या छ्ळवाद्यांचे काय करायचे?

युयुत्सु's picture
युयुत्सु in काथ्याकूट
19 Jun 2011 - 9:23 am
गाभा: 

प्रतिक्रिया

शिल्पा ब's picture

19 Jun 2011 - 9:24 am | शिल्पा ब

त्या बाईचा फोटु दिसत न्हाई.

युयुत्सु's picture

19 Jun 2011 - 9:25 am | युयुत्सु

युयुत्सु's picture

19 Jun 2011 - 9:26 am | युयुत्सु

शिल्पा ब's picture

19 Jun 2011 - 9:49 am | शिल्पा ब

नवीन आलेल्या सुनेला त्रास दिला नाही तर तीपण त्रास देणार नाही. पण सासुरवास न करून कसं चालेल?

एक बारीक निरीक्षण: बातमीत महाराष्ट्रातील एकाही शहराचे नाव नाही. कमीतकमी मुंबईचे नाव तरी असायला हवे होते , हो कि नाही ओ युयुत्सु?

युयुत्सु's picture

19 Jun 2011 - 12:02 pm | युयुत्सु

नवीन आलेल्या सुनेला त्रास दिला नाही तरी ती त्रास करून घेणार नाही याची खात्री काय?

धन्या's picture

19 Jun 2011 - 7:16 pm | धन्या

नवीन आलेल्या सुनेला त्रास दिला नाही तरी ती त्रास करून घेणार नाही याची खात्री काय?

आणि समजा, नवीन आलेल्या सुनेला सासूने जरी त्रास दिला नाही तर सुनही त्रास देणार नाही याची गॅरंटी काय? :)

सासु काय किंवा सुन काय.. दोन्ही पाशवी शक्तीच ना?
शेवटी युयुत्सुरावांचच पारडं जड. ;)
(युयुत्सुराव हल्काईच लेनेका.)

पळा पळा..... खातयं मार आता.

धूम्केतु's picture

22 Jun 2011 - 9:12 pm | धूम्केतु

इथे मुख्यत:नवरा आणि बायको यांच्या एकमकावर असलेल्या विश्वासाचा आणि आदराचा प्रश्ना आहे. हे जर नसेल तर बायको ला त्याच्या आई वडिलांना छळ करायला काही वाटणार नाही आणि नवरा देखील त्या बद्दल काही करू शकणार नाही. तुम्हाला काय वाटते?

वाहीदा's picture

23 Jun 2011 - 1:27 pm | वाहीदा

यक्क ! काय विचार आहेत

जो माणूस आपल्या आई वडिलांचा आदर करित नाही ज्यांनी त्याला जन्म दिला अन इंजिनीअरिंग चे शिक्षणही दिले(तुमच्या खरड वहीच्या माहीतीत वाचले) पण त्यांच्या छ्ळाला मात्र पाठींबा देतो अश्या माणसाच्या बुध्दी अन विचारांची किव येते.

तुमच्या आईने कधी तुम्हाला तिच्या उदरातील दूध पाजायला नकार दिला होता का ? नाही ना ? मग ?
अजून ही तुम्ही तुमच्या नावापुढे वडिलांचे च नाव लावता ना की बायकोचे लावता ?

दूध का भी कर्ज होता है, वोह कब अदा / चुकता करोगे ?

बिपिन कार्यकर्ते's picture

19 Jun 2011 - 9:36 pm | बिपिन कार्यकर्ते

नवीन आलेल्या सुनेला त्रास दिला नाही तर तीपण त्रास देणार नाही.

अतिशय एकांगी आणि म्हणूनच अयोग्य विधान. युयुत्सुंच्या एकांगी भूमिकेला असे दुसरे एकांगी विधान करून कसा विरोध होणार?

अर्थात, हे विधान तुम्ही केवळ एक पोश्चर म्हणून केले असेल तर चालू द्या.

युयुत्सु राव बरेच दिवसातून दिसलात. आता स्त्रीया नवर्‍यांचा छळ कसा करतात त्यावरही एखादी बातमी येऊ दे..

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

19 Jun 2011 - 9:50 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

थोडं प्रास्ताविक आणि नंतर फोटो डकवला असता तर चर्चा प्रस्ताव कसा दमदार झाला असता.

पुरुषांच्या बरोबर स्त्री सर्वच क्षेत्रात येऊ लागली तेव्हाच आपण पुरुष मंडळीं जरा ब्याकफूटवर जाऊ लागलो. समान संधीच्या नादात आपण आपल्या पायावर धोंडा पाडून घेतला. पूर्वीच्या स्त्रीया कशा उंबराच्या आत असल्यामुळे कर्त्या पुरुष मंडळींचा कसा एक वचक होता. नुसते डोळे वटारुन पाहिले तर काम होत होतं आता लय अवघड झालंय. कर्ती आणि कमावती स्त्रीमुळे आपल्याला तिचीही आवडनिवड जपावी लागते आणि हे करता-करता तिचं वर्चस्व कधी निर्माण झालं काही कळलं नाही. आणि त्यामुळे घरातील वयोवृद्धांना ’सुनबाई’ जरा कडू बोलल्या तरी आपल्याला गप्प राहावं लागतं. पुढची पायरी म्हणजे अन्याय, अत्याचार, घरातून काढून देणे वगैरे..

बाकी, तुमचं आणि आमचं स्त्रीयांकडून पुरुषांना आणि स्त्रीयांकडून समाजाला होणार्‍या अत्याचाराबाबत जवळ-जवळ एकमत असल्यामुळे बोलण्यासारखं काही नाही. अजून येऊ द्या. आणि तुम्हाला अशा पेप्रातल्या बातम्या कशा सापडतात याचं मला लै आश्चर्य वाटतं.

-दिलीप बिरुटे
(युयुत्सु यांच्या लेखनाचा फ्यान)

धन्या's picture

19 Jun 2011 - 7:19 pm | धन्या

पुढची पायरी म्हणजे अन्याय, अत्याचार, घरातून काढून देणे वगैरे..

कुणावर अन्याय, अत्याचार करणं ? कुणाला घरातून काढून देणं ?
हे दोन्ही पार्टयांच्या बाबतीत शक्य आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

19 Jun 2011 - 10:13 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>> दोन्ही पार्टयांच्या बाबतीत शक्य आहे.
हो, पण बातमीतला विदा काय दाखवतोय. ६४ टक्के सुना जवाबदार तर ४४ टक्के मुलं जवाबदार आहेत, त्यामुळे फारसं काही स्पष्टीकरण द्यायची गरज नाही.

असो, सर्वांनी गुण्यागोविंदानं राहावं असं आम्हाला वाटतं आणि आता आम्ही थांबतो. :)

-दिलीप बिरुटे

६४ टक्के सुना जवाबदार तर ४४ टक्के मुलं जवाबदार आहेत,

दोन्ही मिळून १०८ टक्के होतात... का कदाचित ८ % मध्ये दोघेही जबाबदार असतील..

चिरोटा's picture

19 Jun 2011 - 10:01 am | चिरोटा

बातमीत महाराष्ट्रातील एकाही शहराचे नाव नाही. कमीतकमी मुंबईचे नाव तरी असायला हवे होते

महाराष्ट्रातील सुना गरीब बिचार्‍या असाव्यात किंवा सासु-सासरे पुरुन उरले असावेत.हे असले सर्वें जास्त मनावर घ्यायचे नसतात. तज्ञ लोकांना त्याचे मोड,मिडियन्, सरासरी काढत बसू देत.

शैलेन्द्र's picture

19 Jun 2011 - 12:20 pm | शैलेन्द्र

सगळे तज्ञ "मोड" काढत बसलेत असं चित्र डोळ्यासमोर आलं..

llपुण्याचे पेशवेll's picture

20 Jun 2011 - 5:30 pm | llपुण्याचे पेशवेll

तज्ज्ञांनी बरेच तिखट खाल्लेले दिसते. ;)

धन्या's picture

19 Jun 2011 - 7:27 pm | धन्या

या मोड, मिडियन्, सरासरी या सार्‍या कन्सेप्ट माणसांच्या बाबतीत वापरणार्‍यांच्या अकलेची खरंच कीव करावीशी वाटते.

व. पू. म्हणतात तसं, "माणसाबद्दल एकच गोष्ट ठामपणाने सांगता की माणसाबद्दल काहीच ठामपणाने सांगता येत नाही."
म्हणे एव्हढे टक्के सासू सासर्‍यांचे हाल होतात आणि तेव्हढे टक्के सुनांना सासूरवास होतो... कसली टक्केवारी घेऊन बसलात राव...

युयुत्सु's picture

19 Jun 2011 - 10:06 am | युयुत्सु

विद्या बाळांसारख्या पुरस्कारलोलुप स्त्रीयांच्या कैवारी या विषयावर आश्चर्यकारक्पणे मूग गिळून आहेत.

शिल्पा ब's picture

19 Jun 2011 - 10:13 am | शिल्पा ब

हो ना. कदाचीत त्या फाजील स्त्रीमुक्तीवादी असतील. आत्मशुन्य यांच्या प्रतिसादाच्या प्रतिक्षेत.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

19 Jun 2011 - 10:48 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कृपया चर्चेला स्त्रीवादाकडे घेऊन जाऊ नये. :)

उदारमतवादी स्त्रीवाद, जहाल स्त्रीवाद, मार्क्सवादी स्त्रीवाद, कृष्णवर्णीय स्त्रीवाद याच्यात आमचा मूळ मुद्दा हरवून जाण्याची शक्यता आहे. :)

अवांतर : बाय द वे, आजच आमच्याकडील दैनिकात एक बातमी वाचनात आली. आमच्या विद्यापीठात ’स्त्री अभ्यास’ असा एक पदव्युत्तर (M.A) ला या वर्षीपासून स्वतंत्र अभ्यासक्रम राबविल्या जाणार आहे. ज्ञाननिर्मीतीची स्त्रीवादी चिकित्सा, लिंगभाव आणि सामाजिक इतिहास, स्त्री चळवळ: युरोप आणि अमेरिका, वगैरे. मला एक विचारायचे होते इतर देशातील विद्यापीठात स्त्रीवादी चळवळींवरील अभ्यासक्रमाचे (विषयाचे) स्वरुप कसे आहे ? (सेमच असेल ? )

-दिलीप बिरुटे

Women’s movements all over the world have always given primacy to the role of education in
achieving women’s equality.

But attempts to operationalise the relationship most often focussed only on the issue of women’s access to education. Even at the international level, most reviews on women and education has suffered from this narrow focus.

While developing countries perceived education as one of the fruits of development from which the large majority of women were being deprived, the focus in developed countries has so far been on poor or non-representation of women in the newly emerging more prestigious sectors of education like technology and the sciences.

Philippines, Sri Lanka and Thailand where access to education is determined, with exceptions in a few communities, by socio-economic factors rather than by gender. These countries have not reached the target of universal primary education; but gender disparities are minimal.

Malaysia and Indonesia, where expansion in education has accelerated in recent years without gender differentiation so that gender disparities have rapidly diminished;

Bangladesh, India, Nepal and Pakistan, where urban participation is relatively high but where overall enrolment rates are low, gender disparities are wide and the pace of change slow

China : Intellectual families’ accept gender equality, though some of them “continue to hold to the traditional idea that education is more important for boys than girls, and while they expect their sons to attend the university, they may expect their daughters to work for senior high school”.

Japan : One of the earliest countries to introduce compulsory elementary education for both boys and girls
(1886) - “in an effort to catch up with the West”, women’s education in Japan received additional policy support from the post-war Constitution, which increased the duration of compulsory education to nine years, and made public schools co-educational. The result is fairly unique in the Asian context. In 1986, 94.7% of all girls were going beyond the compulsory schooling level, while fewer boys (92.8%) were doing so.

नगरीनिरंजन's picture

19 Jun 2011 - 10:54 am | नगरीनिरंजन

स्त्रियांच्या मारामारीत आपल्याला कोण विचारतंय?
म्हणून <थचामो>गप्प राहण्याचे ठरवले आहे</थचामो>
बाकी पाशवी प्रतिसाद वाचण्यास उत्सुक.

पैसा's picture

19 Jun 2011 - 10:57 am | पैसा

धागा अर्ध्या ओळीचा सुद्धा नाही, तसंच धागाकर्ता कोणाच्या बाजूने आहे याचा खुलासा नाही सबब आमचा पास....

शिल्पा ब's picture

19 Jun 2011 - 10:59 am | शिल्पा ब

<<<तसंच धागाकर्ता कोणाच्या बाजूने आहे याचा खुलासा नाही सबब आमचा पास....

तुमचा अभ्यास खुप म्हणजे खुपच कच्चा आहे तो पक्का करुन घ्यावा.

पैसा's picture

19 Jun 2011 - 11:22 am | पैसा

इथे युयुत्सूनी एकही शब्द लिहिलेला नाही. पूर्वी त्यानी स्त्रियांच्या विरुद्ध काही लेखन केलं असलं तरी त्याना मत आणि हृदयरिवर्तनाचा हक्क आहे. जोपर्यंत "आपण गरीब बिचार्‍या/भांडकुदळ सुनांच्या बाजूने/विरुद्ध नाहीत/आहोत" याचा खुलासा येत नाही तोपर्यंत त्याना संशयाचा फायदा देण्यात यावा.

JAGOMOHANPYARE's picture

19 Jun 2011 - 11:02 am | JAGOMOHANPYARE

कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.

कुठलातरी पेपर घ्यावा. त्यातले कुठलेतरी कात्रण घ्यावे. ते कुठल्यातरी वेबसाइट्वर द्यावे. काहीतरी नक्की होईल. :)

स्वाती२'s picture

19 Jun 2011 - 9:05 pm | स्वाती२

अत्याचार करणे, दुर्बलांवर अन्याय करणे ही वृत्ती आहे. असे अत्याचार करणारे स्री-पुरुष दोन्ही असतात. मुला-मुलींच्या संसारात त्रास देणारे पालक जसे असतात तसेच वृद्ध आई-वडिलांना त्रास देणारी मुल-मुली देखील असतात. असा अन्याय होत असताना इतरांनी बघ्याची भूमीका घेऊ नये.

आजकाल वृद्धांच्या बाबतीत होणार्‍या अत्याचाराचे प्रमाण वाढत आहे आणि त्या मानाने उपलब्द्ध असलेले मदतीचे स्त्रोत फार कमी आहेत. अशावेळी स्त्रीवादींची भूमिका वगैरे नेहमीचे काथ्याकुट टाळून मानवतेच्या दृष्तीकोनातून उपाय शोधणे योग्य नाही का?

आजच आईशी बोलताना तिने त्यांच्या सोसायटीतल्या घटनेचा उल्लेख केला. त्यांच्या सोसायटीतल्या एका वृद्ध व्यक्तीला त्यांच्या मुलाने दमदाटी केली. अगदी अंगावर हात देखील उगारला. सोसायटीतील लोकांनी बघ्याची भुमिका घ्यायचे नाकारले. सोसायटीच्या सेक्रेटरींनी या वृद्धाच्या घरी जावून मुलाला आधी समजावले. तो ऐकत नाही म्हटल्यावर मस्त खरडपट्टी काढली आणि वर दम दिला की परत वडिलांना काही त्रास दिलास तर तुला पोलिस बोलावून इथून बेड्या अडकवून मिरवत नेइन. सध्या तरी तो मुलगा नीट वागतोय. सोसायटी मधले सर्वजण या वृद्ध व्यक्तीला त्रास होऊ नये म्हणून सजग आहेत. ज्याने त्याने आपापल्या सोसायटी पुरती जरी अशी सजग नागरीकाची भूमिका निभावली तर बर्‍याच अन्याय पिडितांना दिलासा मिळू शकतो.

धन्या's picture

19 Jun 2011 - 11:31 pm | धन्या

टायपायचा कंटाळा आलाय म्हणून ति़कडे डॉ. दिवटेंच्या लेखाला दिलेली प्रतिक्रिया इथे चिकटवतो...

एखादी स्त्री वाईट वागली म्हणून "सगळ्या बायका अशाच" किंवा एखादा पुरुष वाईट वागला म्हणून "सगळे पुरुष असेच" असा निष्कर्ष काढणे चुकीचे ठरेल.

बरे वाईट गुण स्त्री आणि पुरुष दोन्हींमध्ये असतात. एखाद्या केसमध्ये स्त्रीचा दोष असेल तर एखादया केसमध्ये पुरुष दोषी असेल. कधी दोघांचीही चुक असेल. त्यामुळे समाजात घडणारी अशी एखादी घटना घडते तेव्हा स्त्री पुरुष अशी विभागणी न करता "ती व्यक्ती" म्हणणे जास्त सोयीचे ठरेल.

आणि आता ही आम्ही त्याच प्रतिक्रियेत सहज म्हणून केलेली एक हलकी फुलकी टीपणी...

च्यायला, खरंच असं झालं तर? म्हणजे गुणदोष पाहताना स्त्री पुरुष असं न पाहता केवळ व्यक्ती म्हणून पाहिलं तर? सगळ्यात मोठा प्रश्न हा असेल की युयुत्सूराव धागे कशावर काढणार? :)

शैलेन्द्र's picture

19 Jun 2011 - 11:34 pm | शैलेन्द्र

+१०००

या अशा समस्या सकारात्मक सामाजीक दडपणानेच सुटु शकतात..

धूम्केतु's picture

19 Jun 2011 - 9:07 pm | धूम्केतु

लग्नानंतर शक्य असेल तर स्वातंत्र घरात राहावे. नात्यांचा गोडवा टिकण्यास मदत होते. आई वडिलांनी एकत्र राहण्याचा अट्टाहास धरू नये हे चांगले.

स्वाती२'s picture

19 Jun 2011 - 9:36 pm | स्वाती२

वेगळे रहाणारे आईवडिलही मुलांकडून होणार्‍या आर्थिक फसवणूकीला बळी पडतात आणि हा एक प्रकारे अत्याचारच असतो.

विश्वनाथ मेहेंदळे's picture

21 Jun 2011 - 4:04 pm | विश्वनाथ मेहेंदळे

उद्या हाताला जखम झाली तर हात कापणार का ??

मला माझ्या आईवडिलांनी मोठे केले, म्हातारपणी त्यांना माझी गरज असताना त्यांना एकटे सोडायचे हा कुठला उपाय? वरील बातमीत स्पष्ट लिहिले आहे भावनिक आधाराचा अभाव आणि एकटेपणा ह्या पण समस्या आहेत. त्याचे काय ?

वाहीदा's picture

21 Jun 2011 - 4:32 pm | वाहीदा

लग्नानंतर शक्य असेल तर स्वातंत्र घरात राहावे. नात्यांचा गोडवा टिकण्यास मदत होते.आई वडिलांनी एकत्र राहण्याचा अट्टाहास धरू नये हे चांगले.

-१०००० असहमत !
अशी देखाव्याची नाती-गोती अन गोडवा काय कामाचा ? स्पष्ट शब्दात सांगीतले राग मानू नये - अशी अप्पलपोटी मुलं जन्माला न आलेली बरी !
ऐसे कमजब्त बच्चे (जो मां-बाप को ही बोझ समझते हो) पैदा करने के बजाए मैं अपने आपको बांझ कहेना पसंद करुंगी | (बांझ - मुल-बाळ जन्माला न घालू शकणारी स्त्री )

रक्तात प्रेम नासे,
त्याच्यात मिठ खारे,
खारे कसे म्हणू मी..
हे तर मतलबीच वारे !

नर्मदेतला गोटा's picture

19 Jun 2011 - 9:21 pm | नर्मदेतला गोटा

बातमी जाऊदे

तुमचा सोत्ताचा अनुभव काय असेल तर सान्गा की राव

एक खाजगीतला प्रश्न ?
काही आयडी नवीन असूनही इथे असे वावरत आहेत/टीका टिप्पणी करत आहेत कि पूर्वापार ते येथील प्रस्थापितांना कोळून प्यायलेत. किंवा नाव बदलून पुन्हा येथे वावरते झालेत.
असे असल्यास त्यांनी हळुवार बिलकुल घेवू नये जोरदार घ्यावे..................

वाहीदा's picture

20 Jun 2011 - 4:15 pm | वाहीदा

हे कोणीही कोणावरही करु शकते. घरात ज्याची बाजू वरचढ मग ती आर्थीक दृष्ट्या असो की भावनिक दृष्ट्या, ज्याला संस्कार नाहीत तो नक्कीच DOMESTIC VIOLENCE (मराठी ??) करणार.

पण आपणही कधीतरी वृद्धापकाळात जाणार, त्यावेळी आपले काय होईल हे ज्याने त्याने ठरवावे.
"बुराई, इस हात ले, उस हात दे" , "सास भी कभी बहु थी " ही म्हण विसरता काम नये.
वृध्दांचा आशिर्वाद घेता येत नसेल तरी तळतळाट तरी घेऊ नये कारण याचे परिणाम नक्कीच भोगावे लागतात या मताची मी तरी आहे.

नर्मदेतला गोटा's picture

21 Jun 2011 - 12:06 am | नर्मदेतला गोटा

>> हे काय गौडबंगाल ???????????????????????

विषय काय आणि तुमी लिहिताय काय ?
बर्‍याचदा मूळ लेखापेक्षा, प्रतिक्रियांवर प्रतिक्रिया येतात आणि मूळ विषय
कडेला पडतो

अलख निरंजन's picture

22 Jun 2011 - 11:09 pm | अलख निरंजन

या छ्ळवाद्यांचे काय करायचे?

काय करावे असे युयुत्सुंचे मत आहे?

विजुभाऊ's picture

23 Jun 2011 - 2:46 pm | विजुभाऊ

९०० ज्येष्ठ हे प्रातिनीधक स्वरूप होत नाही. या पैकी एक पंचमांश व्यक्ती हा देखील अल्पसांख्यीक ठरते.
त्या शिवाय त्य ९०० ज्येष्ठांची आर्थीक स्थिती काय आहे हे देखील नमूद केलेले नाही.
या वरून एखादानिष्कर्ष काढणे कितपत योग्य आहे?
आर्थीक स्वातन्त्र्य नसेल तर ज्येष्ठच काय पण इतरानाही फारशी चांगली वागणूक मिळत नाही. ही वस्तु स्थिती आहे.

अहो मग युयुत्सुंचे दुकान कसे चालणार? दुसर्याचा काही म्हणजे काही विचार करवत नाही तुम्हाला!!

अनामिक's picture

25 Jun 2011 - 9:59 pm | अनामिक

वर विजुभाऊ म्हणतात तेच म्हणतो... ९०० आकडा प्रातिनीधीक होऊ शकत नाही. ९०० जेष्ठ, म्हणजे वर नमूद केलेल्या ५ शहरात प्रत्येकी सरासरी १८० सदस्यांचं सर्वेक्षण झालं. आता ह्या प्रत्येक शहराची लोकसंख्या बघता, फक्तं २०० जेष्ठांचं मत घेऊन काय तो निष्कर्ष आहे तो कसा निघू शकतो?