सल्ल हवा आहे

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in काथ्याकूट
20 Sep 2010 - 3:58 pm
गाभा: 

मी नुकताच पुण्यात आलो.
पुण्यात रहाण्याची सोय म्हणुन एका चांगल्या ठिकाणी एका एजन्टाकरवी घर शोधायला लागलो
काही ठिकाणे भादे अधीक होते तर काही ठीकाणी थोड्या गैरसोयी होत्या.
सरतेशेवटी एक घर्/फ्लॅट मनाजोगता वाटला. हवेशीर खिशाला परवडेलसा आणि बर्‍यापैकी सोयीसुवीधा असणारा. फ्लॅटला स्वतन्त्र गच्ची होती.गच्चीतून आजूबाजूचा परीसर छान दिसतो. खीडक्या उघडल्या की फ्लॅट ताज्या स्वच्छ हवेने न्हाऊन निघतो .
एजन्टाला साम्गितले की घर पसंद आहे. मालकाशी बोलणी करून ठरवून टाक. भाडे / डिपॉझीट वगैरे फारशी खळखळ न करता अ‍ॅडजस्ट झाले. घरमालकानी सांगितले की फ्लॅट विद्यार्थ्याना किंवा एकट्यादुकट्या रहाणाराला द्यायचे नाही केवळ फॅमिलीला द्यायचे असा सोसायटीचा नियम आहे.
मी त्या घर मालकाना माझी पत्नी पुण्याला येवू शकणार नाही असे सागितले. पण ते काही ऐकायला तयार नव्हते.
म्हणाले की फ्लॅट्चे अ‍ॅग्रीमेन्ट करताना तरी तुम्ही दोघे असायलाच पाहिजे. मी हा फ्लॅट फॅमिलीलाच देणार.
माझी आता खरोखर पंचाईत झाली. फ्लॅट तर खूप सुरेख होता. आणि मी फॅमिली इथे आणु शकत नव्हतो.
शेवटी माझा हा प्रॉब्लेम माझ्या एका मैत्रीणीने सोडवायला मदत केली. अ‍ॅग्रीमेन्ट साईन करायच्या वेळेस ती माझ्याबरोबर घरमालकांकडे आली. घर मालकानी त्यांच्या घरातल्या लोकांशी आमची दोघांची ओळख करून दिली.
मनाजोगता फ्लॅट मिळाल्याच्य आनन्दात त्या दिवशी मी त्या मैत्रीणीला तिच्या नवर्‍यासकट झकास पार्टी दिली.
एक दीड महिना झाल असेल. त्या मैत्रीणीच्या नवर्‍याला त्याच घरमालकांच्या घराचे इन्टीरीयरडेकोरेशनचे काम मिळाले. हे घरमालक त्या मैत्रीणीच्या नवर्‍याच्या ऑफिसमध्ये गेले असताना ती मैत्रीणही त्याना दिसली.
मैत्रीणीच्या नवर्‍याला आमचा किस्सा माहीत होता पण व्यक्ती नव्हती. त्याने त्याच्या बायकोची घरमालकांशी ओळख करून दिली.
त्या घरमालकानी मैत्रीणीला ओळखले. पण त्यांचा संभ्रम झाला. ते तेथे काही बोलले नाहीत पण त्यानी मला सहज विचारले की माझ्या पत्नीला जुळी बहीण वगैरे आहेका? मला घडलेल्या घटनेची काहीच कल्पना नव्हती . त्यामुळे मी अर्थातच तसे काही नाही म्हणून साम्गितले. त्यावर ते म्हणाले की माझ्या पत्नीसारखीच हुबेहूब्न दिसणारी एक व्यक्ती त्यांच्या पहाण्यात आली. मी ही अर्थात उत्सुकतेने त्याना त्याबद्दल विचारले. त्यावर ते म्हणाले त्या दोघिंची गाठच घालून देतो ना.
घर मालक भला मनुष्य आहे. त्यानी आम्हा चौघाना म्हणजे मला आणि आलेल्या माझ्या पत्नीला (म्हणजे त्यादिवशी अ‍ॅग्रीमेन्ट करताना माझ्या बरोबर आलेल्या माझ्या पत्नीला अर्थात माझ्या मैत्रीणीला) तसेच त्यांच्या इन्टेरीयर डेकोरेटरला आणि त्याच्या पत्नीला ( अर्थात माझ्या त्याच मैत्रीणीला) त्यांच्या कडे पुढच्या आठवड्यात एका कार्यक्रमाला बोलावले आहे.
मला सल्ला हवा आहे की हा पेच प्रसंग मी कसा निभावून नेवू?

प्रतिक्रिया

मॅन्ड्रेक's picture

22 Sep 2010 - 11:03 am | मॅन्ड्रेक

फुकट्चा कि विकतचा?

विजुभाऊ's picture

22 Sep 2010 - 1:55 pm | विजुभाऊ

ती प्रेगनंट आहे..... डॉक्टरांनी बेड रेस्ट सांगितली आहे.माहेरीच राहणार आहे.येउ शकत नाही.

अरे बापरे.... प्रॉब्लेम परवडला पण सोल्यूशन नको.
कारण एखादेवेळेस खरी बायको अथवा माझ्या किंवा बायकोच्या माहेरचे कोणी घरी यायचे आणि त्याच वेळेस घरमालकाना भाडेकरूबद्दल प्रेमळ उमाळा यायचा आणि घरी यायचे.......
मग रट्टेच सगळीकडून कडून.

जाई अस्सल कोल्हापुरी's picture

22 Sep 2010 - 2:25 pm | जाई अस्सल कोल्हापुरी

तुम्ही हॅरी पॉटर पाहिलं असेल ना!
त्यातला Tobby आठवतोय?
तो कसा चुटकी वाजवली की आहे त्या जागेवर गायब होत असतो.
....पहा जमतय का!
ऐन वेळी चुटकीनिशी गायब झालात तरच खैर आहे तुमची!
करा करा.....असा आंगठा आणि मधले बोट एक्मेकांवर टेकवायचे आणि असा झटका द्यायचा बोटाला...
माहिती आहे ना?..
करा ..प्रॅक्टिस करा..
(माझी पण चालु आहे)

नावातकायआहे's picture

22 Sep 2010 - 2:14 pm | नावातकायआहे

घमा ना पुण्यातल्या मिपा स्पेशल कट्ट्यावर न्या.

कानडाऊ योगेशु's picture

22 Sep 2010 - 8:15 pm | कानडाऊ योगेशु

घरमालकाचेच एखादे तसले लफडे आहे का शोधा आणि त्या लफड्याला घेवुन घरमालकाच्या घरी जा.
तेरी भी चुप मेरी भी चुप..!

पण एखाद्या विनोदी चित्रपटात/कादंबरीत शोभेल असा मसाला आहे हा सगळा.मला त्या कादंबरीचे नावही सुचले आहे."अ‍ॅग्रीमेंट."!
पुन्हा प्लॉट असा आहे की तुम्ही तुमची माळ्यावरती पडलेली जपानी गादीही कथानकामध्ये घुसवु शकता.
मिपावरच्या कुणा सिध्दहस्त लेखकाने ह्यावर एखादी चक्रमशः का होईन कथामालिका पाडावी म्हणतो.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

22 Sep 2010 - 10:34 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

हा हा हा...
तुम्हीच घ्या सुपारी!

एका मित्रासाठी हा धागा पुन्हा वर आणतोय. खूप धमाल मजा आली होती .