गुरुचरित्रा बद्दल माहिती नाही अशी व्यक्ती कमीत कमी माझ्या पिढीची सापडणे म्हणजे अशक्य.गुरुचरित्राशी माझा परिचय झाला तो १९८० मध्ये मी होशियारपुरला(पंजाब) असतांना. तेंव्हापासुन मला नरसोबाची वाडी येथे जाण्याचे वेध लागले. मागिल वर्षी सांगली ला असतांना औदुंबर चा योग आला व वाडी ची संधी हुकली. मात्र यावेळी सांगली च्या मुक्कामात नरसोबाची वाडी ला जायचेच असे मनात होते. श्री शरदराव छत्रेंना हे सांगताच ते त्यांच्या नविन घेतलेल्या दुचाकीने दुसरे दिवशीचा कार्यक्रम आखुन तयार झाले. शरदराव हे सांगलीचेच असल्याने त्यांना येथील परिसराची माहिती आहेच पण उत्साही आहेत . दुसरे दिवशी सकाळी ७ ला ठरल्याप्रमाणे मी तयार होतोच. ७ एप्रिल ला आम्ही निघालो. वाडी सांगली हुन २० कि.मी चे आसपास आहे. सर्वप्रथम आम्ही अमरेश्वर चे मंदिर पाहीले.कृष्णा - पंचगंगा संगमावर अमरापुर नावाचे क्षेत्र आहे व तेथे अमरेश्वर नावाचा देव आहे. या अमरेश्वराजवळ ६४ योगीनी राहातात असे म्हटले जाते. तेथे शक्ती तीर्थ आहे. अमरेश्वर लिंग आहे. प्रयागला माघ स्नान करता जे पुण्य मिळते त्यापेक्षा शतपट पुण्य या संगमावर एका स्नानाने मिळते. असे हे रम्य पुण्य पावन क्षेत्र म्हणुन दत्त गुरु येथे राहिले.

तेथील मनाला शांती देणारे वातावरण ते स्थान सोडुच नये अशी भावना मनात निर्माण करते. तेथुन कृष्णेच्या पैलतीरावरील वाडीचे मुख्य मंदिराचे दर्शन घडते. येथे दत्तगुरु तब्बल १२ वर्षे राहीले. येथुनच पुढे ते भिमा तीराला म्हणजे गाणगापुर ला गेले. श्री गुरुंमाउली नी आपल्या मनोहर पादुका येथे ठेवल्या आहेत.


मंदिराजवळच संताजी धनाजी यांची समाधी ची वास्तु दिसते. त्याबद्दल फारशी माहिती मिळाली नाही.


मनोहर पादुकांचे दर्शन घेउन आम्ही मग खिद्रापुर येथील पुरातन मंदिर बघावयास गेलो. वाडी ते खिद्रापुर हे अंतर १८ कि.मी आहे. कोपेश्वर मंदिर हे वास्तुशास्त्र व शिल्पकला यांचा मनोहर संगम आहे. दिड हजार वर्षापुर्वी आमची शिल्प कला कशी बहरली होती याची साक्ष देत हे मंदिर आजही भक्कम रित्या उभे आहे.



कोपेश्वर हे शंकराचे नाव. येथील गाभार्यात प्रवेश केल्यावर एका शाळुंखेवर नजर जाते हिच ती विष्णुची प्रतिकात्मक प्रतिमा धोपेश्वर.

शिवदर्शन घेण्यापुर्वी नंदीचे दर्शन घेण्याची परंपरा आहे. येथील मंडपात नंदी नाही. शंकराने सती ला दक्षाकडील यद्न्यात उपस्थीत राहण्यासाठी नंदीला सोबत पाठविले म्हणुन नंदी येथे नाही अशी कथा आहे.

येथील मुर्तींची बरीच तोडफोड झालेली आहे. बादशाहा औरंगजेबाच्या आज्ञेने मंदिराच्या मुर्तींची तोडफोड करण्यात आली असे बोलले जाते. दक्षिण भारत जिंकण्यासाठी औरंगजेब २० वर्षे महाराष्ट्रात होता.इ.स. १७०२ च्या सप्टेंबर आक्टोबर मध्ये तो मिरज परिसरात कृष्णेच्या काठी होता. तेंव्हा मंदिराची तोडफोड त्याच्या आज्ञेने झाली असा इतिहास आहे.



अशा तर्हेने तोडफोड होवुनही मंदिराची शिल्पकला अजुनही तितकीच उत्क्रुष्ट व मोहक आहे. वाडीला गेल्यानंतर भाविकांनी या मंदिराला अवश्य भेट द्यावी असे हे कोपेश्वर मंदिर.





या भव्य दिव्य वारीचा लाभ मिळवुन देणारे श्री शरदराव छत्रे.

अस्मादीक


प्रतिक्रिया
13 Apr 2012 - 8:09 am | प्रचेतस
सुंदर फोटो.
वर्णनही छान.
13 Apr 2012 - 9:48 am | प्यारे१
छान फोटो, छान वर्णन...!
13 Apr 2012 - 10:13 am | मूकवाचक
+१
13 Apr 2012 - 11:32 pm | मोदक
+११
13 Apr 2012 - 10:23 am | चिंतामणी
अमरेश्वराचे वर्णन गुरूचरीत्राच्या १८व्या अध्यायात आले आहे. त्याची आठवण झाली.
13 Apr 2012 - 10:07 am | चौकटराजा
विश्वासराव ,
बरेच वर्षात या देवालयाला भेट देण्याचे मनात आहे. अजूनही योग आला नाही. नरसोबाच्या वाडीला १९७२ मधेच गेलो होतो. आपण डकविलेले फोटू मस्त आहेत. त्यावरून देवालय चांगल्या अवस्थेत असल्याचे दिसत आहे.
13 Apr 2012 - 11:00 am | कपिलमुनी
पूर्वी २-३ धागे आले होते .. त्यावर बरीच चर्चा झाली होती ... मिपाचा सर्च गंडते दर वेळेस, त्या मुळे शोधता आले नाहीत ...
13 Apr 2012 - 11:14 am | मुक्त विहारि
आणि छान माहिती...
13 Apr 2012 - 5:43 pm | अक्षया
फोटो छान आहेत...
मागचा मे मध्ये गेलो होतो तिथे
सुंदर देऊळ आहे..
13 Apr 2012 - 5:57 pm | यशोधरा
खिद्रापूरचे मंदिर काय सुरेख आहे!
तिथे कसे जायचे? वाडीवरुन पुढे कसे? किती अंतर आहे सांगाल का?
14 Apr 2012 - 9:41 am | विश्वास कल्याणकर
वाडी हुन कोल्हापुर रोड वर आल्यावर खिद्रापुर विचारले की कुणीही सांगेल.
13 Apr 2012 - 9:23 pm | मदनबाण
मंदिराजवळच संताजी धनाजी यांची समाधी ची वास्तु दिसते. त्याबद्दल फारशी माहिती मिळाली नाही.
संताजी धनाजी ? कुठे दिसली हो तुम्हाला ही समाधी ?
जर पाण्यातल्या देवळा बद्धल म्हणत असाल तर ते देउळ संगमेश्वराचे आहे. कॄष्णा आणि पंचगंगा जिथे एकत्र येतात त्या ठिकाणी हे पाण्यात बांधलेले मंदिर आहे. हल्लीच त्याचा जिर्णो धार झाला आहे, आधी फारच छोटेसे देउळ होते.
देवळाच्या आवारात गोपाळस्वामी आणि रामचंद्र योगी यांच्या जिवंत समाध्या आहेत.
14 Apr 2012 - 9:46 am | विश्वास कल्याणकर
लेखामध्ये ४ नंबरचा जो फोटो आहे त्यात तुम्ही म्हणता ते संगमातील देवळाचा फोटो आहे त्याच्या मागे जी मोठी इमारत आहे ती संताजी-धनाजींची समाधी आहे असे कळले . तिथे मी गेलो नाही पण फोटो घेतला. अधिक माहिती मिळाली नाही.
14 Apr 2012 - 10:50 pm | सुहास
लेखामध्ये ४ नंबरचा जो फोटो आहे त्यात तुम्ही म्हणता ते संगमातील देवळाचा फोटो आहे त्याच्या मागे जी मोठी इमारत आहे ती संताजी-धनाजींची समाधी आहे असे कळले . तिथे मी गेलो नाही पण फोटो घेतला. अधिक माहिती मिळाली नाही.
४ नंबर फोटो मध्ये जी मोठी ईमारत आहे तो कुरुंदवाडचा घाट आहे. कृष्णेवरील मोठ्या घाटांपैकी एक घाट आहे. ह्या घाटाच्या पायर्यांवर एक समाधी आहे (जी फोटोत दिसत नाही). ती संताजीची समाधी आहे (पण विकीपीडीया वर वेगळ्या ठिकाणाचा उल्लेख आहे). धनाजी जाधव यांची समाधी पेठवडगाव (जि. कोल्हापूर) येथे आहे.
--सुहास.
15 Apr 2012 - 9:12 am | मदनबाण
त्याच्या मागे जी मोठी इमारत आहे ती संताजी-धनाजींची समाधी आहे असे कळले . तिथे मी गेलो नाही पण फोटो घेतला.
तो वॉटर फिल्टरिंग प्लांट आहे.
14 Apr 2012 - 12:26 pm | सहज
कोपेश्वर मंदीराचे फोटो आवडले
15 Apr 2012 - 12:15 am | सुहास झेले
मस्त आहेत फोटो... मनापासून आवडले !!