बोधीवृक्षावरची बांडगुळं

शैलेन्द्र's picture
शैलेन्द्र in काथ्याकूट
6 Dec 2009 - 8:52 pm
गाभा: 

लोकसत्ताच्या लोकरंग पुरवणीतील बोधीवृक्षावरची बांडगुळे लेख वाचनात आला. हे विचार प्रथमच मांडले गेलेत असे नव्हे किंवा मध्यमवर्गाला अपराधीच्या पिंजर्‍यात ऊभी करायची पद्धतही नवीन नाही. पण माझ्यासारख्या रुढार्थाने पांढरपेशा समाजात न जन्मलेल्या पण आत्ता पांढरपेशाचे जीवन जगणार्‍या सामान्याच्या मनात या लेखाने काही प्रश्न ऊभे राहीले,

  • जर जातींच्या भींती विरघळवणे हे अंतीम ध्येय असेल तर जातीवर आधारीत वेगळेपण टीकवावे व जोपासावे या विचाराचे समर्थन कसे होवु शकते?
  • माणसाच्या नैसर्गीक प्रव्रुत्तिने तो सुखसिन असतो, ईतिहासातुन शिकने वेगळे व ईतिहास चघळने वेगळे, जर आज बरीचशी सुख स्वकर्तुत्वावर मीळत असतील तर ज्या समाजाने पुर्वी अन्याय केला त्याच्याशी आज फटकुन वागावे का?
  • एका विशिष्ट जातीचे (हल्ली समाज म्हणतात त्याला) प्रतिनीधीत्व करणारा राजकीय पक्ष कधीही यशस्वी होणार नाही हे समजायला अजुन कीती वर्ष जावी लागतिल?

असेच अजुनही बरेच प्रश्न मनात आहेत, चर्चेच्या ओघात तेही पुढे येतील,

मिपावरील जाणकारांकडुन याचे अजुन पैलु जाणुन घेण्याची ईच्छा आहे.

प्रतिक्रिया

देवदत्त's picture

6 Dec 2009 - 8:58 pm | देवदत्त

नेमका कोणता लेख? त्याचा दुवा मिळू शकेल का? संदर्भाशिवाय दिलेली प्रतिक्रिया चुकीची ठरू शकेल.

शैलेन्द्र's picture

6 Dec 2009 - 9:05 pm | शैलेन्द्र

दुवा प्रकाशित झाला नाही, प्रयत्न चालु आहे.

सुहास's picture

7 Dec 2009 - 1:09 am | सुहास

लेख वाचला.. आंबेडकरांच्या जयंती आणि पुण्यतिथीलाच मराठी वृत्तपत्रांना रिपब्लिकन ऐक्याची आठवण का येते ते कळत नाही.. :) असो..

•माणसाच्या नैसर्गीक प्रव्रुत्तिने तो सुखसिन असतो, ईतिहासातुन शिकने वेगळे व ईतिहास चघळने वेगळे, जर आज बरीचशी सुख स्वकर्तुत्वावर मीळत असतील तर ज्या समाजाने पुर्वी अन्याय केला त्याच्याशी आज फटकुन वागावे का?

जरूर नाही.. पण आपल्याला हवे ते मिळाले की आपल्या समाजबांधवालाही हवे ते मिळावे यासाठी प्रयत्न करायला काय हरकत आहे?

--सुहास

शैलेन्द्र's picture

7 Dec 2009 - 9:28 am | शैलेन्द्र

फक्त समाजबांधवाला की गरजुला?

रिपब्लिकन ऐक्याची आज फार गरज नाही, त्यातुन काही साधनारही नाही, अशा कीती जागा महाराष्ट्रातुन फक्त बौध्ध समाजाच्या मतावर निवडुन येतील? आणी तिथेही नव्याने तयार झालेला मध्यमवर्ग बौद्ध म्हणुन विचार न करता मध्यमवर्ग म्हणुन विचार करतो(जे माझ्यामते चांगले आहे.) रिपब्लिकन पक्षाने एकतर सर्वसमावेशक व्हावे वा विसर्जीत व्हावे. केवळ एका जातीचा पक्ष म्हणुन त्याला काहीहि भवितव्य नाही असे वाटते.

सुहास's picture

7 Dec 2009 - 11:08 am | सुहास

फक्त समाजबांधवाला की गरजुला?

गरजूला.. मी "सर्वजातीसमावेशक" या अर्थाने समाजबांधव हा शब्द वापरलाय, पण चुकून तसा उल्लेख करणे राहून गेले..! दुर्दैवाने महाराष्ट्राच्या काही भागात बौद्ध आणि इतर मागासवर्गियांमध्येच सरकारी सोयी-सवलतींबद्द्ल अजूनही प्रचंड उदासीनता आहे, त्यामुळे त्यांना त्याचा लाभ घेता येत नाही, पण जे काही सध्या सरकारी सोयी-सवलतींचा लाभ घेतायत तेही त्यांना पुरेशा प्रमाणात जागरूक करताना दिसत नाहीत (काही लोक तर दुर्दैवाने फक्त स्वतःच्या कुटुंबापलिकडे काही पाहताना दिसत नाहीत) ज्यामुळे या सोयी-सवलतींच्या मूळ हेतूलाच धोका पोहचतोय.. अर्थात बौध्द समाजातील मध्यमवर्गाने या बाबतीत काही प्रयत्न केले तर ते वावगे ठरू नये..

रिपब्लिकन पक्षाने एकतर सर्वसमावेशक व्हावे वा विसर्जीत व्हावे. केवळ एका जातीचा पक्ष म्हणुन त्याला काहीहि भवितव्य नाही असे वाटते.

बरोबर.. मला वाटते बाबासाहेबांच्या स्वप्नातील रिपब्लीकन पक्ष फक्त बौध्दांचाच नसावा तर तो बहुजनांचा असावा जो प्रस्थापितांना (कॉन्ग्रेसला) समर्थ पर्याय ठरू शकेल, त्यामुळे रिपब्लिकन पक्षाने एकतर सर्वसमावेशक व्हावे वा विसर्जीत व्हावे याच्याशी सहमत..

बाकी निवडणुकीबद्द्ल म्हणाल तर फक्त "खैरलांजी" प्रकरणावर रान उठवून रिपब्लीकनांना ४-५ जागा सहज मिळवता आल्या असत्या असं मला कधी-कधी वाटतं.. :) पण निवडणुकीत "खैरलांजी" तला "ख" तरी ऐकला का कुणी..?

अवांतरः आपण दया पवारांचे "बलुतं" वाचलंय काय? त्यात त्यांनी रिपब्लीकन पक्षातील दिखाऊ पुढार्‍यांवर मस्त टिका केलीय..

--सुहास

शैलेन्द्र's picture

7 Dec 2009 - 11:04 pm | शैलेन्द्र

"बाकी निवडणुकीबद्द्ल म्हणाल तर फक्त "खैरलांजी" प्रकरणावर रान उठवून रिपब्लीकनांना ४-५ जागा सहज मिळवता आल्या असत्या असं मला कधी-कधी वाटतं.. Smile पण निवडणुकीत "खैरलांजी" तला "ख" तरी ऐकला का कुणी..?"

मला नाही वाटतं, रान उठवायचे म्हणजे कोणाविरुध्द उठवायचे? कोणत्याही एका समाजाने खैरलांजी घडवले नाही, काही नराधमांनी केलेले ते नृशंस कृत्य होते. शासनाने गलथानपना केला पण तो या शासनाचा स्थायीभाव आहे. जातीपातीच्या आरशाबाहेरही खैरलांजी हा जघन्य अपराध आहे आणी फक्त आर पी आयनेच तो हाताळावा अशी अपेक्षा करणे हे त्यांना पुन्हा त्याच वर्तुळात खेचण्यासारखे आहे. महागाइ/ भ्रष्टाचार/ रस्ते/ पाणी / वीज असे सर्वसमावेशक विषय घेवुन व जातीच्या परीघाबाहेरील लोकांना सामावुन घेवुन जोपर्यंत आर पी आय पुढे जात नाही तोवर त्यांना काहीही भवितव्य नाही.

सुहास's picture

8 Dec 2009 - 11:38 pm | सुहास

रान उठवायचे म्हणजे कोणाविरुध्द उठवायचे?

अर्थात सरकारविरूध्द..

शासनाने गलथानपना केला पण तो या शासनाचा स्थायीभाव आहे.

म्हणून गप्प बसायचे? खैरलांजी एक उदाहरण आहे.. मानवी मूल्यांना (सर्वच जातीतील ) पायदळी तुडवण्याचे प्रकार राजरोसपणे या महाराष्ट्रात होत असताना अशा शासनाकडे "स्थायीभाव" म्हणून दुर्लक्ष करावे? आणि जे लोक (rpi) अशा भावनिक प्रश्नाचे राजकारण करू शकत नाही, ते लोक महागाइ/ भ्रष्टाचार/ रस्ते/ पाणी / वीज या तांत्रिक प्रश्नाचे राजकारण काय करणार?

महागाइ/ भ्रष्टाचार/ रस्ते/ पाणी / वीज असे सर्वसमावेशक विषय घेवुन व जातीच्या परीघाबाहेरील लोकांना सामावुन घेवुन जोपर्यंत आर पी आय पुढे जात नाही तोवर त्यांना काहीही भवितव्य नाही.

मान्य, पण दुर्दैवाने महागाइ/ भ्रष्टाचार/ रस्ते/ पाणी / वीज असे सर्वसमावेशक विषय घेवुन निवडणु़का जिंकता येत नाहीत सध्यातरी ..

जातीच्या परीघाबाहेरील लोकांना सामावुन घेवुन जोपर्यंत आर पी आय पुढे जात नाही तोवर त्यांना काहीही भवितव्य नाही, हेही मान्य.. पण कोणता पक्ष जातीयवादी नाहीय ? आज निवडणुकीच्या काळात जातीवर आधारित बेरिज-वजाबाक्या होतायतच ना?

असो. आता थांबू.

--सुहास

प्रकाश घाटपांडे's picture

7 Dec 2009 - 10:02 am | प्रकाश घाटपांडे

पण आपल्याला हवे ते मिळाले की आपल्या समाजबांधवालाही हवे ते मिळावे यासाठी प्रयत्न करायला काय हरकत आहे?

गर्दीच्या एस्टीत शिरणार्‍या जमावातील लोक धक्काबुक्की करुन एकदाचे आत शिरले कि बाहेरील लोकांना थोपवण्यासाठी दरवाजा बंद करण्याचा प्रयत्न करतात. कारण बाहेरील लोक आत आले तर त्यांचा अवकाश कमी होणार असतो.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

सुहास's picture

7 Dec 2009 - 11:13 am | सुहास

आपल्या सर्वच मराठी समाजाची ही अडचण असावी म्हणून मुंबैत मराठी टक्का घसरतोय असे मला वाटते.. :)

--सुहास

टारझन's picture

7 Dec 2009 - 10:48 am | टारझन

"जातीचे" राजकारण करणार्‍यांचा निषेध !!
ह्याच्यात ते काँग्रेसवालेच सर्वांत पुढे वाटतात मला :)
बाकी लेखाचे शिर्षक आवडले !

स्वानन्द's picture

7 Dec 2009 - 3:53 pm | स्वानन्द

>>>जर जातींच्या भींती विरघळवणे हे अंतीम ध्येय असेल तर जातीवर आधारीत वेगळेपण टीकवावे व जोपासावे या विचाराचे समर्थन कसे होवु शकते?
होऊ शकत नाही. पण मग निवडणूकांसाठी मुद्दा कुठला वापरणार? म्हणूनच तर यासाठी राजकीय प्रयत्न कधी होताना दिसत नाहीत.

>>>>माणसाच्या नैसर्गीक प्रव्रुत्तिने तो सुखसिन असतो, ईतिहासातुन शिकने वेगळे व ईतिहास चघळने वेगळे, जर आज बरीचशी सुख स्वकर्तुत्वावर मीळत असतील तर ज्या समाजाने पुर्वी अन्याय केला त्याच्याशी आज फटकुन वागावे का?
अगदी योग्य. कारण उलट जर असे फटकून वागत राहिले तर मग त्या त्या समाजाकडून ही हीच प्रतीक्रिया येईल. आणि 'सामाजिक ऐक्य' हे मूळ उद्दीष्ट कधीच साध्य होऊ शकणार नाही.

>>>>>>एका विशिष्ट जातीचे (हल्ली समाज म्हणतात त्याला) प्रतिनीधीत्व करणारा राजकीय पक्ष कधीही यशस्वी होणार नाही हे समजायला अजुन कीती वर्ष जावी लागतिल?
जोपर्यंत विकासाचा मुद्दा उभा करून कुठला राजकीय पक्ष उभा राहत नाही आणि जनता त्यांच्या प्रतिनिधींना निवडून देत नाही तोपर्यंत हेच चालत राहणार.
( उदाहरणा दाखल : सद्ध्या मनसे विकासाच्या मुद्द्यावर बोलाताना दिसते. पण केवळ विकास हा मुद्दा दाखवल्याने लोक त्यानच्याकडे वळले असते असे तरी वाटत नाही. पण मराठी हा मुद्दा घेताच ( हा मुद्दा बरोबर की चूक हा मुद्दा येथे नाही ) लोकांचा पाठींबा मात्र मोठ्या प्रमाणात मिळवता आला. )

स्वानन्दाचे डोही स्वानन्द तरंग!

प्रशु's picture

7 Dec 2009 - 2:49 pm | प्रशु

>>>>लोकांचा सपोर्ट मात्र मोठ्या प्रमाणात मिळवता आला.

क्रुपया शक्य तेथे मराठी शब्द वापरा.

सपोर्ट = पाठींबा

स्वानन्द's picture

7 Dec 2009 - 3:49 pm | स्वानन्द

आपल्या लेखनावर आमची विशेष नजर राहीलच :)
बाकी लेखावर आपले मत वाचायला अधिक आवडेल. म्हणजे विषयांतर ही टाळता येईल.

स्वानन्दाचे डोही स्वानन्द तरंग!