मिपा वरील नाती गोती...

फटू's picture
फटू in काथ्याकूट
4 Jun 2008 - 1:06 pm
गाभा: 

मंडळी,

नुकताच आमच्या मयुर येलपलेंनी लिहिलेला रायगडावर लिहिलेला लेख वाचला...

हे मयुर येलपले आम्ही आमच्याच अभियांत्रिकी महाविद्यालयात व्याखाता म्हणून काम करत होतो तेव्हाचे आमचे विद्यार्थी... आजही आम्हाला ते "सर" असंच म्हणतात (अगदी आमची औकात माहीती असुनही... :D )

आमचे दुसरे रायगड प्रेमी स्नेही चेतन हे आम्हाला अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये एक वर्षाने वरिष्ठ होते...

तुम्हीही सांगुन टाका तुमची मिपा वरील नाती गोती...

तसं मिपा हेच एक छान कुटुंब आहे... अगदी इथेही काही कारटी नाठाळ आहेत... असो. पण आम्हाला तुम्ही मिपाकर होण्याआधीची नाती गोती अपेक्षित आहेत...

तर मग लिहुन टाका... (माझ्यासारखे रिकाम** असाल तर... :D )

आपलाच,
(नाती गोती शोधणारा) सतिश गावडे

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

4 Jun 2008 - 1:24 pm | विसोबा खेचर

सगळेच मिपाकर माझे बंधुभगिनी व मित्रमैत्रिणी आहेत! :)

तेवढी एक 'ती' सोडून!

ती बहीण तर नाहीच नाही, परंतु मैत्रिणीपेक्षाही मला अधिक जवळची आहे! :)

'ती' देखील इथेच आहे! तिनं इथे एका भलत्याच आयडीने सभासदत्व घेतलेलं आहे असंही तिनं मला सांगितलेलं आहे! अर्थात, ती इथं लिहीत काहीच नाही, नेहमी फक्त वाचनमात्रच असते! लॉगईनही फार क्वचित करते!

काय म्हणालात? तिचं नांव काय अन् आयडी कुठला??

छे छे! मुळ्ळीच सांगणार नाही जा! :)

नायतर आम्हा दोघाना, "आजकल तेरे मेरे प्यारके चर्चे हर जबानपर, सबको मालूम है और सबको खबर हो गई!" हे गाणं म्हणत मिपाच्या बागेत फिरावं लागेल! :)

असो...

आपला,
(फिल्मी) तात्या.

मयुरयेलपले's picture

4 Jun 2008 - 1:36 pm | मयुरयेलपले

आज मला, तुम्हि आम्हाला शिकवायला होतात हे सांगायला अभिमान वाटतो... कोणि आज पर्यंत आपल्या सरांसोबत बसुन बीअर पिलीय का? मी पिलीय... हे सांगायला जास्त अभिमान वाटतो... >:D<
आपला मयुर

फटू's picture

5 Jun 2008 - 1:01 am | फटू

तू तुझ्या सरांसोबत ( म्हणजेच माझ्यासोबत ) बीयर प्यायचास... पण तू हे नाही सांगितलंस की तेव्हा तुझे सर (म्हणजेच मी ) मँगोला, माझा सारखी आमरसाशी साम्य दाखवणारी शीतपेये प्यायचे... बीयर नाही...

ठीक आहे रे... तेव्हा दोन चार मार्क्स कमी दिले असतील म्हणुन काय असं बदनाम करायचं मला...

असं नको करू रे... अजुन पोरगी बीरगी पटवायची आहे मला... (हल्ली पोरी पितो का, फुकतो का असं काही नाही विचारत म्हणे... पण मला रिक्स नाही घ्यायचीये.. :D )

पुन्हा,
सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

वरदा's picture

4 Jun 2008 - 6:56 pm | वरदा

माझे कुणीच आधीच्या ओळखीचे इथे नाही..पण इथे आल्यापासुन वाट्टं मी या सगळ्यांना कित्येक वर्ष ओळखतेय....

राजे's picture

4 Jun 2008 - 6:59 pm | राजे (not verified)

पण इथे आल्यापासुन वाट्टं मी या सगळ्यांना कित्येक वर्ष ओळखतेय....

एकदम मनातंल बोअलला बघा तुम्ही :)

राज जैन
जेव्हा तुम्ही कर्म करण्यामध्ये कमी पडता तेव्हा नशीबाला दोष देता !

चतुरंग's picture

4 Jun 2008 - 7:14 pm | चतुरंग

मी स्वतःला किंचित अधिक ओळखायला लागलो! ;)

चतुरंग

छोटा डॉन's picture

4 Jun 2008 - 7:21 pm | छोटा डॉन

>>मी स्वतःला किंचित अधिक ओळखायला लागलो!
चतुरंगशेठचा नेहमीप्रमाणे "यॉर्कर वर सिक्स " ....

बाकी वरदाशी सहमत ...
"इथं आल्यापासनं बहुतेकांना गेली कित्येक वर्ष ओळखतोय "

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

विसोबा खेचर's picture

5 Jun 2008 - 12:06 am | विसोबा खेचर

चतुरंगशेठचा नेहमीप्रमाणे "यॉर्कर वर सिक्स " ....

हे बाकी मस्तच! आमचा रंगा तसा बोलण्यात हुशार मनुष्य आहे. मला मिपाकंटक फार छळायला लागले की अलिकडे मी रंगाचा आणि प्रियालीचाच सल्ला घेतो! :)

आपला,
(साधा, गरीब, अन् भोळाभाबडा!) तात्या.

चतुरंग's picture

5 Jun 2008 - 12:19 am | चतुरंग

(स्वगत - तात्या मला हरभर्‍याच्या झाडावर तर चढवत नाहीये ना? :? तसा तो चुकला तर त्याचा कान पकडायलाही कमी नाही करणार म्हणा! ;) )

चतुरंग

प्रियाली's picture

5 Jun 2008 - 12:25 am | प्रियाली

अलिकडे मी रंगाचा आणि प्रियालीचाच सल्ला घेतो!

हो! हो!! ;)

वरदा's picture

4 Jun 2008 - 7:45 pm | वरदा

चतुरंगशेठचा नेहमीप्रमाणे "यॉर्कर वर सिक्स " ....

हो ना हेच म्हणते.....

श्रीमंतपेशवे's picture

4 Jun 2008 - 9:54 pm | श्रीमंतपेशवे

मिपावाल्यांना आम्ही तसे नवे आहोत पण आपण सगळ्यांना ओळखतो राव !!
गेला एक महीना नुसत वाचतोय पण आपल खातं काय उघडेना.आज मात्र अजबच!!!
उद्या पुन्हा नाही उघडलं म्हणजे आमची पण ओळख असु द्या म्हटलं !

कोणी नाही..(का, मला काहींनी ओळखलं असेल आणि आता ओळख टाळत असतील?, जाउ दे)

पण नवीन बरीच लोकं भेटली..परवाच एक जण भेटली आमच्या सदशिव पेठेतली. जुने संदर्भ आठवल्यामुळे खूप छान वाटलं.

ईश्वरी's picture

4 Jun 2008 - 10:00 pm | ईश्वरी

परवाच एक जण भेटली आमच्या सदशिव पेठेतली. जुने संदर्भ आठवल्यामुळे खूप छान वाटलं.

अरे मीच ती. मलाही छान वाटलं. घराच्या एवढ्या जवळ्चं कोणीतरी भेटल्याने .

ईश्वरी

एक's picture

5 Jun 2008 - 2:17 am | एक

तूच ती :)

पण म्हटलं एकदम कसं काय नाव टाकू

भडकमकर मास्तर's picture

4 Jun 2008 - 11:49 pm | भडकमकर मास्तर

डॉ. दाढे यांना ओळखतो... हिटलरावरच्या चर्चेत ( नाझी भस्मासूर) त्यांना इथे आणले आणि ते इथलेच झाले...
______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

मिपा माझे संकेतस्थळ आहे
सारे मिपासदस्य माझे सुहृद आहेत
मिपावर येणे मला खूप आवडते
जिद्दीने (आणि हट्टाने:-)) मिपा तयार करणार्‍या तात्यांचा आणि
येथे काव्य-शास्त्र-विनोद करण्यात
पारंगत असलेल्या विद्वानांचा मला अभिमान आहे
ह्या विद्वानांची विद्वत्ता वाचून समजून घेण्याचा मी प्रयत्न करेन
त्यातील काही समजो न समजो,
मी त्यात पिंक टाकण्याचे सौजन्य दाखवेन
मिपाशी निष्ठा राखण्याचा आणि
मिपा सदस्य जे काही मला प्रतिसाद देतील ते लक्षात ठेवून त्यांच्या लेखनप्रपंचात
सहभागी होण्याची मी प्रतिज्ञा करत आहे.
त्यांचे लिखाण आणि त्यावरील वादविवाद
वाचण्यातच माझा येथील टि.पी. सामावलेला आहे.

विसोबा खेचर's picture

5 Jun 2008 - 8:38 am | विसोबा खेचर

त्यातील काही समजो न समजो,
मी त्यात पिंक टाकण्याचे सौजन्य दाखवेन

हे बाकी मस्तच! वा विकासराव, प्रतिज्ञा छान आहे! :)

तात्या.

मुक्तसुनीत's picture

5 Jun 2008 - 9:47 am | मुक्तसुनीत

रामदास फुटाणे यांच्या कवितेचे विडंबन करायचे झाल्यास ...

मिपा कधी कधी माझे संकेतस्थळ आहे ... :))

शितल's picture

5 Jun 2008 - 3:29 am | शितल

मिपावर माझ्या परिचयाचे कोणी नव्हते, प्राजु मुळे मला मिपा बद्दल कळाले, पणा आता मला खुप छान मित्र मैत्रीणी मिपा मुळे मिळाल्या .

अनिल हटेला's picture

5 Jun 2008 - 8:14 am | अनिल हटेला

ह्या विद्वानांची विद्वत्ता वाचून समजून घेण्याचा मी प्रयत्न करेन
त्यातील काही समजो न समजो,
मी त्यात पिंक टाकण्याचे सौजन्य दाखवेन
मिपाशी निष्ठा राखण्याचा आणि
मिपा सदस्य जे काही मला प्रतिसाद देतील ते लक्षात ठेवून त्यांच्या लेखनप्रपंचात
सहभागी होण्याची मी प्रतिज्ञा करत आहे.
त्यांचे लिखाण आणि त्यावरील वादविवाद
वाचण्यातच माझा येथील टि.पी. सामावलेला आहे.

मी सुद्ध हेच म्हणतो.....

बाकी इथला सदस्य झाल्या पासुन घरापासुन घरच्या पासुन दुर आहे अस अजिबात वाटत नाही....
मि पा माझ कुटूम्ब आहे असच वाटतये.....

बाकी लगे रहो.........

डॉ.प्रसाद दाढे's picture

5 Jun 2008 - 8:24 am | डॉ.प्रसाद दाढे

भडकमकरमास्तरा॑नीच (कान धरून?) मला मिपावर आणले आणि दररोज मिपाला भेट दिल्याशिवाय मला चैनच पडत नाही. कालचे दोन दिवस पावसामुळे आमच्याकडे लाईट नव्हते व त्यामुळे मला मिपा पाहता आले नाही तर मन प्रच॑ड अस्वस्थ झाले.. ऍडिक्शनच लागले म्हणा..
धमालने आयोजित केलेल्या मिपास॑मेलनामुळे विजुभाऊ नामक एक वल्ली माझी मित्र झाली.. अशी स॑मेलने परत परत भरविली पाहिजेत.
मध्य॑तरी मदनबाणशी व छोट्या डॉनशी फोनवर खूप गप्पा मारल्या.. प्रत्यक्ष भेटले तर आणखी मजा येईल!
थोडे अवा॑तरः आसपास आ॑ग्लाळलेली पिल्लावळ रोज पाहात असल्यामुळे (वा गेली दहा वर्षे त्या॑च्यातच नाईलाजाने राहिल्यामुळे) मला मराठी भाषेचे भवितव्य धोक्यात आले आहे असे सारखे वाटत होते.. पण तात्या, स॑जोपराव, विजुभाऊ, केशवसुमार, भडकमास्तर, डा॑बिसराव, चतुर॑गशेठ, मुक्तसुनित, मदनबाण, पेठकरकाका इ. मिपाकर इतक॑ छान व अभिजात साहित्य लिहित असतात की मराठी भाषा पुढची दहाहजार वर्षे अशीच गाजत राहिल याची मला पूर्ण खात्री आहे.
भडकमास्तरा॑मुळे मला एव्हढे सगळे मित्र मिळाले..

व्यंकट's picture

5 Jun 2008 - 9:04 am | व्यंकट

मी पोचलो असाच फिरत फिरत

व्यंकट

भाग्यश्री's picture

5 Jun 2008 - 9:14 am | भाग्यश्री

मी इथे कशी आले? खरंतर प्रत्यक्षात ओळखीचे कुणीच नाही.. तरीही तात्यांकाडून इतर संस्थळांवरती मिपा निघणार हे कळतच होते.. त्यामुळे जेव्हा खरोखरच सुरू झाले तेव्हा करून टाकली नोंदणी.. तेव्हापासून शक्यतो वाचनमात्र.. वेळ मिळेल तसा, आणि खूप काही आवडलं की प्रतिसाद देते.. मिपा होतं ते, म्हणून धाडसाने मी काढलेल्या रेघोट्या इथे टाकाव्याश्या वाटल्या.. इतर कुठे नाही फारसं टाकू शकले.. मिपाची दिलदारी आणि मोकळेपणा कारणीभूत..कुणाशी फार वैयक्तीक ओळखी नाही झाल्या,पण सगळे आयडीज ओळखीचे झालेत! त्यामुळे मिपा हे कुटुंब्,मित्रपरिवार वाटतेच वाटते..
असो.. थोडक्यात तात्यांना मी प्रत्यक्ष ओळखत नसले तरी इथे आले तात्यांमुळेच..आणि आता व्यसन लागलंय मिपाचं! धन्यवाद तात्या!!

llपुण्याचे पेशवेll's picture

5 Jun 2008 - 9:18 am | llपुण्याचे पेशवेll

मी मात्र इथे भाग्यश्रीला प्रत्यक्ष ओळखत आहे. ती माझ्याच शाळेत होती. :)
पुण्याचे पेशवे

भाग्यश्री's picture

5 Jun 2008 - 9:26 am | भाग्यश्री

अरे हो पेशव्या.. तुला नाही विसरले.. ओळखते तुला मी चांगलीच.. :))
सॉरी बॉस नाव टाकणेको भूल गयी...

विसोबा खेचर's picture

5 Jun 2008 - 9:20 am | विसोबा खेचर

तरीही तात्यांकाडून इतर संस्थळांवरती मिपा निघणार हे कळतच होते..

कुठल्याकुठल्या संस्थळांवर? कारण काही संस्थ़ळांवर तर माझं नांव घेतलं जाणं हे पाप समजतात! :)

मिपा होतं ते, म्हणून धाडसाने मी काढलेल्या रेघोट्या इथे टाकाव्याश्या वाटल्या..

अरे खरंच की! बर्‍याच दिवसात तू काढलेली चित्र नाही टाकलीस मिपावर! टाक की पुन्हा एखाददा!

असो.. थोडक्यात तात्यांना मी प्रत्यक्ष ओळखत नसले तरी इथे आले तात्यांमुळेच..आणि आता व्यसन लागलंय मिपाचं!

व्यसन? अरे बापरे! अगं भाग्यश्री कोणत्याही गोष्टीचं व्यसन वाईटच बरं का! अगं तूच तर धाक दाखवलास म्हणून आम्ही मिपाचे मद्यकट्टे बंद केले ना! ;)

धन्यवाद तात्या!!

त्यात धन्यवाद कसले? तुम्हा सगळ्यांमुळेच आज मिपाचं गोकूळ नांदतंखेळतं आहे म्हणून उलटपक्षी मीच तुम्हा सर्वांना धन्यवाद देतो!

तात्या.

भाग्यश्री's picture

5 Jun 2008 - 9:29 am | भाग्यश्री

हाहा.. माझा कसला धाक हो! :) होना पण तेव्हा बोलले जोरात.. पण आता सकाळी उठलं की कामं-धामं सोडून मिपा उघडून बसते..म्हणजे व्यसनच ना? नवरा तर ब्लॉक करायला निघालाय.. :))

मदनबाण's picture

5 Jun 2008 - 9:32 am | मदनबाण

Yogesh ही व्यक्ती कोण ते मला माहित नाही ,,,,,त्यांनी एका ब्लॉग वर आपल्या या संकेत स्थळाचे नाव लिहले होते.....ते वाचुनच मी इकडे आलो.....
मिपा चे मला ऍडिक्शन आहे हे मला आनंदाने सांगावेसे वाटते,,,,,

(मिपा ऍडिक्ट)
मदनबाण.....

गणा मास्तर's picture

5 Jun 2008 - 9:58 am | गणा मास्तर

माझ्या मित्राच्या मित्राचा भाउ मला येथे भेटला तो म्हणजे मनोबा
आम्ही एकमेकांना कधीच प्रत्यक्ष भेटलो नाही आहोत, पण ऐकलय खुप ऐक्मेकंबाबत.

ऍडीजोशी's picture

5 Jun 2008 - 11:58 am | ऍडीजोशी (not verified)

मी तात्यांना वेगळ्या कट्ट्यांच्या माध्यमातून जवळपास गेली ४ वर्ष ओळखतोय. तात्या ही काय असामी आहे हे तेंव्हा पासून माहिती होते. चतुरस्त्र व्यक्तीमत्व, बिनधास्त वागणे, खर्‍याची आवड आणि मैत्री जपण्यासाठी जगाला फाट्यावर मारायची तयारी ह्यामुळे तात्यांशी स्नेह वाढावा अशी इच्छा होती. ती मिपा मुळे पुर्ण झाली.

लिहायला सुरुवात केली मी इथे बँगलोरला आल्यापासून. मिपा वर कसा पोचलो ते माहिती नाही. पण इथे आलो नी इथलाच झालो. आणि मिपा तात्यांची आहे हे कळल्यावर आनंदाचा धक्का बसला. जणू दुधात साखर, व्हिस्कीत सोडा, रम मधे थम्स-अप.

बँगलोरला येण्याआधी इथे मराठी कानावर पडेल की नाही अशी शंका होती. पण केवळ आणि केवळ मिपा मुळे मी अजूनही आपल्या मायभूमीतच आहे असं वाटतं.
इथे अनेक मित्र भेटले. डॉन, अबब (आताचा अभिज्ञ) तर प्रत्यक्षात भेटले. पिण्यात माझा हात धरणारा कुणी नाही हा गैरसमज दूर झाला.
ओसर्‍यांच्या ढोसर्‍या केल्याबद्दल कान उपटणार्‍या ताया, मावशा, मैत्रीणी भेटल्या. त्यांच्या मुळेच एक शनीवार संध्याकाळ चक्क सुकी गेली.

कुणाशी कसलीही ओळख असायचा काहिही संबंध नसताना इतकी लोकं जोडल्या गेली.

माझ्या पहिल्या काही लेखांवर आलेल्या प्रतिक्रीया पाहून लिहीण्याचा हुरूप वाढला. खरं सांगायचं तर आज मागे वळून बघताना त्यातले काही लेख अगदीच ऍमॅचुयर कॅटेगरीत मोडणारे होते हे कळतंय. पण तरिही मिपाकर्‍यांनी उत्साह वाढवला, शाबासकी दिली. त्यामुळेच आज अगदीच लाज जाणार नाही इतपत तरी लिहायला जमतंय. त्या बद्दल सगळ्यांचे मनापासून आभार.

मिपा काढणार्‍या तात्या महराजांचा विजय असो.

आपला,

ऍडी जोशी
ईथे भेटा एकदा http://adijoshi.blogspot.com/

प्राजु's picture

5 Jun 2008 - 12:13 pm | प्राजु

मनोगतावर मी लिहित होते. मला मला मिसळपाव हे संकेत स्थळ कसे कळले हे नीटसे आठवत नाही. कोणाकडून कळले हे ही आठवत नाही. बहुतेक सुवर्णमयी किंवा प्रियालीशी फोन वर बोलताना समजले असावे. पण इथे आल्या नंतर मी तिकडे लिहिणे थांबवले. आधी इथे साहित्य प्रकाशित करून तिथेही करायचे पण.. आजकाल वाचनमात्र मी तिथे आणि अन्य स्थळी जाते.
मी भारतात आल्यानंतर मिपाकरांना भेटण्याचा विचार ध्.मु. ला बोल्लोन दाखवला आणि त्याने शक्य तेवढे मिपाकर खास माझ्या भेटिसाठी गोळा केले. मी त्याची सदैव ऋणी आहे.
रटाळ चाललेली दिर्घ मालिका आणि सतत काहि ना काही धक्के देत जाणारी एखादी लघुमालिका यात जो फरक आहे तोच फरक मिपा आणि इतर संस्थळां मध्ये आहे असे माझे वैयक्तिक मत आहे. सकाळी पिसी चालू केल्यानंतर जर पहिली साईट कोणती उघडत असेन मी तर ती मिपा. माझ्यामुळे माझ्या नवर्‍यालाही मिपाची सवय झालिये.
मिपामधला जिवंतपणा कायम ठेव्ण्याचे जितके श्रेय तात्यांचे आहे तितकेच ते मिपावरचे सगळया सभसदांचेहि आहे. हाच जिवंतपणा कायम राहो आणि मिपाकरांचे प्रेम सदैव वृद्धींगत होत राहो ही ईशचरणी प्रार्थना..

(सर्वव्यापी) प्राजु
http://praaju.blogspot.com/

विसोबा खेचर's picture

5 Jun 2008 - 12:22 pm | विसोबा खेचर

माझ्यामुळे माझ्या नवर्‍यालाही मिपाची सवय झालिये.

भाऊजींना माझा नमस्कार सांग बरं का गं प्राजु! (अवांतर - बायको सुगरण नसल्यामुळे अलिकडे वाळलेत बिचारे! लग्नाअधी चांगले सुदृढ व खाऊनपिऊन सुखी होते. तेव्हा त्यांच्या चेहेर्‍यावर खूप प्रसन्नता असायची. अलिकडे सतत बायकोला घाबरलेले वाटतात!) :)

मिपामधला जिवंतपणा कायम ठेव्ण्याचे जितके श्रेय तात्यांचे आहे तितकेच ते मिपावरचे सगळया सभसदांचेहि आहे.

अगदी हेच म्हणतो..!

तात्या.

प्राजु's picture

5 Jun 2008 - 12:31 pm | प्राजु

(अवांतर - बायको सुगरण नसल्यामुळे अलिकडे वाळलेत बिचारे! लग्नाअधी चांगले सुदृढ व खाऊनपिऊन सुखी होते. तेव्हा त्यांच्या चेहेर्‍यावर खूप प्रसन्नता असायची. अलिकडे सतत बायकोला घाबरलेले वाटतात!)

लग्नाआधी तुम्हीच खायला प्यायला घालत होतात जणू... :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

फटू's picture

5 Jun 2008 - 12:24 pm | फटू

माझंही असंच आहे... मशीन चालू केल्यानंतर सर्वात पहीली उघडली जाणारी साइट मिपाच असते... मग ते मशीन ऑफिसचा पीसी असो किंवा घरचा लॅपटॉप... अगदी मिपाची सवय झाली आहे आता...

पुन्हा,
सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...

पद्मश्री चित्रे's picture

5 Jun 2008 - 12:45 pm | पद्मश्री चित्रे

मी इथे खुपच नवीन सभासद आहे.. तसं कुणीच ओळखीचं नाही प्रत्यक्ष.. मिपा बद्दल ऐकल 'आनंदयात्री' कडुन बरच आधी. पण मिपा कर बर्‍याच उशिरा झाले.
त्याच सुमारास मनोगत वर पण गेले, पण ते इतके भावले नाही हे मात्र खरे..
अजुन इथे तस काहीच लेखन केल नाही ,पण विचार आहे. फक्त भेट दिलि इथे तरी छान वाटत..

छोटा डॉन's picture

5 Jun 2008 - 1:05 pm | छोटा डॉन

टायटल पाहून एकदम दचकायला होते ना , पण आहेच हे एक खरेखुरे "गोजीरवाणे दुसरे घर" ...

मी इथे कसे आलो हे आता लक्षात नाही पण आलो आणि इथलाच झालो याबद्दल दुमत नाही.
आता आंतरजालावर कुठल्या ठिकाणी काय चालते व काय चालत नाही याबद्दल चर्चा करण्यासाठी या धागा योग्य नव्हे पण "मिपा" म्हणजे एक समांतर कुटुंबच आहे माझ्यासाठी.

जर तुम्हाला इथे येऊन एकदम मोकळेचाकळे वावरता येत असेल, चकाट्या पिटता येत असतील, चर्चा करता येत असतील, अनुभव शेअर करता येत असतील, मदत मागता येत असेल, ह्या "जीवघेण्या स्पर्धच्या "काळात दिवसातील ४ क्षण जर आनंदाचे जात असतील तर याला "घर" सोडून अजुन काही कमीत कमी मी तर म्हणू शकत नाही.

मिपाने काय दिले ?
मिपाने तात्या, पेठकरकाका, बिरुटेसर , डांबिसकाका , चतुरंगशेठ , भडकमकरमास्तर सारखी ज्ञानाने व अनुभवाने समॄद्ध मंडळी जी आपल्याला नेहमी चांगला सल्ला देतात, आपल्या गुणांचे कौतुक करतात, जर काही चुकले तर वेळीच कान पकडतात ...
धमाल, आंद्या, इनोबा, विजूभाउ [ ह्यांना मी वयाने आमच्या बरोबरीचाच मानतो ] , निलकांत सारखी मनमोकळी मित्रमंडळी दिली.
प्रचंड धडपड करुन सगळ्यांशी फोनवर बोलणे अरेंज करणारा "मदनबाण" ...
बेंगलोरला आल्यावर एकटेपणा वाटूने म्हणून योगायोगाने भेटलेले "ऍडी व अभिज्ञ" सारखे सवंगडी ही फक्त मिपाचीच देण आहे ...
अजुन म्हणाल तर हक्काने "जर्मनीला आल्यावर घरी ये म्हणणारी" स्वाती सारखी मोठी बहिण , प्राजूताई [ हिच्याशी बोलल्यावर मला शप्पथ मोठ्या बहिणीशी बोलल्यासारखे वाटले] , वरदा, मनस्वी सारख्या ताया / मैत्रीणी ...
त्या "खफ" वर धिंगाणा घालणारे "राजे, कुंदन, यशोधरा, ॠचा, भाग्यश्री" सारखे सवंगडी, ह्यांच्याशी गप्पा मारताना मी ऑफीसात आहे हे वाटतच नाही. असे वाटते की जणू आत्ताच मास्तरला टांग देऊन, लेक्चर बंक करुन मस्त "कॉलेजच्या कट्ट्यावर आपल्या जिगर ग्रुप" बरोबर टीपी चालू आहे ...

कोण , कुठली मंडळी आहेत सगळी पण आज बहुतेक सगळ्यात एक "ऋणानुबंध" तयार झाला आहे , हे सर्व मिपा मुळे ...
नाहीतर सर्वसामान्य आयुष्यात जरी "समोरासमोरुन गेलो असतो तर ओळख" सुद्धा दाखवली नसती पण आज ते नाही, उलट लोक एकमेकांना भेटण्यास उत्सुक आहेत...
यातल्या बर्‍याच जणांना प्रत्येक्षात भेटलो नाही पण इच्छा जरुर आहे.

काहींची नावे अनावधाने राहिली असतील पण "मिपा कुटुंबिय" समजून घेतील ...

"तात्यांना" याबद्दल फक्त धन्यवाद म्हणून त्यांच्या प्रयत्नांची किंमत कमी करणार नाही फक्त म्हणेन "जियो तात्या "

हाच जिवंतपणा कायम राहो आणि मिपाकरांचे प्रेम सदैव वृद्धींगत होत राहो ही ईश्वरचरणी प्रार्थना..

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

फक्त संदीप's picture

5 Jun 2008 - 2:54 pm | फक्त संदीप

L) तसा मि येथे माझ्या कविता वाचनाच्या आवडीने आलो.
मला काही कविता वैगरे करता येत नाही पण या स्थळा वरिल सर्व लेखन जमेल तसे वाचण्या चा प्रयत्न करतो.
माझी येथे आजिबात ओळख नहि पण नविन मित्र्-मैत्रिणी येथे मिळतील हि अपेक्षा.
वरिल लेखांवरुन वाटते कि येथिल बहुतांशि सदस्य पुण्यातील आहेत.

मला हे स्थळ अतिशय चांगले वाटले.
आणि मीहि या कुटूंबाचा सदस्य आहे याचा मल आनंद आहे.

आपला विनम्र
संदीप_डिझाईनर................. #:S (कधि नव्हे ते एवधे लिहीले....उफ् फ फ )

रिमझिम's picture

5 Jun 2008 - 3:01 pm | रिमझिम

कुनीच नाही पन सगळेच ओळ्खीचे वाट्तात...अगदी रोज भेटणार्यातले
इथे येवुन खूप छान वाटते,मी वाचन्यासाठीच इथे जास्त येते, कारण मराठी टायपीग मध्ये माझी बोब आहे
आता इतकी सवय झाली आहे की कोनी विचारल की सारख काय
मिसळ पाव वरती असते तर सागाव लागेल की मी इथे काम करते कोन काय काय लिहिते ते वाचण्याचे ..हा हा हा :))

अरुण मनोहर's picture

5 Jun 2008 - 3:23 pm | अरुण मनोहर

किती थोड्या दिवसांत मिपावर ऋणानुबंध तयार झाले! मिपावरचे खेळीमेळीचे आणि मित्रत्वपूर्ण वातावरण असेच राहो. इथे एकमेकांची नाती आणखीन घट्ट होवोत हीच सदीच्छा.
आपल्यातले काही स्वच्छंदी कलाकार एन आर आय प्रमाणे इतरत्र फिरायला, अनुभव घ्यायला गेले तरी बहुसंख्य एन आर आय प्रमाणे त्यांचे "दिल" मिपामधेच अडकलेले राहील ह्याची कट्टर मिपाकरांनी खात्री बाळगावी. नाती अशाच विश्वासातून विणल्या जातात. तात्यांसारख्या सुजाण नाविकाच्या हाती मिपाची कश्ती अनेक नाती गोती एक करीत दूरवर प्रवास करेल ह्याची खात्री आहे.

<<< कलेला सिमा नसू दे >>>

ऋचा's picture

5 Jun 2008 - 3:26 pm | ऋचा

मी इथे कशी आले हे आता लक्षात नाही पण आले आणि इथलीच झाले.
खुप मित्र-मैत्रिणी झाल्या.
माझी १ ली ओळख झाली "शितल" शी.
आणि अस वाटलं की ती आणि मी खुप आधी पासुन ओळखतो एकमेकींना आणि खुप दिवसांनी गाठ पडली.
"आनंदयात्री,डॉन्या,कुंदन,ध्.मु." अगदी मनापासुन ह्यांची मैत्री आवडली,
"ख्.फ." वरची धमाल, एखाद्या गंभीर विषयावर चर्चा अगदी अस वाटलंच नाही की ही सगळी मंडळी नविन आहेत म्हणुन, लहानपणापासुन एकत्र खेळलेय ह्यांच्या बरोबर अस्सच वाटल.

असे मित्र्-मैत्रिणी दिल्या बद्दल मी मिपाची कायम ऋणी राहीन.

"मिपाचे मलाही व्यसन लागले आहे"

"No matter how hard the life crashes;Like a Phoenix I will rise from my Ashes"

हर्षद बर्वे's picture

5 Jun 2008 - 3:59 pm | हर्षद बर्वे

मी तसा मिपा वर नवीनच....
तात्याशी ४ वर्षापप्र्वीवासून ओळख....आणि साधारण त्याच कालावधी मधे ऍडीजोशी (हे तेच बोरिवलीकर असतील असे गृहीत धरून) बरोबर ओळख....:)
बाकी टोपण नावाने वावरणारे इथे बरेच आहेत ...त्यात कोणी असतील तर असोत....
सध्या तरी सगळ्यांच्या लिखाणावर नजर फिरवणॅ चालू आहे.....
पण रोज भेट >:D< द्यावी असे हे "ई-स्थळ" आहे हे मात्र नक्की....

आपला.....
हर्षद बर्वे.
(एच.बी) कंसात्ल्या नावाने बरेच जण ओळखतात....!

विसोबा खेचर's picture

5 Jun 2008 - 4:38 pm | विसोबा खेचर

आपला.....
हर्षद बर्वे.
(एच.बी) कंसात्ल्या नावाने बरेच जण ओळखतात....!

आयला! एच बी, लेका तू आहेस होय! मला माहितीच नव्हतं! :)

बोलला नाहीस ते कधी? :)

तात्या.

ऍडीजोशी's picture

5 Jun 2008 - 6:46 pm | ऍडीजोशी (not verified)

आणि साधारण त्याच कालावधी मधे ऍडीजोशी (हे तेच बोरिवलीकर असतील असे गृहीत धरून) बरोबर ओळख....

आयला बर्व्या तू पण इथे??? सहिये भिडू :) नी तो ऍडी जोशी मिच रे.

आपला,

ऍडी जोशी
ईथे भेटा एकदा http://adijoshi.blogspot.com/

मन's picture

5 Jun 2008 - 4:39 pm | मन

"गोत्यात आणतात ती नाती म्हणजे नाती-गोती " असं व.पु. का पु.ल. ह्यांचं वाक्य वाचलं होतं.
पण सुदैवानं त्याच्या अगदि विरुद्ध इथं पाह्य्ला मिळालं.

आता मी इथं कसा आलो?
काय सांगु कसा आलो.भारतात असताना नेटचा फारसा वापर व्हायचाच नाही.(अगदि कामापुरता व्हायचा.)
पण इथं आल्यावर एकाएकी "आपलं जग" शोधावसं वाटलं.
(कदाचित आंग्ल भाषेबद्दलची तेव्हाची भीतीही कारणीभूत असावी.) मराठी संकेतस्थळ वाचायचो ;पण कुठलं?
तर केवळ ई सकाळ आणि महाराष्ट्र टाइम्स . बस्स.....
एकदा मनात आलं ; मराठी संकेतस्थळ शोधावीत, तसं शोउधुनही पाहिलं;पण जे मिळालं ते पुरेसं नव्हतं.
काही ठिकाणं पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या लिंक वरुन तिथच नेत होती.
मग मी काय केलं; ई सकाळ मधला एक अस्सल मराठी शब्द शोधला(सर्वत्र आढळणारा)आणि अचानक
गूगलात सापडणार्‍या संकेतस्थळांची संख्या वाढली.
असं काय केलं मी? फक्त "आहे" आणि "होता" हे शब्द सकाळ मधुन कॉपी -पेस्ट करुन दिले ठोकुन गूगलात.
बाकी काम गूगलानं केलं.खुप कुप मराठी संकेत स्थळं सापडली.
तिथच मग सापडलं उपक्रम्;आणि त्या पाठोपाठ तुमचं आमचं लाडकं मिपा.
झालं. माझ्या सारख्या सतत कुठलेतरी लेख वाचायला आवडणार्‍या, किंवा तावातावनं(मराठीतुन)चर्चा
करायला आवडणार्‍या किंवा नुसतच गप्पा झोडत बसणं आवडाणार्‍या माण्साला आयतच खाद्य मिळालं.
इथल्या लोकांचं बरच काही,जवळपास सगळच वाचलं. अगदि मनापासुन आवडलं.
हुरुप आला. आणि मग शाळेत कधी निम्म्या पानाच्या वर धड निबंधही न लिहिता येणार्‍या मला लिहायची खुमखुमी
होउ लागली. आल्या आल्या लिहुन पाह्य्लं. आणि समद्यांनीच लै कौतुक केलं(ते तसं करावं म्हणुनच लिहायला आवडतं.).
मग काय वाटेल ते, वाटेल त्या विषयावर सुरु पिंक टाकणं.
"बरं एखाद्या विषयातली जितकी माहिती कमी;ततका दीर्घ प्रतिसाद" असं सूत्र ठेवल्यानं आणखीनच मजा आली.
आणि मुख्य म्हण्जे आल्या पासुनच सगळ्यांनीच सामावुन घेतलं.
(आमी मग यथावकाश नमोगतावर कह्दी नव्हे तो एक लेख लिहुन पाह्यला.
तिथं शुद्ध्-लेखनाचे उपदएश ऐकले.आणि एकुणच तिथला आणि इथला फरक आपोआप लक्षात आला.
तिथुन पुढलं लिखाण केवळ आणि केवळ मिपावरच आहे. ब्लॉगवरही नाही.)
थोडाक्यात काय्,मिपा तर आपली एक लाइफच बनुन र्‍हायलय.
अगदि खरं वास्तव जगणं असतं ना तस्सच.
तिथं आपण जीवन मागितलेलं नसतं. कुठं जन्माला यायचं तेही ठरवलेलं नसतं.
तरीही एकदा ते आयुष्य मिळाल्यावर सोडवत नाही.
अगदि तस्स मिपाचं.
मिळालय आयुष्य इथलं. सोडवत नाही .

फक्त फरक एकच, मिपात आपण प्रवेश करतो , तो स्वतःच्या इच्छेनं.
पण प्रत्यक्ष जीवन जगण्यातली उत्स्फुर्तता,आवश्यकता, गरज आणि मुख्य म्हण्जे जिव्हाळा आणि दोस्ती
तश्शीच राहते ह्या मिपातल्या आयुष्यात सुद्धा.

कुणा कुणाची म्हणुन नावं घेउ माझ्या बरोअबरीच्या धमाल्यापासुन ते डांबिस काका ,पेठकर काका
की "काका" म्हणली जाणारी "दादा" माणसं (आणि शितल ताइ वगैरे ताइगिरी गरणार्‍या ताया)आणि इतरही सगळेच, मस्त बागडताहेत मिपाच्या ओसरीवर.धन्यवाद मिपा निर्मात्यांना आणि सांभाळणार्‍यांना.
खरच असं वाटत्य की आता जगात कुठंही राहिलं तर काय हरकत आहे?
"आपली माणसं" आहेतच की रोजच्या भेटण्यात मिपावार.
चला खूपच बोलतोयं . निरोप घेतो आता.

आपलाच,
मनोबा

विजुभाऊ's picture

5 Jun 2008 - 4:46 pm | विजुभाऊ

मिपा मुळे मी पुन्हा लिहिता झालो.
इथे आल्यावर मला धमु आन्द्या /डॉन्या( हा माझ्याच वयाचा असावा असे मलाही वाटते)/ डॉ.दाढे सरकार / इनोबा / प्राजु आम्बोळी / मदनबाण असे अनेक दोस्त भेटले. सर्वात महत्वाचे म्हणजे ता सगळ्यांचे वाचन खूपच चांगले आहे हे जाणवले. सदैव अमराठी लोकांत राहुन मराठी बोलायला / ऐकायला मिळत नाही ही खंत जाणवायची. मिपाने माझी ती मानसिक गरज पोटभर पूर्ण केली.
चांगले असेल तर अमरपट्टे नाहीतर रट्टे हे मिपाकरांचे वागणे जास्त भावले.
मी लहानपणी एकत्र कुटुंबात वाढलेलो. काका आत्या मावश्या या लोकानी /चुलत आते भावंडानी घर सतत खेळते असायचे. डाम्बीस काका /पेठकरकाका/वरदा / स्वाती ( दोन्ही) /मनस्वी या सर्वामुळे मिपावर मला ते वातावरण पुन्हा अनुभवायला मिळाले.
( तात्या मला माझ्या आजोबांसारखे वाटतात :) )
हां अजुन एक गोष्ट जाणवली ती म्हणजे मी ज्या ज्या मिपाकरांच्या घरच्या लोकाना भेटलो त्या त्या सर्वाना मिपा हे त्यांचे स्वतःचेच घर वाटत होते. सर्व जण मला विजुभाऊ म्हणुनच ओळखत होते.

पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

सगळ्या मिपाकारांशी एकच नाते.........
मित्रो ..................

विजुभाऊ's picture

13 Jul 2015 - 1:33 pm | विजुभाऊ

भिंगरी ताई भौ धन्यवाद
धागा बघून बरेच दिवसानी ती गम्मत आठवली.
धम्या ( हा उसात कुठे गायबलाय कोण जाणे) आन्द्या ( लग्न झाल्यावर याने जालीय सन्यास घेतलाय)
डान्या ( हा निदान फोनवर तरी भेटतो) , इन्या , डॉ दाढे. ( हे सरकार एकदम गायबलेत), यशो ,स्वाती राजेश , प्राजू ,प्रभू मास्तर , रामदास ,................ सगळे मिळून
लै म्हणजे लैच धम्माल करायचो

उगा काहितरीच's picture

13 Jul 2015 - 5:35 pm | उगा काहितरीच

मी धमाल करणाऱ्या मंडळीत उपस्थित नसलो तरी काही आयडी आठवतात जसेकी, यकू, श्रामो (जे कि पुन्हा कधीच दिसणार नाहीत :'( ) सोत्री, ५० फक्त , सुहास.. (प्रत्यक्ष भेटलेला एकमेव मिपाकर), चाफा, आत्मशुन्य, चेतन सुभाष गुगळे (यांच्या बरोबर काय वाद होता , हे कळायला माझे "मिपीय" वय कमी होते तेव्हा ) अजूनही बरेच जण आहेत काही अजूनही सक्रीय आहेत काही नाही.