जा, उडुनी जा पाखरा

सर्वसाक्षी's picture
सर्वसाक्षी in जनातलं, मनातलं
8 Jun 2008 - 3:52 pm

झाडावरचा इवलासा तांबूस तपकिरी पक्षी नजरेस पडताच मी दबक्या पावलांनी अलगद त्या दिशेने सरकलो व झुडुपांमध्ये बसकण मारत लपत छपत किरण साधला. कळ दाबणार इतक्यात त्या चिमण्या जीवाला चाहुल लागली. माणूस हा प्राणी विश्वास ठेवण्याच्या लायकीचा नाही हे ज्ञान त्याला उपजतच असावे. चाहुल लागताच त्या पक्ष्याने पापणी लवायच्या आंत एक चपळ भरारी घेतली आणि तो पलिकडच्या दाट झाडीत दिसेनासा झाला.

त्याची ती भरारी मात्र माझ्या चौकटीत कायमची बंदिस्त झाली.

चित्र तपशिल

उपकरण - निकॉन डी ६०
भिंगसंच - सिग्मा ७०-३०० डीजीमॅक्रो (३५ मिमि तुलनेत १०५-४५०मिमि)
प्रकाशग्रहण छिद्र ५.६
झडपगती १/४०० सेकंद
प्रकाशसंवेदनाक्षमता आय एस ओ ४००
भिंग रचना ३०० मिमि (३५ मिमि तुलनेत ४५०मिमि) दूरग्राही

कलाजीवनमानआस्वादविरंगुळा

प्रतिक्रिया

नंदन's picture

8 Jun 2008 - 8:17 pm | नंदन

फोटो. उडत्या पाखराची पिसे मोजून घ्यावीत :) [कृ. ह. घ्या]

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

विसोबा खेचर's picture

8 Jun 2008 - 10:44 pm | विसोबा खेचर

साक्षिदेवा,

सुंदर चित्र आहे रे! मस्तच!

भिंगसंच
प्रकाशग्रहण छिद्र
झडपगती
प्रकाशसंवेदनाक्षमता
भिंग रचना

अरे बापरे! काय रे साक्षिदेवा, तु आपल्या मथुरादास जलंत्रींचं शिष्यत्व केव्हा पत्करलंस :)

तुझा,
(गाववाला) तात्या.

फटू's picture

9 Jun 2008 - 12:46 am | फटू

छान प्रतीमा आली आहे तुमच्या निकॉन डी ६० उपकरणामधून... :D

पुन्हा,
सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

सुशील's picture

9 Jun 2008 - 2:12 am | सुशील

इथे आवर्जुन देण्याइतके ह्या फोटोत काय आहे?
मला फोटोतले काही कळत नाही ह्या फोटोत असे काय खास आहे कुणी समजावुन सांगेल का?
तो पक्शी निट झाडावर बसलेला असताना टिपला असता तर मला आवडला असता.

ध्रुव's picture

9 Jun 2008 - 4:19 pm | ध्रुव

प्रथम म्हणजे फोटो सुरेख टिपला आहे असे मला वाटते.
मला फोटोतले काही कळत नाही ह्या फोटोत असे काय खास आहे कुणी समजावुन सांगेल का?
उडत्या पक्ष्याचा फोटो मिळणे हे बर्‍याच प्रयत्नांनंतर मिळालेले फळ आहे. सर्वसा़क्षी यांनी वापरलेली लेन्स (सिग्मा ७०-३०० डिजी मॅक्रो) ही निकॉन डी६० कॅमेराबरोबर ऑटोफोकस होत नाही. याचाच अर्थ चित्रातील छोट्या छोट्या गोष्टी स्पष्ट दिसण्यासाठी कमालीचा हात लागतो. अश्या उडणार्‍या पक्ष्याचे चित्र या लेन्सने काढणे म्हणजे खरोखरीच कौतुकास्पद आहे. :)
तो पक्शी निट झाडावर बसलेला असताना टिपला असता तर मला आवडला असता.
नक्कीच! पण असाही छान दिसत आहे.

--
ध्रुव

प्रभाकर पेठकर's picture

9 Jun 2008 - 7:15 am | प्रभाकर पेठकर

श्री. सर्वसाक्षी,
छायाचित्र सुरेख टिपले आहे.
पण, अनावश्यक वनश्री पक्षावरून लक्ष विचलीत करते आहे.थोडे संपादीत केले असते तर अजून प्रभावकारी झाले असते.
उदाहरणार्थः

ध्रुव's picture

9 Jun 2008 - 4:12 pm | ध्रुव

पेठकरांशी सहमत.
चित्र मस्तच टिपले आहे. उडणारा पक्षी पकडणे म्हणजे एक खरोखरचे दिव्य आहे. पक्ष्याच्या पुढे थोडी अजून जगा ठेवली असती तर अजून छान दिसले असते. एक छान चौकटपण चित्राची शोभा वाढवेल.
--
ध्रुव

सहज's picture

9 Jun 2008 - 7:36 am | सहज

फोटो मस्त आला आहे.

आवडला.

पल्लवी's picture

9 Jun 2008 - 7:48 am | पल्लवी

मस्तच !

मदनबाण's picture

9 Jun 2008 - 2:59 pm | मदनबाण

सुरेख.....

फारच सुरेख क्षण तुम्ही टिपला आहे.....
अजुनही असे सुरेख क्षण पाहायला आवडतील.....

(निकॉन प्रेमी)
मदनबाण.....

ध्रुव's picture

9 Jun 2008 - 4:23 pm | ध्रुव

सुरेख चित्र...
असेच एक पकडायचा प्रयत्न मागे केला होता. पण तितका स्पष्ट नाही जमला पकडायला.
king

--
ध्रुव

सर्वसाक्षी's picture

9 Jun 2008 - 8:45 pm | सर्वसाक्षी

सर्वांचे सप्रेम आभार.
नंदन, उडत्या पाखराची पीसे मोजणार्‍या चतुराचा अभिप्राय वाचुन बरे वातले
तात्या, चार शब्द अपल्या भाषेत खरडायचा प्रयत्न केला रे, शिष्यत्व कसले. बाकी तो माणूस काहीतरी शिकुन घेण्यासारखा आहे हे खरे.
प्रभाकर शेठ, चित्र संपूर्ण आहे तसे अधिक बरे वाटेल असे मला वाटले. नुसता पक्षी देण्यापेक्षा अंधुक केलेली मागची झाडी पूरक ठरावी असा माझा समज. मात्र एकुण प्रतिमेच्या आकारमानात पक्षीप्रतिमा लहान आहे. एकतर लांबुन टिपले आहे, याहुन जवळ जाणे शक्य नव्हते, पक्षी ठरत नव्हता. शिवाय भिंगाची मर्यादा होतीच. आपण संपादित केलेले चित्रही झकास दिसते.
ध्रुव, सध्या सिग्माची डी ६० ला स्वयंचलीत रुपात वावरता येईल अशी आवृती आली आहे जी मी वापरली आहे. मात्र किंमत या एकाच कारणास्तव मूळ निकॉन ऐवजी ही तडजोड स्विकारली आहे हे सत्य आहे. चित्र टिपताना तारांबळ उडाली हे मात्र खरे.
पुन्हा सर्वांचे आभार

साक्षी