कंपार्टमेंट

विनायक प्रभू's picture
विनायक प्रभू in काथ्याकूट
15 Feb 2010 - 5:55 pm
गाभा: 

खरे तर 'अ' शी मैत्री व्हायचे काहीही कारण नव्हते.
एका अत्यंत जवळच्या मित्राने करुन दिली.
हळु हळु मैत्री वाढली.
एकत्र बसणे उठणे होउ लागले.
मैत्री घनिष्ठ झाली.
एकमेकांशी रोज बोलणे होउ लागले.
तसे 'अ' चे वर्तुळ फार मोठे.
त्या वर्तुळातले काही जण मित्र होउ लागले.
मैफिली जमु लागल्या.
अगदी वर्तुळातातले परदेशी असलेले सुद्धा भारत भेटीत न चुकता भेटु लागले.
एकंदरीत सगळे मजेत चालले होते.
काही कारणाने 'अ' चे वर्तुळातल्या 'ब' शी भांडण झाले.
सुरुवात अगदी छोटीशी झाली.
त्याचे वणव्यात रुपांतर झाले.
एकमेकांच्या पाठीवर थाप मारणारे पाठीवर वार करु लागले.
वर्तुळ गोंधळले.
काय करावे कळेना.
'अ' आणि 'ब' ची सार्वजनिक ठिकाणी एकमेकांची निर्भत्सना इतरांना त्रासदायक ठरु लागली.
मग त्यात दोन तट पडले.
कोण बरोबर कोण चुक ह्या बद्द्ल न्याय होउन हे तट वेगळे झाले.
पण काही जणाना हे मुळ स्वभावाने न्यायधिश होणे जमले नाही.
मग त्या सर्वांनी एकमेकांशी संपर्क साधुन एक निर्णय घेतला.
कोण चुक कोण बरोबर हा निर्णय आपण घ्यायचा नाही.
'अ' चे 'ब' शी शत्रुत्व हे वेगळे कंपार्ट्मेंट.
आपल्याला दोघेही सारखे.
इथे मैत्री करायला वेळ मिळत नाही.
दुष्मनीच्या पाट्या का उचलायच्या?
दोघांच्या बरोबर मैत्री तेवढीच निभवायची.
दोघांनाही एकच सांगायचे,
मी कुणाचीही बाजु घेणार नाही.
आपली मैत्री आणि तुम्हा दोघांची लढाई ही वेगवेगळी कंपार्ट्मेंट्स.
आणि ह्या मुद्द्यावर तुम्हा दोघांपैकी कुणाला आमची मैत्री सोडावीशी वाटली तर ती तुमची मर्जी.
काय म्हणता मंडळी तुम्हाला काय वाटते?

प्रतिक्रिया

पाषाणभेद's picture

15 Feb 2010 - 6:35 pm | पाषाणभेद

कोणता झेंडा घेवू हाती चा दुसरा अंक. (का तिसरा?)

The universal symbol for diabetes
डायबेटीस विरुद्ध लढा

महाराष्ट्र भाषा असे मराठी | घालीतसे लाथ नडणार्‍यांच्या कटी||

महाराष्ट्र संतकवी पाषाणभेद
शके १५६३

श्रावण मोडक's picture

15 Feb 2010 - 6:52 pm | श्रावण मोडक

आम्ही लईच सावधानता पाळून एवढंच म्हंतो की, भापो!
खरं तर इथंच थांबायचं होतं. पण आत्ताच काही पाहिलं इतरत्र आणि ता. क. वाढवावा लागला -
ही भांडणं का करतात हे एकदा या 'अ' आणि 'ब' लाही विचारून घ्या हो. त्यांचे भांडणाचे मुद्देही टिकत नसावेत असे हे ताजं काही वाचल्यावर वाटू लागलंय. इथं इतरांचाच बळी जातो. तुम्ही धागा काढण्यामागं तो हेतू नसला तरी, आता तो चिकटू शकतो बरं...

टारझन's picture

15 Feb 2010 - 8:36 pm | टारझन

असेच म्हणतोय :)

-(उरलेली भुतावळ) टारझन
आम्ही आता "क" कंपनी काढण्याचा विचार करतोय =))

सुनील's picture

15 Feb 2010 - 8:48 pm | सुनील

लेखातील मताशी सहमत.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

शुचि's picture

15 Feb 2010 - 11:46 pm | शुचि

मला महीत नसलेल्या विषयात बोलते आहे पण १ जरूर उद्दृत करावसं वाटतं .मला वाटतं गडकर्‍यांच्या ओळी आहेत -

प्रेम कोणीही करेना
का अशी "फरियाद" खोटी
प्रेम लाभे प्रेमळाला
त्याग ही त्याची कसोटी.

दोघांवर प्रेम करत ... यासारखी उत्तम गोष्ट नाही. :)
**********************************
या जगात दुर्लभ असे काही असेल तर ती सद्वासना आहे - वाचनात आलेला सद्विचार (ज्ञनेश्वरीतील ओवीवर आधरीत)

महेश हतोळकर's picture

16 Feb 2010 - 9:27 am | महेश हतोळकर

भा पो

समंजस's picture

16 Feb 2010 - 10:29 am | समंजस

नेहमीप्रमाणे छान झालंय मास्तर!! :)
पण हे कोणी सांगीतलंय की भांडणं व्हायला कारणं हवीत म्हणून :>
अहो जिथे ४ मराठी माणसं एकत्र येणार तिथे भांडणं ही होणारच. कारण असो वा नसो :D

सुनील's picture

16 Feb 2010 - 12:20 pm | सुनील

हॅ हॅ हॅ

गावात तीन मराठी टाळकी जमली की एक महाराष्ट्र मंडळ काढले जाते. आणि चौथे टाळके आले, की गावात दोन मंडळे होतात!!

चालायचच!!

हॅ हॅ हॅ

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

16 Feb 2010 - 6:04 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मी कुणाचीही बाजु घेणार नाही.

व्वा मास्तर...! सहमत आहे.

-दिलीप बिरुटे