सोमवार ते शुक्रवार हाफिस आणि वीकांत फिरण्यात व्यस्त असताना अचानक १ मे ची सुट्टी जाहीर झाली...
महाराष्ट्र दिन, कामगार दिन (म्हणजेच बैलपोळा :-p) या गोष्टींना फाट्यावर मारायला लावणारी "Month End" नावाची एक जबरा चीज आहे याची नव्याने जाणीव झाली. पण शेवटी सुट्टी मिळालीच. :-)
पानशेत बोटींग क्लब ला जायचे बरेच दिवसांपासून डोक्यात होते. तेच ठरवून सकाळी ०७ वाजता बाईक हाणायला सुरूवात केली.. वडगांव पुलाजवळ सगळे मित्र जमून डोणज्याच्या दिशेने गाड्या वळवल्या.
डोणज्यापर्यंतचा रस्ता नेहमीसारखाच अरूंद, खड्ड्यांनी भरलेला आणि सिंहगडाच्या दिशेने भरधाव जाणारे पब्लीक यांनी व्यापलेला होता, पण आजूबाजूला असलेला निसर्ग हे सगळे विसरायला लावत होता, उन्हाचा रखरखाट सुरू होता होताच आम्ही नाष्टा करायला थांबलो. मिसळ, पोहे, वडापाव यथेच्छ चापून पानशेतच्या रस्त्याकडे कूच केले..
(फोटो मुद्दामच दिले नाहीयेत - आभार मानल्याबद्दल धन्यवाद ;-))
खडकवासल्यापासून पानशेत धरणापर्यंतचा रस्ता अवर्णनीय आहे. संपूर्ण प्रवासात रस्त्याच्या बाजूने नदी आपली सोबत करते.

बोटींग क्लब मध्ये पोहोचल्या नंतर तिथल्या व्यवस्थापकाने आमच्यापैकी एका नेहमीच्या मेंबराला ओळखले आणि त्यांच्या गप्पा सुरू झाल्या.. आम्ही पाण्यात जायचा मार्ग कुठे आहे - कसे जायचे - कुठून उतरायचे - किती वेळ आहे.. वगैरे "क" च्या बाराखडीत गुंतलो असताना व्यवस्थापक महाशय स्वतःच आमच्या बरोबर आले.
जलाशय खुणावत होताच.


सुरूवात केली पोहोण्यापासून..

लाईफ जॅकेट घालून पोहणे हा बेक्कार अनुभव होता.. पाण्याखाली पोहता येत नव्हते, सूर मारता येत नव्हता आणि तरंगण्यासाठी फारसे कष्ट घ्यावे लागत नव्हते. :-(
थोड्यावेळाने कयाकिंग सुरू केले.


खूप लांबपर्यंत फेरी मारून, कयाक बरोबर खेळ करून (खेळ करताना कयाक उलटी होता होता वाचवून) काठावर परतलो. येता येता रेस लावण्याचे निष्फळ प्रयत्न केले पण मोटरबोट जवळून गेल्यानंतर उसळणार्या लाटेने कयाक सांभाळता सांभाळता पुरेवाट होत होती. रेस दूरच राहिली.
सर्फींग - बोटीमागे दोरीने बांधलेल्या एका सर्फ बोर्डवर आपण झोपून / उभे राहून लांब फेरी मारायची. फेरी मारता मारता वेगाने बोट वेडीवाकडी फिरते, बोट फिरल्याने बोर्ड पण तसाच फिरतो आणि आपण त्याच वेगाने पाण्यात पडतो. :-O



बनाना राईड - सर्फ बोर्डसारखीच मजा. :-)

मनसोक्त पोहणे, कयाकिंग, सर्फींग आणि राईड आवरल्यानंतर थोडा वेळ पाण्यात निवांत पडून राहण्याची मजाही अनुभवली.

पाण्यातून बाहेर येवून गरमागरम खेकडा भजींवर ताव मारला.. :-)

पुन्हा तोच निसर्गरम्य रस्ता टळटळीत दुपारी पार करून पुणे गाठले, उन्हावर उतारा म्हणून बास्कीन रॉबीन्स ला भेट दिली. संध्याकाळचा बार्बेक्यू नेशन कट्टा खुणावत होता.
अधिक माहिती -
१) लाईफ जॅकेट सक्तीचे आहे.
२) कयाकिंग - ३० मिनिटे - रू. १००/-
३) सर्फिंग - १ राईड - रू. १५०/-
४) बनाना राईड - १ राईड - रू. १५०/-
५) पोहणे - फ्री - पण परवानगी नाहीये :-O आम्ही सकाळचे पहिलेच कष्टंबर आणि बराच वेळ फक्त आम्हीच असल्याने आम्हाला पाण्यात उतरू दिले. ते पण लाईफ जॅकेट घालूनच.
६) कयाक घेवून धरणाच्या भिंतीकडे जायला परवानगी नाही.
प्रतिक्रिया
2 May 2012 - 4:24 pm | प्रचेतस
मस्त रे मोदका.
2 May 2012 - 4:31 pm | पियुशा
कयाकिंग , सर्फिंग भन्नाट एकदम :)
2 May 2012 - 4:32 pm | यकु
हॅहॅहॅ
लैच भारी रे.
हे इथे लिहिलंस, आता दुसर्यावेळी तुला कयाक मिळायचे वांधे होणार ;-) गर्दीमुळे.
धुरवडीच्या दिवशी दिवसभर अपेयपानानंतर दौलताबाद घाटातल्या मोमबत्ता तलावात 'उतरे' पर्यंत पोहत बसलो होतो त्याची हे पाणी पाहून आठवण झाली. ;-)
2 May 2012 - 4:43 pm | सूड
धुरवडीच्या दिवशी ?? असो. मोदका, इनो घेण्यात आले आहे. निद्रादेवी नको त्या वेळी नको इतक्या प्रसन्न झाल्याने येणं रद्द झालं आणि आता धागा बघून जळजळ वाढली.
2 May 2012 - 4:42 pm | इस्पिक राजा
लै धमाल केलीस रे.
2 May 2012 - 4:58 pm | अक्षया
सहीच
फोटो आणि वृतांत..:)
भजीचा फोटो tempting :)
2 May 2012 - 5:06 pm | इरसाल
मोदक टोपी घालके सचिन तेंडुलकर सारखा दिसत आहे.
2 May 2012 - 7:33 pm | मोदक
बरोबर आहे कारण तो मोदक नाहीये. मी त्याच्या वरच्या फटूत आहे.
ते आमचे परममित्र चिराग मुळे (टोपी घालून) आहेत. :-)
3 May 2012 - 11:23 am | प्यारे१
माझा 'गणेशा' झालाय हा धागा पाहताना!
_________________________
<गणेशामोड> संपल्यामुळं नवप्रतिसाद!
चान चान फटु नी मस्त मस्त धमाल! खेकडा भजी आ धी समुद्रातल्या एखाद्या वेगळ्या दगडा/ प्राण्यासारखी वगैरे वाटली. म्हटलं मोदक्स एक्सिपिडीशन की काय???
2 May 2012 - 7:00 pm | चौकटराजा
चिल्का लेक ओरीसा ( भारतातील सर्वात मोठे)
कोडईकनाल लेक
दल लेक श्रीनगर
नैनि लेक नैनिताल
वेम्ब्नाड लेक कुमारकोम केरळ
नागार्जुन सागर धरण आध्र प्रदेश
नक्की लेक माउंट अबू
येथे व्यक्तीगत वा ग्रूप बोटींग केले आहे . मोदक राव आपणही त्याचा भविष्यात आऩंद घ्यावा ही शुभेच्छा !
2 May 2012 - 7:13 pm | अत्रुप्त आत्मा
2 May 2012 - 7:22 pm | गणामास्तर
लैच भारी.. आता वाटतंय उगीच नाही म्हणालो, यायला पाहिजे होते राव.
2 May 2012 - 8:00 pm | रेवती
अरे, खरच गेला होतास की! ;)
फोटो आवडले.
2 May 2012 - 8:06 pm | जेनी...
मस्त :)
2 May 2012 - 10:25 pm | पैसा
वर्णन आणि फोटो दोन्ही!
3 May 2012 - 1:47 am | प्रभाकर पेठकर
व्वा अप्रतिम छायाचित्रं आणि सुंदर वर्णन.
3 May 2012 - 7:17 am | ५० फक्त
मस्त वर्णन आणि फोटो. मला पण जायला आवडेल, पण माझ्या साईझचं लाईफ जॅकेट मिळेल का त्यांच्याकडे हा प्रश्न आहे.
3 May 2012 - 7:20 am | मोदक
आहे आहे.... :-D
बुवांच्या परममित्राला बसेल इतके मोठे जॅकेट्स पण आहेत तिथे. ;-)
3 May 2012 - 10:58 am | मृत्युन्जय
ले विंट्रेंस्टिंग दिसतय बघ. आम्हाला पोहता येत नसल्याने सर्फिंग बाद. नाहितर आम्ही पडल्यावर आम्हाला पोहता यायचे नाही आणि आम्चे धूड इतरांना वाहता यायचे नाही
3 May 2012 - 11:03 am | पिंगू
च्यायला मी सकाळपासून नागंराला जुंपलो होतो ना. नायतर मीपण आलो असतो कयाकिंगला.. बाकी संध्याकाळच्या कट्ट्याला मात्र हजेरी लागली आणि १ मे सार्थकी लागला..
- पिंगू
3 May 2012 - 2:11 pm | सानिकास्वप्निल
झकास फोटो :)
सॉल्लिड धमाल केलेली दिसत आहे :)
एकदा कयाकिंग करायचे आहे :)