फायरफॉक्सवाल्यांसाठी - मिसळपाव नीट वाचण्यासाठी च३.० वापरा

मिसळपाव's picture
मिसळपाव in काथ्याकूट
21 Jun 2008 - 7:51 am
गाभा: 

फायरफॉक्स वापरणारया मिसळपावच्या वाचकांसाठी एक सूचना. फायरफॉक्स ३.० परवाच रीलीझ झाला. तो वापरला तर मिसळपाव.कॉम वर रस्व, दिर्घ व जोडाक्षरं बरोबर दिसतात. फायरफॉक्स २.न वर नीट दिसत नाहित.

प्रतिक्रिया

सखाराम_गटणे™'s picture

21 Jun 2008 - 9:44 am | सखाराम_गटणे™

> मिसळपाव
आभारी आहोत.
फक्त वरच्या टाइटल बार मध्ये नाव दिसत नाही.

सखाराम गटणे
(धमु, छोटा डॉन, आंद्या, पिवळा डांबिस, विजुभाउ यांच्या वर्गातला :))

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

21 Jun 2008 - 9:55 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

टाइटल बार मध्ये मराठीत नाव दिसत नाही. चौकोनी डबे दिसतात.
काही उपाय आहे का ?

अवांतर : 'मिसळपाव'सदस्य म्हणजे कोणी मिसळपावच्या अधिकारी वर्गापैकी आहे का ? :)

-दिलीप बिरुटे
( चौकोनी डब्यांना वैतागलेला )

सखाराम_गटणे™'s picture

21 Jun 2008 - 10:12 am | सखाराम_गटणे™

मला सुदधा ही अडचण येते आहे. आइ आणी फायरफोक्स सुदधा.
पण कचेरीत आइ ला ही अड्चण येत नाही.
बहुतेक, कोणता तरी फॉन्ट लागत असावा.
लोकसत्ता चा फॉन्ट ने कदाचीत फायदा होइल.

फायरफोक्स ३ च्या टैब मध्ये विषय दिसत आहे. :)

सखाराम गटणे
(धमु, छोटा डॉन, आंद्या, पिवळा डांबिस, विजुभाउ यांच्या वर्गातला :))

विसोबा खेचर's picture

21 Jun 2008 - 10:10 am | विसोबा खेचर

अवांतर : 'मिसळपाव'सदस्य म्हणजे कोणी मिसळपावच्या अधिकारी वर्गापैकी आहे का

नाही, 'मिसळपाव' हे सदस्य मिपाच्या अधिकारी वर्गापैकी नाहीत.

खालील मंडळी मिपाच्या अधिकारी वर्गात आहेत.. :)

१) नीलकांत
२) चतुरंग
३) डॉ बिरुटे
४) धोंडोपंत
५) विकास
६) प्रियाली
७) राजीव अनंत भिडे

असो..

आपला,
(भरभक्कम मंडळींची साथ लाभलेला) तात्या.

नंदा प्रधान's picture

21 Jun 2008 - 10:03 pm | नंदा प्रधान

तात्या वरील निवडीशी असहमत आहे. पहिली तीन नावे वगळता बाकिच्यांना हे अधिकार दिले जाऊ नयेत.
धोंडोपंत इथे दिसतही नाहीत, प्रियाली फक्त टाईमपास करायला येते (लेख लिहायचा असेल तर उपक्रमावर जाते),
विकासही येऊन जाउनच असतो, राजीव अनंत भिडे हे तर कधीच दिसले नाहीत.

त्यापेक्षा पिवळा डांबीस,पेठकर, मुक्तसुनित, प्राजू, धमाल/आंद्या/डॉन/विजुभाअऊ/इनोबा ह्यापैकी एक, भडकमकर मास्तर इ.इ. नावांचा विचार का केला गेला नाही? माझ्यामते ह्यांचे योगदान जास्त प्रभावी ठरेल.. असो.. स्पष्ट बोलल्या बद्दल माफी!

ध्रुव's picture

23 Jun 2008 - 10:10 am | ध्रुव

पहिली तिन मंडळी सोडली तर बाकीचे लोक आपले लक्ष नक्की ठेवून असतात असे वाटते ;)
--
ध्रुव

विसोबा खेचर's picture

23 Jun 2008 - 10:49 am | विसोबा खेचर

तात्या वरील निवडीशी असहमत आहे.

प्रधानसाहेब, माझ्या आठवणीप्रमाणे याबाबत मी आपल्याला मत किंवा सल्ला विचारला नव्हता!

असो, तरीही न विचारता मत दिल्याबद्दल अनेक आभार. मात्र आपले मत विचारात घेतले जाणार नाही याचा खेद वाटतो! :)

तात्या.

वैशाली हसमनीस's picture

21 Jun 2008 - 10:33 am | वैशाली हसमनीस

मि.पा.च्या सर्व अधिकारी वर्गास स. न.वि.वि.
आपण इतर सदरांबरोबर 'स्वास्थ्य'हे सदर चालू करावे ही विनंती .अर्थात शक्य असल्यास.धन्यवाद.

विसोबा खेचर's picture

21 Jun 2008 - 10:46 am | विसोबा खेचर

अवश्य करू,

धन्यवाद..

आपला,
(धन्वंतरी) तात्या.

देवदत्त's picture

21 Jun 2008 - 5:11 pm | देवदत्त

माहितीबद्दल धन्यवाद मिसळपाव...
मी फायरफॉक्स ३.० टाकले माझ्या संगणकात. आय. ई. मध्ये जशी अक्षरे दिसतात त्याप्रमाणे फायरफॉक्स २ मध्ये दिसत नव्हती. ३.० मध्ये बदलले असेल असे मला वाटले. पण इथेही तशीच अक्षरे दिसतात. अर्थात तुम्ही सांगितलेला बदल दिसतोय बहुधा.

बाकी इतर सदस्यांना... टायटल बार मध्ये चौकोनी डबे हे फायरफॉक्स ३.० मध्येच दिसतात की आधीही दिसत होते? माझ्या अनुभवाप्रमाणे टायटल बार मध्ये मराठी अक्षरे नीट दिसण्यासाठी आपल्याला विंडोज सेटींग्स मध्ये Regional/Language Options->Languages Tab->Install Files for complex script हा पर्याय निवडावा लागतो, जे मी केले आहे. तेही विंडोज XP आणि नंतरच्या विंडोज मध्ये. आधीच्या विंडोजमध्ये दिसत नाहीत.

मिसळपाव's picture

21 Jun 2008 - 5:21 pm | मिसळपाव

मी 'मिसळपाव' एव्ह्ढ्या कौतुकाने नाव घेतलं कारण तेव्हा मी फायरफॉक्स २.० वापरत होतो आणि त्यावर रस्व लिहीताना पंचाईत पडते. निव्वळ मला जमलं म्हणून घेतलं. पण तात्याबांची परवानगी घेउन - अगदि, "नाहि, काहि गडबड नाहि ना होणार?" प्रमाणे!!

( म्हैस मधल्या मास्तरांचा भाऊ) - सुबोध जोशी.
ता.क. - मला तरी विषय व माझं नाव व्यवस्थित दिसतंय.

विसोबा खेचर's picture

21 Jun 2008 - 5:29 pm | विसोबा खेचर

पण तात्याबांची परवानगी घेउन - अगदि, "नाहि, काहि गडबड नाहि ना होणार?" प्रमाणे!!

अहो छे! त्यात गडबड काय होणार? मिसळपाव हा आमचा अत्यंत आवडता पदार्थ आहे, तेव्हा त्या पदार्थाचं नांव जर आयडी म्हणून कुणी घेतलं तर आम्हाला त्यात आनंदच आहे! :)

मिसळपाव मस्तकी धरावा,
अवघा हलकल्लोळ करावा
मिसळधर्म वाढवावा!

हेच संत तात्याबांचं ब्रीद होतं, स्वप्न होतं. ते आता दिवसेंदिवस पूर्ण होत असलेलं आम्ही पाहतो आहोत त्यामुळे संत तात्याबा आता समाधी घ्यायला मोकळे! :)

तात्या.

मिसळपाव's picture

21 Jun 2008 - 6:04 pm | मिसळपाव

देवदत्त, मला सगळी साईट व्यवस्थित दिसत्येय.

आय. ई. ७.० (एक्स पी), फाफॉ ३.० (एक्स पी) व फाफॉ ३.० (विस्टा) या तीन पध्दती वापरून मिसळपाव.कॉम सारखंच दिसतं. फाफॉ ३.० नुसतं बसवलं - बाकी काहिही बदल केले नाहित.

तुम्हा मंडळींची काय समस्या आहे देव जाणे. मी म्हंटलं ना, माझी पुण्याईच थोर!!

देवदत्त's picture

21 Jun 2008 - 7:55 pm | देवदत्त

मलाही सर्व साईट व्यवस्थित दिसते. त्यात अडचण काहीच नाही :)
फक्त आय ई आणि फायरफॉक्स मध्ये अक्षरांचे जे वळण आहे, त्यात विंडोजच्या दोन फॉंट मध्ये असतो तसा फरक आहे.
फक्त मिसळपावच नाही तर सर्व युनिकोड वापरणार्‍या संकेतस्थळांवर.
हे पहा...
फायरफॉक्स
misalpav_FF

आय. ई.
misalpav_IE

देवदत्त's picture

22 Jun 2008 - 11:49 am | देवदत्त

आणखी एक फरक दिसला. काल टाकलेल्या प्रतिसादांतील चित्रांत तो नव्हता.
आय ई मध्ये प्रतिसादाची/लेखाची वेळ व तारीख देवनागरी मध्ये दिसते पण फायरफॉक्स मध्ये रोमन लिपीत. (सध्या तरी मिसळपाववरच. :( )

प्रियाली's picture

21 Jun 2008 - 6:12 pm | प्रियाली

चौकोनांना सद्गती देण्यासाठी विंडोजचे इंडिक फॉन्ट्स लोड करा. आयईची अडचण नक्की सुटावी.

(घाईत)प्रियाली

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

21 Jun 2008 - 8:49 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

Regional/Language Options->Languages Tab->Install Files for complex script या मुळे टायटल बार वरील चौकोनी डबे गेले आहेत. आय. इ. वर मिसळपाव उत्तम दिसते. अडचण आहे, ते लेखनाचे पुर्वपरिक्षण पाहतांना दिसणा-या चौकोनी डब्यांचे :( इतरवेळी मिसळपाव वाचता येते.

चौकोनांना सद्गती देण्यासाठी विंडोजचे इंडिक फॉन्ट्स लोड करा. आयईची अडचण नक्की सुटावी.

आम्हाला जर फॉन्टचा दुवा दिला तर लोड करता येईल. आपणास जेव्हा वेळ मिळेल तेव्हा दुवा द्या !!! आम्ही अनेक फॉन्टस लोड केले पण यश येईना !!! :(

पुर्वपरिक्षण पाहतांना पाहा एक झलक !!!
untitled

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सखाराम_गटणे™'s picture

21 Jun 2008 - 8:53 pm | सखाराम_गटणे™

सर, फफ ३ वापरुन पहा ना.
मला नाही फफ ३ मध्ये अड्चण येत.

सखाराम गटणे
(धमु, छोटा डॉन, आंद्या, पिवळा डांबिस, विजुभाउ इ. यांच्या वर्गातला :))

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

21 Jun 2008 - 9:02 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

फायरफॉक्स ३ मधे अडचण येत नाही. आता डबे दिसत नाही. आपल्या मदतीबद्दल आभार !!!

पण तरी प्रश्न पडतो. या पुर्वी असे कधीच घडले नाही, आय.इ. मधे. पण जाने दो !!! झाले ना आपले काम. :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सखाराम_गटणे™'s picture

21 Jun 2008 - 9:09 pm | सखाराम_गटणे™

>>फायरफॉक्स ३ मधे अडचण येत नाही. आता डबे दिसत नाही. आपल्या मदतीबद्दल आभार !!!

वेलकम वेलकम !!!!

सखाराम गटणे
(धमु, छोटा डॉन, आंद्या, पिवळा डांबिस, विजुभाउ इ. यांच्या वर्गातला :))

लंबूटांग's picture

22 Jun 2008 - 10:52 pm | लंबूटांग

माझ्याकडे बराहा टाकले आहे. सगळ्या साइट व्यवस्थित दिसतात. फ्री आहे ते सॉफ्टवेअर.

फटू's picture

23 Jun 2008 - 1:08 am | फटू

माझ्या आधीच्या फफ मध्ये मिपाची अक्षरे व्यवस्थित दिसायची नाहीत... आता फफ ३ मुळे ती समस्या दूर झाली आहे !!!

पुन्हा,
सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...