कंडेन्सड मिल्क केक

सानिकास्वप्निल's picture
सानिकास्वप्निल in पाककृती
25 Mar 2011 - 1:04 am

भारतीय संघाला आजच्या विजयाबद्दल हार्दिक शुभेच्छा :)

साहित्यः
१ १/४ कप मैदा
१ कप कंडेन्सड मिल्क
३/४ कप साखर
१ कप मऊ झालेले बटर किंवा वितळवून गार केलेले बटर
३/४ टीस्पून बेकिंग पावडर
२ अंडी
१ टीस्पून व्हॅनिला ईसेन्स
.

पा़कृ:

मैदा आणी बेकिंग पावडर एकत्र चाळून घ्या.

.

बटर, साखर एकत्र चांगले फेटून घेणे.

.

त्यात मग कंडेन्सड मिल्क घालून सगळे एकजीव होइपर्यन्त फेटणे.

.

काट्याने अंडी चांगली फेटून घेणे.

.

कंडेन्सड मिल्क +बटरच्या मिश्रणात मैदा व बेकिंग पावडर, व्हॅनिला ईसेन्स घाला व नीट एकत्र करा.

.

त्यात फेटलेली अंडी घालून लाकडी चमच्याने एकत्र करा.

.

तुपाचा हात फिरवलेल्या केकच्या भांड्यात हे मिश्रण ओता व प्रि-हिट केलेल्या ओव्हनमध्ये १८० डिग्री सेंवर ३५-४० मिनिटे बेक करायला ठेवा.

.

तयार केक कूलिंग रॅकवर काढून थंड करा व मग त्याचे स्लाईस करा.

.

कृपया हा केक बिनअंड्याचा कसा करायचा मला माहित नाही ;) ज्यांना माहित असेल त्यांनी मला ही पा़कृ द्यावी :)

प्रतिक्रिया

प्राजु's picture

25 Mar 2011 - 1:51 am | प्राजु

हाच तो पाउंड केक का?
दिसतो तसाच आहे. मस्त आलाय फोटो. :)

सानिकास्वप्निल's picture

25 Mar 2011 - 4:31 am | सानिकास्वप्निल

हो पाउंड केकच हा, फक्त कंडेन्सड मिल्क वापरून बनवलेला :)

केक छान दिसतोय. बाकी सर्व फोटोजही छान.
कंडेन्सड मिल्क चा बिनंअंड्याचा केक बरेच वेळा खाल्लेला आहे. तोही चवदार होतो. त्यात अंड्याऐवजी बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा घालतात. घरी विचारून बघतो रेसिपी.

रेवती's picture

25 Mar 2011 - 5:00 am | रेवती

केक छानच झालाय!
तुम्ही पायरीपायरीने पाकृ व फोटू देता.....पांथस्थांच्या शिष्या आहात असे वाटते.:)

पियुशा's picture

25 Mar 2011 - 10:23 am | पियुशा

झक्कास !
:)

मुलूखावेगळी's picture

25 Mar 2011 - 11:02 am | मुलूखावेगळी

मस्त ग
कंडेन्सड मिल्क केक बिन अंड्याचा पन करता येतो.

कच्ची कैरी's picture

25 Mar 2011 - 4:10 pm | कच्ची कैरी

मस्त !पाकृ गैरीच मस्त :)
अवांतर्-मला तर एगलेस केक आणि केकलेस एग दोन्हीही आवडतात ;)

परिकथेतील राजकुमार's picture

25 Mar 2011 - 4:35 pm | परिकथेतील राजकुमार

ज ह ब र्‍या !!

ताबडतोब पार्सल केल्या जावा.

प्राजक्ता पवार's picture

26 Mar 2011 - 1:54 pm | प्राजक्ता पवार

मस्तं :)

sneharani's picture

26 Mar 2011 - 2:59 pm | sneharani

मस्त रेसिपी!शेवटचा फोटोही मस्तच!!
:)

स्रुजा's picture

18 Feb 2015 - 2:19 am | स्रुजा

हां तर तुला अनाहिता मध्ये म्हणले तसा या केकचा किस्सा बरं का .

आमच्याकडे मागच्या आठवड्यात एक मित्र आणि त्याच्या उसगावहून आलेल्या फॅ मिली ला रात्री कॉफी प्यायला बोलावलं होतं. मंडळी जेवूनच येणार होती. नवरा न्युझीलंड- श्रीलंका मॅच सोडून वर बघायला तयार नाही, हे लोकं उगवायला तयार नाहीत. हाटेलात जेवण बनवून खायला गेले होते की काय कोण जाणे. अस्मादिक अत्यंत कंटाळले. मग मला वाटलं जरा नसलेलं पाककौशल्य आहेच असं समजून मिरवावं. कॉफी बरोबर डिझर्टचा महत्त्वाकांक्षी बेत मी रात्री ९ ला आखला. मग माझ्या वा.खू. चाळायला लागले. आणि युरेका ! माझ्याकडे असलेल्या साहित्याची तुझी रेसीपी सापडली एकदाची.

या आधीचं बेकींग कौशल्य म्हणजे मफीन्स, बास. म्हणलं आता हा धागा ओळ अन ओळ तस्शीच्या तश्शी पाळायची. आहे काय अन नाही काय . झालं. साहित्य काढलं, नीट ३-३ दा वाचलं. आणि ओव्हन ठेवला १८० वर तापवत. चटाचटा सगळं आवरलं ( तेवढं मला नीट येतं), केक मोल्ड मध्ये सगळं टाकलं आणि अशी बाहेर येऊन बसले की आता या कधी ही, तुम्हाला केकचा छान वास येईल मग मी काही नाही गं वेळ होता म्हणलं जरा केक करावा अशी एकदम "प्रो" बतावणी करावी वगैरे. पण कसलं काय मेला वासच येईना. बरं नवरा पण बाहेर येईना. त्याला असले छान वास आले एरवी की लगेच खायला हवं असतं. मग मी अळीमिळी गुपचिळी ठेवायची ठरवली. कॉफी पाजून त्यांना पाठवायचं ठरवलं , हा मेला केक बिघडला तर काय घ्या. पण घरी नवरा नावाचा ब्रुट्स होता हे विसरले. ते आल्या आल्या या बाबाने जाहीर केलं अरे आज आपल्याला केक मिळणार आहे. अजून एक मित्र आणि त्याची बायको येणार नव्हते तर त्यांना फोन करून सांगितलं की या केक खायला. ते पण आले.

इकडे तो केक अजून ओव्हन मध्ये आणि मी गॅस वर. मग मी हळूहळू मनाशीच रेसिपी आठवायला सुरुवात केली आणि प्रकाश पडला की च्यामारी १८० फॅ नाही रे बाबा १८० से. लिहिलं होतं तिने. आधी जाऊन तो ओव्हन जास्त तापमानाला सेट केला.

हे आमचे खादाड मित्र एकिकडे अगं झालं की नाही म्हणून माझ्या डोक्यावर नाचायला लागले. यथावकाश झकास वास सुटला आणी माझा जीव भांड्यात पडला, नवरा पण थोडक्यात सुटला ना ही तर काही खरं नव्हतं. उगा आपलं याला बोलाव त्याला सांग करत असतो.

तो केक भन्नाट झाला होता, सगळ्यांनी भांडून भां डून संपवला. माझा नवरा त्यांना म्हणे अरे तुम्ही खा, ही काय करेल परत मग मी खाईन. मग मला वाटलं की यालाच बिचार्‍याला मिळाला नाही की काय, तर ते गेल्यावर म्हणे अगं मी आधीच ३ मोठे तुकडे उडवले होते आणि मग निवांत बसलो होतो. कप्पाळ माझं!

तर बाई, माझी लाज राखलीस , धन्यवाद कसं म्हणू तुला?

सानिकास्वप्निल's picture

18 Feb 2015 - 2:27 am | सानिकास्वप्निल

१८० फॅ नाही रे बाबा १८० से. लिहिलं होतं तिने. आधी जाऊन तो ओव्हन जास्त तापमानाला सेट केला.

बाई गं तूच माझी लाज राखलीस =))

माझेच धन्यवाद घे आता तू *biggrin*

स्रुजा's picture

18 Feb 2015 - 2:30 am | स्रुजा

:lol:

अति महत्वाकांक्षी तू आणि नवरा ओव्हर कॉन्फीडंट!!
राम बनाये जोडी म्हणतात ना ते हेच!!

स्रुजा's picture

18 Feb 2015 - 5:34 am | स्रुजा

हा हा ! मग ! बायकोचं कौतुक मिरवायला मिळत होतं त्याला, पण हे प्रेम माझ्या अंगाशी येता येता राहिलं. तशी मी अगदीच "ही" नाहीये पण भरवशाच्या म्हशीला आहे ;)

स्पंदना's picture

18 Feb 2015 - 5:36 am | स्पंदना

:))

सविता००१'s picture

18 Feb 2015 - 1:40 pm | सविता००१

:))
:))
:))

सखी's picture

18 Feb 2015 - 8:25 pm | सखी

स्रुजा कहर आहेस गं बाई तु, दंडवत स्विकार माते. यानिमित्ताने सोपी पा़कृ मिळाली, नक्की करुन बघेन.
बाकी तु आणि सानिकाने केक करण्यासाठी भारताचा विजयाचा मुहुर्त साधला म्हणायचा, तेही दोन वेगळ्या विश्वचषक सामन्यातला - खासच! :)

मग मला वाटलं की यालाच बिचार्‍याला मिळाला नाही की काय, तर ते गेल्यावर म्हणे अगं मी आधीच ३ मोठे तुकडे उडवले होते आणि मग निवांत बसलो होतो. कप्पाळ माझं!

याला म्हंटात डोका!

अजया's picture

18 Feb 2015 - 8:35 am | अजया

=))

पैसा's picture

18 Feb 2015 - 9:35 am | पैसा

भन्नाट रेसिपी आणि फटु! स्रुजा, १८० फॅरनहीट म्हणजे बिरबलाची खिचडी की ग करायला ठेवलीस! :D

प्रश्नलंका's picture

18 Feb 2015 - 1:35 pm | प्रश्नलंका

*lol*

प्रीत-मोहर's picture

18 Feb 2015 - 8:40 pm | प्रीत-मोहर

तशी महानच आहे हो आमची सीता.. आपल हे सृजा . =)))

स्रुजा's picture

18 Feb 2015 - 9:44 pm | स्रुजा

हां मंग ! आता मी बिरबल आणि सीताचं डेडली कॉम्बी झालेली आहे पै ताईच्या प्रतिसादानंतर.

जिन्गल बेल's picture

18 Feb 2015 - 9:44 am | जिन्गल बेल

*lol*

इशा१२३'s picture

18 Feb 2015 - 1:21 pm | इशा१२३

:))) :lol:

वा वा वा.. मस्त केक, सही लागतो असा प्लेन केक सुद्धा. :)

गिरकी's picture

18 Feb 2015 - 4:48 pm | गिरकी

आजच करण्यात येइल :)