आठवणीतील क्रिकेट सामने...! भाग १

विकाल's picture
विकाल in क्रिडा जगत
11 Feb 2011 - 12:57 pm

विश्वचषक ९६: भारत वि. पाकिस्तान

उन्माद. या एकाच शब्दाने या सामन्याचं वर्णन होऊ शकतं.भारतीय संघाकडून असलेल्या अपेक्षा. सचिनचा बहर्लेला खेळ. संघाचे साधलेले संतुलन. अन विजयाची करोडो भारतीयांनी केलेली वाजवी मागणी.
ईतिहास पण भारताच्या बाजूने. विश्वचषकात पाक विरूध्द रा़ख्लेले अपराजित्व...! हे सर्व भारताचे पारडे जड करणारे घटक होते. पण पाक संघपण काही कच्चा लिंबू नव्हता. अक्रम, युनुस ही जोड्गोळी, साथीला अकिब जावेद..! फलंदाजी पण मजबूत... अन्वर, सोहल, एजाज, ईंजमाम अन याही पेक्षा बलशाली घट्क म्ह्णजे जावेद मिंयादाद्चा संघात असणारा समावेश.

एकूणच ही एका अटीतटीच्या सामन्याची नांदी होती.

सामना होता उप उपांत्य फेरीचा. आधीच्या उप उपांत्य सामन्यात विंडीज संघानं बलाढ्य अशा दक्षिण अफ्रिकेचा पराभव केला होता. त्यामुळे या सामन्याकडं लक्ष असणं स्वाभाविक होतं.

दिन शनिवार.. मार्च ९, १९९६...! चिन्नास्वामी स्टेडियम, बंगलोर (द देन)

भारताचा कर्णधार अझर तर पाक चा अक्रम...! पण नाणेफेकीला उतरला तो आमिर सोहेल. अतिशय उर्मट. दु़खापती मुळ त्यानं माघार घेतली होती. त्यावर अतिशय वादंग माजलं. अझर हा सुदैवी कर्णधार होता. कायम उत्तम अशा खेळाडूंचं त्याला कुशन लाभलं. आणि या सामन्यात त्याने नाणेफे़क जिंकून फलंदाजी घेतली.{त्याने उपान्त्य सामन्यात मात्र गोलंदाजी का घेतली हे न सुट्लेले कोडे आहे.}

पाक संघात आता अता-उर-रेहमान चा समावेश झाला होता.{हा ही पुढे फिक्सिंगच्या जाळ्यात अडकला..! तो वेगळा विषय पण अधोरेखित केला योगायोग म्हणुन जाता जाता...!} भारताच्या डावाची सुरुवात सिध्दु न सचिन...! युनिस अन अकिब चा मारा नेटानं खेळून काढला या दोघांनी...!
पण पकड अशी मात्र डावावर आली नव्हती.. अन २२ व्या षटकात सचिनचा बळी गेला..! ३१ धावा. त्रि. अता उर..! भारत १ बाद ९०. सिध्दु रंगात आला होता..! मांजरेकर, अझर, कांबळी यांनी उपयुक्त योगदाने दिली पण अजून घट्ट पकड आली नव्हती..पारडं समसमानं अस होतं. या दरम्यान सिध्दु ९३ धावांची खेळी खेळुन मुश्ताक अहमद च्या फ्लिपर वर बोल्ड होउन परतला होता.
भारत ६ बाद २३६... अपूरी वाट्णारी अशी धावसंख्या... आणि आलं एक वादळं....! दिवस रात्र या सामन्यात ही वेळ महत्वाची होती...! अंधुक होणारा सूर्य प्रकाश आणि हळू हळू प्रखर होणारे दिवे... आग ओकणारा युनुस अन अपेक्षांच्ग ओझं... अन झाला तो चमत्कार... अजयने वकार ची पार लक्तर लोळ्वली...! ६ चेंडूत २२ धावा कूटल्या...! अन ५० षटका अखेर भारत ८ बाद २८९...!!!! पाक हतबल...!! अन दुसरा मानसिक विजय झाला तो ईथे... पाहा एक झलक.

पण सहजा सहजी हार मानतील ते पाक खेळाडू कसले....अन्वर अन सोहेल नी आक्रमण उघड्ले... श्रीनाथ, प्रसाद तर मार खाऊन वैतागले...असाच अन्वरने कोललेला चेंडू कुंबळेनं अलगद झेलला... पाक १ बाद ६७.

उर्मट सोहेल छळू लागला...! पाकचा वरचष्मा वाढत होता... पन या उर्मट पणानेच सामना भारताकडे वळला....!

चौकारांची बरसात केल्यावर सोहेल्नं प्रसाद ला पून्हा एकदा भिरकव्ण्याची भाषा केली... अन घड्ल ते मात्र विलक्षण होतं.... एका स्लोअर वन वर सोहेलची उजवी दांडी गुल झाली होती... तोंडापेक्षा कर्मानं उत्तर देण्याची परंपरा अधोरेखित झाली होती.....८३ नंतर भारतीय क्रिकेट मध्ये घड्लेला एक गौरव क्षण होता.... कसा तो पहा ईथे...

तिसरा मानसिक विजय... अन ईथून जो विजय रथ स्वार झाला तो पाकचा डाव २४८ वर ध्वस्त करून थांबला....! या विजयात प्रसाद अन कुंबळेच्या तीन तीन बळीं ईतके साह्य मिंयादाद ला धावबाद करण्याचे लाभले...!

अत्युच्य खेळाची परीसीमा पाहणार्या या सामन्यात भारत जिंकला हे तर भाग्यच...!

एका गौरवशाली विजयाची नोंद झाली....अन आत्मविश्वासाने ओतप्रोत भारत आता उपांत्य फेरीत पोचला होता....!!!!!!!!!!!!!

आभारः तू नळी न क्रिकईन्फो...!

क्रिकेट

प्रतिक्रिया

विकालराव तो सामना आजही डोळ्यांपुढे आहे.
पुर्वी पाकिस्तान समोर नहमी खचलेला दिसणारा भारतीय संघ विश्वचषकांच्या सामन्यात जेव्हा जेव्हा पाकिस्तान समोर ठाकलाय तेव्हा तेव्हा आत्मविश्वासानं एका वेगळ्याच जिद्धीन त्यांना तोंड दिलय.

तुम्ही दिलेले दुवे दिसत नाहीत. (की मलाच एकट्याला दिसत नाहीत काही कल्पना नाही.)

परिकथेतील राजकुमार's picture

11 Feb 2011 - 2:04 pm | परिकथेतील राजकुमार

विकाल सुंदर वर्णन केले आहेत सामन्याचे.

तुम्ही वर्णीलेल्या प्रसंगात माझ्यामते अमिर सोहेल प्रसादला ' जा लाईनवर बॉल घेउन ये, तुझी जागा तीच आहे' असे काहीसे म्हणाला होता.

ते इथे पाहता येईल :-

हा सामना मियांदादच्या कारकिर्दीतल्या त्याचा शेवटचा एकदिवसीय सामना. पराभवाने कारकिर्दीची सांगता झाल्याची भावना अजुनही तो बर्‍याचदा बोलुन दाखवतो.

ह्या सामन्याची अजुन काही क्षणचीत्रे येथे पाहता येतील :-

http://www.youtube.com/watch?v=o3T5zzuCDsY

अवांतर :-

अझर हा सुदैवी कर्णधार होता. कायम उत्तम अशा खेळाडूंचं त्याला कुशन लाभलं.

ह्याच्याशी बिलकुल समहत नाही. एकवेळ द्रविड आणि धोनी ह्यांना ह्याबाबतीत सुदैवी म्हणता येईल.

मेघवेडा's picture

11 Feb 2011 - 2:19 pm | मेघवेडा

अझर हा सुदैवी कर्णधार होता. कायम उत्तम अशा खेळाडूंचं त्याला कुशन लाभलं.

ह्याच्याशी बिलकुल समहत नाही. एकवेळ द्रविड आणि धोनी ह्यांना ह्याबाबतीत सुदैवी म्हणता येईल.

खरंय.. खरंतर तेव्हा 'तुका म्हणे त्यातल्या त्यात' म्हणत आपणच अल्पसंतुष्ट राहत होतो कदाचित! :)

छान वर्णन विकाल. बाकी यंदा भारत-पाक सामना होत नाही असा अंदाज आहे. अर्थात झाला तर उत्तमच!