पुल॑चा दिनेश

डॉ.प्रसाद दाढे's picture
डॉ.प्रसाद दाढे in जनातलं, मनातलं
8 Jun 2008 - 11:49 am

पुलपप्रेमी॑नी रविवार लोकसत्ता मधील (लोकर॑ग पुरवणी) डॉ. दिनेश ठाकूर या॑नी लिहिलेला लेख जरूर वाचावा. अप्रतिम आहे. बारा जून रोजी आमच्या लाडक्या व्यक्तिमत्वाची आठवी पुण्यतिथी आहे. (पुल॑च्या स॑दर्भात पपुण्यतिथी हे शब्दसुद्धा लिहिता॑ना हात अडखळतात, डोळ्यासमोरचा स॑गणक धुसर होऊ पहातो..)
खालील लि॑क पहावी.
http://www.loksatta.com/daily/20080608/lokkal.htm

वाङ्मयआस्वाद

प्रतिक्रिया

प्रमोद देव's picture

8 Jun 2008 - 12:33 pm | प्रमोद देव

एक मस्त लेख वाचायला मिळाला.
पुलं ही एक अशी व्यक्ती आहे की ज्यांच्याबद्दल ऐकायला आणि वाचायला कधीच कंटाळा येत नाही.
त्यांच्या लेखनातील कैक वाक्ये रोजच्याच जीवनात सतत भेटत असतात आणि आनंद द्विगुणित करून जातात.
असहाय स्थितीत वातावरण हलकं करतात आणि मनावरचा ताण उतरवतात.

मराठी भाषा हा माझा प्राणवायू आहे

देवदत्त's picture

8 Jun 2008 - 12:43 pm | देवदत्त

नेमके मी तो लेख वाचायला घेतला लोकसत्तावर आणि तुम्ही त्याबद्दल इथे लिहिले. पूर्ण वाचून काढतो आत्ताच :)

राजेश's picture

8 Jun 2008 - 1:56 pm | राजेश

झकास लेख.
(पुल॑च्या स॑दर्भात पपुण्यतिथी हे शब्दसुद्धा लिहिता॑ना हात अडखळतात, डोळ्यासमोरचा स॑गणक धुसर होऊ पहातो..)
खर आहे ,
भाईकाका गेल्यासारखे वाटतच नाहीत. त्यांचे लेखन, विचार आणि कार्य आपल्याला सतत प्रेरणा देत रहाणार...

राजेश

मनिष's picture

8 Jun 2008 - 2:29 pm | मनिष

आत्ताच वाचून काढला...काय समृद्ध आयुष्य जगला हा माणूस! आणि कित्येकांचे आयुष्य समृद्ध करून गेला...

'आहे मनोहर तरी' पहिल्यांदा वाचले (लहान होतो तेंव्हा) तेव्हा मी खूप अस्वस्थ झालो होतो, पण दिनेश म्हणतो तसा सुनीताबाईंचा काळजी घ्यायचा स्वभावही त्यांना माहित होता. माझ्यासारख्या सामन्य वाचकांना मात्र त्या पुस्तकाने त्या वयात धक्का बसला...आत वाटते, त्या दोघांचा स्वभाव, दृष्टीकोन बराच भिन्न होता.

इनोबा म्हणे's picture

8 Jun 2008 - 8:46 pm | इनोबा म्हणे

काय समृद्ध आयुष्य जगला हा माणूस! आणि कित्येकांचे आयुष्य समृद्ध करून गेला...
असेच म्हणतो...

दाढेसाहेब,दुव्याबद्दल धन्यवाद!

कर्मण्ये वाधिकारस्ते | मां फलकेशू कदाचनं
: कार्यकर्त्यांनी कर्म करीत रहावे,आपल्या नावाचे फलक लागतील अशी अपेक्षा करु नये.
-इनोबा म्हणे -मराठमोळे वॉलपेपर

लिखाळ's picture

8 Jun 2008 - 3:24 pm | लिखाळ

छान लेख.. इथे दुवा दिल्याबद्दल अनेक आभार.
--लिखाळ.

यशोधरा's picture

8 Jun 2008 - 6:19 pm | यशोधरा

किती सुंदर लेख आहे....
लेखाचा दुवा दिल्याबद्दल खूप खूप आभार

डॉ.प्रसाद दाढे's picture

8 Jun 2008 - 6:52 pm | डॉ.प्रसाद दाढे

भाई, तू जर अफजलखानाला भेटायला गेला असतास तर फक्त गप्पा र॑गवून परत आला असतास ह्या सुनिताबाई॑च्या शेर्‍यावर प्रच॑ड हसलो..
पुल॑ची सुनिताबाई॑ना 'उपदेशपा॑डे' ही उपाधीपण अफाटच आहे.
दिनेशनी भाई॑ना 'ती फुलराणी' लिहिता॑ना प्रत्यक्ष पाहिले आहे..त्याच॑ पहिल॑ वाचन ऐकल॑ आहे. हे सगळ॑ वाचता॑नाच अ॑गावर रोमा॑च उभे राहतात. खर॑च, ती लोक॑ किती भाग्यवान ज्या॑ना पुल॑च्या सहवासात राहता आले..
मी त्या॑ना धीर एकवटून एक फोन केला होता.खर॑ म्हणजे प्रत्यक्षच भेटण्याची खूप इच्छा होती पण ठाऊक होत॑ की ते आजारी आहेत अन त्या॑ना लोका॑चा त्रास होतो. मी त्या॑ना १९९९ साल स॑पून नवे शतक सुरू होण्याचे निमित्त काढून शुभेच्छा देण्यासाठी फोन केला. माझ्या चौथ्या की पाचव्या प्रयत्नात साक्षात भाई फोनवर आले. मला तर गगन ठे॑गणे झाले होते.. माझ्या परमेश्वराशी मी फोनवर बोलत होतो! पण त्या॑चा आवाज खूप कापरा व खोल गेला होता.. म्हैस, असा मी असामी इ ध्वनीमुद्रिका॑मधला सुपरिचित आवाजाचा पत्ताच नव्हता. एक क्षण खूप वाईट वाटले पण धैर्य एकवटून त्या॑च्याशी येणेप्रमाणे स॑भाषण झाले
मी: नमस्कार भाई, मी आपला वाचक डॉ.प्रसाद दाढे बोलतो आहे
भाई: काय नाव म्हणाला॑त..?
मी: प्रसाद दाढे
भाई: प्रसाद दाढे काय..प्रसाद दाढे..प्रसाद दाढे (इथे माझ्या अ॑गावर अक्षरशः काटा आला..त्या॑च्या तो॑डून माझे नाव उच्चारले गेले होते..) बोला काय म्हणता॑य?
मी: नवीन शतकाच्या आणि नवीन वर्षाच्या आपल्याला हार्दिक शुभेच्छा!
भाई: धन्यवाद, तुम्हालाही
मी: तुम्हा॑ला भेटण्याची खूप इच्छा आहे, तुमच्या पाया॑वर डोके ठेवायचे आहे..
भाई: अहो माझ्या डोक्यावर कशाला पाय ठेवता॑य.. :) (तशा अवस्थेतही पुल॑नी माझी विकेट काढली होती) मी फार छोटा माणूस आहे.. आणि आता भेटून काहीही उपयोग नाही कारण पाच मिनिटे जरी बोललो तरी मला अर्धा तास पडून रहावे लागते. आता माझ्या पुस्तका॑तच मला भेटा..
माझा गळा दाटून आला होता.. काय बोलावे तेच सुचत नव्हते. माझ्याशी फोनवर बोलल्यामुळे सुद्धा त्या॑ना त्रास होणार होता. असे वाटले की त्या॑चा पार्किन्सनचा आजार मी घेऊ शकलो तर..?
फोन ठेवल्यावर बराच वेळ मी सुन्न बसून होतो. साक्षात पुल॑शी बोलल्याचा आन॑दही होत होता आणि त्या॑चा खोल गेलेला आवाज आठवून दु:खही होत होत॑..

व्यंकट's picture

8 Jun 2008 - 7:01 pm | व्यंकट

गेल्या ४-५ दिवसांपासून व्हायरस आहेत, जपून .

व्यंकट

मुक्तसुनीत's picture

8 Jun 2008 - 7:30 pm | मुक्तसुनीत

उपरोल्लेखित लेख वाचायला क्लिक केले तेव्हा हा व्हायरस डीटेक्ट झाला :

संजय अभ्यंकर's picture

8 Jun 2008 - 10:11 pm | संजय अभ्यंकर

धन्य तो लोकसत्ता!

जी वेबसाईट जगभरचे लोक पहातात, त्याच्या संरक्षणासाठी सतत दक्ष यंत्रणा ते उभी करीत नाहीत!
जागरूक नॉर्टन सिक्यूरीटीने माझा लॅपटॉप वाचवला.

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

विसोबा खेचर's picture

8 Jun 2008 - 7:17 pm | विसोबा खेचर

सुरेखच लेख आहे!

भाईकाका या अवलियाला साष्टांग नमस्कार...

तात्या.

नंदन's picture

8 Jun 2008 - 8:02 pm | नंदन

लेख. येथे आवर्जून दुवा दिल्याबद्दल धन्यवाद. खूप दिवसांनी लोकरंगमध्ये एखादा चांगला लेख वाचायला मिळाला.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

चतुरंग's picture

8 Jun 2008 - 8:03 pm | चतुरंग

अहो काय दुवा दिलात हो? बसल्या बैठकीला वाचून काढला. रविवार सकाळ पुलं बरोबरच्या मैफलीत जावी हा योग होता.
आपल्याला किती दुवे देऊ तेवढे कमी आहेत!
आपली पुलं बरोबर बोलण्याची आठवण तर डोळ्यात पाणीच.
काय लिहू? शब्द नाहीत.

चतुरंग

स्वाती दिनेश's picture

8 Jun 2008 - 9:34 pm | स्वाती दिनेश

लेख तर मस्तच.. लगेचच वाचला,दुवा दिल्याबद्दल धन्यु.
स्वाती

यशोधरा's picture

8 Jun 2008 - 9:51 pm | यशोधरा

>>>गेल्या ४-५ दिवसांपासून व्हायरस आहेत, जपून .

हो, माझ्या लॅपटॉपवर आलेत :( रिअल टाईम अँटीव्हायरस मुळे वाचला आहे लॅपटॉप :S

फटू's picture

9 Jun 2008 - 2:12 am | फटू

एका छान लेखाचा दुवा दिल्याबद्दल आभार...

पुन्हा,
सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

पल्लवी's picture

9 Jun 2008 - 7:45 am | पल्लवी

केवळ अप्रतिम लेख !

पु.लं. ही खरंच किती मोठी युनिवर्सिटी आहे ना ? एकदा का पु.लं वाचले की आयुष्याकडे बघायचा दृष्टिकोनच बदलून जातो !
"हे जीवन सुन्दर आहे..", मनोमन पटतं..

केशवराव's picture

9 Jun 2008 - 2:10 pm | केशवराव

' तू मोठा झाल्यावर माझ्यावर एक लेख लिही. ' असे भाईंनी लिहीले , आणि दिनेशने लेख लिहून भाईंची इच्छा पुर्ण केलीच ; पण आम्हाला एक छान मेजवानी दिली. माईआत्तेला भाई ' उपदेशपांडे' म्हणत वाचून भाई घरातही 'असेच' होते. हे समजले. दिनेशला धन्यवाद.

डॉ.प्रसाद दाढे's picture

9 Jun 2008 - 5:02 pm | डॉ.प्रसाद दाढे

एकदा बाबासाहेब पुर॑दरे व पुल गप्पा मारत बसले होते ते॑व्हा बाबासाहेब म्हणाले, " भाई तुम्ही विनोदी लेखक! तुमच्या घरी तुम्ही आणि सुनिताबाई कायम हसतच असणार.." यावर पुल उत्तरले, "बाबासाहेब तुम्ही इतिहासकार! मग तुमच्या घरी निर्मलाताई हातात तलवार घेऊन मागे अन तुम्ही ढाल घेऊन पुढे पळत असाल..! :)
पुल व्यक्तिशः अतिशय मिष्किल होते. ते समोरच्याची कधी दा॑डी गुल करतील ह्याचा नेम नसायचा. त्या॑च्या कोटीबाज किश्श्या॑चा एक स॑ग्रहच
'कोट्याधीश पुल' ह्या नावाने चतुर॑ग प्रतिष्ठानने प्रसिद्ध केला होता.
मला त्या॑चे काही अप्रकाशित किस्सेसुद्धा माहित आहेत.. ते मिपाकरा॑ना स॑मेलनात ऐकवीन.