टेराकोटा पॉटरी प्रदर्शन

अजुन कच्चाच आहे's picture
अजुन कच्चाच आहे in कलादालन
10 Nov 2009 - 5:34 pm

टेराकोटा पॉटरी प्रदर्शन

आमंत्रण
पुण्यात येऊ शकणाऱ्या मिपाकरांसाठी खास

रायगड जिल्ह्यातील इंदापूर येथील “आकार पॉट आर्ट”तर्फे भाजलेल्या मातीच्या (टेराकोटा) कलाकृतींचे प्रदर्शन दि. १२ नोव्हें. ते १५ नोव्हें. २००९ च्या दरम्यान पुण्यात कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या कलादालनात आयोजीत करण्यात आले आहे.
सदर प्रदर्शनाचे उद्ग्घाटन डॉ. अभिजीत वैद्य, एम.डी. संस्थापक राष्ट्रीय आरोग्यसेना प्रमुख, यांच्या हस्ते, टेराकोटाचे तज्ज्ञ श्री. आनंद दामले यांच्या उपस्थीतीत, दि. १२ नोव्हें.२००९ रोजी सकाळी ९.३० वा. होणार आहे.
या प्रदर्शनात ग्रामीण भागातील कलाकारांनी तयार केलेल्या कुंभारकलेच्या विविध कलाकृती मांडण्यात येणार आहेत. तसेच त्या बनवण्याच्या काही पद्धतींचे प्रात्यक्षिकही दाखवण्यात येणार आहे.

प्रदर्शनाची वेळ : सकाळी १०.३० ते संध्या. ८.००
प्रात्यक्षिकांची वेळ : सकाळी ११.०० ते दुपारी १.००

कला

प्रतिक्रिया

टारझन's picture

10 Nov 2009 - 6:08 pm | टारझन

टेराकोटा पॉटरी प्रदर्शन

आगागागागा !! अंमळ नजरचुकीनं वेगळंच वाचलं .... आणि प्रदर्शनी डोळ्यासमोर आली =)) आणि अंमळ खपलोच !!

असो ... प्रदर्शनाला आमच्या शुभेच्छा !!

-- (पॉटरी प्रेमी) टॅरी पॉट्टीकर

अजुन कच्चाच आहे's picture

10 Nov 2009 - 7:42 pm | अजुन कच्चाच आहे

"आकार"च्या कामाची एक झलक

.................
अजून कच्चाच आहे.

सूहास's picture

10 Nov 2009 - 7:59 pm | सूहास (not verified)

बेस्ट लक ...येण जमणार नाही...

झाल्यावर फोतु टाक..

सू हा स...

पाषाणभेद's picture

11 Nov 2009 - 10:43 am | पाषाणभेद

आरे अजून कच्चाच आहे भाऊ, त्ये सगळ्ये मडके अजून कच्चे चे का भाजलेले हायेत? आँ? त्या अबू वानी? आँ?

जय मनसे प्रवृत्ती !
--------------------
पासानभेद बिहारी
(महारास्ट्र, कर्नाटक, गुजरात, आंधरप्रदेस, ब्रिटन, कैनडा, नोर्वे, रसीया, होलंड, जरमनी, अमरीका, आफ्रिका मैं नौकरी पाने के लिये हमे कन्टॅक करें|)