माध्यमांनो असे हताश होऊ नका.....

अभिज्ञ's picture
अभिज्ञ in काथ्याकूट
13 Feb 2010 - 11:50 pm
गाभा: 

निखील वागळे,राजीव खांडेकर,राजदीप सरदेसाई ह्यांच्या सह सागरीका घोष व अभिग्यान प्रकाश ह्या सर्वच मंडळींना

जाहीर विनंती कि त्यांनी कृपया करून पुणे बॊम्बस्फ़ोट वगैरे सारख्या दुय्यम घटनांकडे पुर्णपणे दुर्लक्ष करावे

MNIK ,

मराठी माणसाची निंदानालस्ती करणारे टॉक शोज,

शिवसेनेच्या नावाने बोम्बाबोम्ब, छा गये राहुल

यांसारखे महत्वाचे कार्यक्र्म दाखविण्याची त्वरीत व्यवस्था करावी.

देशाच्या द्रृष्टीने ते सर्वात महत्वाचे विषय आहेत हे ध्यानात असावे म्हणजे झाले व त्याहि पेक्षा महत्वाचे म्हणजे आपली टी आर पी आहे हे फ़क्त विसरू नका.

प्रतिक्रिया

मुक्तसुनीत's picture

14 Feb 2010 - 12:06 am | मुक्तसुनीत

विषयातले छद्म समजले. पण अर्थातच , सध्या टीआर्पी हा केवळ स्फोटांवर असणार हे खरे आहे. स्फोटाच्या बातम्या देणे हेच सध्या धंद्याला फायदेशीर.

फास्टरफेणे's picture

14 Feb 2010 - 12:14 am | फास्टरफेणे

पवार: मुंबईत ११ बाँबस्फोट झाले तरी मुंबई नॉर्मल होती...पुणेकरांवर माझा पूर्ण विश्वास आहे. (११ बाँबस्फोट झाले तरी पुणे नॉर्मल असेल !)

अशोक खान: हेडली पुणेमें जिस जिस जगह गये थे वह सभी जगहोंकी तलाशी ली जा रही है! (हेडलीविषयी एवढा आदर! "गये थे"!!!)

फास्टरफेणे's picture

14 Feb 2010 - 12:36 am | फास्टरफेणे

मी खानाच्या सिनेमाची ४ दिवसांच्या सगळ्या खेळांची तिकिटे घेतली आहेत...सध्या चित्रपटगृह सगळ्यात सुरक्षित जागा आहे !

अभिज्ञ's picture

14 Feb 2010 - 12:37 am | अभिज्ञ

....../\.....

हा लै लै लैच उच्च होता.

अभिज्ञ.

--------------------------------------------------------
पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.

फास्टरफेणे's picture

14 Feb 2010 - 12:46 am | फास्टरफेणे

आर्रर्रर्र आबा पण पोचले वाटतं !

थोडीच तिकीटं शिल्लक आहेत, एका तिकीटाची किंमत रु. ६३००० फक्त !

http://www.hindu.com/2010/02/13/stories/2010021358340100.htm

बिपिन कार्यकर्ते's picture

14 Feb 2010 - 12:49 am | बिपिन कार्यकर्ते

_/\_

फाफे... अतिशय मार्मिक आणि जोरदार टोला हाणलाय. काय बोलणार?

बिपिन कार्यकर्ते

शानबा५१२'s picture

14 Feb 2010 - 9:10 am | शानबा५१२

दाद कि काय बोलतात ती अशा प्रतिक्रियेंना द्यायलाच हवी

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

14 Feb 2010 - 10:43 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>मी खानाच्या सिनेमाची ४ दिवसांच्या सगळ्या खेळांची तिकिटे घेतली आहेत...सध्या चित्रपटगृह सगळ्यात सुरक्षित जागा आहे !

खरंय ! सुरक्षीत जागा तीच म्हणावी लागेल. च्यायला, हे खान समर्थक ज्या पद्धतीने टी-शर्ट, तिकिटे, दाखवून आम्ही 'जिंकलो' असा अविर्भाव दाखवत आहेत. [खरं तर तो माज म्हणावा वाटतोय] त्या हरामखोर साल्यांना सार्वजनिक चौकात चोपले पाहिजे असे, वाटत आहे.

पुण्यात हल्ला होणार हे माहिती होते. आणि असे असूनही तेथील सुरक्षा काढून घेतली. ते मात्र चूक झाले. सुरक्षा काढून ती जर चित्रपट थेट्रांना देणार असाल तर खेट्राची आठवण होणार नाही तर काय हो ?

-दिलीप बिरुटे

[भडकलेला ]

फास्टरफेणे's picture

14 Feb 2010 - 1:12 am | फास्टरफेणे

आपण यांना ओळखता का?

हे आहेत खानाचे चाहते...सिनेमा बघायला मिळणार म्हणून केवढा आनंद झालाय...
अरे हो...सिनेमा बघून झाल्यावर आणखी एक महत्वाचं काम करायचं आहे त्यांना... कोणतं काय विचारता? "मेणबत्त्या लावायचं " !

चला...मेणबत्त्यांचा स्टॉल लावावा...सध्या चांगली मागणी आहे. (कोण म्हणतो मराठी माणसाकडे "व्यावसायिक दूरदृष्टी" नसते म्हणून? :p)

मनीषा's picture

14 Feb 2010 - 9:42 am | मनीषा

आणि फुले?
व्हॅलेंटाईन डे साठी बाजारात आलेली फुले श्रद्धांजली साठी वापरावी कि नविन फुले मागवावीत?
बघा --- आपले राज्यसरकार उद्योजकांसाठी आणि व्यापारा साठी नविन संधी उपलब्ध करुन देते आहे ..

वर्षा म्हसकर-नायर's picture

14 Feb 2010 - 9:57 am | वर्षा म्हसकर-नायर

फाफे,
उत्कृष्ट मार्मिक लिहीले आहे आपण. एकदम सही.

हुप्प्या's picture

14 Feb 2010 - 10:22 am | हुप्प्या

अशा मामुली घटना तर नेहमीच घडतात. विचारा धाकल्या आबासाहेबांना.
ऐशे मामूली हादशे तो हरदम होते र्‍हैते है.

तिमा's picture

14 Feb 2010 - 7:49 pm | तिमा

पैला 'रेड अ‍ॅलर्ट' संपायच्या आंत पुन्ना बांब फुटला तर कंचा अ‍ॅलर्ट म्हन्तात वो?

हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|