महावीर बंडू -

विदेश's picture
विदेश in जे न देखे रवी...
10 Aug 2011 - 2:16 pm

हाती फिरवत गदेस गरगर
बंडू फिरतो भरभर घरभर ,
येणा-जाणाऱ्यास तडाखे
बाल महावीराचे शंभर !

सोफ्यावरून खुर्चीवरती -
खुर्चीवरून फरशीवरती ,
उड्डाणातुनी जखमी होतो
पराक्रमी तो बंडू असतो !

ढगांची गडगड कानीं येता
बंडू एकदम गडबडतो -
महावीर बंडू हा अमुचा
आईच्या पाठीशी दडतो !!

बालगीतमौजमजा

प्रतिक्रिया

प्रास's picture

10 Aug 2011 - 2:26 pm | प्रास

विदेश भौ,

तुमचा हा महावीर बंडू भारी आवल्डा बरं का आपल्याला.....

छान असतात बालगीते तुमची... पुस्तक नक्की निघू शकेल...

पप्पु अंकल's picture

11 Aug 2011 - 2:18 pm | पप्पु अंकल

बंडू अगदी डोळ्यासमोर ऊभा केलात.

परिकथेतील राजकुमार's picture

11 Aug 2011 - 3:18 pm | परिकथेतील राजकुमार

बंडू अगदी डोळ्यासमोर ऊभा केलात.

हेच बोल्तो.

सुटसुटीत आणि चटपटीत बालगीत आवडले.

गणेशा's picture

11 Aug 2011 - 4:00 pm | गणेशा

छान