"गॉड पार्टीकल्स​" निर्मीत वस्तुमान आणि बिग बॅन्ग थेअरी - तफावत!

निमिष सोनार's picture
निमिष सोनार in काथ्याकूट
7 Jul 2012 - 7:46 am
गाभा: 

वस्तुमान निर्मितीस कारणीभूत, हिग्स्-बोसोन असे नाव असलेले "गॉड पार्टीकल्स" प्रोटॉनच्या अघातापसून निर्माण करण्यात यश आल्याबद्दल सर्न च्या सगळ्या वैज्ञानिकांचे अभिनंदन!

मात्र, त्याद्वारे जे वस्तुमान निर्माण झाल्याचा दावा केला आहे ते फार अल्पजीवी होते म्हणजे मायक्रो सेकंदा पेक्षा ही कमी काळ ते टिकले आणि आपल्या ब्रम्हांडात मात्र अनेक कायमस्वरूपी वस्तुमान आहेत म्हणजे आपली पृथ्वी आणि इतर ग्रह.

कमीत कमी छोट्या आकाराचे अनेक कायमस्वरूपी गोळे त्या प्रयोगातून बाहेर निघायला हवे होते.

मग बिग बॅन्ग थेअरी यातून पूर्णपणे स्पष्ट होत नाही.

कुणी स्पष्ट करू शकेल का?

प्रतिक्रिया

Nile's picture

7 Jul 2012 - 8:18 am | Nile

बॅटमॅन's picture

7 Jul 2012 - 8:21 am | बॅटमॅन

फेसला भेदून पाम आरपार गेल्याचा फोटो जास्त भारी शोभला असता ;)

चला तर मग! चर्चा बंद करतो मी. दोन्ही छान प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

विसुनाना's picture

7 Jul 2012 - 12:02 pm | विसुनाना

माझ्या अल्पमतीला जे समजले तेवढे लिहीतो. निळे उर्फ नील ऊर्फ नाईल यांच्या फ्लोचार्टातील एक कँडी. आपल्या मायमराठीत जिलेबी म्हणा हवे तर -:
१.

मात्र, त्याद्वारे जे वस्तुमान निर्माण झाल्याचा दावा केला आहे ते फार अल्पजीवी होते म्हणजे मायक्रो सेकंदा पेक्षा ही कमी काळ ते टिकले आणि आपल्या ब्रम्हांडात मात्र अनेक कायमस्वरूपी वस्तुमान आहेत म्हणजे आपली पृथ्वी आणि इतर ग्रह.

--हिग्ज बोसॉन हा कण कधीही स्वतंत्ररित्या अस्तित्त्वात नसतो. तो जेव्हा एखाद्या मूलकणात विलय पावतो (नेहमीच विलय पावलेला असतो)तेव्हा त्या मूलकणाला वस्तुमान प्राप्त करून देतो. पक्षी, एखाद्या मूलकणाचा घटक असलेला हिग्ज बोसॉन कुणी प्रयत्नांची पराकाष्ठा करून वेगळा केला तर त्या मूळकणाचे वस्तुमान नाहीसे होईल. परंतु हा निर्माण केलेला हिग्ज बोसॉन सेकंदाच्या अब्जावधी भागात पुन्हा दुसर्‍या एखाद्या मूलकणात विलय पावत असल्याने त्याचे अतित्त्व 'फार अल्पजीवी' असते. दुसर्‍या शब्दांत अनेक 'कायमस्वरूपी वस्तुमान' असलेल्या सर्व पदार्थात हिग्ज बोसॉन्स 'कायमस्वरूपी' विलय पावलेले असतात.
२.'बिग बँग'
--यावर माझ्यासारख्या बारक्या माणसाने बोलूच नये.
३. या विषयावर इथे काही (पार्टिकल - क्वांटम) फिजिक्समधील माहितगारांनी चर्चा करावी. आम्हाला त्याचा लाभ होईल.

बॅटमॅन's picture

7 Jul 2012 - 3:07 pm | बॅटमॅन

कॉलिंग दुर्बिटणेबै, घासूगुर्जी एट अ‍ॅल...

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

8 Jul 2012 - 5:14 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

गृहपाठ सुरू आहे.

@ विसुनाना.. सोप्या भाषेत उत्तम उकल करणारा प्रतिसाद.. धन्यवाद...

अविनाशकुलकर्णी's picture

10 Jul 2012 - 11:09 am | अविनाशकुलकर्णी

Shiva's Cosmic Dance at CERN

On June 18, 2004, an unusual new landmark was unveiled at CERN, the European Center for Research in Particle Physics in Geneva — a 2m tall statue of the Indian deity Shiva Nataraja, the Lord of Dance. The statue, symbolizing Shiva's cosmic dance of creation and destruction, was given to CERN by the Indian government to celebrate the research center's long association with India.

In choosing the image of Shiva Nataraja, the Indian government acknowledged the profound significance of the metaphor of Shiva's dance for the cosmic dance of subatomic particles, which is observed and analyzed by CERN's physicists. The parallel between Shiva's dance and the dance of subatomic particles was first discussed by Fritjof Capra in an article titled "The Dance of Shiva: The Hindu View of Matter in the Light of Modern Physics," published in Main Currents in Modern Thought in 1972. Shiva's cosmic dance then became a central metaphor in Capra's international bestseller The Tao of Physics, first published in 1975 and still in print in over 40 editions around the world.

A special plaque next to the Shiva statue at CERN explains the significance of the metaphor of Shiva's cosmic dance with several quotations from The Tao of Physics. Here is the text of the plaque:

Ananda K. Coomaraswamy, seeing beyond the unsurpassed rhythm, beauty, power and grace of the Nataraja, once wrote of it "It is the clearest image of the activity of God which any art or religion can boast of."

More recently, Fritjof Capra explained that "Modern physics has shown that the rhythm of creation and destruction is not only manifest in the turn of the seasons and in the birth and death of all living creatures, but is also the very essence of inorganic matter," and that "For the modern physicists, then, Shiva's dance is the dance of subatomic matter."

It is indeed as Capra concluded: "Hundreds of years ago, Indian artists created visual images of dancing Shivas in a beautiful series of bronzes. In our time, physicists have used the most advanced technology to portray the patterns of the cosmic dance. The metaphor of the cosmic dance thus unifies ancient mythology, religious art and modern physics."

अर्धवटराव's picture

10 Jul 2012 - 11:20 am | अर्धवटराव

आयला.. मिपाकरांचा एव्हढा वट्ट... इथल्या धाग्यीक ("साहित्यीक" च्या चालीवर) काड्या थेट सर्न पर्यंत पोचवल्या... ते ही सेक्युलर वगैरे मायबाप सरकारकडुन... मीपाकर असल्याचा मला अभिमान आहे.

अर्धवटराव

रमताराम's picture

10 Jul 2012 - 11:27 am | रमताराम

म्हटलं अजून कसं आलं नाही. मज्जा. आणि वर काप्रा म्हणजे आयसिंग ऑन द केक. वुडहाऊस वगैरे फालतू लेखकांपेक्षा काप्राच वाचावा अशा मताचा मी आहे.

ररांशी फ्रिजॉफ काप्रा बद्दल पूर्ण सहमत आहे.
काप्राचे संधिकाल या नावाचे पुस्तक मराठीत अनुवादीत झालेले आहे. व बहुतेक अजूनही उपलब्धही आहे. जिज्ञासूंनी जरुर वाचावे.
काप्राचे सर्वात प्रसिद्ध पुस्तक : 'दि टाओ ऑफ फिजिक्स' पीडीएफ स्वरुपात वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अवांतरः गुरुजी वुडहाऊस बद्दल मात्र असहमत. ;) माझ्या आवडत्या लेखकांपैकी एक वुडहाऊस आहे.

रमताराम's picture

10 Jul 2012 - 3:30 pm | रमताराम

गुरुजी वुडहाऊस बद्दल मात्र असहमत. ...
अरे देवा.... बरं जाऊ दे.

बिपिन कार्यकर्ते's picture

10 Jul 2012 - 3:32 pm | बिपिन कार्यकर्ते

हाहाहा! माझ्या हाताला मगाशीच खाज आली होती... पण म्हणलं जौद्या! ;)

आम्ही विज्ञानाच्या अँगलनेच विचार करत बसलो... ;)
मग हरकत नाही. विनोदाच्या बाजूने मला विचार करायला कधी जमणार देवच जाणे :(