हे काय चालल आहे?

अरुण मनोहर's picture
अरुण मनोहर in काथ्याकूट
31 May 2008 - 4:21 am
गाभा: 

मला आधी मिपा माहीत नव्ह्ते. तेव्हा दुसर्‍या संस्थ वर गेलो होतो. मिपाची माहीती झाल्यापासून मिपाला सोडले नाही. इथे आवडण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. टेक्नीकली पाहिले तर मिपाची मांडणी रसिकांना आकर्षीत करणारी आहे. दुसर्‍या संस्थच्या तुलनेत खूप उजवी. क्रॉस रेफरन्सची सोय खूप छान आहे. म्हणजे आपण लॉग इन झाल्यावर "वाटचाल" मधे गेलो की आपल्या सहभागावर नवीन कमेन्ट काय आल्या ते सहज कळते. तसेच त्या वेळी हजर असलेल्या इतर सभासदांशी संपर्क साधण्याच्या खूप सोयी आहेत.
टेक्नीकल एक सोडून द्या. ते तर दुसरे कोणी कॉपी पण करू शकतो. मिपाची शक्ती म्हणजे इथे दिसणारा मनमोकळेपणा. मित्रत्व. सभासदांनी एकमेकांना दिलेले उस्फूर्त प्रतिसाद. हे काही कोणाला सहजासहजी कॉपी करता येईल का? त्या साठी दिल पाहीजे.

हे सगळे अस्सल मिपाकरांना माहीत आहेच. मग इथे उल्लेख करायचे प्रयोजन काय असा प्रश्न पडला का? नाही एकमेकांच्या "पाठी खाजवून हात सुजवण्यासाठी" नाही.

मला "सहवास" वर जी धुमाकूळ चर्चा झाली त्याचा पुनःउच्चार करायचा नाही. पण मिपा चालकांनी असल्या दगडफेकीतून मिपाचे मूळ धोरण आणि मूळ बांधा कसा सुरक्षीत ठेवता येइल ह्याचा विचार करायला हवा. असला गोंधळ मुळातच आत शिरूच देउ नका, सरळ एन्ट्रीलाच उडवा असे कोणी म्हणेल. तसे करणे सोपे वाटले तरी ते दुराग्रही होणार नाही का? कुठवर बॅलन्स साधायचा?