बाँबस्फोट ,सुरक्षा आणि गुप्तचर संस्था

चिरोटा's picture
चिरोटा in काथ्याकूट
16 Feb 2010 - 3:14 am
गाभा: 

गेल्या काही वर्षात आपण देशाच्या सुरक्षा व्यवस्थेचा पार बोजवारा उडालेला पाहतो आहोत्. मुंबई ,दिल्ली,जयपुर्,हैद्राबाद्,कोइम्ब्तोर्,कोलकाता ...आता पुणे सगळीकडेच पोलिस,राज्य/केंद्र सरकार हतबल.'हयगय केली जाणार नाही' वगैरे ठरलेली भाषा,मंत्र्यांचे चौकशीचे आदेश्,निवृत्त अधिकार्‍यांची समिती,त्यांची पोलिसदलाला 'आधुनिक' बनवण्याची शिफारस. मग अडते कुठे?
जवळपास अशा प्रकारच्या बातमीत 'केंद्रिय गुप्तचर संस्थांनी आधीच इशारे दिले होते' अशा प्रकारची वाक्ये हमखास आढळतात्.गेल्या काही दिवसांत अशा संस्थांविषयी इंटरनेटवर काही माहिती मिळते का बघितले. पण भारतिय संस्था भलत्याच गुप्त निघाल्या. अमेरिकेच्या सी.आय्.ए. ची साइट आहे,गोर्‍या साहेबाच्या MI6 ची साईट आहे,इस्रायलच्या मोसादची पण साईट आहे.पण भारतिय गुप्तचर संस्थांची वेब साईट नाही.
भारतिय वृत्तपत्रांमध्येही ह्यासंस्थांविषयी कधीही माहिती येत नाही.टी.व्ही चॅनेल्सपण ह्या संस्थांविषयी विषयी बोलायचे टाळतात.
प्रश्न पडतो की ह्या संस्थांचे काम चालते तरी कसे? Official Secret Act विषयी मला जास्त माहिती नाही पण आजच्या जगात ह्या संस्था,त्यांचे कामकाज् एवढ्या प्रमाणात गुप्त ठेवण्याचे कारण काय?भारताच्या अंतर्गत सुरक्षेसाठी इंटिलिजन्स ब्युरो ही संस्था आहे तर बाह्य सुरक्षेसाठी रॉ नावाची संस्था आहे एवढेच ऐकून आहे.रॉ चा वार्षिक जमाखर्च कॅग तपासत नाहीत असेही वाचले होते.

प्रतिक्रिया

मदनबाण's picture

16 Feb 2010 - 3:55 am | मदनबाण

काय आहे हिंदुस्थानातल्या गुप्तचर संस्था भलत्याच गुप्त आहेत्,,,ज्याचा पत्ता सी.आय्.ए. किंवा मोसाद सुद्धा लावु शकणार नाहीत!!! तर तुमच्या आमच्या सारख्या सामान्य नागरिकांना कुठुन त्यांच्या बद्धल कळणार ???
त्यांची माहिती फक्त आपल्या राजकारण्यांना असते ते सुद्धा असे बॉम्ब्स्फोट्,घातपात झाले की ती त्यांना कळते.पोलिस बिचारे काय करणार त्यांच्या स्वतःच्याच सुरक्षेतेची मारामार आहे... करकरेंच जॅकिट तर अजुन सापडलं नाहीये,तर गुप्तचर खात्याचं काय घेऊन बसलात !!!

(ब्योमकेश बक्षीचा पंखा)
मदनबाण.....
http://en.wikipedia.org/wiki/Byomkesh_Bakshi

विनायक रानडे's picture

16 Feb 2010 - 8:53 am | विनायक रानडे

तथाकथित निधर्मी (कर्तव्य विसरलेले) लोकांचा पाया व कणा नसतो, हे त्यांच्या निधर्मी भुमिकेत बसत नाही. त्यामुळे प्रत्येक बाबतीत संधी साधुपणा व त्यातून घोळ घालणे फार सोपे असल्याने हे सगळे फारसे प्रयत्न न करता घडवून आणले जाते. त्यात तशाच घोळकराना पोसले जाते. त्यामुळेच केव्हाही सत्ता मिळवणे सोपे असते. जन्ता (जनता नव्हे, हे लक्षात घ्या) घोळात त्या त्या घटकलेला पोट भरल्याशी मतलब राखून असते. पुढिल दुवा समजण्याचा प्रयत्न करा. असे घोळ काही स्वार्थी मंडळी मुद्दाम घडवून आणतात. त्यात त्यांना यश मिळते.
http://video.google.com/videoplay?docid=-594683847743189197#

What does Christianity, 911 and The Federal Reserve all have in common?

विनायक रानडे's picture

16 Feb 2010 - 6:31 pm | विनायक रानडे

अधि व्हिडीओ बघा, समजण्याचा प्रयत्न करा, मग समजेल ह्या गुप्तचर संस्था काय करतात ह्यांचा बोलविता धनी कोण? बटणे कोठून, का, केव्हा, कशी हलतात? बाबू पासून नेत्या पर्यंत निवड का, केव्हा, कशी होते हे "कौन्टीन्ग" ह्या बुश इलेक्शन प्रक्रियेशी संबंधित सिनेमा समजण्याच्या प्रयत्नातून उमजेल.

चिरोटा's picture

16 Feb 2010 - 9:37 am | चिरोटा

'तथाकथित' निधर्मी लोकांचा आणि गुप्तचर संस्थांचा संबंध कळला नाही.भारतात सत्ताधारी/विरोधी पक्ष गुप्तचर संस्थांमध्ये पारदर्शकता आणण्याची मागणी का करत नाहीत? मिडिया,पत्रकार् ह्या संस्थांबद्दल कधीच चर्चा करताना/लिहिताना का आढळत नाहीत? हे प्रश्न आहेत.
गेल्या पन्नास वर्षात सरकार कुठल्याही पक्षाचे असो, ह्या संस्थांविषयी गुप्तता पाळण्याचे धोरण कायम दिसते.
भेंडी
P = NP

विनायक रानडे's picture

16 Feb 2010 - 6:36 pm | विनायक रानडे

अधि व्हिडीओ बघा, समजण्याचा प्रयत्न करा, मग समजेल ह्या गुप्तचर संस्था काय करतात ह्यांचा बोलविता धनी कोण? बटणे कोठून, का, केव्हा, कशी हलतात? बाबू पासून नेत्या पर्यंत निवड का, केव्हा, कशी होते हे "कौन्टीन्ग" ह्या बुश इलेक्शन प्रक्रियेशी संबंधित सिनेमा समजण्याच्या प्रयत्नातून उमजेल. कोणताही मिडीया कोणाचा आहे? ह्यांचे पोट कोण कसे ताब्यात ठेवते?

सुधीर१३७'s picture

16 Feb 2010 - 6:11 pm | सुधीर१३७

:T प्रश्न पडतो की ह्या संस्थांचे काम चालते तरी कसे? :T :T

काम (?) केले तर ना...................... कशाला नसत्या चवकशा करता राव ?

आपले काम करा..................................... ते काहीच

काम करणार नाहीत याची खात्री बाळगा........................................... X( :''( :B

प्रमोद देव's picture

16 Feb 2010 - 7:47 pm | प्रमोद देव

दोघेही आपापली कामं व्यवस्थित करताहेत म्हणून अशा प्रकारच्या घटना क्वचितच घडतात. गुप्तचर संघटना आणि पोलिस दल ह्यांच्यावर नियंत्रण मात्र सत्ताधारी पक्षाचं असल्याने त्या त्या पक्षाच्या फायद्यासाठीही ह्या संघटना वापरल्या जातात...ज्यामुळे कैक वेळेला ह्या संघटनांची प्राथमिकता त्यांच्या मुख्य कामाऐवजी सटरफटर कामांना द्यावी लागते.

सरकार म्हणजेच बॉस....बॉस इज ऑलवेज राइट ह्या नियमाप्रमाणे कोणत्याही सरकारी संस्थांना(म्हणजेच त्यातील कर्मचार्‍यांना) तत्सम सरकारचे ऐकावेच लागते.

अजून एक महत्वाची गोष्ट. गुप्तचर संघटना असोत अथवा पोलिस...त्यांना कोणतीही खबर मिळाली तरी ती त्यांनी सरकारला...(पक्षी) पंतप्रधान,गृहमंत्री,मुख्यमंत्री वगैरे त्या त्या ठिकाणच्या प्रमुख मंत्र्यांना कळवायची असते. त्यांना स्वत:ला निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य नसतं...लोकशाहीत तर वरून आदेश आल्याशिवाय झाडाचं पानही हलत नाही असा कारभार आहे. मंत्री-संत्री आपापल्या कुवतीप्रमाणे,अकलेप्रमाणे आणि सोईप्रमाणे आदेश देतात....त्यामुळे बर्‍याच वेळा ’वेळ’ टळून गेलेली असते.
तोवर हातात आलेल्या माहितीचे तीन-तेरा-पावणे-बारा झालेले असतात.
बर्‍याचदा कारवाई कुणी करावी...केंद्राने की राज्याने...ह्यामध्ये एकमेकांच्या कोर्टात चेंडू ढकलण्यात कालहरण होत असते....त्यामुळे रात्रंदिवस मेहनत करून केलेल्या कामाचे चीज होण्याऐवजी ह्या संघटनांचे श्रम अक्षरश: पाण्यात जातात.

हा विषय वरून दिसतो तेवढा सरळ साधा नाही. ह्यात बर्‍याच वरिष्ठ राजकीय-अराजकिय व्यक्तींचे लागेबांधे,साटेलोटे असते.
असो.

इति अलम्‌!

**********
भले तर देऊ कासेची लंगोटी ।
नाठाळाचे माथी हाणू काठी ॥

चिरोटा's picture

16 Feb 2010 - 11:02 pm | चिरोटा

ह्यात बर्‍याच वरिष्ठ राजकीय-अराजकिय व्यक्तींचे लागेबांधे,साटेलोटे असते.

माजी पंतप्रधान इंदिरा गांधींनी ह्या दोन्ही संघटना दावणीला बांधल्या होत्या असे म्हणतात.मोठ्या प्रमाणावर विरोधकांचा काटा काढण्याचे काम ह्या संघटनातर्फे होत असे.सत्ताधारी असोत वा विरोधक कोणाकडूनच ह्या कामात पारदर्शकता आणण्याची मागणी होत नाही ह्याचे आश्चर्य वाटते.
रॉ ह्या संघटनेत तर मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार चालतो. रॉ चे माजी संचालक अशोक चतुर्वेदी(http://en.wikipedia.org/wiki/Ashok_Chaturvedi )हे एक असे उदाहरण. रॉ चे एक माजी संयुक्त संचालक सिंग ह्यांनी लिहिलेल्या पुस्तकाचा हा दुवा सापडला.(http://www.easternbookcorporation.com/moreinfo.php?txt_searchstring=14541 )
पुस्तक प्रसिद्ध झाल्यावर सी.बी.आय. तर्फे सिंग ह्यांच्या घरावर धाड घालण्यात आली व त्यांना अटक करण्यात आली.
भेंडी
P = NP