कळसुबाई नळीच्या वाटेने

बज्जु's picture
बज्जु in भटकंती
3 Jan 2012 - 1:31 pm

कळसुबाईला बारी गावाच्या व्यतिरिक्त आणखी दोन वाटांनी जाता येत अशी माहिती होती, बरेच दिवस जाण्याचा विचार देखील होता पण योग काही जुळुन येत न्हवता. शेवटी नाक्य़ाच्या मुलांनी ३१ डिसेंबरला मज्जा करण्यासाठी भंडारद-याला एम.टी.डी.सी.त जाण्याच नक्की केलं, २० जणांच बुकींग सुध्दा झालं, आणि आम्ही सुध्दा एका दगडात दोन पक्शी होतील म्हणुन कळसुबाई नळीच्या वाटेने आणि नंतर भंडारदरा असा बेत नक्की केला. नाक्याची काही मुलं तर ३० तारखेला दुपारीच एम.टी.डी.सी.त थडकले, ऊगीच चांगल्य़ा (?) कामाला ऊशीर नको. असो.

आम्ही मात्र ठाण्याहुन ३१ तारखेला पहाटे ४.३० ला तवेरा घेऊन निघालो, आमचे काही मित्र आम्हाला आंबेवाडी या पायथ्याच्या गावात सोडुन पुढे एम.टी.डी.सी.त जाणार होते, आणि ट्रेक झाल्यावर शुध्दीत असलेले आम्हाला घ्यायला येणार होते. साधारण ७.१५ ला आंबेवाडीच्या अलीकडे ४ कि.मी वर आम्ही गाडी सोड्ली, कारण आमचे लक्श असलेली कळसुबाई (असलेली नव्हे असलेला) आणि त्याबाजुला असलेली नळीची वाट अगदी स्पष्ट दिसत होती.

आंबेवाडीच्या अलीकडे ४ कि.मी वरुन कळसुबाई

आम्हाला आंबेवाडीत सोडायला आलेले काही मित्र

मित्रांचा निरोप घेऊन निघालो आणि अगदी जवळच दिसत असलेल्या आंबेवाडीला कुशीत घेतलेल्या या भिमकाय, अजस्त्र, अबब (काहीही म्हणा हो) दुर्ग त्रिकुटाचा फ़ोटो काढायचा मोह अनावर झाला.

अर्थातच अलंग, मदन, कुलंग

भिमकाय मदन

आम्ही जात असलेली वाट पश्चिमेकडुन असल्याने कळसुबाईच्या मागुन येत असलेली सुर्यकिरणे मजेशीर दिसत होती.

नळीला सुरुवात होते त्या ठिकाणी तासभरात पोहोचु असा अंदाज होता, पण ही वाट आजुबाजुच्या एक-दोन डोंगरांना वळसा घालत, थोडी आंबेवाडीच्या दिशेने, एखाद दोन टेकाडांच्या वरुन जात होती.

शेवटी ९.३० च्या सुमारास नळीपाशी पोहोचलो. नळी म्हणजे काय हो मोठ मोठ्या दगडधोंड्यांनी भरलेली पाण्याची वाट्च ती. या ठिकाणाहुनच पाणी खाली ऊडी घेते (असाच ऊल्लेख श्री. आनंद पाळंदे यांच्या "डोंगरयात्रा" मध्ये आहे)

तिथुन कळसुबाई अगदी अस्पष्ट दिसत होता, लगेच क्लिकून टाकलं कारण एकदा का नळी चढायला सुरुवात केली की वरती पोहोचेपर्यंत कळसुबाई दिसेलस वाट्त न्हवतं.

अस्पष्ट दिसणारा कळसुबाई

नळी प्रवेश - कळसुबाई गायब

या दगडधोंड्यांच्या वाटेत देखील निसर्ग मधुनच आपली किमया दाखवत होता.

एके ठिकाणी तर दगडावरील शेवाळे वाळुन त्याचे छान डिझाईन झाल होत.

वाटेत काही ठिकाणी सोपे कातळ्टप्पे होते तर काही ठिकाणची वाट अजस्त्र शिळांनी बंद झाली होती.

आतापर्यंत केलेली तासभराची चढाई ही साधारण अशा प्रकारे होती.

चालायला सुरुवात करुन तीन तास होऊन गेले, कुठून आलो ती वाट दिसत न्हवती, जिथे जायचय़ ती जागाही दिसत न्हवती, नळी अजुन किती आहे याचा अंदाज येत न्हवता, केवळ दोन्ही बाजूचे डोंगर जवळ जवळ येत आहेत म्हणजे नळी आता संपेल या आशेवर जात होतो.

एकेठिकाणी विश्रांतीसाठी थांबलो, जवळ्चे तहान लाडु-भूक लाडु खाल्ले, पाणी प्यायले आणि निघालो.

नळी संपायची चिन्ह दिसायला लागली, सुर्यप्रकाश वाढायला लागला आणि थोड्याच वेळात आम्ही नळी पार करुन वरती आलो.

डावीकडे असलेल्या कळसुबाईचे सुखद दर्शन झाले.

कळसुबाईच्या अत्युच्च्य टोकावर जायला अजुन अर्धा तास तरी लागणारच होता. पण बरेच दिवसांनी ट्रेकला जात असल्याने सवय मोडलेली, त्यात पहाटे लवकर निघालेलो, दिवसभरात खाणही तसं विशेष झालं न्हवत, या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणुन की काय पायात क्र्यम्प यायला लागले, आणि अर्धा तासाच्या अंतराला पाऊणतास लागला. शेवट्च्या शिडीपाशी आलो,

आणखी पाच मिनीटातचं कळसुबाईच्या देवळापाशी पोचलो.

आजुबाजुच्या परिसराचे फोटो काढले

आमच्या बरोबर पुर्वी काही ट्रेक केलेले जुने मित्र ऐन देवळातच भेटले, मग काय जुन्या आठवणी, गमती-जमती यात थोडा वेळ घालवला.

त्यांचा निरोप घेऊन निघालो कारण ते बारी गावात ऊतरणार होते, आणि कळसुबाई सगळ्या वाटांनी करायचा अस ठरवलं असल्याने आम्ही ईंदोरे नावाच्या एका लांबच्या वाटेने परतणार होतो. जवळच असलेल्या विहीरीतुन पाणी भरुन घेतलं, तिथेच एका मामाने आता खोपटी वजा दुकान टाकलं आहे, मामाकडेच गरमागरम खेकडा भजी खाल्ली, चहा प्यायला, त्यामधे खाण्यापेक्षा ईंदोरे गावची वाट विचारुन घेण हाही एक ऊद्देश होता. "बारीची जवळची वाट सोडुन लांबच्या वाटेने कशापायी जाता" इती मामा. आम्ही अर्थातच त्याकडे दुर्लक्ष केल आणि निघालो.

ईंदोरे गावच्या वाटेवरुन

साधारण पाऊण तासाच्या चालीनंतर एके ठिकाणी एकदम तुटलेला कडाच आला, पण त्याच्या बाजुनेच खाली ऊतरायला दगडी पाय-या देखील होत्या. साधारण १०० एक पाय-या असाव्यात.

एके ठिकाणी तर लोखंडी साखळी सुध्दा लावलेली होती, पण ती मधेच तुटली असल्याने आम्ही अर्थातच पाय-यांवरुन गेलो.

दगडात कोरलेल्या पार-या

तीन तास ऊतरुन पायथ्याच्या ईंदोरे गावात पोहोचलो तेव्हा पाय मी म्हणायला लागले होते, वाटेत मोबाईलला रेंज मिळाल्यामुळे मित्रांना निरोप पाठवला होता ते सुध्दा वेळेत आले आणि ५ च्या सुमारास भंडारदरा एम.टी.डी.सी.त पोचलो, आणि दोन्ही उद्दीष्ट साध्य झाल्याने समाधान पावलो.

भंडारदरा, मागील रांगेत रतनगड आणि खुटा

गडप्रेमी बज्जु

प्रतिक्रिया

सुहास झेले's picture

3 Jan 2012 - 1:50 pm | सुहास झेले

सही... हा रुट माहित नव्हता :( :(

आम्ही बारी गावातूनच गेलो होतो. मस्त ट्रेक आहे. ईंदोरे गावाची वाट पण मस्त. परत सुंदर सफर झाली.

धन्यवाद :) :)

प्रचेतस's picture

3 Jan 2012 - 1:56 pm | प्रचेतस

बज्जु गुरुजी, जबरदस्त फोटो आणि वर्णन.
कळसूबाईच्या दगडात खोदलेल्या पायर्‍या पहिल्यांदाच पाहिल्या.

मन१'s picture

3 Jan 2012 - 2:00 pm | मन१

कसले ते ट्रेक... कसले ते ट्रेकर्स....
आम्ही तर बुवा नुसते बघूनच गार होतो.

नुसत्या फोटोंनीच घामाघूम झालेला
बैठेबहाद्दर

प्यारे१'s picture

3 Jan 2012 - 2:23 pm | प्यारे१

देवा........
अरे काय चाललंय? वल्ली, तिक्डे ब्लॉगवर तो पंकज झरेकर इकडे हे साहेब. अवघड आहेत सगळे.

अन्या दातार's picture

3 Jan 2012 - 2:24 pm | अन्या दातार

जबरदस्त आहे राव ट्रेक.

शाहिर's picture

3 Jan 2012 - 2:49 pm | शाहिर

काहि प्रॉब्लेम झाला आहे का?

बज्जु साहेब

लय भारि मस्त

फोटो एकदम कडक

सर तुम्हि ठाणेकर आहात का? म्हंजे ठाणे येथे रहाता का?

बज्जु's picture

4 Jan 2012 - 4:56 pm | बज्जु

निश साहेब

मी ठाणेकर आहे. ठाण्यात पाचपाखाडी भागात रहातो.

प्रतिक्रियेबद्द्ल धन्स.

बज्जु

मोदक's picture

3 Jan 2012 - 4:54 pm | मोदक

:-(

घरी जवून बघावे लागणार..!

मोदक

गणेशा's picture

3 Jan 2012 - 7:04 pm | गणेशा

अप्रतिम ट्रेक भाऊ ...

विकास's picture

3 Jan 2012 - 7:38 pm | विकास

अगदी असेच वाटले. छान वर्णन आणि प्रकाशचित्रे!

मस्त फोटो आणि वर्णन पण, सध्या तरी अवघड आहे, पण कधीतरी जाईनच इथं

पैसा's picture

3 Jan 2012 - 10:44 pm | पैसा

आणि झकास वर्णन! इतकं चालून मग शिवाय फोटो काढायच्या तुमच्या हौसेला सलाम!

नशीबवान आहात तुम्ही सगळी ट्रेक करणारी ...
हेवा वाटतो तुम्हा सर्वाचा.

पाषाणभेद's picture

4 Jan 2012 - 12:31 am | पाषाणभेद

फार अवघड ट्रेक दिसतोय

जयंत कुलकर्णी's picture

4 Jan 2012 - 1:44 am | जयंत कुलकर्णी

सगळे कदाचित म्हणतील यांनी सगळे ट्रेक केलेत की काय ? पण हो मी सगळे ट्रेक केलेत आणि ते सुद्धा १९७० ते १९७८ सालात. कळसुबाईलाही मी त्या काळात गेलो होतो. हा ट्रेक आम्ही इगतपूरी ते जुन्नर असा केला होता. त्यात कुलंग, अलंग, मलंग, रतनगड, कलसूबाई .... इ... किल्ले केले होते.

आठवण जागी केलीत त्याबद्दल धन्यवाद !

sagarpdy's picture

4 Jan 2012 - 2:43 pm | sagarpdy

त्यात कुलंग, अलंग, मलंग, रतनगड, कलसूबाई .... इ... किल्ले केले होते.

मदन हो मदन!

बज्जु's picture

6 Jan 2012 - 9:11 am | बज्जु

सर्व प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद

बज्जु

तुषार काळभोर's picture

6 Jan 2012 - 3:02 pm | तुषार काळभोर

महाराष्ट्रातील सर्वोच्च स्थळी पायर्‍या आणि रेलिंगची सोय करणार्‍या सर्वांना साष्टांग नमस्कार!!

मेघवेडा's picture

6 Jan 2012 - 3:11 pm | मेघवेडा

भारी ट्रेक!

यशोधरा's picture

6 Jan 2012 - 4:44 pm | यशोधरा

+१

अभिजीत राजवाडे's picture

7 Jan 2012 - 8:33 pm | अभिजीत राजवाडे

हा ट्रेक राहिला आहे. तुमचे फोटो पाहुन पुन्हा उत्साह आला आहे. लवकरात लवकर करतो.