आलय ,
ज्याला मारलय ,त्याची आई भांडायला हीच्या घरी आलिय ..बाकिच्या आजुबाजुच्या बायका ..

एक = " अहो साळुंखे बाई ,जरा आवरतं घ्याओ " :(

दुसरी = " अओ रोजचीच कटकट झालिय ,किति दिवस म्हणुन ऐकुन घ्यायचं " \(

तीसरी = " जाऊद्या ओ कलकलाट करुन काय फरक पडणारय का त्यांच्यात( आग भडकवण्याचा प्रयत्न ) " :)

चौथी =" काय रे देवा ,रोज ही भांडण" :( \( ;)

:D

great work Jagutaai ..keep it up :)

श्रावण मोडक's picture

20 Jul 2012 - 10:27 am | श्रावण मोडक

नुसत्या प्रकाशचित्रातील दर्शनातून या साळुंख्यांना बायकी ठरवत आवरतं घेणं, कलकलाट, कटकट, भांडण वगैरे शब्दांचा प्रयोग पाहून मौज वाटली. :-) त्या साळुंख्यात एकही नर नसावा अशी खात्री का वाटली हो? ;-)

जागुताई तुमचं खरच कौतुक वाटत. निसर्गात काय चाललय यावर इतकं बारीक लक्ष कधीच ठेवलं जात नाही. खूप छान लेख आणि फोटो.

जागु's picture

20 Jul 2012 - 10:19 am | जागु

बिपिन, जाई, विणा धन्यवाद.

पुर्जा संवाद मस्तच.

मोदक's picture

20 Jul 2012 - 10:38 am | मोदक

मस्त फोटु आणि वर्णन सुध्दा...

श्रावणजी नर बायकांमध्ये पडले नसतील.

मोदक धन्यवाद.

सुधीर's picture

20 Jul 2012 - 1:38 pm | सुधीर

कधी कधी साळुंखी आणि पोपट यांच्या आवाजात गल्लत होते. फोटो आवडले.

प्यारे१'s picture

20 Jul 2012 - 2:32 pm | प्यारे१

काय मस्त रागवली आहे ती साळुंकी....एखाद्या पोराला असं चिडून दाखवलं तर ते पटकन अभ्यासाला बसेल. :)

जागुतै.
हॅट्स ऑफ्फ.

अमितसांगली's picture

24 Jul 2012 - 7:00 pm | अमितसांगली

सर्वच फोटो सुंदर....

गुळाचा गणपती's picture

29 Jul 2012 - 12:44 am | गुळाचा गणपती

जागु,

मस्त...