अंगणात फिरताना रात्री
सहज आकाशाकडे लक्ष गेले
खूप दिवसात आकाशच नाही बघितले
असंख्य तार्यांनी भरलेले
दूर दूर विखरलेले तारे
स्वयंप्रकाशी, लखलखणारे
मूलतत्वाशी नाते असणारे
एकमेकांपासूनद्धा आता किती दूर
बघता बघता एक तारा निखळला
गालावरून ओघळणार्या अश्रूसारखा
घसरून गेला अनंतात
आकाशाशी नाते सोडून
दचकून भानावर आलो..
आभाळमाया जपायला हवी
अश्म होईतोवर तरी
प्रतिक्रिया
6 Aug 2010 - 12:58 pm | मितान
आभाळमाया जपायला हवी
अश्म होईतोवर तरी
खूप सुंदर !
"जोवरी सुचते पावसाचे गाणे
हिरमुसवाणे व्हावयाचे नाही.. "
6 Aug 2010 - 1:00 pm | अर्धवट
>>अंगणात फिरताना रात्री
सहज आकाशाकडे लक्ष गेले
खूप दिवसात आकाशच नाही बघितले
असंख्य तार्यांनी भरलेले
खरंच की!!
(भारावलेला) अर्धवट
>>अश्म होईतोवर तरी
हे नाही कळालं, समजावुन सांगा
(काव्यभिकारी) अर्धवट
खुप छान लिहिलय..
(काकाजी) अर्धवट
6 Aug 2010 - 2:48 pm | श्रावण मोडक
या कवितेवर काम अपुरं राहिलं का? कल्पनेत ताकद आहे असं वाटतं, पण ती ताकद दिसून येत नाहीये!
6 Aug 2010 - 8:51 pm | गंगाधर मुटे
सुंदर.
8 Aug 2010 - 5:58 pm | पॅपिलॉन
वर श्रावण मोडक यांनी जणू माझीच प्रतिक्रिया दिली आहे! कल्पना जबरदस्त पण मांडणी थिटी पडतेय. थोडं रीवर्क करा, जमून जाईल.