किल्ले पुरंदर

मनराव's picture
मनराव in भटकंती
3 Apr 2012 - 5:17 pm


आम्ही दोघांनी नवीन गाडी घेऊन महिना झाला होता पण अजून बाहेर हिंडायला गेलो नव्हतो, म्हणून गेल्या शनिवारी तुषारला फोन केला

मी: काय रे काय करतोयस ?
तुषार: काही नाही रे !!! आराम चालू आहे.
मी: चल मग उद्या कुठे तरी लांब भटकून येऊ. पालीला जाऊन येऊ.
तुषार: थांब जरा, तुला संध्याकाळी फोन करून सांगतो.
मी: ठीके !!!

आमच्या आळशी गड्याने (तुषार) संध्याकाळी फोन तर केला पण म्हणाला पाली नको, जवळच्या जवळ नारायणपूरला जाऊन येऊ. मी म्हणालो ठीके हे नाही तर ते. आपल्याला काय ??? दिवस कारणी लागल्याशी मतलब. सकाळी सकाळी ६.३० ला चांदणी चौकात भेटायचं ठरलं.
ठरल्या प्रमाणे रविवारी सकाळी आम्ही ६.३० ला चांदणी चौकात भेटलो. बंगलोर हायवे ने, दोन बुलेट गाड्यांवर आरामशीर निघालो नारायणपूर कडे. वाटेत एके ठिकाणी मिसळपावचा समाचार घेतला. पोटोबा शांत झाले होते त्यामुळे दुपार पर्यंतची काळजी मिटली होती.
रस्त्यावर येणारे जाणारे लोक वळून वळून बघत होते (आम्हाला नव्हे आमच्या गाड्यांना), जाम भारी वाटत होतं.
सकाळ असल्यामुळे हायवेला गर्दीही फार नव्हती. ८.१५ ला आम्ही नारायणपुरात पोहोचलो. दर्शन घेतलं आणि तेवढ्यात आरती सुरु झाली. यथासांग आरती होई पर्यंत ९.०० वाजले. आता काय करायचा हा प्रश्न पडला. घरी परत जाण्याचा तर विचार सुद्धा मनाला शिवला नव्हता. मग मीच म्हणालो आलोच आहोत तर जाऊयात पुरंदरला. काहीहि आढे-वेढे न घेता मावळा तयार झाला याचं मला जरा आश्चर्यच वाटलं. पण असो, लागलीच गाड्या काढल्या आणि मागल्या रस्त्याने पुरंदरची वाट धरली. मागे पुरंदरला जेव्हा आलो होतो तेव्हा वर जाण्याचा रस्ता फारसा चांगला नव्हता पण आता एकदम झाक केला आहे.

एकदम टाररोड. अर्ध्या तासातच वर पोहोचलो. वर जाता जाता मधेच एक फोटो सेशन झालं. नुसतच गडीवर भटकून यायचं असल्याने कॅमेरा आणला नव्हता म्हणून मग मोबाइलनेच फोटो काढायला सुरुवात केली. पावसाळा संपून बरेच महिने उलटले आहेत हे जिथे तिथे जाणवत होतं. सगळीकडे एकदम रखरखीत. गडावर गेल्या गेल्या पहिला दृष्टीस पडला तो वीर मुरारबाजी देशपांड्यांचा पुतळा आणि त्यांची समाधी.

५ मिनिटे त्यांच्या स्मरणात घालवल्या नंतर पुढे निघालो. गाडी अजूनही बरोबर होती. पुढे बिन्नी दरवाज्यापाशी थोडा वेळ थांबलो. तिथेच मग शिवपर्वातल्या गप्पा सुरु झाल्या.

त्या दरवाज्याची आजची अवस्था पाहता शिवकाळात इथून घोडे कसे वर येत असतील, इथे मावळे कसे लढत असतील याचं विश्लेषण सुरु झाले. गप्पा मारता मारता पुढे निघालो आणि एके ठिकाणी पोहोचलो जिथून गाडी पुढे नेता येत नाही. गाडी लावली आणि गड चढायला सुरुवात केली.

सुरुवातीलाच पुरंदरेश्वराचं मस्त देऊळ आहे. शंभू महादेवाचं दर्शन घेतलं आणि वर चढायला सुरुवात केली.

२०-२५ मिनिटातच "सर" दरवाजा सर झाला. चढता चढता पुरंदरच्या तहाचा इतिहास डोळ्या समोर तरळत होता. मुघल आक्रमण कुठून झालं असेल. त्यांचं सैन्य किती लांब पसरलेलं असेल. वज्रगडावरून तोफांचा हल्ला कसा केला असेल. आपल्या मावळ्यांनी जीवाची पर्वा न करता किल्ला कसा लढत ठेवला असेल याची गोळाबेरीज मनात चालू होती.

असो, सर दरवाजा ओलांडून पुढे आम्ही फत्तेबुरुजा कडे जायला निघालो. बुरूजाकडे जाताना पुरंदर एकीकडे, पुढच्या बाजूने भकास वाटत होता पण दुसऱ्या बाजूने म्हणजे मागच्या बाजूला अजूनही थोडी हिरवळ मे महिन्या मध्ये जळण्यासाठी तग धरून होती. आता पर्यंत घामाच्या धारा वाहू लागल्या होत्या.

बुरुजाच्या टोकाला पोहोचल्यावर तिथे मस्त वारं सुटलं होतं. समोर वज्रगडाकडे पहात थोडा वेळ तसाच उभा राहिलो. भर उन्हात सुद्धा तिथे थंडपणा जाणवत होता. पुन्हा माघे वळालो आणि सर दरवाजा कडे आलो. इथून पुढे आता केदारेश्वराच्या दर्शनाला जायचं होतं. तटबंदी अगदी नावाला राहिली आहे. पुन्हा पायपीट सुरु झाली. पायवाटेवर एकही मोठे झाड नाही.

रणरणत्या उन्हात तटबंदीच्या कडे कडे ने एक एक बुरुज बघत केदारेश्वर मंदिर गाठलं.

केदारेश्वराच दर्शन घेतलं आणि थोडा वेळ तिथेच सावलीला आराम केला. आता परत जायची वेळ झाली होती. आल्या पावली परत जायचं असल्यामुळे आणि त्यात थोडासाच गड उतरायचा होता त्यामुळे फारसा वेळ लागला नाही. तडक खाली आलो. मधेच शॉर्टकट मारल्यामुळे संभाजी महाराजांचं जन्म ठिकाण पहायचं राहून गेलं तेवढी एकच रुखरुख मनाला लागुन रहिली. गाडी लावली तिथे एक घर वजा हॉटेल आहे. भूक सणकून लागली होती. झुणका आणि भाकरीवर यथेच्छ ताव मारला. ताकाचे दोन दोन ग्लास रिकामे केले आणि बसलो गप्पा मारत. अर्धा पाऊण तास गप्पा झाल्यावर गाडीला किक मारली आणि कुठेही न थांबता थेट चांदणी चौक गाठला. पुन्हा चौकात एक एक कॉफी मारली आणि घरला आलो. रामनवमीचा दिवस आनंदात गेला होता :)

प्रतिक्रिया

दुसरा फोटो हा केवळ जळवणे या एकाच कृतीचं समर्थन करतो आहे, असो. एखादा फोन केल्यास नजर लागु नये म्हणुन माझाही ९० कि. चा देह आणि १८० कि. ची रेड मर्क्युरी आणली असती, असो ट्रिप मस्त झाली आहे हे समजले.

एक विनंती सर्वांसाठीच - दुचाकीवर असताना हेल्मेट आणि चारचाकीत असतान सिट बेल्ट हे फक्त आणि फक्त तुमचे जीव वाचवण्यासाठीच असतात, या दोन्ही गोष्टीचा योग्य तो उपयोग अजिबात टाळु नये, ही नम्र विनंती.

अवांतर - पहिल्या फोटोतील, दोन लोखंडी खांब आणि एक झाड , आहाहा काय व्ह्यु आहे. ग्रेट.

स्पा's picture

4 Apr 2012 - 10:16 am | स्पा

१८० कि. ची रेड मर्क्युरी आणली असती

आमची "यामा" तुमच्या सो called मेर्चुरीला.. धूळ चारायला कधीची तरस्तेय ;)

धुळ चारण्याआधी शुद्धलेखन सुधारा, ते मराठीचं स'बली'करण का काय ते करा मग बोला,

चिपळुणकरांना पण विचारा रेड मर्क्युरी बद्दल.

विषय बदलण्याचा क्षीण प्रयत्न :D

बुलेट गाड्यांसहीत सगळे फोटो आणि वृत्तांत आवडला!

मागे होंडावरुन कन्याकुमारी (?), आता मग बुलेटवरुन हिमालय सर व्हायलाच पाहिजे. ;-)

त्याची तयारी चालु आहे यकु शेठ..... :)

जाई.'s picture

3 Apr 2012 - 5:36 pm | जाई.

छान वृत्तांत

छान भटकंती.

दुसरा फोटो पाहून बेहद्द खूष झालो आहे.

:-)

अत्रुप्त आत्मा's picture

3 Apr 2012 - 6:35 pm | अत्रुप्त आत्मा

मा*** मनराव...तुमची बुलेट चिंचवड कट्याला मारली होती,तेंव्हा पासुन मनात इष्काच्या इंगळीसारखी बसली आहे. ;-) आणी तिच्यावर तुम्ही हा किल्ला सर केलात,वर परत रस्ता आणी गाड्यांचे फोटू टाकलेत...अन्याय...अन्याय...शुद्ध अन्याय आहे हा.... ;-)

झ्याक ट्रीपचा झ्याक वृत्तांत दिल्याबद्दल धन्यवाद :-)

मनोवेगाने सर्वत्र संचार करत असणार्‍या आत्म्यांना वाहनांची काय जरूर?
कदाचित अशा पार्थिव आणि भौतिक गोष्टींमध्ये अडकून पडल्यामुळेच ते अत्रुप्त राहात असावेत काय? :P

अत्रुप्त आत्मा's picture

3 Apr 2012 - 11:40 pm | अत्रुप्त आत्मा

@मनोवेगाने सर्वत्र संचार करत असणार्‍या आत्म्यांना वाहनांची काय जरूर?>>> तुमच्या सारखे दुष्ट वेतोबा बसतात ना मानगुटिला... ;-)

@कदाचित अशा पार्थिव आणि भौतिक गोष्टींमध्ये अडकून पडल्यामुळेच ते
अत्रुप्त राहात असावेत काय?>>> तु गाव मला दु..दु..दु.. *******

मोदक's picture

4 Apr 2012 - 12:08 am | मोदक

मनरावची गाडी जबरा आहे, आणखी ६ महिन्यांत "बोलायला" लागेलच. :-)

चिंचवड कट्ट्याला तुझी गाडी चालवणे झकास अनुभव होता रे...

वपाडाव's picture

3 Apr 2012 - 6:40 pm | वपाडाव

लै झ्याक... अप्रतिम...

पैसा's picture

3 Apr 2012 - 7:18 pm | पैसा

आणि फोटो देखील!

प्रचेतस's picture

3 Apr 2012 - 7:41 pm | प्रचेतस

मस्त रे मनरावा.
फोटो सुंदर. वेळ होता तर वज्रगडावर पण जाऊन यायचे रे. तिथले ते दरवाजे आणि सर्वोच्च जागी असलेले कातळ जाम भारी आहेत.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

4 Apr 2012 - 12:43 am | निनाद मुक्काम प...

रामनवमी आणि दुर्ग मोहीम अशी मस्त सांगड घातल्या गेली,

राजस्थान मधील बहुतेक दुर्ग अत्यंत सुस्थितीत आहेत. कारण अपवाद वगळता एकजात सर्व मुघलांना शरण गेले. याउलट महारष्ट्रातील एकूण एक किल्ले युद्धाच्या आणि पराक्रमाच्या खुणा अभिमानाने मिरवतात
आज शुल्लक गोष्टींसाठी पक्षांतर करणारे .....
आणि दिलेर खानची ऑफर नाकारणारा बाजी.

असो
पक्षांतारावरून अवांतर नको

पु ले शु .

मनराव झिंदाबाद नी मुर्दाबाद एकाच वेळी...

स्पा's picture

4 Apr 2012 - 9:49 am | स्पा

मस्तच

मी-सौरभ's picture

4 Apr 2012 - 10:49 am | मी-सौरभ

पावसाळा सुरु झाल्यावर एक बाईक कट्टा करुया..

करुया म्हणजे काय करुयाच !!

करुया म्हणजे काय करुयाच !!

अरे वा :)

वपाडाव's picture

4 Apr 2012 - 2:02 pm | वपाडाव

आपले दुचाकी प्रशिक्षण संपले काय हो?
नै परवाना काढण्यास एळिजिबळ झालात का असं विचारायचंय?

सूड's picture

4 Apr 2012 - 2:19 pm | सूड

झालो नसलो तर होऊ एलिगिब्ले, आपणांसारखे मित्र असताना आम्हांस चिंतेचे कारण नाही.

मोदक's picture

4 Apr 2012 - 7:14 pm | मोदक

हाक मारणे..

चौकटराजा's picture

4 Apr 2012 - 1:56 pm | चौकटराजा

एक मिपाकर माझ्या पाठीमागे लागला आहे की आपण कुठेतरी एक दिवसाच्या भटकंतीला जाउ. माझ्या मनात ही सोपी ट्रीप आली होती. पण
रखरखाट म्हणतोयस तर मी नाही जात आत्ताच .मन्रराव पावसाळ्यात गेलास तर पिलियन वर मी. ( तुला फुल मनोरंजनाची गॅरंटी) .
बुलेट गाड्या कॅटवॉक करताहेत की चरताहेत ? क्या खूबसूरती है ! !

>>>मन्रराव पावसाळ्यात गेलास तर पिलियन वर मी. ( तुला फुल मनोरंजनाची गॅरंटी) .

मन्या सांभाळून रे! ;)
चौरा शेठ , मनोरंजन फुकटच ना! की काही पैसे वैग्रे :) ?

चौकटराजा's picture

4 Apr 2012 - 6:32 pm | चौकटराजा

पेट्रोल खर्च त्याचा . हवेचा खर्च माझा.

अरे वा !! तुमच्या घरी एल पी जी ची उणीव नसेल मग.

अत्रुप्त आत्मा's picture

4 Apr 2012 - 10:08 pm | अत्रुप्त आत्मा

@तुमच्या घरी एल पी जी ची उणीव नसेल मग.>>> मेलो आहे...

प्यारे१'s picture

5 Apr 2012 - 12:58 pm | प्यारे१

>>>पेट्रोल खर्च त्याचा . हवेचा खर्च माझा.

हवा 'फुग्यात' भरणार का?

मला वाटतं हवे पेक्षा फुग्याचा खर्च जास्त येईल! आपलं मत?

- सीरियस डिस्कशनला उत्सुक प्यारे१

मोदक's picture

5 Apr 2012 - 11:43 pm | मोदक

१) हवा कोणती..? Co2, नायट्रोजन की हिलीयम..?
२) फुग्याचा साईझ कोणता..? छोटा / मोठा की एअर बलून..?
३) फुग्याचे प्लॅस्टीक कोणते..? (DSS क्वालीटीचे एक प्लॅस्टीक मजबूत असते हे माहीत आहे..)

;-)

चौकटराजा's picture

6 Apr 2012 - 8:28 am | चौकटराजा

ज्या अर्थी हवा म्हटले आहे त्या अर्थी वायू नाही . ( मिक्स्चर ,- कम्पाउंड किंवा एलेमेंट नाही) .
खर्चाचा उल्ल्लेख आहे म्हणजे स्वता: उत्पन्न केलेली नाही. ( एच टू एस )
मनराव टायर टाकून फुग्याला बुलेट लावणार असेल तरीही " हवेचा" खर्च आमचा.
च्याउ रा ( रा १)

मनराव's picture

5 Apr 2012 - 10:37 am | मनराव

धन्यवाद सगळ्यांना....

रघु सावंत's picture

3 Jun 2012 - 11:17 pm | रघु सावंत

सायबा फोटो पाहून बेहद्द खूष झालो आहे.