संडे स्पेशल (जिलेबी)

स्वाती राजेश's picture
स्वाती राजेश in पाककृती
11 May 2008 - 9:07 pm

जिलेबी
२ वाट्या मैदा
१च.बेसन
१च.तेल
२ च.आंबट दही
२वाट्या साखर
केशर
१ लिंबू(पाकात पिळण्यासाठी)
तळण्यासाठी तूप किंवा तेल

१.जिलेबी करायच्या अदल्यादिवशी कोमट पाण्यात मैदा,बेसन, तेल, दही घालून गुठळी न होता भज्याप्रमाणे भिजवावे.खाण्याचा रंग घालायचा असल्यास तो पीठ भिजवतानाच घालावा.
२.जिलेबी करायच्या दिवशी पीठ घट्ट झाल्यास कोमट पाणी वापरून बेताचे सैलसर करावे.
३.साखरेचा एकतारी पाक करावा. त्यात केशर, लिंबुरस घालावा.
४.शक्यतो पितळेची कल्हई केलेली परातीत भरपूर तूप/तेल घालून ती गॅसवर ठेवावी.प्रथम तेल भरपूर तापू द्यावे व तापल्यावर गॅस मंद करून जिलेबी तळाव्यात.
५.गुलाबी रंगावर जिलेबी तळाव्यात,व त्या पाकात टाकाव्यात,पाक नेहमी गरम असावा. पुढचा घाणा झाल्यावर पहिल्या काढाव्यात.

टीपः जिलेबी कडक हवी असल्यास जास्त तळावी. मऊ हवी असल्यास बेताची तळावी.
दह्याचे किंवा बेसन चे प्रमाण जास्त झाल्यास जिलेबीवर गाठी आल्यासारखी जिलेबी दिसते.
एकदा वापरलेले पीठ फ्रिजमधे ठेऊन परत वापरू नये.
जिलेबी करताना सॉस च्या बॉटला वापर करावा. किंवा नारळाच्या करवंटीचा सुद्धा चांगला उपयोग होतो.

प्रतिक्रिया

प्रभाकर पेठकर's picture

11 May 2008 - 10:12 pm | प्रभाकर पेठकर

ह्या प्रकरणात कधी हात घातलेला नाही. पटापट आणि व्यवस्थित गोल जिलब्या पाडण्यासाठी कौशल्य लागते.
एकदा प्रयत्न करून पाहिला पाहिजे.

गणपा's picture

11 May 2008 - 10:16 pm | गणपा

स्वातीताई मस्त पाकक्रिया. वाचुन तर एकदम सोप्पी वाटतेय कृती. करुन पहायला हवी.
सॉस च्या बॉटला वापर करायची कल्पना ग्रेट. फडक्याचा वापर करुन एकदा प्रयत्न केला होता, पण सगळच बोंबलल.(आणि जिलेबी ऐवजी भजी करावी लागली)
--गणपा

विसोबा खेचर's picture

11 May 2008 - 11:36 pm | विसोबा खेचर

क्य बात है स्वातीताई! आज बर्‍याच दिवसांनी मिपावर दिसताय! तरीच मी म्हणतो आहे की मिपाची अन्नपूर्णा गेली तरी कुठे? :) पाहतो तर आज जिलेबी घेऊन हजर! बहोत अच्छे! :)

बाकी जिलेबीची पाकृ एकदम खास बर्रका! क्या केहेने...

अहो काय सांगू तुम्हाला स्वातीताई, उतम साजूक तुपातली, जाड नळीची, केशर घातलेली जिलेबी हा माझा वीक प्वाईंट! आयुष्यात सख्ख्या प्रेयसीवर जेवढं प्रेम केलं नाही तेवढं या जिलेबीवर केलं! :)

जिलेबीच्या या सुंदर पाकृकरता मिपाच्या आई अन्नपूर्णे, तुला धन्यवाद गं बाई! :)

आपला,
(जिलेबीप्रेमी!) तात्या.

स्वाती राजेश's picture

12 May 2008 - 12:09 am | स्वाती राजेश

पेठकर्,गणपा,तात्या धन्यवाद!!!!!!!!
तात्या,खरेतर तुम्ही मि.पा.वर टाकलेल्या फोटोवरून सुचली जिलेबीची रेसिपी द्यायला.
अवांतरः सद्द्या इथे उन्हाळा चालू आहे, त्यामुळे जरा आजुबाजुला भटकंती चालू आहे!!!त्यामुळे इथे जरा यायला वेळ मिळाला नाही. पण जेव्हा संगणक चालू होतो तेव्हा आपोआप मि.पा.ची साईट उघडली जाते.:) अगदी मेल च्या आधी.:))

प्राजु's picture

12 May 2008 - 9:11 am | प्राजु

करून पाहीली पाहीजे..

- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

झकासराव's picture

12 May 2008 - 9:41 am | झकासराव

कालच साजुक तुपातली जिलेबी खाल्ली.
अर्थात मी गेलो होतो गुलाब जाम आणायला पण तिथे काल रविवार स्पेशल म्हणुन तुपातील जिलेबी होती.
ती पाहुन मोह आवरला नाही. घेतलीच विकत :)
घरी बनवण्याची कला अंगात हवी. पण आमच्या घरी सध्या तरी फक्त मी एकटाच आहे जिलेबी आवडणारा त्यामुळे घरी बनवु ह्या प्रस्तावाला अनुमोदन व तयारी दर्शवणार कोणी नाही म्हणून सध्या तरी विकतच घ्यावी लागते.
एकदा स्वताहुन प्रयत्न केला पाहिजे. त्यावेळी ही पाककृती उपयोगी येइल.
तात्या शेठ जिलेबीचा फोटु बघुन तोंडात लाळ जमा झाली हो. :)
................
http://picasaweb.google.co.in/zakasrao

रोचीन's picture

12 May 2008 - 12:34 pm | रोचीन

टिचकी मारल्यावर येणार्या पानावर फक्त ठोकळे दिसत आहेत. :(
कृपया मदत करा!!!!

स्वाती दिनेश's picture

12 May 2008 - 4:29 pm | स्वाती दिनेश

स्वाती मस्तच ..मुखपृष्ठावरच्या जिलेबीच्या चित्रापाठोपाठ लगेचच तुझी पाकृ आली..वावा मस्तच!
मी कधी जिलबी घरी नाही करून पाहिली,आता तुझ्या रेसिपीने करून पहावी म्हणते,:)
स्वाती

मनस्वी's picture

12 May 2008 - 4:42 pm | मनस्वी

स्वातीताई. सॉसच्या बाटलीची आयडीया सहीच.

वरदा's picture

12 May 2008 - 5:51 pm | वरदा

मी कधी करुन पण नाही पाहिली किंवा घरात कुणाला करतानाही नाही पाहिली...तुझी क्रुती वाट्टेय तर सोपी करुन पाहिल्यावरच कळेल जमते का...
सॉलीड आवडते मला जिलबी..खूपच्...मुलुंडच्या एका दुकानातून काका आणायचे साजुक तुपातली जिलबी...काय असायची.....इथेही स्वामीनारायण मंदिरात बनवतात प्युअर साजुक तुपात आणि केशर तर एवढं असतं ना..झक्कास आता तू आठ्वण करुन दिलीस मला गेलं पाहिजे आणायला......
एवढी कठीण क्रुती सोप्पी करुन सांगितल्याबद्दल तुझं अभिनंदन!!!