असम्भव

आंबोळी's picture
आंबोळी in काथ्याकूट
8 Apr 2008 - 10:18 pm
गाभा: 

हि मालीका सुरवातीला त्यातील गूढतेमुळे बरी होती. पण आता विषय खुप ताणायला लागलेत. सासू-सुनेच्य मालिकेतील मधले २-४ भाग बुडले तरी जसा काही फरक पडत नाही तसे आता या मालिकेचे झाले आहे.

त्यातील चान्गली लोके फारच बावळट आहेत. सुलेखाची आई , बाळ,शुभ्रा, प्रिया,इन्स्पेकटर भोसले, डोक्तोर , आदी,आजोबा हे एकमेकाशी या प्रोब्लेम विषयी अजिबात बोलत नाहित. (दुर्दैवाने यातले बरेचसे एकाच घरात रहातात किन्वा दिवसातून किमान एकदा तरी भेटतात.)
या उलट सुलेखा लोकान्समोर रडारडी करुन त्याना सहज गन्डवते..... हे फारच बालिश आहे.

सध्या घरातल्या थोरल्या मुलाला वाड्यात खजिना पुरलाय हे बाहेरच्यान्कडुन कळते म्हणुन तो लै दन्गा करतो / रुसतो या मधे २-४ एपिसोड घालवले. खरे म्हन्जे असल्या गोष्टी लहानपणापासून माहिती पाहिजेत....(आमच्या वाटेगावच्या वाड्यात खजिना नाही. पन तो आसल्याच्या अफवा आम्ही लहानपणापासून ऐकतोय्....त्यामुळे वरिल गोष्ट पटत नाही )

असो....

मालिकान्च्या नादी लागू नये या (आमच्या) ग्रुहीतकाला धक्का लागता लागता राहीला...

प्रतिक्रिया

अभिज्ञ's picture

8 Apr 2008 - 11:50 pm | अभिज्ञ

माझे नशीब अत्यंत चांगले असावे म्हणुन कि काय इथे हल्ली बेंगलोरात माझ्याकडे झी मराठी दिसत नाही.
त्यामुळेच माझी ह्या "असंभव" त्रासातून मुक्तता झाली आहे.
परंतु माझ्या केबल वाल्याने इ टि.व्हि. मराठी सूरु केल्याने हा "असंभव" त्रास मला "ह्या गोजिरवाण्या घरा"तून व्हायला लागलाय.
माझ्या मते "ह्या गोजिरवाण्या घरात" हि मालिका "असंभव" पेक्षा जास्त "असंभव" वाटते.
ह्या थोर मालिकेचि हि काहि क्षणचित्रे...
१.कुटुंबाचे आडनाव "परांजपे".
२.घरातल्या मुलिचा पहिला घटस्फोट,मग दुस-याशी लग्न.मग परत तिथे घटस्फोट.मग परत पहिल्या नव-याशी परत लग्न.
३.घरातला थोरला मुलगा "उंडगा" असतो.तो गॅरेज चालविणे,सुपा-या घेणे असलि कामे करत असतो.
४.धा़कट्या मुलाच्या पहिल्या बायकोचा विनयभंग होउन तिची आत्महत्या.मग त्याचे दुसरे लग्न.दुस-या बायकोचे तिच्या नंणदेच्या दुस-या नव-याबरोबर असणारे अफेअर.....
त्यात परत ह्या सर्व घटना "परांजपे" आडनावाच्या कुटुंबात घडत असतात....
अशा एक से एक प्रसंगातून हि मालिका पुढे पुढे सरकत राहते.
मालिकेतील आता बरेचसे कलाकार जाउन त्यांच्या जागी आता नवीन कलाकार आले आहेत.
मला वाटते कि हा सर्वच प्रकार पुनर्जन्मापेक्षाही डेडलि असावा.

असल्या अतर्क्य घटनांनी भरलेली हि मालिका "या गोजिरवाण्या घरात" अशा नावाने दाखवल्यावर मला तर ती असंभव पेक्षा हि असंभव
वाटते.
असंभव,या गोजिरवाण्या घरात सारख्या टुकार मालिका कधि बंद होतील हे देवच जाणो.कदाचित त्या बंद झाल्या कि नाहि हे पहायला
पुनर्जन्मच घ्यावा लागेल असे आता मला वाटायला लागले आहे.

असो...

अबब

बेसनलाडू's picture

9 Apr 2008 - 2:37 am | बेसनलाडू

अजून हा बकवास प्रकार पाहण्यात आलेला नाही, पण प्रतिसादातच तुम्ही म्हटल्याप्रमाणे मला वाटते कि हा सर्वच प्रकार पुनर्जन्मापेक्षाही डेडलि असावा, यावरून भारतात जाईन तेव्हा निदान ही मालिका तरी पाहणार नाही, असा आताच कानाला खडा लावला आहे.
त्यात परत ह्या सर्व घटना "परांजपे" आडनावाच्या कुटुंबात घडत असतात....
अहो म्हणूनच नाव 'असंभव' दिलेय ना! ;) :))
(संभावित)बेसनलाडू

चतुरंग's picture

9 Apr 2008 - 2:47 am | चतुरंग

"ह्या लाजिरवाण्या घरात" ठेवा म्हणावं;))
दळभद्री लेकाचे!!

चतुरंग

अन्या दातार's picture

10 Apr 2008 - 8:12 pm | अन्या दातार

ते घर गोजिरवाणे नाही लाजीरवाणे झाले आहे
आता त्याचे नवे नामकरण व्हायला पाहिजे या लाजीरवाण्या घरात म्हणून

प्राजु's picture

9 Apr 2008 - 12:21 am | प्राजु

हे एकच विशेषण आहे. माझा आजकाल या मालिकांशी काहिही संबंध नाही.. पण अबब, आपण जी क्षणचित्रे दिलीत त्यावरून त्या मालिकेच्या दिग्दर्शकाच्या कल्पनाशक्तीची आणि बुद्धीची कीव येते आहे.
सुखी आहे मी.. इथल्या "एव्हरिबडी लव्हज् रेमंड्स" सारख्या मालिकांमध्ये
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

अवधुत पुरोहित's picture

9 Apr 2008 - 1:55 am | अवधुत पुरोहित

ही कल्पनाशक्ती दिग्दर्शकाची नसुन लेखकाची असते...

फिल्मी (दिग्दर्शक) अवधुत

विसोबा खेचर's picture

9 Apr 2008 - 8:25 am | विसोबा खेचर

मी कुठल्याच मालिका बघत नाही. तो मी स्वत:च्या रसिकतेचा अपमान समजतो. सर्व मालिका एकापेक्षा एक फालतू असतात! मला या मालिकावाल्यांच्या क्रिएटीव्हीटीची कीव येते.

फार पूर्वी मात्र काही मोजक्याच मालिका माझ्या खूप लाडक्या होत्या-

त्यापैकी- अडोसपडोस, चाळ नावाची वाचाळ वस्ती, नुक्कड, ये है जिंदगी, उडान, इत्यादी.

कविता चौधरी या विलक्षण बोलक्या चेहेर्‍याच्या अभिनेत्रीची उडान ही मालिका मला खूप आवडली होती. आता अश्या मालिका होतच नाहीत!

असो,

तात्या.

स्वाती दिनेश's picture

9 Apr 2008 - 7:53 pm | स्वाती दिनेश

अरे काय तात्या आठवण काढलीस? या मालिका मी ही आवडीने पाहत असे.खरंच मजा यायची ..
आता गेली कितीतरी वर्षे हिंदी,मराठी चॅनेल्सचा काही संपर्कच नाही म्हणून संबंधही उरला नाही .त्याचं पूर्वी थोडं वाईट वाटत असे, पण इथे चाललेल्या चर्चातून समजते आहे की मालिका काय किवा रिऍलिटी शोज काय सगळे बकवास आहे! त्यामुळे आता ही चॅनेले आणि त्यांचे कार्यक्रम पाहायला मिळत नाहीत याचे अजिबात वाईट वाटत नाहीये.
स्वाती

प्रसन्न's picture

9 Apr 2008 - 10:04 am | प्रसन्न

सर्वात भयानक मालिका

राजमुद्रा's picture

9 Apr 2008 - 1:48 pm | राजमुद्रा

त्याहीपेक्षा भयानक
काटा रुते कुणाला

राजमुद्रा :)

छोटा डॉन's picture

9 Apr 2008 - 4:30 pm | छोटा डॉन

मी घरी गेल्यावर साधारणता ३-४ भाग बघितले होते....
असह्य असह्य म्हणतात ते हेच असावे ...

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

भोचक's picture

9 Apr 2008 - 2:56 pm | भोचक

मी टिव्हीवर सारेगमपव्यतिरिक्त एकही मालिकात्मक कार्यक्रम बघत नाही. पण हा एक कार्यक्रम बघत असताना झळकणार्‍या मालिकांच्या जाहिरातींमुळे त्यात काय चालले आहे ते कळते. त्याच्या भयानक जाहिराती पाहूनच त्या मालिकांत काय चालले याचा अंदाज येतो. वहिनीसाहेब नावाच्या मालिकेच्या जाहिरातीत सतत कुणी कुणाला मारताना दाखविले जाते. तेही इतक्या ओंगळपणे की त्याची किळस वाटते. याचा लहान मुलांवरही मोठा परिणाम होतो. माझी दोन वर्षाची मुलगी नेमकी अनेकदा टिव्हीसमोर असायची. त्यावेळी तिला जाणवणार्‍या विचित्र फिलींग आम्हाला लक्षात आल्या. आता अशी एखादी जाहिरात लागली की हे बघायचं नाही ना, असं ती आम्हाला विचारते. त्यामुळे अनेकदा या जाहिराती पाहताना संताप अनावर होतो. लोक (कुठले?) पहातात म्हणून काहीही अतर्क्य आणि किळसवाणे दाखविणार्‍या या दिग्दर्शकांचा आणि लेखकांना जाहिररित्या चाबकाने फोडून काढावे अशी इच्छा होते.

या सुखांनो या नावाच्या मालिकेची जाहिरात बघताना या सगळ्यांना खरोखरच सुखाची गरज आहे, त्यामुळे त्यांना तातडीने सुख पॅक करून पाठवून देऊन मालिका बंद करावी असा सल्ला द्यावासा वाटतो. तीच कथा कळत नकळतची. एक बिनडोक मुलगी. आयुष्यात इतके बिनडोक निर्णय घेते आणि त्यात लोकांनी सहभागी व्हायचं हे आपल्या डोक्याच्या पलीकडचे आहे.

दुसर्‍यांची दुःखे, रडारड, भांडण, लफडी यातून मनोरंजन काय होत असेल? त्यामुळे अशा मालिकांवर बंदी घालावी या मताचा मी आहे. अत्यंत सुंदर मालिकांचाही एक काळ दूरदर्शनवर होता. तो वाहिनींच्या बाजारीकरणाच्या सुरवातीबरोबरच संपला. दुर्देव.

मालिकांच्या फेर्‍यापासून अलिप्त रहाणारा (भोचक)

अन्जलि's picture

9 Apr 2008 - 3:34 pm | अन्जलि

सग्ल्यअ मलिकामधे एक्च दखव्ले अहे. य सुखनो मधे पन नव्ररअ मर्तो खुन होतो. कलत नकलत मधे पन खुन होतो सग्लिकदे सर्खिच रदरद. घरि गेल्यवर फ्रेश होन्यसथि विरन्गुला म्हनुन कहि बघवे तर हे असे. पुर्विचे सग्ले दिगर्शक कोथे गेले?

अंजली ताई मराठी कळ फलक नीट वापरा. तुमचे नावही देवनागरीत करुन घ्या
तुमची रदरद वाचुन आम्हाला रदु येते.....
रदुन रदुन शाल्खे दोले पुशनाला विजुभाऊ

भडकमकर मास्तर's picture

9 Apr 2008 - 3:34 pm | भडकमकर मास्तर

एक बिनडोक मुलगी. आयुष्यात इतके बिनडोक निर्णय घेते आणि त्यात लोकांनी सहभागी व्हायचं
आणि त्यात जहिरातीत ती विचारते, मी करतेय ते बरोबर आहे का? .. विनोदी कुठली.... आधी इतके उद्योग केलेस तेव्हा विचारलेस का आम्हाला?? अं..? लब्बाड... !!!

स्वाती राजेश's picture

9 Apr 2008 - 3:39 pm | स्वाती राजेश

या सिरीयल १ महिन्यानी जरी पाहील्या तरी, तिथेच असतात. कोल्हापुरातील रंकाळ्याजवळील नंदी सारखे तीळ भर पुढे, गहूभर मागे..

मिसळपाव वरील सदस्य यापेक्षा सकस, आणि छान सिरीयल काढू शकतील असे माझे मत...

उदय सप्रे's picture

9 Apr 2008 - 4:11 pm | उदय सप्रे

अ सिरिअल इज अ प्रोग्राम व्हेअर वी "नो" "सी रिअल" !
प्रत्यक्षात घडणारे काहीच येथे दिसत नाही.
एक अनुभव म्हणून सांगतो :
झी वरील "हास्य सम्राट"चे ऑडिशन , स्थळ : दादर , वेळ - ठरवलेली सकाळी ८ , परिक्षक - विजय कदम यांचे आगमन ११.४५ वाजता, एकूण लोक ऑडिशन साठी ४५० + , २ हॉल्मधे कोंबलेले, प्रत्येकाला फक्त ३ मिनिटे वेळ, दुसर्‍या हॉल्मधे स्क्रीनिंग्साठी "स्पॉट" बॉय टाईप्चे लोक्.....मी शिव्या घालून आलो.....

झी वर २ सिरिअल्स खरेच चांगल्या होत्या : मेघ दाटले (१३ भाग) आणि "श्रीयुत गंगाधर टिपरे" बास !

बाकी अधुरी एक कहाणी पासून वादळाची वाट पर्यंत एक्दम भिक्कार !

मनस्वी's picture

9 Apr 2008 - 4:16 pm | मनस्वी

मी शिव्या घालून आलो.....

बरे केलेत. खूर्च्या पण हाणायच्या होत्या टाळक्यात एकेकाच्या.

४०५ आनंदवन विसरला वाटत.....

(बॉबी ला मिस करणारा)
मदनबाण

विद्याधर३१'s picture

9 Apr 2008 - 7:46 pm | विद्याधर३१

४०५ आनंदवन, प्रपंच, झोका..........देव चालले ( पिंपळपान)

या सारख्या सुन्दर मालिकांच्या आठवणी जाग्या झाल्या.

(प्रतिमा कुलकर्णी यांच्या नवीन मालिकेची चातकासारखी वाट बघणारा..)
विद्याधर

आवांतर: प्रपंच पुन्हा चालु झाल्यास बघण्यास उत्सुक आहे.

मनस्वी's picture

9 Apr 2008 - 4:17 pm | मनस्वी

सगळ्यात वीट आणतो तो आदेश बांदेकर. त्याच्या गरीब विनोदबुद्धीचा कहर आहे.
आता तर २-२ मालिकांत आहे!

धमाल मुलगा's picture

9 Apr 2008 - 4:19 pm | धमाल मुलगा

आणि कोट्या करतो त्याही अपमानास्पद !
त्याला एकदा सोडाच मिपाकरांच्या घोळक्यात...आयुष्यभर लक्षात राहतील असले जब्राट इनोद होतील त्याच्यावर!!!

सहमत.....

वरदा's picture

9 Apr 2008 - 5:44 pm | वरदा

होती टिपरे.. ह्या गोजिरवाण्या घरात मी ३ वर्षापूर्वी तिथे असताना पाहिली होती अजूनही चालू आहे ती?????
काय भयंकर लोक आहेत्...पाणी घालून घालून आता त्यात डाळ राहीलीच नाहीये म्हणावं..फक्त पाणी.....:((((

प्रभाकर पेठकर's picture

9 Apr 2008 - 8:15 pm | प्रभाकर पेठकर

ह्या मालिका म्हणजे 'सिरियल किलर्स' असतात.

ऍनिमल प्लॅनेट, डिस्कव्हरी, हिस्ट्री, नॅशनल जिऑग्रॅफी , एखादी मराठी बातम्यांची वाहिनी , मी मराठीवरील 'दिलखुलास' आणि काही कुकरी शोज एवढे पुरते मला.

मनस्वी's picture

10 Apr 2008 - 12:57 pm | मनस्वी

पोगो चॅनेल पण मस्त आहे.. एकदम नो टेन्शन. त्यावरील मॅड, गॅग्ज, मिस्टर बीन, तकेशीज कॅसल आणि जावेद जाफरीची कॉमेन्ट्री एकदम टाईमपास.

देवदत्त's picture

9 Apr 2008 - 8:38 pm | देवदत्त

हेच...
मी तरी असल्या मालिका बघत नाही. बघायचे काय तर जे १, २ थोड्या दिवसांत संपेल. उदा. कोपरखळी, कॉमेडी.कॉम, सी, आय. डी., ऑफिस ऑफिस, वगैरे वगैरे.
३ वर्षांपूर्वीपर्यंत जमेल त्या चांगल्या मालिका बघत होतो. उदा. टिपरे, ४०५ आनंदवन, झोका, प्रपंच, दुनियादारी. (आता तर नावे ही आठवत नाही)
नाही तर आहेच, सिनेमा एके सिनेमा. ;)
आणखी एक, काही मालिका नवीन असतात तेव्हाच पहायच्या. नव्याची नवलाई.
सध्या तरी मी एन डी टी व्ही इमॅजीन वर जस्सूबेन जयंतीलाल जोशी की ज्वाईंट फॅमिली आवर्जून बघतो. निदान सुरुवातीला तरी पाहण्यास चांगले आहे.

तात्या, तुम्ही सांगितलेल्या सगळ्या मालिका मी पाहिल्या होत्या, थोड्याफार आठवतातही, पण त्यातील अडोस पडोसचे नावच आता आठवते आहे. त्यात काय कोण असायचे ते आठवत नाही. अर्थात तेव्हा मी फार लहान होतो.

त्यावेळी मालिकांच्या नावांवरून आम्ही (की कुणीतरी) एक लांब परिच्छेद (संवाद) तयार केला होता. नीटसा आठवत नाही. आठवला तर नक्की लिहीन.

वरील चर्चा वाचल्यावर मिसळपाव वरील माझे संथ चालते मालिका ही हे विडंबन आठ्वले. विशेषतः
कथानकाचा थांग न लागे
पुढे तीळभर, गहूभर मागे
'मार्गी' झाली म्हणता म्हणता क्षणात 'वक्री' होई..
संथ चालते मालिका ही...
या ओळी...

आनंद घारे's picture

10 Apr 2008 - 7:07 pm | आनंद घारे

मिपाचे सदस्य नाहीत हे उघड आहे कारण एकादी तरी सकारात्मक प्रतिक्रिया आली असती. पण ते लोक आपल्या आजूबाजूलाच अस्तित्वात असतात ना? त्यांना बहुधा मिसळपाव आवडत नसावी. जर कोणाला डिस्कव्हरी किंवा नॅशनल ज्यॉग्राफिक असे कांही पहावेसे वाटत असेल तर घरातले इतर लोक त्यांना ते पाहू देतात काय?
असंभव या मालिकेबद्दल जे लिहिले गेले आहे त्याशी मीसुद्धा सहमत आहे. तरीही मला त्यातल्या त्यात तीच मालिका बरी वाटते, त्यामुळे मी ती (शिव्या घालत घालत) पाहतो.

मनापासून आवडलेल्या मालिका:
चिमणराव, गजरा, चाळ नावाची वाचाळ वस्ती, प्रपंच, झोका, ४०५ आनंदवन, श्रीयुत गंगाधर टिपरे...

न आवडलेल्या मालिका- सर्वच्या सर्वं daily soaps... हिंदी मालिकांची पिल्लं अजुन काय??

मराठी बातमी पत्रं म्हणायचं झालं तर स्टार माझा हे.. हिंदी बातमीपत्रांचं (Zee News, Aaj Tak, India TV) पिल्लू आहे.... तरी बरं अजुन रात्री भूतांचे घाणेरडे कार्यक्रम दाखवत नाहीत ..

बातमी पत्रातील लोक फार वाईट मराठी बोलतात....आणि विषयही पोरकट असतात..

झी २४ तास बद्दल काही कल्पना नाही...टाटा स्काय ची कृपा...

ई टीव्ही वरच्या बातम्या माहितीपुर्वक असतात...

मी मराठी वर दिलखुलास हा एकच कार्यक्रम पाहिला आहे...बरा वाटला..
प्रसाद ओक आणि पुष्कर श्रोती ह्या दोघांची भिकार मालिका लागते ह्या वाहिनी वर...

१ प्रश्न आहे.... आज काल टि. व्ही. वर "जो बोले सिकन्दर"ची जाहिरात मोठ्या प्रमाणावर दाखवली जाते.. (कसली त्याचा वाद नाही आहे... )
मला हे कळ्त नाही, संध्याकाळी सर्व कुटुंब मिळून जर एखादी मालिका पाहत असेल, आणि हया जाहिरातेतला मनुष्य जोरजोरात कबड्डी कबड्डी (इथ्ये शब्द बदललेला.....) तर काय करावं??....
हे सोडा....
"छान छान गोष्टी" ह्या लहान मुल्लांच्या कार्यक्रमाच्या मध्ये ही जाहिरात मध्ये दाखवली जाते... ह्या मागचा उद्देश्य तो काय...
(हे शेवटचे मूळ विषयाला सोडून होते, पण टी. व्ही. चा विषय आल्याने, मनातले मोकळे करावेसे वाटले..)

मोहित्यांचा केतन
(अवघाची संसार मालिका आणि त्यातली Fool पात्रं ह्यांच्याशी काहीही संबंध नसलेले मोहिते..)

अवांतरः
खालची link काळ्जीपूर्वक click करा...कारण मला फार मोठा धक्का बसला...तेव्हा तुम्हाला Heart problem असेल तर शक्यतो टाळा...विशेषतः दुसरी link

..
http://www.orkut.com/Community.aspx?cmm=27493788

http://www.orkut.com/CommMsgs.aspx?cmm=27493788&tid=2514141917995359885&na=3&nst=11&nid=27493788-2514141917995359885-2529485362263600398

Orkut मध्ये अशी community सुद्धा असू शकते??

झकासराव's picture

10 Apr 2008 - 10:58 pm | झकासराव

नीना कुलकर्णी आणि तिचा नवरा दिलिप कुलकर्णी यांची "नायक" ह्या मालिकेचा कसा काय उल्लेख नाहिये???
ती छानच होती.
टिपरे चे रीपिट टेलेकास्ट पाहिले मी.
मस्त आहे. :)

एक's picture

11 Apr 2008 - 12:21 am | एक

साईन्फिल्ड्स.
जेरी साईन्फिल्डची निरिक्षणशक्ति आणि विनोदबुद्धी विलक्षण आहे. या बाबतीत त्याची तुलना कधी कधी पु.लं शी कराविशी वाटते. युट्यब वर हा त्याचा एक स्टँडप शो पण
आहे.. http://www.youtube.com/watch?v=qY5AVBSjTAQ

हुज लाईन इज इट एनी वे?

स्पिन सिटी.

एव्हरीबडी लव्ह्ज रेमंड.. (यातला म्हातारा तर माझा फेवरेट आहे.)

यातला कुठ्लाही एपिसोड कधीही कितीही वेळाअ बघितला तरी छान वाटतो.

मी असं ऐकलं की या सिरीयल्स भारतात पण लागतात.
आई वडील इथे आले होते तेव्हा त्यांच्या साठी म्हणून सोनी आणि झी चॅनेल्स घेतले. मला कल्पना नव्हती ते तिकडे या चॅनेल्स ना एवढे वैतागले होते..इथे आल्यानंतर त्यांनी वर दिलेल्या सिरीयल्स बघायलाच सुरुवात केली..

देवदत्त's picture

14 Apr 2008 - 8:44 pm | देवदत्त

इंग्रजी मालिका म्हटले तर मी फ्रेंड्स (FRIENDS)आणि फुल हाऊस(Full House) नक्कीच बघतो.