मूव्हींग ग्राफिटी

भीडस्त's picture
भीडस्त in जनातलं, मनातलं
30 Aug 2010 - 12:12 pm

वाहनांच्या पाठीवर लिहिलेला मजकूर खूपच मनोरंजक असतो.लांबवरच्या कंटाळवाण्या प्रवासातला शीणवटा क्षणात दूर करण्याचं सामर्थ्य ही कधी भावनाप्रधान तर कधी चटकदार असणारी वाक्यं अंगी बाळगून असतात.

पण आताशा हे लिखाण मनोरंजनाबरोबरच उद्बोधनाचंही काम करत आहे.

काही दिवसांपूर्वी रस्त्यावर चालणार्‍या ट्रकच्या मागे वाचायला मिळालेली वाक्यं चांगलीच मासलेवाईक आहेत.

१) जीवनाच्या वाटेवर सत्कार्य करताना कुत्र्यांपेक्षा माणसंच जास्त आडवी येतात.
आणि हे दुसरं


२)या फाळक्यावर बरीच भाउगर्दी आहे . त्यातलं आपलं वाक्य आहे.
दारू ही नर्क आहे त्यामध्ये नवसागर हा अर्क आहे पिणारा मुर्ख आहे असा माझा तर्क आहे.

सुभाषितेअनुभव