पंछी बनू उडता फिरू...

केशवसुमार's picture
केशवसुमार in जनातलं, मनातलं
3 Aug 2010 - 8:57 am

गरमागरम धिरडी हाणली तोवर १०:४५ झाले होते. ११ ला निघायचे म्हणजे सगळ्यांना १०:४५ पासून हल्या करायला सुरू केले (पीएम ची खोड.... )शेवटी ११:०५ मिनिटांनी ७ जवानांनी साओ कॉन्राडो बीच कडे कुच केली.. तिथे पॅराग्लायडींचे कार्यालय कुठे आहे ही माहिती एप्रिल मध्ये किंमत विचारून हिंमत न झाल्याने आधीच झाली होती. तरी एकदा गुगलबाबाला शरण गेलो
पेद्रो बोनीतो रँप इथे माहिती वाचली. बिगफ्लाय ह्या कंपनीची साईट बघून घेतली.. (आधी कधी काही अपघात वगैरे झाले आहेत का हे १० वेगवेगळे सर्च मारून बघितले हे वे. सा. न. ल. ). आमची टॅक्सी जशी तिथे थांबली तशी २-३ ब्राझीलीयन माणसे पोर्तुगीज भाषेत बडबडत एक फोटो अल्बम घेऊन आमच्या अंगावर आली.. भलताच विचार मनात आणू नका.. ते सर्व पायलट आहेत हे नंतर समजले.. मी पीएम पडल्यामुळे किंमत पाडायची जबाबदारी अर्थातच माझ्यावर आली. मी आपला बिगफ्लाय वाला माणूस शोधत होतो.. थोडा संवाद साधल्यावर त्यांनी एकमेकांना इशारे केले आणि २-३ ची ७-८ माणसे झाली ते पोर्तुगीज मध्ये आणि मी इंग्रजी मध्ये असा संवाद (?! )सुरू झाला .. एकदोनदा मी दोन्ही हात पसरून लहान मुले विमान उडवतात तसे ही त्यांना करून झाले.. भ ची बाराखडी तर पदोपदी तोंडात येत होती.. सगळे हातवारे खाणाखुणा करून सुद्धा... माणसांची संख्या, पॅराग्लायडींगची फी हे दोन आकडे सोडले तर मी त्यांना आणि ते मला काय सांगत होते ते कोणालाच काहीच समजलं नाही. जोडीला भारतीय भाषेत (मराठी, कानडी, तेलगू ...)मध्ये टीम मेंबर आपल्यापरीने सूचना देत होते.. तेव्हढ्यात बिगफ्लायचा कार्लोस प्रगट झाला.. आणि मग आय डू.. यू टेक.. ओके.. ओके येस.. येस.. गूऊड.. आशा अस्खलीत इंग्रजीत संवादाला चालना मिळाली.. दर डोई २५० रियाइज आणि फोटो आणि व्हिडिओ चे ८० रियाइज असा हिशोब कार्लोसने मला दिला, पुरावा म्हणून रेट कार्ड दाखवले.. मी मुंबई फॅशन स्ट्रीटवरचा घासाघीसीचा अनुभव पणाला लावला.. एक दोनदा चर्चा सोडून नको आम्हाला नाही करायचे वगैरे करून झाले.. मोबाईलवर आकडे टाईप करून ओ नो नो.. ओ येस येस करून झाले.. एक गठ्ठा ७ माणसे हे आमिष दाखवून झाले.. शेवटी दरडोई २५० रियाइज मध्ये फोटो+ व्हिडिओ सर्व सामाईक असा सौदा तुटला.. (दोघांनाही एकमेकांना गंडवल्याचा आनंद मिळाला हे वे. सा. न. ल.) जरा कुठे मी मैदान जिंकल्याचा आनंद घेत होतो, तेव्हढ्यात कार्लोसने एक बाँब टाकला.. पॅराग्लायडींग करण्या पूर्वी तिथल्या असोसिएशनची मेंबरशिप घेणे गरजेचे आहे आणि त्याचे फिप्टी रियाइज वेगळे!.. झाले पुन्हा चर्चा चालू झाली.. मी आणि अजून दोघे आमच्या खिशात इतके पैसे नव्हते. जालावरती साधारणता किती खर्च येईल हा अंदाज होता आणि रिओ तसे सेफ नसल्यामुळे मोजूनच पैसे नेले होते.. (आधीच खिशात २५० रियाइज आहेत ह्या कल्पनेने काही जणांना घाम फुटला होता हे वे. सा. न. ल.) .. त्यामुळे नाईलाजाने आम्ही उडायचा बेत रद्द केला. कार्लोसला थँक्यू टाटा बाय बाय केले.. ज्यांच्या कडे पैसे होते त्यांनी असू दे रे, आयुष्यात परत कुठे रिओला येणार, थोडे महाग पडते आहे पण करू, अशी एकमेकांची समजूत काढली आणि कार्लोस बरोबर असोसिएशनच्या कार्यालयात प्रवेश केला.. पैसे नसलेल्या आम्ही तिघांनी टॅक्सी थांब्याची वाट धरली.. ५ मिनिटे झाली तरी टॅक्सी काही मिळेना.. आज आपला दिवसच नाही असे मनात आले.. तेव्हढ्यात नंदादीप सुर्वे धावत आला.. सर सर ते फिप्टी नाही फिप्टीन आहे !! तेव्हढे पैसे सगळ्यांकडे मिळून होते. कार्लोसच्या इंग्रजीचा उद्धार करत, जवळ जवळ पळतच आम्ही त्या असोसिएशनचे कार्यालय गाठले. पुढची १० मिनिटे अर्ज भरणे आणि आमच्या नावाच्या स्पेलिंगची पूर्णं वाट लावलेली ओळखपत्र मिळवणे ह्यात गेली.. हे होता होता १२:३० झाले होते.. काही पायलटांना दुसरे गिर्‍हाईक मिळाल्याने ते निघून गेले आणि आदमी सात और पायलट पाच असा नवा प्रश्न आमच्या समोर दत्त म्हणून उभा ठाकला. कार्लोसने फोना फोनी केली आणि १५ मिनिटात एकास एक असा हिशोब लागला.. कोण कुणाचा पायलट हे ठरले.. एकमेकांची नावे सांगून हस्तांदोलने झाली आणि आम्ही आम्हाला नेमून दिलेल्या पायलटच्या कार मध्ये बसलो . साओ कॉन्राडो बीच ते पेद्रो बोनीतो रँप हा १५-२० मिनिटाचा घाटातील प्रवास पार करून आम्ही पेद्रो बोनीतो रँपच्या पार्किंग लॉट ला पोचलो.
IMG_0001
पार्किंग लॉट पासून ५० -५५ पायर्‍या चढल्या नंतर पेद्रो बोनीतो रँप नजरेस पडला..आजूबाजूला बराच प्रेक्षक वर्ग जमला होता. काही घारी ही फिरत होत्या.. रँप नीट बघायच्या आधी समोर तोच 'पेद्रो दि गावा' चा चेहरा पुन्हा माझ्या कडे बघत होता.
DSC04161
थोडे पुढे गेल्यावर पेद्रो दि गावाचा खडा कडा दिसला..मागच्याच आठवड्यात आपण ह्याच्या टोकावर उभे होते ह्या कल्पनेनेच एक क्षण अंगावर काटा आला . त्या काळ्याकभिन्न कातळावर नजर थांबत नव्हती.
IMG_0024
कार्लोस तिथल्या फॉरम्यालिटीज पूर्णं करत होता, तोवर आम्ही समोर दिसणारा समुद्र किनारा कॅमेर्‍यात बंद केला..
IMG_0017
आमच्या आधीच्या दोघा तिघांना त्या रँपवरून उड्या मारताना बघून आपण इथे येऊन चूक केली अस सारखे वाटू लागले..
आमची तंतरलेली बघायला बराच प्रेक्षक वर्ग पण होता. शेवटी पैसे भरले होते त्यामुळे जे होईल ते होईल असा विचार करून आम्ही हेल्मेट आणि सेफ्टी बेल्ट चढवून आमच्या नंबराची वाट पाहायला सुरुवात केली.
DSC04168
कार्लोसच माझा पायलट होता. त्याने सगळ्या सूचना दिल्या..
DSC04180
(फोटोत पाय आले नाहीत म्हणून बरं नाही त्यांची थरथर तुम्हा सुज्ञ लोकांना नक्कीच दिसली असती).
ऑल सेट फॉर गो.. येस..
आणि पुन्हा आमचे नशीब फिरले, वार्‍याची दिशा अचानक फिरली, रँप मॅनेजरने लाल झेंडा लावला.. कार्लोसने सांगितले ह्या कंडिशन मध्ये तो उड्डाण घेणार नाही..
IMG_0028
पायाची लटपट आणि पोटातला गोळा काही काळासाठी गायब झाले.. २५ -३० मिनिटे वार्‍याची दिशा बदलते का बघण्यात घालवली.. शेवटी एकदाचे लाल निशाण निघाले आणि आम्हाला रँपवर उभे केले.. कार्लोसने त्याचे पॅरॅशूट आमच्या पट्ट्याला अडकवले...
IMG_0037
मी डोळे गच्च बंद केले होते.. पट्टा करकचून धरला..कार्लोस कानात काहीतरी बोलत होता ते काही कळत नव्हते.. कीप वॉकिंग फास्ट... १.. २.. ३.. फास्ट..फास्ट..फास्ट.. फास्ट.... पुढचे काही आठवत नाही.. पेकाटात एक लाथ बसली आणि आमच्या पाया खालची जमीन गायब झाली..
खांद्याला एक झटका बसला आणि आम्ही उडते झालो..
IMG_0039
काही क्षणांनी कार्लोस ओरडून सांगत होता हात सोड.. हात सोड.. यू आर सेफ. आम्ही घाबरत घाबरतच डोळे उघडले.. ते लगेच फिरले .. नजर स्थिर व्हायला पुढचे काही क्षण गेले.. माझ्या सर्व जाणीवा परत आल्या.. आणि मी हात सोडून जोरात ओरडलो.. आय एम फ्लाइंग लाइक अ बर्ड...(त्याक्षणी मला घारीचा प्रचंड हेवा वाटला..हे वे. सा. न. ल. )
DSC04189
इतक्या उंचावरून दिसणारा तो नजारा केवळ अवर्णनीय होता.. पुढचे १५ ते २० मिनिटे मला काय काय डोळ्यात साठवू असे झाले होते.. कार्लोस आपला इमाने इतबारे ते सगळे कॅमेर्‍यात साठवत होता..
DSC04205

DSC04209

यथा अवकाश आमचा देह जमिनीवर आला..
पण मन अजून ही म्हणते आहे...
पंछी बनू उडता फिरू मस्त गगन में...

देशांतरक्रीडाअनुभव

प्रतिक्रिया

क्रान्ति's picture

3 Aug 2010 - 9:19 am | क्रान्ति

इतका चित्तथरारक, रोमांचक आणि अवर्णनीय अनुभवघेअल्याबद्दल हार्दिक अभिनंदन आणि तो शेअर केल्याबद्दल धन्यवाद. लेख आणि फोटो सगळंच अप्रतिम! वाचतावाचता स्वतःच उडत आहोत की काय, असा भास व्हावा, इतकं गुंगवून टाकणारं लेखन झालंय.:)

मदनबाण's picture

3 Aug 2010 - 9:29 am | मदनबाण

लयं भारी !!! :)

स्वाती दिनेश's picture

3 Aug 2010 - 10:55 am | स्वाती दिनेश

मस्तच... क्लास!!!
स्वाती

शाल्मली's picture

4 Aug 2010 - 12:23 pm | शाल्मली

मस्तच... क्लास!!!

अगदी असेच म्हणते!

बेसनलाडू's picture

4 Aug 2010 - 9:38 pm | बेसनलाडू

(सहमत)बेसनलाडू

वा मस्त! फोटु भारीच.

(पण सर्वात जास्त तुमचा 'वेअरेबल' टॅटू आवडला!)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

3 Aug 2010 - 11:02 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

क्लास ... गद्यलेखनतर मस्तच पण काय फोटो आहेत. आता खरंच हा ही अनुभव एकदा घ्यावा असं मनापासून वाटायला लागलं आहे.

अवांतरः तुम्ही हातावर काय गोंदवून घेतलं आहेत?

केशवसुमार's picture

4 Aug 2010 - 2:17 am | केशवसुमार

हातावर कसल गोंदवून घेतोय.. घरातून लाथ घालून हकलतील.. नीळे म्हणतात तसा तो वेअरेबल टॅटू आहे.. भारतात हल्ली सगळी कडे सर्रास मिळतो..पुण्यात हाँकाँग लेन वर विचारा तिथे मिळेल.. मी हा बडोद्यात घेतला होता.. इथे एकदम हिट्ट झाला हा आय्टम..१०-१२ जोडाची ऑर्डर बुकिंगपण झाले आहे..;)

सुप्रिया's picture

3 Aug 2010 - 11:07 am | सुप्रिया

एकदम मस्त वर्णन!

मस्त कलंदर's picture

3 Aug 2010 - 11:20 am | मस्त कलंदर

आयुष्यात अजून काय काय करायचे याची एक भली मोठी यादीच आहे माझ्याकडे. त्यातले बंजी जंपीग जमेल की नाही माहित नाही, पण पॅराग्लायडिंग नक्कीच करायचेय. हा लेख वाचून आधी हातपाय थरथर कापले तरी, नंतर मलापण जमेलसं वाटत आहे...

अवांतराबाबत अदिती आणि नाईल्याशी सहमत!!!

मस्तच.
वर्णन तर वर्णन फोटो पण लै भारी.

केसु आणि विलासरावांमुळे ब्राझील ची सफर घडते आहे.
दोघांना धंन्स.

नगरीनिरंजन's picture

3 Aug 2010 - 2:48 pm | नगरीनिरंजन

हा अनुभव एकदा घेतलाच पाहिजे! तुम्ही लिहिलंयही छान!

विकास's picture

3 Aug 2010 - 4:06 pm | विकास

एकदम मस्त अनुभव आणि फोटो!

लिखाळ's picture

3 Aug 2010 - 4:15 pm | लिखाळ

जोरदार... :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

3 Aug 2010 - 4:22 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

च्यायला, केसू तुमचा हेवा वाटला. वर्णन आणि फोटो एकदम झकास.

-दिलीप बिरुटे

झकास्....फोटो हापिसातून दिसले नाहीत.
पण नुसत्या वर्णानामुळेसुद्धा दर्शनाचा थरार अनुभवता येतोय.
लै लै लै लै लै भार्री

प्रियाली's picture

3 Aug 2010 - 4:49 pm | प्रियाली

लेखात कार्लोस हे नाव पाहिलं आणि दरदरून घाम फुटला. ;)

बाकी लेख वाचायची हिम्मत झाली नाही. ;) असो. ही फक्त दखल बाकी प्रतिसाद लेख वाचल्यावर.

माया's picture

3 Aug 2010 - 4:53 pm | माया

सॉलीड!!!

चतुरंग's picture

3 Aug 2010 - 4:55 pm | चतुरंग

वर्णन आणि फोटू दोन्ही! ज ह ब ह र्‍या हा अनुभव राव!!
(काल चेपु वर फोटू बघितले होते आज पुन्हा बघताना तीच मजा आली.)
(अवांतर - 'गोंदवले कर' कधीपासून झालात?)

चतुरंग

केशवसुमार's picture

3 Aug 2010 - 5:06 pm | केशवसुमार

रंगाशेठ,
आम्ही 'तातपुरते गोंदव' ले 'कर'
(गजनी)केशवसुमार

प्रभो's picture

3 Aug 2010 - 7:05 pm | प्रभो

भारी!!

सगळे फोटू मस्त आलेत.
ते पाहून बर्‍याचजणांना पॅराग्लायडींगला जावेसे वाटत असेल.
आपण हे धाडस करू शकू का? असा प्रश्न मीही स्वत:ला विचारला (मनातल्या मनात).
धिरड्यापासून सुरुवात करून वार्‍यामुळे रँप मॅनेजरने लावलेल्या लाल झेंड्यापर्यंतच माझी उडी.;)
त्यानंतर २५ - ३० मिनिटे वाट पाहून लाल झेंडा निघाला कि घरी परत.
(फोटू बघून भिती वाटली हे कबूल करायला हवे.)

केशवसुमार's picture

3 Aug 2010 - 9:39 pm | केशवसुमार

पेद्रो दि गावा वरून दिसणारा रँप

RAMP

रेवती's picture

3 Aug 2010 - 10:55 pm | रेवती

अपने बस कि बात नही|
एकवेळ तात्पुरते टॅटू करून घेता येइल पण पॅराग्लायडींगला जाणे आणि दातखीळ बसवून घेणे हे एकच!;)
तुम्ही दाखवलेला स्पॉट दिसतोय मात्र भन्नाट!

मस्त कलंदर's picture

4 Aug 2010 - 1:09 am | मस्त कलंदर

लै डेंजर जागा आहे... सपशेल माघार...

राजेश घासकडवी's picture

4 Aug 2010 - 1:27 am | राजेश घासकडवी

या फोटोमुळे एकदम सगळा पर्स्पेक्टीव येतो. मस्त.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

4 Aug 2010 - 1:12 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

झकास फोटो आहे.
हे असले फोटो दाखवलेत तर गोंदण्याचा गुन्हाही घरचे माफ करतील बहुदा! पण तो टॅटू जाम आवडला. एकदातरी मलाही असले किडे करून पहायचेच आहेत.

चिन्मना's picture

4 Aug 2010 - 7:35 am | चिन्मना

आईशप्पथ! भन्नाट जागा आहे !! जबरी मजा आली असेल पॅराग्लायडिंगला. ब्राझीलला जायच्या कारणांमध्ये अजून एकाची भर.....

वेअरेबल टॅटू एकदम हिट आहे :-)

Nile's picture

4 Aug 2010 - 12:31 pm | Nile

मस्त! बेस्ट जागा.

मीनल's picture

4 Aug 2010 - 12:46 am | मीनल

मजा येत असेल मुक्त आकाशातून( आपण बांधलेले सुरक्षित असताना) खाली पहाणे.

बायका नेतात का हो आकाशात?
आम्ही कसं काय `त्याला` इतकं खेटून बसणार?????
ते नाही जमणारं.
टॅटू जमेल. हाय काय आनि नाय काय!

दिनेश's picture

4 Aug 2010 - 12:55 am | दिनेश

च्यायला मजा केलीस तर. इकडे ये. येत्या विंटरमध्ये स्नो-फॉल होताना ह्या गोष्टी करु.
बाकी मला पण सफर घडवलीस आकाशातून...

दिनेश
(कोदा लिखाणाला कंटाळलेला)

बहुगुणी's picture

4 Aug 2010 - 1:21 am | बहुगुणी

आणि फोटोही खासच.

शेवटी जमिनीवर उतरतांनाचे फोटो नाहीत का? तो नंतर चा take-off spot चा फोटो पाहिल्यावर Landing देखील सोपं नसावं असं वाटलं...

मस्त कलंदर's picture

4 Aug 2010 - 1:27 am | मस्त कलंदर

असेच वाटले तो फोटो पाहून....

केशवसुमार's picture

4 Aug 2010 - 2:09 am | केशवसुमार

जमिनीवर येतानाचा व्हिडिओ आहे.. फाइल साइजच्या प्रॉब्लेम मुळे इथे टाकला नाही..समुद्र किनार्‍यावरच्या (रँप वरून समोर दिसणार्‍या) वाळूत उतरलो .. नक्की कसे Landing होणार आणि कुठला भाग शेकणार ह्या विचारात जमिन पायाला कधी लागली हे समजले नाही..
उडी मारतानाच इतकी तंतरली होती की जमिनीवर येताना फार काही वाटलेच नाही..;)

...पहायला आवडेल.

सन्जोप राव's picture

4 Aug 2010 - 7:50 am | सन्जोप राव

प्रचंड थरारक अनुभव असणार यात शंका नाही. तूर्त परमै**त आनंद मानणार्‍या भाद्रपदी म्हातार्‍या कुत्र्याप्रमाणे टाळ्या वाजवतो.

स्वप्निल..'s picture

4 Aug 2010 - 9:05 am | स्वप्निल..

अरे वा .. सहिच .कधी चान्स मिळाला तर करेन नक्की ..

अशीच मजा मला स्काय डायव्हींग करतांना आली होती :)

च्यायला ह्यात काय मोठसं ? हे तर आम्ही दर शनिवारी करतो . रात्री आठ नंतर.
ह्या गटारीला तर लई मोठा प्रोग्राम है.

बाकी फोटू सरस !

केशवसुमार's picture

5 Aug 2010 - 12:32 am | केशवसुमार

प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार!
(आभारी)केशवसुमार