आई आहे तर मी आहे.........

मंगेशपावसकर's picture
मंगेशपावसकर in काथ्याकूट
9 Mar 2010 - 10:29 am
गाभा: 

दुर्गे दुर्घटभारी तुझवीण संसारी अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी....

स्त्री ची क्षत्रू स्त्रीच असते हे खरे असले तरी स्त्री शृंगार पुरुषासाठीच करते, म्हणून त्यावर आक्षेप घेणे चुकीचे आहे, आमच्या वोर्क अरेना मध्येही अशाच सुंदर क्याजुअल वस्त्रे परिधान केलेल्या ललना (फ्रेंड्स ) येतात आम्ही त्यांचाशी फ्लर्ट ही करतो. पण मुक्तपणे, स्वैर, त्यानाही दुखावत नाही. परत कॅफेटेरिया मध्ये एकत्रच लंच घेतो. दोन स्त्रियांचा भांडणात त्यांचा बहुतेक वेळा विषय स्वतःचा पुरूषच असतो. आई असेल तर मुलासाठी, बहिण असेल तर भावासाठी, प्रेयसी असेल तर प्रियकरासाठी, पत्नी असेल तर पतीसाठी एकंदरीत स्त्री हि दिव्यासाठी (पुरुष ) स्वतःला अखंड जाळून घेणारी वातच म्हणावी लागेल.
आरक्षणासारखी चिंधी स्त्रियांपुढे ढकलून राजनीती तर चालली आहेच पण खाजगी नोकरदार वर्गात स्त्रियांचे प्रमाण लक्षात घेता व त्यांची कर्तुत्व क्षमता पाहून त्यांना त्याची गरज नाही असे दिसून येते. माझ्या कुठल्याही योग्य पावलाला माझ्या आईचा खंबीर पाठींबा असतो म्हणून मला माझ्या कार्यावर आत्मविश्वास असतो.
थोडक्यात काय आई आहे तर मी आहे.

दुर्गे दुर्घटभारी तुझवीण संसारी अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी....

प्रतिक्रिया

शाहरुख's picture

9 Mar 2010 - 10:40 am | शाहरुख

स्त्री ची क्षत्रू स्त्रीच असते..... हे खरे असले तरी स्त्री शृंगार पुरुषासाठीच करते, म्हणून त्यावर आक्षेप घेणे चुकीचे आहे

"....." च्या जागी काय आहे ?

शाहरुख's picture

9 Mar 2010 - 11:04 am | शाहरुख

माझ्या प्रतिसादामुळे श्री. पावसकर यांनी लेखातील वर दर्शवलेल्या वाक्यात योग्य ती सुधारणा केली असल्याने माझा हा आणि वरील प्रतिसाद उडवावा अशी मी संपादक मंडळास विनंती करतो.

प्रकाश घाटपांडे's picture

9 Mar 2010 - 12:41 pm | प्रकाश घाटपांडे

एक (सु) (कु) विचार
स्त्री ही क्षणाची पत्नी व अनंतकाळची माता असते.
प्रकाश घाटपांडे
आमच्या जालनिशीत जरुर डोकवा.