कॉंग्रेस आणि राष्‍ट्रवादीने अखेर डाव साधला

मड्डम's picture
मड्डम in काथ्याकूट
9 Nov 2009 - 5:06 pm
गाभा: 

कॉंग्रेस आणि राष्‍ट्रवादीने अखेर डाव साधला. मनसेच्‍या आमदारांनी सभागृहात घातलेल्‍या गोंधळाचे भांडवल करून मनसेच्‍या चार आमदारांना चार वर्षासाठी निलंबनाचा ठराव विधीमंडळ कामकाज मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी मांडला असून त्याला बहुमताच्‍या जोरावर मंजूर करून घेतले.

प्रतिक्रिया

पाषाणभेद's picture

9 Nov 2009 - 5:32 pm | पाषाणभेद

कायदेशीर रित्या अजून त्या आमदारांनी शपथ घेतलेली नाही. ते अजून आमदार झालेले नाहीत.

ठरावाला अनूमोदन देणारे 'मराठीचे मारक' आमदार राहतील.

जय मनसे प्रवृत्ती !
--------------------
पासानभेद बिहारी
(महारास्ट्र, कर्नाटक, गुजरात, आंधरप्रदेस, ब्रिटन, कैनडा, नोर्वे, रसीया, होलंड, जरमनी, अमरीका, आफ्रिका मैं नौकरी पाने के लिये हमे कन्टॅक करें|)

विजयसो's picture

9 Nov 2009 - 6:32 pm | विजयसो

निलंबन म्हणजे त्यांना विधिमंडलात बसता येणार नहीं अणि प्रश्न हि विचरता येणार नहीं एवढेच ना ?? की त्यांना त्यांच्या मतदार संघातील विकास कामे ही नहीं करता येणार ?

मड्डम's picture

10 Nov 2009 - 11:09 am | मड्डम

आमदारांना सभागृहातील तसेच इतर कोणत्याही प्रशासकीय बैठकांना बसता येणार नाही. त्यांना मिळणारे भत्ते, सोई व सुविधा दिल्‍या जाणार नाही. तसेच त्यांच्‍या मतदार संघाच्‍या विकासासाठी दिला जाणारा आमदार निधीही त्यांना मिळणार नाही. थोडक्यात केवळ नावापुरता आमदार...

माझी दुनिया's picture

9 Nov 2009 - 7:47 pm | माझी दुनिया

कॉंग्रेस आणि राष्‍ट्रवादीने अखेर डाव साधला

सहमत, ५ वर्षात मनसेने डोकेदुखी करून ठेवली असती, सगळ्याच पक्षांना. तेव्हा पहिल्याच दिवशी त्यांना इंगा दाखवलेला बरा म्हणून एरवी भांडणारे सगळे पक्ष याबाबतीत एकत्र आले. बाकी महाराष्ट्राच्या नामुष्कीशी एकालाही देणेघेणे नाही.
____________
माझ्या लिखाणावर सर्व प्रकाशकांची मोजकी प्रतिक्रिया असते : साभार परत !
_____________
माझी दुनिया

धमाल मुलगा's picture

9 Nov 2009 - 8:00 pm | धमाल मुलगा

५ वर्षात मनसेने डोकेदुखी करून ठेवली असती, सगळ्याच पक्षांना. तेव्हा पहिल्याच दिवशी त्यांना इंगा दाखवलेला बरा म्हणून एरवी भांडणारे सगळे पक्ष याबाबतीत एकत्र आले.

की, स्वतःला अडचणीत आणु शकतील अशा प्रश्नांचा पाठपुरावा आक्रमकरित्या करुन उत्तरं द्यायला भाग पाडु शकतील मनसेचे आमदार म्हणुन स्वतःची कातडी वाचवण्यासाठी एकत्र आले? अर्थात हे तर येणारा काळच ठरवेल, नाही का? :)

>>बाकी महाराष्ट्राच्या नामुष्कीशी एकालाही देणेघेणे नाही.
ह्म्म..हे बाकी खरं हं! २६/११चा अहवाल गुंडगिरी करुन दाबला तेव्हा नव्हती का नामुष्की? रोज उठुन नवे उद्योगधंदे परराज्यात जाऊ लागले आहेत तेव्हा नाही होत वाटतं नामुष्की??

नानांच्या प्रतिसादातल्याप्रमाणे पिंडीवर विंचु बसला तरी तो खेटरानं मारायलाच हवा..महादेवाच्या पिंडीवर आहे मग कसं खेटर लावावं असा विचार करुन घातच होणार ना?

महाराष्ट्राची नामुष्की होते जेव्हा २ मराठी माणसं एकमेकांशी अमराठी भाषेत बोलतात, जेव्हा अबु आझमीसारख्यांना महाराष्ट्रातुन निवडुन येता येतं...महाराष्ट्राबाहेरचे इथं येऊन आमदार-खासदार होतात..आपापल्या व्होटबँकेच्या जीवावर वल्गना करत महाराष्ट्राच्याच छाताडावर नाचतात!
....................अर्थात हे जेव्हा कळेल तेव्हा कळेल...तोवर चालुद्यात ज्यांना करायचाय त्यांना उदो उदो!

पाषाणभेद's picture

9 Nov 2009 - 8:35 pm | पाषाणभेद

नाशिकच्या मनसेचे आमदार श्री. वसंत गिते यांना निलंबीत करण्यात राष्ट्रवादिचे छगन भुजबळांचा हात असला पाहिजे. वसंत गिते फार मागे होते. या आधी सभागृहांत अशा घटना घडलेल्या होत्या. त्या वेळी असली कारवाही करण्यात आली नव्हती. छगन भुजबळांना नाशकात प्रतिस्पर्धी नको म्हणून ही कारवाही करण्यात आलेली आहे.

तमाम काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजपा शेळपट आमदारांचा निषेध.

जय मनसे प्रवृत्ती !
--------------------
पासानभेद बिहारी
(महारास्ट्र, कर्नाटक, गुजरात, आंधरप्रदेस, ब्रिटन, कैनडा, नोर्वे, रसीया, होलंड, जरमनी, अमरीका, आफ्रिका मैं नौकरी पाने के लिये हमे कन्टॅक करें|)

दिलीप वसंत सामंत's picture

9 Nov 2009 - 10:04 pm | दिलीप वसंत सामंत

या सार्‍या आमदारांनी राजीनामे देऊन पुन्हा निवडणूक लढवावी ते पुन्हा जास्तच बहुमताने निवडून येतील. मात्र मराठी माणूस व आम्ही मराठी माणसासाठी लढतो असे म्हणणारे पक्ष (त्या पक्षांच्या नेत्यांच्या यावरील प्रतिक्रिया यापुढे पहाव्यात.) च्या कधीही मराठीच्या व महाराष्ट्राच्या प्रश्नावर एक होत नाहीत त्याचाच हा परिणाम. निलंबनास मत देणारे सारेच आमदार व त्यांचे मतदार अमराठी नाहीत. हे सारे पक्षाच्या बरोबर आहेत मराठी माणसाबरोबर नाहीत.
ह्याची मुळे फार पूर्वीच्या निवडणुकीत आहेत. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी ज्यांनी लाठ्या गोळ्या खाल्ल्या, काँग्रेसच्या पोलिसांचे अत्याचार सहन केले त्यांना बाजूला सारून संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मिती ला विरोध करणार्‍या यावचंद्र दिवाकरौ मुंबई सह संयुक्त महाराष्ट्र होऊ देणार नाही असे म्हणणार्‍या काँग्रेस लाच मराठी माणसांनी निवडून दिले. त्यावेळेला परप्रांतीय मतदार निवडणुकीवर आपल्या मतांचा परिणाम होऊ देण्या एवढ्या संख्येत नक्कीच नव्हते तरीही तेव्हा व त्यानंतर काँग्रेसलाच सत्ता मिळत गेली. यावरून मराठी माणूस कसा अस्मिताशून्य आहे हेच दिसते. त्यामुळे मराठीच्या व महाराष्ट्राच्या अपमानाच्या, मानहानीच्या अशा घटना नेहमीच होत रहाणार.
यात एक मुद्दा असा मांडला जातो की हिंदी ही राष्ट्रभाषा आहे हे राज्यघटनेत आहे. कोणताही कायदा "आहे" असे असून चालत नाही त्याची अंमलबजावणी होते की नाही हे पाहावे लागते. हिंदी ला राष्ट्रभाषा म्हणून इतर राज्ये किती व काय किंमत देतात हे सार्‍यानीच विशेषतः पत्रकारांनी व वाहिन्यांनी एकदा सर्वेक्षण करून पहावे व ते निष्कर्ष प्रामाणिक पणे जाहीर करावेत. दक्षिणेतील हिंदी विरोध व त्याविषयी वेळोवेळी त्या राज्यात झालेल्या हिंसक आंदोलनांचा इतिहास जरा पहावा.
आतातरी सर्व मराठी माणसांनी व आपण मराठी माणसांसाठी लढतो असे म्हणणार्‍या सर्वच पक्षांनी एकजूट दाखवावी. पक्ष म्हणून वेगळे असाल तरी मराठी व महाराष्ट्राच्या सर्व प्रश्नांवर एक राहावे तरच मराठी माणूस व महाराष्ट्र टिकेल, नाहीतर "मुंबई ही महाराष्ट्राच्या गळ्यातली धोंड" म्हणून मुंबई वेगळी करा असे म्हणणारे टपलेच आहेत.
येथे एक सांगतो या निवडणूकीत मी शिवसेनेस मत दिले पण यापुढील मत त्यांच्या वरील घटनेच्या प्रतिक्रियेवर ठरवीन हे नक्कीच.
मला वाटते सर्व मराठी मतदारांनी यापुढील घटनाक्रमावरून आपले मत ठरवावे. केवळ मराठी माणूस व महाराष्ट्र यांकरिता लढणार्‍यांनाच मत द्यावे. आपली अस्मिता (जी इतर राज्ये नेहमीच व एकमताने एकजुटीने दाखवितात) दाखवून द्यावी तरच आपण मराठी म्हणून या महाराष्ट्रात मानाने राहू शकू.

ब्रिटिश टिंग्या's picture

9 Nov 2009 - 9:08 pm | ब्रिटिश टिंग्या

"बिहारी" विधानसभा पाहुन अंमळ खेद वाटला! :(

मनसेने सदर प्रकार विधानसभेत न करता भर चौकात त्या आझम्याला फटकवायला पाहिजे होतं!

असो, शेवटी मनसेचे संख्याबळ ७ वर घसरले आहे :(

देवदत्त's picture

9 Nov 2009 - 9:12 pm | देवदत्त

शेवटी मनसेचे संख्याबळ ७ वर घसरले आहे

७ की ९?

ब्रिटिश टिंग्या's picture

9 Nov 2009 - 9:24 pm | ब्रिटिश टिंग्या

४था पेग चालु आहे! रमेशभाऊंच्या नावाचा ;)