डोक्यात तिडीक आणणारे मिपाकर - भाग ४

अवलिया's picture
अवलिया in जनातलं, मनातलं
14 Feb 2011 - 6:51 pm

मागील भाग - http://misalpav.com/node/16729
***

लहानपणी आई, काकू, मावशी, आत्या ह्या महिला मंडळाच्या एकंदर सरंजामी वृत्तीमूळे, काही आणायचे असले की जा रे नाना हे आणुन दे, काही करायचे असले की जा रे नाना ते करुन दे असल्या हुकुमांचे पालन करता करता केव्हातरी महिला ह्या कुणी भयानक प्राणी आहेत हे माझ्या मनाने पक्के धरले होते. पण हळू हळू केव्हातरी वर्गात नेहमी ड्रेसमधे दिसणारी दोन वेण्या घातलेली दोन बेंच पलिकडे बसणारी मुलगी एका लांबलचक कापडात गुंडाळुन समोर आली की भलती चिकणी दिसते आणि मनाची घालमेल अचानक वाढते हे लक्षात आलं. पुढं मागं अशा अनेक भुलवणार्‍या बाहुल्या समोर येत गेल्या आणि एकंदर कापडात गुंडाळलेलं प्रकरण लै भारी असतं हे मनात ठाम बसलं. मात्र त्या कापडाला काही इतिहास असेल त्याची काही कहाणी असेल, त्याच्याबद्दल आपल्याला तसं काहीच माहित नाही ह्याची गुंडाळलेल्या कापडाची कहाणी ह्या लेखाला वाचेपर्यंत कल्पना नव्हती.

वाचा तर

प्राचीन भारताच्या बाकी भागात हे 'दुटांगीकरण' प्रकर्षाने दिसून येतेच. पण प्राचीन भारताचा विस्तार आत्ताच्या अफगाणिस्तानपर्यंत म्हणजे तेव्हाच्या गांधार देशापर्यंत मानला जातो. या गांधार देशात सुद्धा कपड्याचे 'दुटांगीकरण' अस्तित्वात असल्याचे भरपूर पुरावे मिळतात. हे 'दुटांगीकरण' बहुतांशी धोतर नेसल्यासारखे, एक पदर मागे कासोटा म्हणून नेणे आणि दुसर्‍या पदराचा पुढे पंखा करणे किंवा खरंच पदर म्हणून वापरणे असं दिसतं. किंवा धोतरासारखे दुटांगीकरण आणि दुसरे वेगळे वस्त्र वरचे शरीर झाकायला असं दिसून येतं. स्त्रिया व पुरूष दोघांच्याही अंगावर याच प्रकारचे 'दुटांगीकरण' दिसून येते.

गुप्त काळात मात्र (early 4th cent to mid 8th cent AD) आपल्याला आपल्या ओळखीची दुटांगी साडी दिसून येते. हिचे दुटांगीकरण हे धोतरापेक्षा वेगळे आहे आणि तेच कापड सलगपणे पदरापर्यंत गेलेले आहे. तेही अजंठाच्या लेण्यात म्हणजे आपल्याच महाराष्ट्रात. आता ही साडी खरोखरच नऊवारी होती की नाही ते मात्र सांगणं कठीण आहे. पण त्या गूढ, अवघड आणि खानदानी प्रकाराचा पहिला बिंदू हा धरायला हरकत नाही.

ही पद्धत नक्की कशी आहे याचं गूढ अनेकांना असेलच त्यांच्यासाठी अगदी थोडक्यात म्हणजे आपल्या नेहमीच्या साडीसारखीच सुरूवात करायची. पण साडीची लांबी मोठी असल्याने ज्या भरपूर निर्‍या येतात त्यांचा मध्य काढून तो दोन पायांच्या मधून मागे नेऊन कमरेपाशी खोचायचा. झाली बेसिक पद्धत. कमरेशी खोचताना निर्‍यांची दिशा मात्र आपल्या नेहमीच्या साडीपेक्षा उलटी ठेवायची, पदराची एक कड उजव्या खांद्याच्याखालून तर दुसरी कड गुढघ्याच्या खालून डाव्या खांद्याकडे यायला हवी, पदर खूप मोठा काढायचा नाही, पदर मागे एका रेषेत असता कामा नये तर तो दोन खांद्यावर/ डोक्यावर घेतल्यावर मागे एक समान पातळीवर यायला हवा अशी काही महत्वाची पथ्य पाळायला शिकलं की बास.

अधि़क माहिती - http://misalpav.com/node/11055
***

अनेक अनुभवांना आयुष्य सामोरं जात असतं. कधी हे सामोरं जाणं ठरवून होतं तर कधी लादलं जातं. ठरवणे आणि लादले जाणे यातला फरक तसा अगदी नगण्य. बहुधा आपल्या मानण्यावरच असावा. आपण आपलं मनाचं समाधान करुन घेतो, गेलेल्या अनेक आठवणींना मनाच्या खोल कप्प्यात दामटुन बसवतो आणि वरकरणी हसरा मुखवटा घेत परत लादलेलं आयुष्य ठरवलेलंच आहे असे समजत विसरण्याचा प्रयत्न करतो. हे विसरणं इतकं सहज असतं का? म्हटलं तर हो म्हटलं तर नाही. परत तोच मुद्दा पुन्हा समोर येतोच - हे सगळं मानण्यावर असतं. असंच काहीसं वाटतं http://misalpav.com/node/4594 ही कविता वाचतांना.

***

मंडळी वरती जे दोन परिच्छेद दिले आहेत ते सदर लेखिकेची क्षमता दाखवुन देण्यास पुरेसे असले तरी ती केवळ एवढेच लिहु शकते असे नाही. तिचे अधिक लेखन http://misalpav.com/newtracker/2105 इथे वाचता येईल.

बरोबर आहे मंडळी, ही लेखिका आहे नीधप उर्फ नीरजा !

चित्रपट सृष्टीशी संबंध असणारी नीधप ललित लेखिका आहेच त्याचबरोबर अतिशय चांगल्या कवितांचा नजराणा तिने आजपर्यंत रसिकांना दिला आहे. मनापासून केलेले लेखन, कथेतील पात्रांशी तादात्म्य पावतच जणू काही त्यांच्या भावना कागदावर उतरवण्याचे सामर्थ्य आणि समाजमनाची विलक्षण जाण या सर्व बाबींमुळे नीधपचे लेखन असो की कविता, रसिकांसाठी ती मेजवानीच असते. त्यावर तिने काढलेली छायाचित्रे तर क्या कहने !

मात्र नीधप आमची या आठवड्याची "डोक्यात तिडीक आणणारा मिपाकर" आहे. कारण सरळ आहे हल्ली ती लेख लिहित नाही. हरकत नाही. आम्ही तिला मोगर्‍यांच्या कळ्या भेट देत आहोत. त्याच बरोबर पुष्पगुच्छ आणि पैठणी देत आहोत. त्याचा तिने स्विकार करावा आणि लवकरात लवकर एखादा मस्त लेख लिहावा की तो वाचून रसिक जन उद्गारतील " वा ! मोगरा फुलला !" बाकी ती ठरवेल ते मान्य. कसे?

पुष्पगुच्छ

पैठणी

मोगर्‍यांच्या कळ्या

दुकानांचे पत्ते

पुष्पगुच्छ - http://www.sendflowerindia.com/Images/bouquet_07.jpg
पैठणी - http://agjbusiness.com/images/paithani.jpg
मोगर्‍यांच्या कळ्या - http://farm2.static.flickr.com/1426/1170785933_17e9c4bf75.jpg

क्रमशः

(पुढील मिपाकर पूढल्या आठवड्यात - ज्यांना सत्कार नको असेल त्यांनी खरड व्यनीतुन सुचना देणे म्हणजे यादीतुन नाव कटाप करता येईल. यादी लै मोठी आहे)

औषधोपचारशुभेच्छा

प्रतिक्रिया

नीधप ने पटकन एखादा लेख लिहावा ही विनंती.
अवांतर: नाना, जरा वेगवेगळ्या साड्या देत जावा ना!
गजर्‍याचा फोटू तोच चालेल.

रेवती's picture

14 Feb 2011 - 6:59 pm | रेवती

धन्यवाद!
छान फोटू.

पैठणी म्हणून कांथा वर्क दिली होतीत तीच बरी होती. माझी व्हायचीये तशी साडी अजून. पैठणी आहे माझ्याकडे. :)

लेख लिहिण्याबद्दल... मिपा लिहित्याला स्वतःचं लिखाण स्वतःच एडिटही करू देत नाही तोवर इथे कायपण नवीन लिहायचं नाही असं ठरवलंय बुवा.

बाकी आठवण काढल्याबद्दल आभार!

ह्यो काय नीधप ताय.. तुझा प्रण तू सोड ना..

- वाचनोइच्छुक पिंगू

सन्जोप राव's picture

15 Feb 2011 - 7:11 am | सन्जोप राव

आता घाटपांडेंच्या प्रतिसादाची प्रतिक्षा आहे....

गुंडोपंत's picture

15 Feb 2011 - 8:00 am | गुंडोपंत

आवडला.

नीरजा लिहायला काही हरकत नसावी.
अगदी पुनर्संपादनाची गरज पडली तर संपादक आहेत ना?

खरे तर येथे,

  • मराठी चित्रपट आणि त्यामागे चालणारी पडद्याआडची घडामोड याविषयावर यायला हवे आहे.
  • श्वाससारख्या उच्च चित्रपटाच्या निर्मिती मध्येही पैशांसाठी झालेली अडचण
  • एकुणच मराठी चित्रपट व त्यातले आर्थिक विश्व
  • चित्रपटांच्या आंतरजालीय चोर्‍या आणि त्याचे या क्षेत्रावर होणारे भयानक परिणाम
  • चोर्‍या थांबवण्यासाठी हॉलिवुडच्या निर्मात्यांची तगडी तटबंदी

असे अनेक विषय तुझ्याकडून वाचायचे आहेत आम्हाला.

शिवाय चित्रपटाविषयी 'वेशभुषाकार या नजरेतूनपण' आम्हाला काही कळू देत?
उत्सव सारख्या चित्रपटांविषयी, मालगुडी डेज या विषयी काही यायला हवे. झालेच तर अ लव्हस्टोरी १९४२ अशा वेशभुषा (फसलेल्या?) चित्रपटां बद्दलपण यावे.

लिखाणाची वाट पाहतो आहोतच!

>>नीरजा लिहायला काही हरकत नसावी.<<
हरकत कुणाचीच नाही. मी लिखाण बंद केलं नाहीये. मिपावर टाकणं बंद केलंय इतकंच. माझा ब्लॉग आणि मायबोली आहेच आणि इतरही काही माध्यमं आहेतच.

>>>अगदी पुनर्संपादनाची गरज पडली तर संपादक आहेत ना?<<
मला तसे अनोळखीच असलेले ५-६ (नक्की संख्या माहित नाही) लोक माझं लिखाण बदलू शकतात आणि मला मात्र माझ्याच लिखाणात बदल करण्यासाठी या लोकांकडे विनंत्या करायला लागतात हे मला तरी अजिबात पटत नाही.

असो.

टारझन's picture

15 Feb 2011 - 12:32 pm | टारझन

स्वसंपादनाची सोय द्यावी :) जे लोकं स्वसंपादन कॅण्सल करा म्हणुन आग्रही होते .. ते मात्र इकडे लिखाण करताना कधीच दिसत नाहीत , ह्याउलट स्वसंपादन नसल्याने बरेच लोकं लिहीणे बंद झाल्या .. णिरजा त्यांपैकी एक .
:)

+ २
स्वसंपादनाची सोय असणे ही लेखकांची मागणी रास्त आहे .
>>जे लोकं स्वसंपादन कॅण्सल करा म्हणुन आग्रही होते .. ते मात्र इकडे लिखाण करताना कधीच दिसत नाहीत ,
हो बरोबर आहे.. खूप क्वचितच त्यांचे लिखाण मिपावर येत असावे.

>>स्वसंपादनाची सोय असणे ही लेखकांची मागणी रास्त आहे .

कसं काय ?
हे म्हणजे पेपरात स्तंभलेखन करणार्‍या लेखिकेने पेपर घरोघरी वाटला गेला तरी 'मला लिखाणाचं संपादन करता आले पाहिजे' म्हटल्यासारखं आहे.

माझ्यासारख्या अतिसामान्य वकुबाच्या "लेखकाला" लिखाण प्रकाशित करण्यापूर्वी वाचायची सोय असणं पुरेसं वाटतं ! एकदा वाचायला दिलं लोकांना की कशाला पाहिजे संपादन ?

नॉट कन्व्हिन्स्ड यट !

>>>हे म्हणजे पेपरात स्तंभलेखन करणार्‍या लेखिकेने पेपर घरोघरी वाटला गेला तरी 'मला लिखाणाचं संपादन करता आले पाहिजे' म्हटल्यासारखं आहे.<<<
तुलना चुकीची आहे.
१. वृत्तपत्राच्या प्रकाशनसंस्थेचा लेखावर मालकी हक्क असतो. त्याबदल्यात लेखकाला वृत्तपत्र मोबदला देते.
२. वृत्तपत्राच्या संपादकाकडे लेख सुपूर्द केल्यावरही तो प्रसिद्ध व्हायच्या आधी गरज पडल्यास लेखक आपणहून त्या लेखावर संस्कार करतो, गरज पडल्यास संपादक तसे सुचवतो.
३. हे सगळे करण्यासाठी संपादकाचा वृत्तपत्रीय अनुभव, विषयातील पात्रता असावी लागते.

या तिनही पातळ्यांवर ही तुलना संपूर्णपणे चुकीची आहे.

>>>एकदा वाचायला दिलं लोकांना की कशाला पाहिजे संपादन ?<<<
हे ज्या त्या लेखकाने ठरवायचं इतरांनी नाही. लेखनावर पहिला हक्क लेखकाचाच असतो. मिपावर लिखाण टाकले तरीही तो हक्क लेखकाचाच असतो. लेखकाला अमुक हक्क कशाला पाहिजे म्हणायचा अधिकार कुणालाच नाही.

बाकी तुम्ही कन्व्हिन्स्ड असण्याचं तुमच्यापाशी. मी मला पटतं तेच करते.

गवि's picture

15 Feb 2011 - 1:16 pm | गवि

यावर उपाय म्हणून इमेजच्या रुपात लेख पब्लिश करा इथे.

इमेज तर तुमच्या ब्लॉग / वेबसाईटवरच राहील ना? पूर्ण एडिटेबल.

:)

पण .हम्म..आय नो..तुम्हाला रीतसर एडिटेबल ऑप्शन हवाय्..चांगली आहे मागणी.

इन्द्र्राज पवार's picture

15 Feb 2011 - 6:50 pm | इन्द्र्राज पवार

"...माझा ब्लॉग आणि मायबोली आहेच आणि इतरही काही माध्यमं आहेतच. ..."

~ नीरजा यांच्या ब्लॉगवरील लेख मी ज्या ज्या वेळी वाचले आहेत त्या त्या वेळी हे प्रकर्षाने वाटले गेले/आजही वाटते...की त्या लेखातील विचारांवर, मतावर, विविधतेवर (विशेषतः इथेच श्री.गुंडोपंत यानी आपल्या प्रतिसादात दिलेल्या उदाहरणावर.....त्यानी उल्लेखिलेल्या विषयांवर नीरजा अधिकारी व्यक्ती आहेत, हे इथे कित्येकाना माहीत आहे) सदस्यांत विस्तृत चर्चा झाली तर खुद्द नीरजा यानाही आनंदच होईल....तसेच त्यांचे लिखाण केवळ त्यांच्या ब्लॉगना भेट देणार्‍यांपुरतेच मर्यादित न राहता चर्चेतील प्रतिसादांमुळे इतरांना [नव्याने इथे सदस्यत्व घेत असलेल्या मंडळींनाही...] त्या विषयांचे काही प्रमाणात ज्ञान होईल.

~ अर्थात, इथला सहभाग थांबविण्याचे तसेच त्यांच्या नाराजीचे जे कारण आहे, त्याविषयी संपादक मंडळांकडेच उत्तर असेल. तरीही त्यांची गैरहजेरी जाणवते यात दुमत नाहीच.

इन्द्रा

स्वाती दिनेश's picture

15 Feb 2011 - 12:22 pm | स्वाती दिनेश

नीरजाने लिहावे असे वाटतेच, पण तिचा मुद्दाही एकीकडे पटतो.. यातून सुवर्णमध्य नाही का काढता येणार?
जसे मनोगतावर पहिला प्रतिसाद यायच्या आधीपर्यंत आपण संपादन करु शकतो, तेवढा अवधी पुरेसा वाटतो.
तसे काही नाही का करता येणार?
नीरजा, गुंडोपंतांनी सुचवलेल्या विषयांपैकी एखादा लवकरात लवकर वाचायला मिळावा अशी अपेक्षा,
स्वाती

निरजा या मिपावरील माझ्या आवडत्या लेखक्-लेखिकांपैकी एक आहेत. धन्यवाद.
मात्र त्या काही कारणामुळे येथे लिहित नाहि हे आजच कळाले.

@ निरजा ..
ठिक आहे .. तुमची मागणी मान्य होण्याची वाट पाहतो आहे.

परंतु , सेहवागने स्टेडियम छोठे आहे म्हणुन मी बॅटींग करणार नाही (मी मोठ्या स्टेडियम वर सिक्स मारतो येथे माझ्या सिक्स चे महत्व कमी होउ देणार नाही) असे झाले हे..
का स्टेडियम मधील प्रेक्षकांना वाट पहायला लावताय ...

- गणेशा

नीधप's picture

15 Feb 2011 - 7:54 pm | नीधप

तुलना म्हणून नाही पण मायबोलीही द्रुपलच वापरते. तिथे स्वसंपादनाची सोय आहे आणि डिलिट करण्याची नाही. याचा अर्थ द्रुपलमधे तांत्रिकदृष्ट्या हे शक्य आहे.
तसेच स्वसंपादनाची सुविधा प्रतिसादांना नसणे हे समजू शकते पण स्वतःच्या लिखाणासाठीही नाही हे माझ्यासाठी अनाकलनीय आहे.
अर्थात मिपा म्हणले तरी शेवटी खाजगी मालकीची साइट आहे आणि ज्याच्या खिशातून मिपा चालवले जाते त्याचा निर्णय सभासदांनी मान्य करायला हवा ह्याची मला कल्पना आहे.
तेव्हा मला त्यांचा कुठला निर्णय पटला नाही तर मी विनंती करणे, निर्णय कसा अयोग्य आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न करणे आणि मग पुढे जाऊन मिपावरील सहभाग मर्यादित करणे हे एवढेच मी करू शकते. ते मी करतेय.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

15 Feb 2011 - 11:41 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

तुझं लिखाण आवडीने वाचणारे इथेही आहेत याची ही पावती समज.

ड्रुपॉल ६ ची गडबड लवकरच दुरूस्त होऊन नीचे फक्त प्रतिसादच नव्हेत धागेही पुन्हा बोर्डावर दिसोत ही अपेक्षा.

आत्मशून्य's picture

15 Feb 2011 - 8:02 pm | आत्मशून्य

मी मिपा वरती नवखा आहे पण तूमचा ब्लॉग अधून मधून वाचला जायचा. माहीत न्हवते आपण इथे सूध्दा कार्यरत आहात. -पू.ले.प्र.

बिपिन कार्यकर्ते's picture

16 Feb 2011 - 8:29 pm | बिपिन कार्यकर्ते

'नी' चे लेखन आवडतेच. इथे नाही तर नाही, पण लिहित रहा.