"ने मजसी ने" ची शताब्दी

विकास's picture
विकास in काथ्याकूट
10 Dec 2009 - 4:03 am
गाभा: 

आज लोकसत्तेतील लताच्या मुलाखतीत म्हणल्याप्रमाणे उद्या उद्या (१० डिसेंबर, २००९) ला स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहीलेल्या "ने मजसी ने परत मातृभूमीला" या काव्यास शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. हे वाचकांपर्यंत पोचवल्याबद्दल लोकसत्तेचे आभार!

याबाबत कधीच ऐकलेले नव्हते तसेच जालावर देखील माहीती मिळाली नाही. कुणास अधिक माहीती असल्यास अवश्य सांगा.

तर्काने विचार केल्यावर इतके नक्की लक्षात आले की ही कविता १९०९ मधे लिहीली असावी. सावरकरांना १९१० मधे अटक करण्यात आली. त्याच्या थोडे आधी म्हणजे ऑगस्ट १९०९ मधे मदललाल धिंग्राला फाशी झाली. त्याच्या आधी टिळकांची (१९०८) मंडलेला रवानगी झाली...त्या सुमाराचा आणि नंतरचा काळ हा विशेषकरून ब्रिटनमधील भारतीय क्रांतिकारकांसाठी त्रासदायक (frustration आणणारा) ठरला. कधीकाळी वाचलेल्या भा.द.खेर आणि शैलजा राजे यांच्या "यज्ञ" कादंबरीत असा उल्लेख होता की एका ब्रिटीश युवतीने, जी त्यांच्या मागावर गुप्तहेर म्हणून होती पण त्यांची हितचिंतकही नंतर झाली, तीने त्यांना सांगितले की इथून निघून जा वगैरे... पण ते ऐकण्याच्या मनःस्थितीत सावरकर नव्हते. त्याच सुमारास त्यांना ब्रायटनच्या किनार्‍यावर घराच्या आणि देशाच्या आठवणीने तसेच असहाय्य भावनेत हे काव्य सुचले. जितके हृदयनाथांनी दिलेले संगीत हे ह्या गाण्यातील आर्तभाव श्रोत्यांपर्यंत पोहचवतात (जालावर पटकन दुवा मिळाला नाही), तितकेच बाबुजींनी स्वरबद्ध केलेले पण...

प्रतिक्रिया

या गीतातील भावना शब्दात पकडणे, अशक्य..

बाबुंजींनी हे गाणे अधीक सोपे करुन लोकांपर्यंत पोहोचवले

दोन्ही विभुतींपुढे नतमस्तक

आम्ही हिंदूत्ववादी !!
आमची शाखा कुठेही नाही..

मदनबाण's picture

10 Dec 2009 - 4:42 am | मदनबाण

हे गाणं जेव्हा पण ऐकतो तेव्हा, डोळ्यात पाणी येतेच.
या महानायकास कोटी कोटी प्रणाम...

हेच गाणं वेगळ्या चालीत :---
http://www.youtube.com/watch?v=GJfB7Nm8d4k

मदनबाण.....

घाटावरचे भट's picture

10 Dec 2009 - 9:36 am | घाटावरचे भट

Get this widget | Track details | eSnips Social DNA

हृदयनाथांचं 'ने मजसी'. ऐकू न आल्यास हा दुवा.

आशिष सुर्वे's picture

10 Dec 2009 - 9:53 am | आशिष सुर्वे

हे काव्य जेव्हा जेव्हा मी ऐकतो, तेव्हा तेव्हा मला एका आगळ्याच अनुभूतीचा अनुभव येतो..
हे काव्य म्हणजे एक भव्य-दिव्य साक्षात्कार आहे..
-
कोकणी फणस

प्रशु's picture

10 Dec 2009 - 3:56 pm | प्रशु

जेव्हा जेव्हा हे गीत ए॑कतो, तेव्हा तेव्हा व्याकुळ व्हायला होते. स्वातंत्रवीरांच्या अलो॑किक प्रतिभेचा हा एक आविष्कार आहे.

'तो बालगुलाबहि आता रे, फुलबाग मला हाय पोरका झाला'.....
लहान मुलाचा म्रुत्यु, घरादारासकट कुटुंबांची झालेली ससेहोलपट, त्यानंतरची जन्मठेप हे सगळं पचऊन हा महानायक 'अनादि मी अनंत मी' होऊन काळाच्या पुढे गेलाय.

अंदमानातली सावरकरांची वचन तुम्ही काढु शकाल, कारण तुमचं क्रर्तुत्वच तेवढ आहे पण आमच्या मनातील ह्या महानायकाच्या खुणा तुम्ही कशा काय मीटवणार......

संपुर्ण सावरकर कुटुंबासमोर नतमस्तक......
प्रशु.

स्वाती२'s picture

10 Dec 2009 - 5:02 pm | स्वाती२

स्वातंत्र्यवीर सावरकरांना शतशः प्रणाम!