खरा दंगा आज झालाच...!!!

इन्द्र्राज पवार's picture
इन्द्र्राज पवार in क्रिडा जगत
2 Mar 2011 - 10:58 pm

व्वा....जियो आयर्लंड !!!

धमाल म्हणजे काय हे आज आयर्लंडने बंगलोरच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर हजर असलेल्या मूठभर क्रिकेटप्रेमींना दाखवून दिले....आणि हे मूठभरच खरे नशिबवान ठरले....कारण त्याना याची देही याची डोळा पाहायला मिळाला विश्वचषक २०११ मधील पहिलावहिला सेन्सेशनल 'चमत्कार....'

इंग्लंडने उभे केलेले ३२७ धावाचे अक्राळविक्राळ लक्ष्य आयर्लंडसारखा टिल्लूपिल्लू संघ कधी गाठू शकेल हे खुद्द त्या देशाच्या नागरिकांनीही स्वप्नातही आणले नसेल त्यात निम्मा संघ १२५ च्या आत गारद. पण नेमक्या अशाच स्थितीत १९८३ च्या वर्ल्ड कप मध्ये कपिल देवने जी १७५ ची जिगरबाज खेळी केली तिची याद ताजा आयर्लंडच्या ओब्रायन या वाघाने करून दाखविली. ५० चेंडूत १०० धावा काढून अँडरसन आणि को. ची लक्तरे काढली....आणि तो जरी पुढे धावचित झाला तरी उरलेल्या तिघांनी तशीच खेळी करत अशक्यप्राय वाटणारा विजय ५ चेंडू राखून जिंकला.....आणि मग स्टेडियममध्ये त्यांच्या पाठिराख्यांनी जो जल्लोष केलेला दिसला.....तो केवळ कप जिंकल्यावरच होऊ शकतो.

सलाम आयर्लंड !! आता मजा आली विश्वकप २०११ मध्ये.

इन्द्रा

क्रिकेट

प्रतिक्रिया

आनंदयात्री's picture

2 Mar 2011 - 11:01 pm | आनंदयात्री

बाजार .. बाज्जाssssर उठवला अग्रेंजाचा !!
आयर्लंड झिंदाबाद !!

पैसा's picture

2 Mar 2011 - 11:05 pm | पैसा

भारतासारख्या "बलाढ्य" संघाला जे जमलं नाही ते आयर्लंडने घडवलं. शाबास आयर्लंड!

मेघवेडा's picture

2 Mar 2011 - 11:16 pm | मेघवेडा

हापिसात इतकं चिडव चिडव चिडवलंय एकेकाला, आता रैवारी आपले वीर घुसले तर मला पुढला अख्खा आठवडा सिक लीव्ह घ्यावी लागेल! =)) =))

मजा आली पण! घरी जाऊन जल्लोष बघेन..

चिंतामणी's picture

2 Mar 2011 - 11:17 pm | चिंतामणी

आता भारताच्या संघाला तोंड द्यायचे आहे.

बेसनलाडू's picture

2 Mar 2011 - 11:29 pm | बेसनलाडू

आणि भारताला आयर्लंडच्या संघाला तोंड द्यायचे आहे :)
(संतुलित)बेसनलाडू

अमोल केळकर's picture

3 Mar 2011 - 9:44 am | अमोल केळकर

खेळपट्टी ही तीच !! :(

अमोल

विकास's picture

2 Mar 2011 - 11:43 pm | विकास

पाहीले नाही, पण १९८३ चीच आठवण करून देणारा हा प्रसंग आहे!

आयरीश लोकांच्या दृष्टीने आजच, या वर्षीचा सेंट पॅट्रिक डे, साजरा झाला असेल!

इन्द्र्राज पवार's picture

3 Mar 2011 - 12:56 am | इन्द्र्राज पवार

आता विविध चॅनेल्सवर ज्या चर्चा जोरजोरात चाललेल्या आहेत, आजीमाजी क्रिकेटपटूंच्या आणि तज्ज्ञांच्या उपस्थितीत, ते पाहिल्यावर असे वाटू लागले आहे की या सर्वांच्या डोक्यावर ते गाढ झोपेत असताना कुणीतरी गारेगार पाण्याचा हंडा रिकामा केला आहे, आणि आता ते खडबडून जागे झाले आहेत...व त्याना दिसत्योय तो इंग्लंडचा केविन पीटरसन नव्हे तर आयर्लंडचा केविन ओब्रायन...!! धमाल दंगा सुरू आहे प्रत्येक चॅनेलवर....बजेटही मागे पडले आहे.

केविन ओब्रायन.... पठ्ठ्याने किती रेकॉर्डस् करावेत या एकाच सामन्यात ?

१. सर्वाधिक जलद शतक....वर्ल्ड कपच्या इतिहासातील.....५० चेंडूत १०० धावा.
(या अगोदरचा मॅथ्यू हेडनचा ६६ चेंडूत १०० धावाचे रेकॉर्ड तोडले...)
२. सर्वाधिक लांब अंतरावर सिक्सर ठोकली....१०२ मीटर्स...एकून ६ सिक्सेस
(या अगोदर ऑस्ट्रेलियाच्या शेन वॅटसनने ९७ मीटर्स अंतरावर सिक्सर ठोकली होती.)
३. कोणत्याही गोलंदाजाने याला बाद केले नाही, तर धावबाद झाला (हे रेकॉर्ड नसेल, पण इंग्लंडला झोंबणारी बाब आहे)
४. आयर्लंडचा इंग्लंडवर पहिला विजय.....आज ते देश वेडा झाला असेल...विजय आणि तोही कट्टर शत्रू राष्ट्रावर मिळविला....क्या बात है |
५. प्रथमच आंतरराष्ट्रीय सामन्यात आयर्लंडच्या एखाद्या खेळाडूस 'मॅन ऑफ दि मॅच' पुरस्कार.
६. विश्वचषक स्पर्धेत प्रथमच ३००+ धावांचा यशस्वी पाठलाग.

पैसा वसूल.....बंभोलेनाथ !!

इन्द्रा

६. विश्वचषक स्पर्धेत प्रथमच ३००+ धावांचा यशस्वी पाठलाग.

अभ्यास कमी पडतो आहे. १९९२ साली श्रीलंकेने झिम्बाब्वेविरुद्ध ३१३ चेस डाऊन केले होते. :)

इन्द्र्राज पवार's picture

3 Mar 2011 - 1:11 am | इन्द्र्राज पवार

"...१९९२ साली श्रीलंकेने झिम्बाब्वेविरुद्ध ३१३ चेस डाऊन केले होते...."

~ रीअली ? मग मी काय ऐकले...? की ३२७ धावांचे इतके मोठे लक्ष्य प्रथमच गाठले...असे म्हणायचे होते काय? {प्रथमच असा यशस्वी पाठलाग झाला असे झी २४ तास वर बातमी देणारे सांगत होते...}

इन्द्रा

मेघवेडा's picture

3 Mar 2011 - 1:24 am | मेघवेडा

हो ते ही बरोबरच आहे. आत्तापर्यंत श्रीलंकेचा ३१३ धावांचा रेकॉर्ड होता जो आयर्लंडनं आज मोडला! :)

मस्त रेकॉर्ड ब्रेक, ब्रेकिंग न्यूज !!
जियो आयर्लंड ! जियो!! :-)

पॉमड्यांनी ऑईन मॉर्गन सारखंच आता केव्हिन ओब्रायनलाही ओढून घेतला नाही म्हणजे मिळवली..

अवांतर : आयर्लंडला 'टेस्ट प्लेयिंग नेशन' म्हणून मान्यता देण्याबद्दल बोलताहेत का हो न्यूजवाले?

इन्द्र्राज पवार's picture

3 Mar 2011 - 1:08 am | इन्द्र्राज पवार

"...आयर्लंडला 'टेस्ट प्लेयिंग नेशन' म्हणून मान्यता देण्याबद्दल बोलताहेत का हो न्यूजवाले?..."

~ योगायोगाची गोष्ट म्हणजे 'स्टार स्पोर्टस्' वर नेमका हाच विषय ग्रॅम हिक, आथर्टन आणि हर्ष भोगले यानी छेडला होता....म्हणजे ऑनलाईन मत मांडणारे अन्य दोघे (नावे समजली नाहीत... पण एक द.आफ्रिकेचे होते) व हिक यानी असे मत मांडले की, टेस्ट क्रिकेट नसले तरी आत्ताची क्रमांक ८ ते १२ तसेच आयसीसीच्या यादीतील आणखीन ४ संघ (यात अमेरिकेचेही नाव घेतले गेले) अशा ८ संघाना भारतासारख्या या खेळाच्या प्रेमात पडलेल्या देशात वर्षातून एकदा बोलाविण्यात यावे आणि इथेच याच संघांचे एक दिवसीय तसेच २०-२० चे काही सामने घडवून आणावेत, जेणेकरून विविध शहरातील खेळपट्ट्यांचीही त्याना सवय होईल त्याचप्रमाणे या देशातील क्रिकेटप्रेमींचे त्याना प्रोत्साहनही मिळेल.

आता इतकी चांगली सूचना (प्रत्यक्षात येवो वा न येवो हा भाग वेगळा..) आणि चर्चा चालू असता आमचे नवज्योत सिद्धूबाबा शांत राहतील तर ते सिद्धू सिद्ध होणारच नाहीत....त्यांच्या आरड्याओरड्याला आम्हीच काय पण तिथले पॅनेलही वैतागले....आणि हा विषय मागे पडला...पण आयर्लंडच्या विजयामुळे या कल्पनेवर आयसीसीतर्फे सकारात्मक विचार होऊ शकेल असे वाटते.

इन्द्रा

मेघवेडा's picture

3 Mar 2011 - 1:22 am | मेघवेडा

हो.. त्यांनी ते निव्वळ 'असोशिएट' पेक्षा अधिक ताकदीचे असल्याचे आता एकापेक्षा अधिक वेळा सिद्ध करून दाखवलेलं आहे. परवाचा बांग्लादेशविरूद्धचा सामनाही फार रंजक झाला होता. पाकिस्तानला मागे हरवले आहेच त्यांनी. २००७ मध्ये झिम्बाब्वेविरूद्ध एक सामना टायही झाला होता त्यांचा. वर म्हटल्याप्रमाणे हरकत नाही आपल्याकडे सामने ऑर्गनाईज करायला..

पुष्करिणीशी सहमत.. ओब्रायनला आयपीएल मध्ये मजबूत भाव येईल आता! येत्या सीझनकरित त्याची तडकाफडकी निवड झाल्यासही आश्चर्य वाटायचं नाही.

पुष्करिणी's picture

3 Mar 2011 - 1:08 am | पुष्करिणी

टीव्हीवर नाही पहाता आली पण शेवटची ९ षटकांचं धावतं वर्णन पहात होते. धन्स मेवे .

कोणती आयपीएल टीम केव्हिन ओब्रायनला घेइल पुढच्या वर्षी?

इन्द्र्राज पवार's picture

3 Mar 2011 - 1:16 am | इन्द्र्राज पवार

"...धन्स मेवे ...!!

~~ ओये, पुष्करिणीणीणीणीणी.......तुझ्या जीवाला काही वाटते का...? अगं मी धडपडत त्या टीव्हीभोवती जमलेल्या मित्रांच्या दंग्यातून बाहेर येऊन, तिथली कॉफी न घेता.... इथे दहा मिनिटे कळफलक बडवत बसून ही धमाल बातमी इथल्या परिवाराला, सविस्तर, दिली.....आणि तू धन्स म्हणतेस मेवे याना?

वाईट्ट्ट आहेस तू....म्हणजे आहेसच...वाईट....अगदी अगदी वाईट्ट्ट्ट्ट....खर्रीखौर्री वाईट्ट्ट्ट !!

इन्द्रा

पुष्करिणी's picture

3 Mar 2011 - 1:33 am | पुष्करिणी

शिव शिव शिव , पवारसाहेब एकदम रामनाम :)

तुम्हांला पण धन्स हो....पण जेंव्हा तुम्ही कॉफी पित पित मॅच बघत होता तेंव्हा मेवेंनी शेवटची १० षटकं चालली असताना इंट्रेष्टिंग मॅच चालू आहे असं सांगितल म्हणून त्यांना धन्स हो!!
:) :) :)

टारझन's picture

3 Mar 2011 - 2:41 am | टारझन

ईंद्राज .. आपला आयडी हैक झाला आहे काय ? पर्‍याच्या एक जालिय काकु असे चिऊ-काऊ चे प्रतिसाद लिहीत असतात आजकाल ..

- हलकट्ट .. वाईट्ट .. खर्राखुर्रा चावट्ट

प्यारे१'s picture

3 Mar 2011 - 9:32 am | प्यारे१

अरुणा शानभाग यांच्या इच्छा/ दयामरणाची चर्चा चालू असताना ब्रेकिंग न्यूज आली सगळीकडे.

विश्वचषकातली सर्वात जलद शतकाबद्दल तेव्हापासून मॅच बघितली. ओ'ब्रायन शांत झाला होता तोपर्यंत.

पैसे घेऊन पळून गेलेल्या बायकोच्या नवर्‍यासारखे तोंड घेऊन काही नाही होईल ठिकठाक असा आव आणणारा अ‍ॅन्ड्र्यू स्ट्रॉस दिसत होता टी व्ही वर.

भारताने आपली 'बायको' सांभाळावी हे बरे.

अवांतरः वरील उपमा फक्त सामन्यासंदर्भातील असून पाशवी शक्तिंनी पाश आवरते घ्यावेत.

अतिअवांतर : टारा,

इन्द्राला 'हळुवार' म्हणावे का???

इन्द्र्राज पवार's picture

3 Mar 2011 - 11:11 am | इन्द्र्राज पवार

"...इन्द्राला 'हळुवार' म्हणावे का???..."

~ काय म्हणायचे ते म्हणा !! व्होल वावर ईज युवर्स, प्यारेलाल जी.
केविन ओब्रायनने दिल खुश कर दिया है ! [त्यातही ती ५० चेंडूतील १०० धावांची जादूमय खेळी पूर्णपणे पाहिली असल्याने, पठ्ठ्या नजरेसमोरून जातच नाही.]

इन्द्रा

इन्द्र्राज पवार's picture

3 Mar 2011 - 10:33 am | इन्द्र्राज पवार

"...ईंद्राज .. आपला आयडी हैक झाला आहे काय ?..."

~ ईल्ला, टारझनराव.....मी खरंच काल बेहोष झालो होतो (खार्‍या शेंगदाण्याशिवायच...)....इतरत्र म्हटल्याप्रमाणे इंग्लंडला असे कुणीही धुतले (अगदी त्या हिरव्या चाँदतार्‍यानेसुद्धा...) तर मला फार आनंद होतो. आणि त्याच भरात इथे किती दंगा करू असे होऊन गेले.

पुष्करिणीला ते 'वाईट्ट्ट्ट' म्हटले ते त्याच भरात....(तशी ती चांगली कन्या आहे हं !....शेवटी मिपा-भगिनी असल्याने असा पारा कमीजास्त झाला तर ती रागावतही नाही.)

थॅन्क्स...!

इन्द्रा

मेव्या , ईग्लंड टिम मध्ये सध्या किती प्लेयर्स 'आयरिश ' आहेत ? आणि किती नॉन - ब्रिटीश ;)

ईन्द्रा, थोड कौतुक डीईडब्ल्यु च आणि केवळ पाच कॅचेस सोडल्याच पण करा ..

इन्द्र्राज पवार's picture

3 Mar 2011 - 2:18 am | इन्द्र्राज पवार

"....केवळ पाच कॅचेस सोडल्याच पण करा .....!!"

~ सुहासराव....वो आपुनको कुछ मालूम नही | इंग्लंडला कधीही कोणत्याही संघाने हरविले तर आम्हाला खूप खूप आनंद होतो. अहो, रेकॉर्ड पाहा जरा, इतकी किडकी मनोवृत्ती आहे या गोर्‍यांची....१९८३ त्या गाजलेल्या वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्येला आमच्या संदीप पाटील आणि मोहिंदरने याना धूळ चारली होती....तर आमच्या विजयाचे कौतुक राहिले बाजूला, यांच्या पेपरवाल्यांनी "आता काय, वेस्ट इंडिजच्या विजयाची हॅटट्रिक होणार..." अशा धर्तीच्या बातम्या दिल्या होत्या. कधीही भारताचे कौतुक करणार नाहीत ही मंडळी.

पडलो तरी नाक वर म्हणणारी जमात आहे इंग्लंडची टीम म्हणजे....म्हणून भले ते कॅचेस सुटले असतील (पण त्याना ते सोडा म्हणून थोडेच आयर्लंडवाल्यांनी सांगितले?) पण ओब्रायनने जो दणका दिला त्याचा तरी विचार करा...!

इन्द्रा

हा हा हा हा हा हा!!!!
आमच्या हापिसात आज कसला दुखवट्याचा सीन झाला होता. हापिसाचं राहू द्या, उभ्या इंग्लंडमध्ये दुखवटा जाहीर करुन झाला असेल एव्हाना.
आमच्या कँटीनमध्ये बीयरच्या बाटल्या आणून ठेवल्या होत्या लोकांनी, शेलिब्रेट काअयला. पण मॅच संपल्यावर १० मिनिटात अर्धं हापिस रिकामं झालं. उरलेले सगळे गोरे चेहरे थोबाडीत बसल्याचा भाव घेऊन फिरत होते.

लै मजा आली! फर्ष्ट टैम आयर्लंडला सपोर्ट करताना इतकी मजा आली राव!!! त्यजायला त्या ओब्रायनाच्या, काय कुटलाय, काय कुटलाय, जबर्‍याच!!! सगळे गोरे गोलंदाज शरमेने काळेठिक्कर पडले आज!! :D

इन्द्राने धागा काढून दंगा करायला जागा दिल्याबद्दल इन्द्राला ठांकू आणि मेव्याने शेवटच्या १० व्हव्हरी उरल्या तेव्हा जागं केल्याबद्दल त्येलापण ठांकू!!

--असुर

मला आता झहिर खान आणि मुनाफ पटेल ची भिती वाटायला लागली आहे, त्यात भर म्हणुन दरिद्रि आशिष नेहराला घेउ नये म्हणजे मि़ळवली.

बाकी आयर्लंड लई भारी खेळले यात शंकाच नाही, हॅट्स ऑफ टु देम.

इंग्लंडातले मिपाकर एकदा आमच्यातर्फे पण त्या हरामखोर ब्रिटांना चिडवुन घ्या. तुम्ही इथं आलात की तुम्हाला मिसळ्पाव माझ्यातर्फे.

मस्त जिरवली माजोरड्यांची !

प्रीत-मोहर's picture

3 Mar 2011 - 8:09 am | प्रीत-मोहर

ये धत्तड तत्तड ये धत्तड तत्तड ये धत्तड तत्तड ये धत्तड तत्तड ये धत्तड तत्तड ये धत्तड तत्तड

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 Mar 2011 - 8:17 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

१११/५ असतांना सामना आयर्लंड जिंकतो असे म्हणायचे म्हणजे निव्वळ बावळपणा होता. पण ओ ब्रायनची फलंदाजी पाहतांना काही चमत्त्कार तर घडणार नाही अशी शंका यायला लागली आणि सामना लिलया आयर्लंडच्या पदरात पडला. ओ ब्रायन धावबाद झाल्यानंतर अकरा चेंडूत अकरा धावा होतात की नाही असेही वाटत होते. पण काल उत्तम खेळ आणि उत्तम प्रयत्न करणा-यांच्या बाजून दैवही उतरले असे वाटले. आयर्लंडच्या फलंदाजीने सामना जिंकतांना क्रिकेट रसिकांना खूप आनंद दिला. आणि आम्हीही हा पूर्ण सामना याची देही याची डोळा पाहिल्याने खूश आहोत. अर्थात आयर्लंडने आपल्याकडून रविवारी दणदणीत मार खावा आहे यासाठी देवाकडे आत्तापासून प्रार्थना सुरु आहे. :)

-दिलीप बिरुटे

अवलिया's picture

3 Mar 2011 - 8:20 am | अवलिया

>>>>अर्थात आयर्लंडने आपल्याकडून रविवारी दणदणीत मार खावा आहे यासाठी देवाकडे आत्तापासून प्रार्थना सुरु आहे.

किंवा आयर्लंडकडून आपल्याला रविवारी दणदणीत मार खावा लागु नये यासाठी देवाकडे आत्तापासून प्रार्थना सुरु आहे असे ही म्हणता येईल ;)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 Mar 2011 - 8:26 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

:)

लावता का पैज ? आपण लै धुणार आहोत या आयर्लंडला.
टपाल खर्चासहित एक जाडजूड मराठी पुस्तक पाठवावं लागेल.
[टीप : संस्कृत पुस्तक पाठवू नका. पोथ्या बिथ्या तर नकोच नको]

-दिलीप बिरुटे

अवलिया's picture

3 Mar 2011 - 8:30 am | अवलिया

बाब्बो ! बेटिंग आणि ते ही मराठी पुस्तकांचे !! खल्लास !!

मराठी पुस्तकांचा खप वाढवायला चांगली नामी युक्ती आहे. :)

विनायक प्रभू's picture

3 Mar 2011 - 11:34 am | विनायक प्रभू

समालोचक डेवीड ला स्वतः ला आवरता आले नाही.
अंडर डॉग्ज ने सर्वांना अप युवर्स म्ह्टले असे बोलुन चुकला पट्ठा.
अगदी इंग्लंड चा असला तरी.
जल्लोषात फारशी लक्षात आली नाही ही कॉमेंट.

छोटा डॉन's picture

3 Mar 2011 - 12:50 pm | छोटा डॉन

हा हा हा ...
मास्तरांनी बरोबर 'पाईन्टाचा मुद्दा' काढला बॉ ;)

असो, हा विश्वचषक 'इंग्लंड' जिंकणार असे भाकित इथे वर्तवतो.
बाकी तुमचे आकडेवारी घाला बारा गडगड्याच्या हिरीत, इंग्लंडने नाय जिंकला तर दुसरा चान्स आहे पाकिस्तानला.

- ( मैदानाबाहेरचा तज्ज्ञ ) छोटा डॉन

वपाडाव's picture

3 Mar 2011 - 12:34 pm | वपाडाव

ओ'ब्रायन भौंचा विजय असो.
म्याच मध्ये ज्याम मजा आणली राव याने.
रोडीज पाहता पाह्ता सहज चैनल चेंज केले अन काय?
धुंआधार बळ्ळेबाजी.

त्यामुळेच धोनीच्या गोकआआ म्हणे.
-(चिंतित) वपाडाव
व्य. नि. करा हे सां. न. ल.

नगरीनिरंजन's picture

3 Mar 2011 - 12:51 pm | नगरीनिरंजन

गोकआआ चा अर्थ आम्हाला माहिती आहे त्यामुळे आम्ही व्यनि करणार नाही. उगाच वाट पाहू नये व जाहिरात करणे थांबवावे.
बादवे, तुमची वॉशिंग मशीण चोरीला गेली तर मग आता तुम्ही हाताने कपडे धुता का*? तुमची मशिण हल्ली कोणाकडे असते** ते कळाले की नाही?
ह. घ्या. हे. वे. सां. न. ल.

* आभारः कै.श्री. दादा कोंडके

**व्यंकूच्या शिकवणीतून साभार.

वपाडाव's picture

3 Mar 2011 - 12:38 pm | वपाडाव

प्र. का. टा. आ.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

3 Mar 2011 - 7:37 pm | निनाद मुक्काम प...

आमचे बहुतेक शिक्षक आयरीश.
व आमचे शिकण्याचे ठिकाण सुद्धा लिवरपूल आणी डब्लिन च्या मध्ये
त्यामुळे बोटीने मुंबई ते अलिबाग एवढ्या अंतरात डब्लिन ला जाणे व्हायचे .
हा काळ २००३ चा.
तेव्हा तेथे काही क्रिकेट क्लब्स होते .अगदी तुरळक .त्यांनी आमच्या शिक्षण संस्थेची संपर्क साधून क्रिकेट खेळायला मुले हवी .अशी विचारणा केली होती .
.( त्यांना ११ खेळाडू पूर्ण करायचे होते .)
आज त्यांचा विजय पाहून मनापासून आनंद झाला
.
बाकी ''संपूर्ण युके मध्ये दुखवटा'' हे जरा अतिशयोक्तीचे विधान वाटले .
आपल्या देशात हॉकीचे जे स्थान तेच ह्यांच्याकडे क्रिकेटचे आहे .
आपल्या देसी समूह मात्र क्रिकेट आवर्जून पाहतो .( मोण्ती पनीसार त्याच्या मधील खेळाडू जरी खेळत असला तरी ह्यांना भज्जी आवडतो .)
आपला सचिन तसा त्यांचा डेविड व त्यांची बायको पॉश
दर्दी इंग्लिश रसिकाला मात्र वेदना झाल्या असतील .

सुधीर काळे's picture

3 Mar 2011 - 9:49 pm | सुधीर काळे

एकतर्फी सामना होणार म्हणून मी माझ्या संगणकावर इतर कामात दंग झालो पण 'क्रिकइन्फो' कोपर्‍यात चालू होतं. आयर्लंडचा आकडा वर जाऊ लागल्यावर पुन्हा टीव्ही समोर जाऊन बसलो आणि एकदम धन्य धन्य वाटले. मूनी, कूसाक आणि जॉन्स्टन यांनीही छान खेळ केला व आयर्लंडचे स्वप्न पूर्ण झाले.