टी. पी.

वारा's picture
वारा in काथ्याकूट
28 Apr 2010 - 5:12 pm
गाभा: 

आमची भारतीय कंपनी एका जापानी इलेक्ट्रोनीक कंपनीची ओथोराइस्ड डीस्ट्रीब्युटर आहे.
नॉर्मली टेक्नीकल सपोर्ट वाल्यांचे काम कस्ट्मर ओरीएंटेड असते. पाच सहा वर्षे काम केल्यावर तसा सगळा प्रोड्क्ट परीवार समजुन जातो. यानंतर सहसा कोणी अभ्यास करत बसत नाही. जुन्याच स्किमा कॉपी पेस्ट करुन कस्ट्मर कडे फॉरवर्ड केल्या जातात. आणि लोकांच्या संगणक टि.पी. स्किल्स हळुहळु कळायला लागतात. काही स्कील्स खाली देत आहे , मिपा करानी याला अजुन प्रगल्भ करावे अशी ईच्छा. (याचा उपयोग आम्हालाही भविष्यात होईल.)

१) डेस्कटॉप वर उजवा क्लीक करुन रिफ्रेश करणे. (अंदाजे प्रत्येक १०/१५ मिनीटांनी)
२) एक्स्प्लोरर ओपन करुन क्लोज करणे
३) दर तासाने व्हायरस स्कॅन चालवणे.
४) स्कॅन डिस्क, डिस्क डिफ्रॅग, सिस्टीम चेकींग करणे
५) लॅपटॉप, पी.सी. रीस्टार्ट करणे.

प्रतिक्रिया

नितिन थत्ते's picture

28 Apr 2010 - 6:16 pm | नितिन थत्ते

>>डेस्कटॉप वर उजवा क्लीक करुन रिफ्रेश करणे. (अंदाजे प्रत्येक १०/१५ मिनीटांनी)

१०/१५ मिनिटे फार होतात. १०/१५ सेकंद म्हणायचं होतं का तुम्हाला? १०/१५ मिनिटे म्हणजे तुमच्याकडे फारच काम असतं बुवा.... ;)

नितिन थत्ते

योगी९००'s picture

28 Apr 2010 - 8:32 pm | योगी९००

>>डेस्कटॉप वर उजवा क्लीक करुन रिफ्रेश करणे. (अंदाजे प्रत्येक १०/१५ मिनीटांनी)
ही एक फार विचित्र सवय आहे. माझ्या एका मित्राला संगणकावर काम करताना उगाच डेस्कटॉप वर रिफ्रेश करायची सवय आहे. तो जेव्हा जेव्हा डेस्कटॉप वर येतो त्या त्या वेळी एकामागोमाग एक असे २/३ वेळा डेस्कटॉप वर उजवा क्लीक करुन रिफ्रेश करतो...कारण काय..? (सवय हेच कारण)

त्याचे बघून बघून मलाही ही सवय थोडी लागली होती. त्याच्याबरोबर कधी काम करत असलो आणि संगणकाचा ताबा त्याच्याकडे असला तर फार irritate होतं.

खादाडमाऊ

मेघवेडा's picture

28 Apr 2010 - 9:22 pm | मेघवेडा

मला इथं लेख वाचताना वाचत असलेला परिच्छेद सिलेक्ट करून वाचायची सवय लागली. त्या सवयीचा परिणाम असा झाला, की वेळ जात नसेल, 'टीपी' करायचा असेल तर उगाचच कुठलाही लेख उघडून फक्त सिलेक्ट, डीसिलेक्ट करत बसतो मी! वाचत नसलो तरीही!! :)

-- मेघवेडा!

भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!

Nile's picture

29 Apr 2010 - 2:16 am | Nile

च्यायला मी पण करतो असं (वाचताना सिलेक्ट, उगाच नाही करत बसत).

अस्मी's picture

29 Apr 2010 - 10:03 am | अस्मी

मलाही अश्शीच सवय आहे परिच्छेद सिलेक्ट करुन वाचण्याची :)
आणि असं का करते, त्याने काय विशेष होतं ते माहीत नाही....

- अस्मिता

*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
कुणीही कसं दिसावं यापेक्षा कसं असावं याला महत्त्व आहे. ते शक्य नसेल तर जास्तीत जास्त कसं नसावं याल तरी नक्कीच महत्त्व आहे.

देवदत्त's picture

28 Apr 2010 - 9:24 pm | देवदत्त

छ्य्य्या....

त्यापेक्षा १० मिनिटांनी विंडोज एक्स्प्लोअरर मध्ये एक एक फोल्डर निवडून Delete कळ दाबा. पुढील वेळी Recycle Bin मध्ये जाऊन पुन्हा Restore करा. ;)

>>१०/१५ मिनिटे फार होतात. १०/१५ सेकंद म्हणायचं होतं का तुम्हाला? १०/१५ मिनिटे म्हणजे तुमच्याकडे फारच काम असतं बुवा....

तसे समजा, नाहितरी सेकंदापेक्षा मिनीटे मोजली की दीवस लवकर संपतो.

>> तो जेव्हा जेव्हा डेस्कटॉप वर येतो त्या त्या वेळी एकामागोमाग एक असे २/३ वेळा डेस्कटॉप वर उजवा क्लीक करुन रिफ्रेश करतो...कारण काय..? (सवय हेच कारण)

सेम, सेम, आमच्या एका ओफिस बंधुला सारखे स्क्रोल चक्र करकरत, पुढे मागे न्यायची सवय आहे त्यामुळे त्याचे डॉक्युमेंट सारखे वर खाली होत असते. मला वाट्ते की हा सेल्स वाला असल्यामुळे याचे डॉक्युमेंट कोण वाचु नये म्हणुन असा करतो की काय?

>>मला इथं लेख वाचताना वाचत असलेला परिच्छेद सिलेक्ट करून वाचायची सवय लागली

करेक्ट!!!!

>>Recycle Bin मध्ये जाऊन पुन्हा Restore करा

:) :) व्हेरी गूड.

भारद्वाज's picture

29 Apr 2010 - 12:17 am | भारद्वाज

माझा मित्र हवं असलेलं फोल्डर ओपन करण्याआधी नेहमीच चूकीचं फोल्डर ओपन करतो आणि मग लगेच बॅक करतो. असं २-३ वेळा झाल्यावर त्याला नेमकं फोल्डर दिसतं.

Nile's picture

29 Apr 2010 - 2:23 am | Nile

मला एक लागलेली सवय म्हणजे सतत कंप्युटरवर काहीतरी सुरु हवे. थोडावेळ कंप्यु काही करत नसेल तर मी लगेच ब्राउझर उघडुन समस्त सोशल सायटी उघडतो (काही नवं आहे का बघतो, नसतंच साऱहं कुठुन येईल?)अन बंद करतो.

सुचेल तसं's picture

29 Apr 2010 - 2:51 am | सुचेल तसं

१. मॅच चालू असेल तर क्रिकइन्फोवर जाऊन सारखं स्कोअरकार्ड रिफ्रेश करत रहाणं (ते आपोआप काही वेळानी रिफ्रेश होत असेल तरीही) . दोन्ही संघातल्या प्रत्येक खेळाडूचं उगीचच प्रोफाईल पहात बसणं.

२. थोड्या थोड्या वेळानी ईसकाळवर जाऊन एखाद्या लेखावर आपण दिलेली कमेंट प्रसिद्ध झाली की नाही ते पहाणं. (खवचट कमेंट असेल तर ईसकाळवाले लवकर प्रसिद्धपण करत नाहीत)

३. रोज सगळे बँक अकाऊंट्स, लोन अकाऊंट चेक करत बसणं.. फारच बोअर होत असेल तर १०० रुपये सेविंग अकाऊंट मधून करंट मधे आणि परत करंटमधून सेविंगमधे ट्रान्सफर करणं.

४. वीकीपीडियात जाऊन ज्याचं नाव डोक्यात येईल त्याची माहिती सर्च करून वाचत बसणं.. त्या लेखात आलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या नावावर टिचकी मारुन उगीचच त्याची माहिती वाचत बसणं...

५. आयएमडीबीवर जाऊन जे डोक्यात येईल त्या चित्रपटाची माहिती वाचत बसणं.. मग त्या चित्रपटाच्या दिग्दर्शकाची खाजगी माहिती, आत्तापर्यंतचे चित्रपट ह्यांची माहिती वाचत बसणं.

६. मटावर जाऊन जेवढं काही वाचणं हापिसात शक्य आहे तेवढं वाचणं आणि उरलेलं घरी जाऊन पहाणं. :-)

७. मायक्रोसॉफ्ट वर्डमधे जाऊन एखाद्या इंग्लिश शब्दाचे समानार्थी शब्द बघत बसणं (शिफ्ट + एफ७ दाबून).. एखाद्या समानार्थी शब्दावर टिचकी मारून त्याच्या समानार्थी शब्दांच्या यादीत मूळ शब्द येतोय का नाही ते पहाणं.

८. आणि महत्त्वाचं म्हणजे - उरलेल्या वेळात हापिसचं काम करणं.. :-)

अस्मी's picture

29 Apr 2010 - 10:07 am | अस्मी

मॅच चालू असेल तर क्रिकइन्फोवर जाऊन सारखं स्कोअरकार्ड रिफ्रेश करत रहाणं (ते आपोआप काही वेळानी रिफ्रेश होत असेल तरीही)

एखाद्या समानार्थी शब्दावर टिचकी मारून त्याच्या समानार्थी शब्दांच्या यादीत मूळ शब्द येतोय का नाही ते पहाणं.

:) करेक्ट

- अस्मिता

*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*
कुणीही कसं दिसावं यापेक्षा कसं असावं याला महत्त्व आहे. ते शक्य नसेल तर जास्तीत जास्त कसं नसावं याल तरी नक्कीच महत्त्व आहे.

वारा's picture

29 Apr 2010 - 3:24 pm | वारा

बापरे....

प्रत्येक गोष्ट अर्धा अर्धा तास जरी केली तरी चांगले ४ , ५ तास जातिल राहिलेले २ , ३ तास घालवणे काय अवघड नाही हो.

शुचि's picture

29 Apr 2010 - 3:48 am | शुचि

(१) नवर्‍याला दिवसातनं २ फोन - प्रत्येकी १५ मिनिटांचे
(२) १५ वेळा प्रसाधनगृहात जाऊन आरसा बघून येणे
(३) चॅप्स्टिक ओठांवर फिरवणे ३५ वेळा
(४) मिपा वर पडीक असणे पण पाहुणे म्हणून :D
(५) मेल्स डिलीट करून मग डिलीट फोल्डर मधून सावकाश एक एक मेल डिलीट करणे
(६) कॉफी चा त्रास होतो? डिकॅफ चा मारा करणे. फुकट आहे.
(७) आपलं कॅलेंडर उघडून पुढच्या महीन्याच्या मीटींग्जचा आढावा घेणे ज्यात आपली उपस्थिती नगण्य असते तरीही. :D
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
विश्वच अवघे ओठा लावून, कुब्जा प्याली तो मुरलीरव
डोळ्यांमधुनी थेंब सुखाचे, हे माझ्यास्तव..हे माझ्यास्तव

वारा's picture

29 Apr 2010 - 3:27 pm | वारा

फोन प्रकरण.. कंपनीचा असेल तर अजुन मजा.

वाचक's picture

29 Apr 2010 - 4:22 am | वाचक

काढणे आणि वाचणे आणि प्रतिसाद देणे :)

वारा's picture

29 Apr 2010 - 3:28 pm | वारा

सेम .. तुम्ही पण यात आलात.

भय्या's picture

29 Apr 2010 - 8:04 am | भय्या

हा काय प्रकार आहे बुवा!!

शुचि's picture

29 Apr 2010 - 9:57 am | शुचि

कॅफेन काढून टाकलेली कॉफी
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
विश्वच अवघे ओठा लावून, कुब्जा प्याली तो मुरलीरव
डोळ्यांमधुनी थेंब सुखाचे, हे माझ्यास्तव..हे माझ्यास्तव

प्रमोद्_पुणे's picture

29 Apr 2010 - 11:35 am | प्रमोद्_पुणे

(१) रोजच्या रोज timesheet लिहिण्यात अर्धा एक तास घालवणे (काहिच काम केले नसेल तर timesheet भरणे ही एक कलाच आहे..);
(२) विकी वर नवनवीन देश, व्यक्तींची माहिती वाचणे;
(३) increment जवळ आले असेल तर उगाच किती पगार वाढ होइल आणि किती bonus मिळेल (स्वतःला आणि 'हितचिंतकांना') ह्याची calculations करत बसणे;
(४) इसकाळ, मिपा उघडून बसणे (म्हणजे microssoft outlook open केल्यावर लगेच) ई..ई..

वारा's picture

29 Apr 2010 - 3:30 pm | वारा

>>काहिच काम केले नसेल तर timesheet भरणे ही एक कलाच

अशा कलागुणांना आपण चालना दिली पाहीजे..