शरद पवारांच्या आवाहनात तथ्य किती?

देवदत्त's picture
देवदत्त in काथ्याकूट
20 Apr 2008 - 1:43 pm
गाभा: 

मला राजकारणातील जास्त कळत नाही. पण एक सामान्य नागरिक म्हणून जे काही माहीत आहे त्यावरून पुढील विवेचन..

शेतकर्‍यांना भाव मिळत असताना महागाईचा बाऊ नको असे शरद पवार म्हणाले. (पहा बातमी)

स्वत:ला काही करणे जमले नाही किंवा काही करायचे नसले तर अशी विधाने बाहेर निघतात का?

त्यांच्या म्हणण्याप्रमाणे शेतकर्‍याला खरच भाव मिळत असल्याचे त्यांना दिसत आहे का? मला नाही तसे वाटत. शेतकर्‍यांना कमी भाव मिळतो. तो माल बाहेर ग्राहकापर्यंत येता येता त्याचा भाव खूप वाढतो असेच दिसते. शेतकर्‍यांना भाव मिळत असल्याने महागाई वाढत असल्यास, इतके वर्षे महागाई वाढत असल्याचे दिसत आहे त्यात मग शेतकरी हलाखीचे जीवन का जगत आहेत?
हो, अवेळी पावसाने शेतीत नुकसान झाले त्यामुळे अन्यधान्याची कमी हे एक कारण आहेच. पण महागाई वाढण्यास इतर कारणे नाहीत का? सरकारी खात्याने ज्या धाडी टाकल्या त्यात साठेखोरांनी करोडो रुपयांचे धान्य साठवून ठेवण्यात आल्याचे दिसले त्याबाबत त्यांचे काहीच म्हणणे नाही का?

दोन वर्षांपुर्वी MRP अर्थात सामानाच्या अधिकतम मूल्याचे नियम धाब्यावर बसवून जे अवाजवी मूल्य आकारण्यात येत होते त्याबाबत श्री शरद पवार ह्यांच्याकडे विचारणा केली गेली त्यांनी त्याबाबत कारर्वाई करण्यात येईल असे सांगितले होते. थोड्याच दिवसांत ह्याबाबत काहीच केले गेले नसल्याने त्यांना विचारले असता त्यांनी "असे काही झाले असल्याची मला माहीती नाही" असे सांगितले (संदर्भ: मी आवाज वाहिनीवर त्यांच्या दोन्ही प्रतिक्रिया बघितल्या होत्या.)

आता त्यांनी हे वाक्य म्हणणे म्हणजे त्याचीच पुनरावृत्ती होणार असेच दिसते. म्हणजे आधी काही तरी एक सांगणे. नंतर असे काही घडलेच नाही असे सांगणे.

लोकांच्या भूकेचा प्रश्न सोडविणारा भूकेकंगाल होता कामा नये ह्यासाठी जर महागाई वाढत असेल तर माझे महागाई विरोधात काही म्हणणे नाही. शेतकरीच काय पण कोणीही भुकेने त्रासला जाऊ नये असे मलाही वाटते. परंतु मग राज्यकर्त्यांनी ह्याबाबत खरोखरच काय घडत आहे त्याचे लोकांसमोर नीट निवेदन करावे.

खरोखर काय कारणे आहेत ते कळावे असे मलाही वाटते.

प्रतिक्रिया

हेरंब's picture

20 Apr 2008 - 5:32 pm | हेरंब

शेतकर्‍यांना चांगला भाव मिळत नाही हे खरेच आहे. व त्याचे मूळ कारण आहे मधले दलाल. आपल्या देशांत या दलालांनी धुमाकुळ घातला आहे. परिणामी सर्वच क्षेत्रांत शेतकरी, मजुर, कलाकार वगैरे यांना खरा मोबदला मिळतच नाही आणि हे दलालच गब्बर होतात. राजकारण्यांचीही या दलालांनाच साथ आहे. किंबहुना त्यांचेच पित्ते या दलालीत सामील आहेत.
या देशांतल्या गरीब, भोळ्याभाबड्या जनतेला राजरोस लुबाडले जात आहे. पण त्यांना रोजच्या असंख्य कटकटींमध्ये अशा तर्‍हेने गूंतवून ठेवले आहे की एकजूट करुन, या सर्वच सत्तेच्या दलालांना फेकून देणे त्यांच्या आवाक्याबाहेर ठरले आहे. हे सर्व या निलाजर्‍या राजकारण्यांना चांगलेच माहित आहे म्हणूनच भरल्या पोटी ते असे बोलू शकतात. (यांत तथाकथित साम्यवादीही मोडतात.)

देवदत्त's picture

28 Apr 2008 - 10:55 pm | देवदत्त

पण त्यांना रोजच्या असंख्य कटकटींमध्ये अशा तर्‍हेने गूंतवून ठेवले आहे की एकजूट करुन, या सर्वच सत्तेच्या दलालांना फेकून देणे त्यांच्या आवाक्याबाहेर ठरले आहे.
सहमत.
आणखी गेल्या आठवड्यात जे काही आणखी राजकारण झाले त्यावरून तर हेच दिसते की त्यांना पाऊल उचलायचे नाही. फक्त चांगले होत असेल तिकडे कॉलर वर करून उभे राहणे. बाकी महत्वाच्या मु्द्यांकडे दुर्लक्ष करून इतर जमेल त्या विषयावर लोकसभेत्/विधानसभेत गोंधळ घालणे हेच दिसते.

देवदत्त's picture

4 Oct 2009 - 10:10 am | देवदत्त

पवार साहेब स्वतः केलेली वक्तव्ये पडताळून पाहत नाहीत असे पुन्हा एकदा दिसतेय.

"वाटेल ती किंमत मोजून महागाई आटोक्यात आणू"
आत्ताच लोकसत्तावर वाचल्याप्रमाणे, शरद पवारांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर असे वक्तव्य केले.
आता जर ते असे म्हणत आहेत, तर गेल्या वर्षी त्यांनी विधान केले होते की "शेतकर्‍यांना भाव मिळत असताना महागाईचा बाऊ नको ", त्या नंतर दीड वर्षात त्यांनी काय केले होते ह्याबाबत माहिती कुठे मिळेल?

पाऊस तर दर वर्षीच कमी जास्त पडत असतो. मग त्याबाबत एक ठराविक लक्ष्य ठेवून काहीच का केले जात नाही?

निवडणूकीच्या आधी सांगणे की आम्ही काय वाट्टेल ते करू आणि निवडणूका संपल्यावर वेगळी कारणे देणे हेच चालत राहील काय?

टारझन's picture

4 Oct 2009 - 12:41 pm | टारझन

सगळेच साले फोकलीचे एकजात ...
राज ठाकरे कडून काहीतरी अपेक्षा होत्या ... पण त्याने पण मुंबै मधे दोन टिकीटं उत्तर भारतीयांना दिली !! छ्या !! पवारसाहेबांबद्दल काय बोलावं ? क्रिकेट खेळत बसतात ... साखरकारखाण्यांपासून कापसापर्यंत .. सगळीकडे त्यांची भागिदारी ! यातंच सगळं काही आलं !!
सगळे एकसारखेच्च्च !!

परवाच डिस्कव्हरी चॅनलवर "वाईल्ड डिस्कव्हरी" नामक कार्यक्रम पहात होतो. त्यात दाखवलं , एक सिंहांचा कळप शिकार खाऊन शांत झोपलेला असतो आणि बाकी प्राणी अगदी त्यांच्या कक्षेत येउन निर्धास्त चरत असतात. समालोचकाच्या म्हणन्यानुसार ,त्या प्राण्यांना माहित असते की ह्यांची आजची शिकार संपलेली आहे , आणि आता हे हमला करणार नाहीत म्हणून ... पहा कंपॅरिझन करून :)

अविनाशकुलकर्णी's picture

4 Oct 2009 - 7:09 pm | अविनाशकुलकर्णी

कृषी या विषयावर त्यांचा दांडगा अनुभव आहे अशी हवा आहे...ते प्रथम कृषीमंत्री आले तेंव्हा सर्वात जास्त आत्महत्या शेतक~यांनि केल्या...व त्या अजुनहि चालुच आहेत...योग्य भाव मिळुन हि का असा शेतकरी प्राण त्याग करेल?....या मारगाने भाववाढ होवुन शेतकरी आत्महत्या करणे थांबवणार असेल तर जनता ति महागाई सहनहि करेल...उध्धव जर शेतक~या साठी काहि करु ईछ्छितो तर ते म्हणतात त्याला शेतितले काहि कळत नाहि....भारतात असा एकहि नेता नाहि ज्याला ह्या आत्म हत्या थाम्बवता येवु नयेत...???..सारेच न कळण्या जोगे आहे.....