नविन जमान्यातले शब्दप्रयोग बनवू या.

अरुण मनोहर's picture
अरुण मनोहर in काथ्याकूट
3 Jan 2011 - 8:17 am
गाभा: 

(हिन्दी चित्रपटाला धन्यवाद,) भाई लोकांची भाषा कशी थोड्या अवधीतच घराघरात पसरली!

देवा पुढे ठेवण्याची सुपारी कोणाला यमाकडे पाठवण्याचे साधन झाली.
पेटी म्हणजे एक लाख ... अब्बब केवढे पैसे असा वासलेला आ बंद होत नाहीये, तेवढ्यात खोका म्हणजे एक कोटी ही छप्परफाड रकम मागितल्या जाऊ लागली. सफेद कपडेवाले नविन युगातले राजा महाराजा ह्या भाई लोकांच्या कितीतरी पुढे गेले. पहाता पहाता कोटी म्हणजे चिल्लर खुर्दा वाटायला लागला. कुठलीही बातमी घ्या आधी किती शे कोटी असायचे, आता हजार कोटींच्या घरात जर गैरव्यवहार नसेल, तर ह्या लोकांच्या इज्जतका फालुदा होत असावा असे वाटते.

आणि ताज्या घटनेनुसार, सगळे रेकॉर्ड तोडून लाख कोटींच्या रकमेत गैरव्यवहार मोजावे लागतात. भारताची ही अप्रतिम प्रगती पाहून, भाई लोकांची रकम गणना भाषा अपुरी पडत असावी. आता इतके खोके वगैरे बोलणे म्हणजे पोत्यामधे किती दाणे आहेत ते सांगण्यासारखे वाटते.

नविन गणना कदाचित अशी असेल-
एक पेटी- एक लाख. (कच्च्या बच्च्यांना शिकवण्यासाठी वापरणे)
एक खोका- घोटाळा कंपूमधे प्रवेश करण्यासाठी आवश्यक कमाई
एक कंन्टेनर एक हजार कोटी. तुझा घोटाळा ह्या आकाराचा नसेल तर नालायक माणसा, थुत तुझ्या जिनगानीवर!
एक वेअरहाउस- एक लाख कोटी. महाराजा क्लब मधे एन्ट्री.

मला वाटते, सध्या येवढे पुरे.

नविन युगासाठी आणखी काही वाक्प्रचार आहेत का?

प्रतिक्रिया

पण मिपाकरांनी अनेक नवनवे शब्द मराठीला बहाल केले आहेतच.

घाशीराम कोतवाल १.२'s picture

3 Jan 2011 - 9:01 am | घाशीराम कोतवाल १.२

भाई लोकांची डिक्शनरी

१०० ची नोट = एक कान
५०० ची नोट = अर्धा गांधी
१००० ची नोट = पुरा गांधी

एक लाख = एक पेटी
दहा लाख = एक ड्रम
एक कोटी = एक खोका

एके ४७ = गिटार
रिव्हाल्वर , पिस्तुल = घोडा
हॅन्ड्ग्रेणेड = आलु
आर डी एक्स RDX = काला साबुन

एका ईंग्रजी वृत्तपत्रात वाचलेले शब्द आहेत हे नाही तर लोकांचा गैरसमज व्हायचा हा घाष्या टपोरीभाई झाला कि काय म्हणुन ...

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

3 Jan 2011 - 11:08 am | निनाद मुक्काम प...

अंडर वल्ड ने माय मराठीस बहाल केलेले काही शब्द (डोंबिवलीतून मुंबईत आलो तेव्हा आमच्या कॉलेज काट्यावर समाजातील अनेक विभूती हजेरी नोंदवायच्या त्यांच्याकडून माझ्या शब्दकोशात हि मोलाची भर )
ढगात पाठवेन (खलास करेन )
कोपचात खर्चापानी ( बुकलून काढणे )
पोटला करणे (मारून मृत देहाची वासलात लावणे .) भरत नेपालीचा छोटा राजनच्या गुंडांनी पोटला केला .असे त्याच्या दोन साथीदारांच्या दूरध्वनी वार्तालापात पोलिसांना कळले .५ दिवसापुर्वीची बातमी आहे व नुकतेच छोटा राजन ने ह्यास दूरध्वनीवरून दुरोजा दिला आहे .)
मांडवली करणे (मध्यस्थी करणे )
तोडपानी करणे ( पैशाची सेटल मेंट करणे )
नंबर कारी (हा वकिली शब्द आहे मुख्य आरोपीचे सहाय्यक )
फिल्डिंग लावणे (सावजासाठी दबा धरून बसणे)
घन करणे (राडा घालणे म्हणजेच लफडे करणे )
चोच्या (गोटी)
फंतर (भाई लोकांचा कनिष्ठ सहाय्यक जो छोटे मोठे गेम वाजवणे /एखाद्याला हूल देणे /वसुली करणे / भाईच्या वान्तेड पिरीयड त्याच्या निवार्याची सोय करणे आदी अनेक कार्य करणारा सेवक )