पाईल्स कुठे आहेत?

नितिनकरमरकर's picture
नितिनकरमरकर in जनातलं, मनातलं
16 Mar 2010 - 8:57 am

मी सध्या कामानिमित्ते इंदोनेशियात जाकार्ताला रहातो. रोजच्या संभाशणासाठी इंग्लिशचा इतका प्रॉब्लेम येत नाही पण काही काही गोष्टीत मात्र फारच पंचाईत होते. त्याचाच हा एक छोटासा विनोदी किस्सा.

इथे येऊन २ महिने झाले आणि अचानकच मूळव्याधीचा त्रास चालू झाला. *** "मोड" येणे म्हणजे काय त्रास असतो ते जो या अनुभवातून गेला आहे त्यालाच समजेल. आणि मी तर "पहिलटकरीण" होतो! आधी खरेतर असा त्रास कधी झाला नव्हता. इथल्या खाण्या मुळे असेल (*** साठी पु. ल. - रावसाहेब वाचा अथवा ऐका).

भरपूर हिरव्या मिरच्या, लसूण असतो इथल्या भाज्यांमध्ये आणि ८-१० दिवसातून एकदा फणसा ची भाजी! यामुळे असावे. कैलास जीवन आणि बियोकेमिकल १७ नंबर ने फरक पडेना. मग डॉक्टर शोधत हिंडलो - नुसता डॉक्टर काही कामाचा नाही त्याला इंग्लीश यायला हवे ना!

शेवटी माल केलापा गाडिंग मधील एका फार्मेसी गेलो. तेथे येणे प्रमाणे संवाद घडला--

मी : बिसा बिचारा इंग्लीश? (मी स्वता: एक बिचारा आहे हे तिला सांगता येईल का?)
ती: ओन्ली लिट्ल
मी : Is there a doctor nearby? I want to see one urgently!
ती : कम इनसाइड, प्लीज़
मी आपला निमुट पणे तिच्या मागून गेलो, तिने मला एका पांढ-या डगलेवाल्या बाई समोर नुसतेच सोडून दिले. ती डॉक्टर असण्याची शक्यता होती.
मी : Are you a Doctor? (What a stupid question - हे आपले मनातच!)
ती : या (बहासा मधे या म्हणजे होय असाही अर्थ आहे आणि काही समजले नाही तरी नुसतेच या म्हणतात.) त्यामूळे मला समजेना की तिला नक्की प्रश्न कळला आहे की नाही? मी परत तिलाही विचारले;
मी : बिसा बिचारा इंग्लीश?
ती : एस, प्लीज़,
मी : Are you a Doctor? (Again the same Stupid question...)
ती : Yes.
मी : I came to Indomesia about 2 months back and I think I am suffering from piles.

तिने नुसतेच मख्खपणे माझ्याकडे पहिले.
मी : Doctor, I think I am suffering from piles. I came to Indonesia about 2 months back, and the change in the food could be one of the reasons.
ती : So you are suffering from Diarrhea? (Oh! my god! no Piles, Piles!)
मी : No Doctor! Piles not Diarrhea.
ती : (कन्फ्यूज़्ड) You write it down. (मला वाटले माझ्या वेगळ्या accent मूळे तिला समजत नसावे!)
मग मी तिला लिहून दिले, तिला ते समजले असे वाटले पण तिच्या प्रश्नाने आता आव, हिवताप वगैरे सर्व रोग होतील असे वाटले,
ती : Oh! Piles!, Where is it? (खलास हिला नक्की समजले आहे ना?)
मी : At the bottom (Is there any better way of telling where the piles are? मला तरी माहीत नाही.)
ती : ok. I will give you tablets and cream. etc. etc -----
गोळ्या वगैरे घेऊन बाहेर पडलो आणि तडक घरी येऊन गूगल वर बसलो!. तिने दिलेल्या औषधांची "मेडिकल" नावे "गूगल" केली, ती योग्य असावित असे वाटले, पण शेवटी Skype वरून रात्री बोलतांना, डॉ. आपटे यांच्या कडून खात्री करून मगच ती घेणे सुरू केले.

इच्छुकांसाठी -- "Tail Lamp" आता पूर्णपणे "विझला" आहे!

देशांतरअनुभव

प्रतिक्रिया

हर्षद आनंदी's picture

16 Mar 2010 - 9:13 am | हर्षद आनंदी

इच्छुकांसाठी -- "Tail Lamp" आता पूर्णपणे "विझला" आहे!

नाहीतर..

शिग्ण्लच्या जाग्येवर नस्ता बसविला का?

दुर्जनं प्रथमं वंदे सज्जनं तदनन्तरं | मुखप्रक्षालनात पूर्वं गुदप्रक्षालनं यथा ||

प्रमोद देव's picture

16 Mar 2010 - 9:20 am | प्रमोद देव

मुळव्याध म्हटलं असतंत तर कदाचित जास्त सहज समजलं असतं असं वाटतंय...
कारण इंडोनेशियन लोकांत(भाषेत) संस्कृतचा प्रभाव बराच दिसतो. :)

विसोबा खेचर's picture

16 Mar 2010 - 9:23 am | विसोबा खेचर

मस्तच! :)

तात्या.

बिपिन कार्यकर्ते's picture

16 Mar 2010 - 9:31 am | बिपिन कार्यकर्ते

हाहाहा!!!! लै भारी. नशीब अ‍ॅक्टिंग करून दाखवावं लागलं नाही. या मूळव्याधीवरून ते "त्यांच्यासारखं एक तान घेऊन दाखवा, मूळव्याध होतं की नाही बघा." हे आठवलं... :)

बिपिन कार्यकर्ते

मदनबाण's picture

16 Mar 2010 - 9:36 am | मदनबाण

हा.हा.हा...त्यात्या जशा देवगडच्या म्हणी सांगतात तशीच एखादी म्हण सांगायची तिला,लगेच समजले असते दुखा:चे "मुळ"

मदनबाण.....

मोती बनून शिंपल्यात राहण्यापेक्षा दवबिंदू होऊन चातकाची तहान भागविणे जास्त श्रेष्ठ.
www.mazeyoutube.blogspot.com

नावातकायआहे's picture

16 Mar 2010 - 7:12 pm | नावातकायआहे

वाचा.....

आज जरा मूड आहे व वेळ ही....... ~X(

शुचि's picture

16 Mar 2010 - 7:22 pm | शुचि

ह. ह. पु. वा.
>>मी : At the bottom (Is there any better way of telling where the piles are? मला तरी माहीत नाही.)>>
=)) =))
***********************************
we (women) go from mothers to men with no self in between. Once we wanted to be "nice girls". Now we are "nice married ladies" - just like mother.

गणपा's picture

16 Mar 2010 - 7:30 pm | गणपा

=)) =)) =)) =)) =)) =))

शानबा५१२'s picture

16 Mar 2010 - 8:13 pm | शानबा५१२

गूगलबद्दलचा आदर वाढला................................
गूगल नेक्सस व नोकिया ५८०० चा वेडा

_____________चुकीचा समजला गेलेला,मानुसघान्या अणि एक केले से भी अकेला असा..........

चतुरंग's picture

16 Mar 2010 - 8:14 pm | चतुरंग

भारीच प्रश्न पाईल्स कुठे आहेत? काय चपखल नाव आहे ना 'मूळव्याध!'
'अवघड जागचे दुखणे आणि बाई डॉक्टर!' ;)
आपण लिहिलेला अनुभव भारीच आहे.
व्याधापासून सुटका व्हावी म्हणून शुभेच्छा! :)
(मग शेवटी बहासा मध्ये काय म्हणतात पाईल्सला ते समजले की नाही?)

चतुरंग

jaypal's picture

16 Mar 2010 - 9:41 pm | jaypal

तुमच म्हणन खरोखरीच योग्य आहे .ज्याच जळतं त्यालाच कळतं. बरे झालात हे चांगलच झाल पण आता आहारात अंजिर+केळे ही दोन फळे कायम ठेवा. नुतन वर्ष आरोग्यदायी जावो. :-)
आवडती फळे = अंजीर + केळे
***************************************************
दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/

टारझन's picture

16 Mar 2010 - 10:25 pm | टारझन

एवढा उपद्व्याप करण्या पेक्षा पत्र लिहीलं असतंत एखाद =)) जकार्ता मधेच होतात तसे ही =)) पटकन् पोचलं असतं

असो .. पाईल्स विषयी बरंच ऐकुन आहे :) त्यामुळे तो बरा होण्यासाठी शुभेच्छा ! ते शेवटचं वाक्य कळलं नाही :)

- (अनैच्छुक) टारझन

प्राजु's picture

16 Mar 2010 - 10:40 pm | प्राजु

हाहाहा.. सह्हीये किस्सा हा.
- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.net/