मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

विनोद

कर्णधारांची दैनंदिनी

परिकथेतील राजकुमार ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
सर्व मि.प. करांना धाडसी गुप्तहेराचा नमस्कार. पॉंटिंग नावाच्या वाचाळ प्राण्याने सुनिल गवासकर ह्यांच्या वर केलेल्या टिकेविषयी आपण वाचले असेलच. बर्‍याच मान्यवरांनी ह्या विषयावर भाष्य टाळले. परंतु काहि माजी भारतीय कर्णधारांच्या दैनंदिनीत मात्र ह्या विषयी बरेच लिहिलेले आढळले. ह्या काहि निवडक प्रतीक्रिया , फ़क्त मि.पा. सभासदांसाठि. बिशन सिंग बेदी :- ओये होये मुंडे मे बडा दम हैगा ! बर्‍याच वर्षानी का होइना पण कोणीतरी त्याला आरसा दाखवल बरे झाले. देवदूत कसला असुर आहे तो ! ह्याला येव्हडे सावरुन घेतले पण शेवटि काय ? ह्यांच्या हाथाखाली आम्हाला खेळायला लावले.

बंदपीठाचा धसका.

कपिल काळे ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
पुण्यनगरीतील शनिवारवाड्याच्या आसपासचं एक मराठी वृत्तपत्र बरयापैकी उपक्रमशील आहे. अनेक उपक्रम चालवतात, रोज वेगळी पुरवणी काढतात. अशीच त्यांची एक साप्ताहिक पुरवणी “बंदपीठ”. ह्यात आपले अनुभव लिहून पाठवतात वाचक. गेले पाच सहा महिने बंदपीठात तर थैमान चालू आहे. समाजातील चांगले दाखवून देणारा एखादा तुरळक लेख सोडला तर बाकीचे तर वाचवत नाहीत. एकेका लेखांचे विषय तर पहा. कॅन्सर झाल्यावर केमोथेरपी घेताना, प्रत्येक केमोनंतर किती केस गळून पडले? दिवाळीला फिरायला बाहेर गेलो तेव्हा दोन ट्रकांच्या मध्ये सापडून आपल्या मोटारीचा चेंदामेंदा कसा झाला?

हॅलो, केन आइ स्पीक टू ओबामाजी?

कपिल काळे ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
ह्या सटायर ची मूळ प्रेरणा "दिवाळीतले चमत्कार" असून, फक्त संवादांमधून चित्र उभे करण्याची खुमखुमी ( बराच डायल्यूट शब्द वापरला) सुद्धा एक प्रेरणा स्त्रोत आहे. सहज बसल्या बसल्या चकाट्या पिटताना सुचली कल्पना आणि मग मिपावर टाकेपर्यन्त धीर नाही निघाला... “ हॅलो, केन आइ स्पीक टू ओबामाजी?” “ह्हे, व्हूज दॅट?” “आई येम सतीश मिश्रा, मायावतीज एड फ्राम इंडिया” “मा या वा ठी , व्हाट्स दॅट?

मिपा ओळख २

चेतन ·
प्रसंग दुसरा : मिपाचे सदस्य होउन पंधरा एक दिवस झालेत. भाउ पंधरा दिवस झाले बघ तु सांगितलेले आणि न सांगितलेलं सगळ येड्**सारखं वाचुन काढलं. आता मी पण काहितरी लिहाव म्हणतोय. बहुतेक हा मिपावरचा दुसरा गटणे होणार वाटतं तरी बरं पंधरा दिवसात यानि काही चर्चाप्रस्ताव टाकले नाहित. काय म्हणालास? नाही काही नाही हे आपलं खुदं के साथ बातां. हे ही मिपावरुनच ढापलेलं बर का मी आपला पी.जे केल्याच्या थाटात म्हणालो. तर हा हिरो तेव्ह्ढ्याच थंड्पणे म्हणतो कसा दादा मिपावर दुसरर्‍याचं लिखाण प्रसिद्ध करायला परवानगी नाही आहे माहिते ना!

मिपा ओळख

चेतन ·
लेखनप्रकार
प्रसंगः एक नविन मराठी माणसाला मिपाबद्दल सांगताना पुलंनी ज्यांच्यापुढे करं जोडावेत अशी महाराष्ट्रातील तीन गावं सांगितली. त्यानंतर असेच कर जोडण्यासारखे एक गाव म्हणजे मिपा. येथे (---^---) असे काहितरी कर जोडावे लागतात. तशी इतरही अनेक संस्थळ आहेत पण पुलंच्या भाषेतच सांगायचे तर ज्यांच्यपुढे करं जोडावे असे फक्त मिपाच त्याची सर इतरांना नाही. इथल्या माणसांची नावेदेखील गावचा, साहित्याचा बाज असणारि अर्थात काही अपवाद म्हणून ढोले पाटिल पॅरडाइस् सारखी इंग्रजाळलेली ब्रिटिश टिंग्या सारखी नावं पण आहेत.

आमचा बॉस आणि आम्ही

मूखदूर्बळ ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
आमचा बॉस आणि आम्ही, एकत्र राबतो. बॉस राबवतो. आम्ही 'राब'तो. आम्हाला कधीतरी ऑफीसला जायला उशीर होतो. नेमका तेंव्हाच, आमचा बॉस लवकर आलेला असतो. आम्हाला पाहून आमचा बॉस एकवार आमच्याकडे बघतो आणि एक वेळ घड्याळाकडे. आमच्या मनात विचार येतो ' घड्याळाच्या जागी आमच्या बॉसलाच लटकवावा' , पण... चेहेर्‍यावर 'आपल्याच घड्याळाचे काटे मोडल्याचा' भाव आणावा लागतो. आमचा बॉस विचारतो, "उशीर का झाला?" आम्ही सांगतो, " ट्रेन लेट" "मग तूमच्या बरोबरचे देशपांडे वेळेवर कसे?" " ट्रेन पकडायला लेट. " आम्ही उत्तरात थोडासा बदल करतो. आमचा बॉस आमच्या हजेरी बूकात एक फूली मारतो. आम्ही बॉसला मनातल्या मनात ३ ते ४ 'फूल्या' वहातो.

माझा आचरटपणा..काव्यवाचन..

हर्षदा विनया ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
एक काव्यवाचन ( विनोदी लिहिण्याचा हा माझा पहिलाच व माझ्या तत्वांप्रमाणे एका बैठकित पुर्ण केलेला प्रयत्न, फ़ारसे चांगले व पठडीत बसणारे नाही, परंतू लायकी माहीती असताना सुद्धा post करतेय) ( एक सभाग्रूह, लोकांची गर्दी कमी असल्याने तो आकाराने अधिकच मोठा आहे कि काय? असे भास व्हायला लागले . काही (स्वतःला कवी/कवयित्री म्हणवणारे ) सभाग्रूहातल्या स्टेज वर, लग्न समारंभाला आल्याच्या थाटात, शाही कपडे ( व स्त्रीया चेह-याला रंगरंगोटी करून) बसले आहेत.) कवींना आपण अ, ब, क, ड तसेच कवयित्रीना a,b.c अशी नावे देऊ. कवी अ : श्रोतेहो, आ...

फक्त विचारच करा, खरे होवू नये अशी प्रार्थना करा

घाशीराम कोतवाल १.२ ·
लेखनविषय:
विचार करा (फक्त विचारच करा, खरे होवू नये अशी प्रार्थना करा) की जर महिला पुरुषांविरुद्ध आंदोलन करण्यासाठी रस्त्यावर उतरल्या तर काय काय घडेल? त्याचा हा विनोदी आढावा.... पुण्यात महिलांची पुरुषांवर लाटणे फेक. अनेक पुरुष डोक्यावर टेंगुळ येवून जखमी. अनेक पुरुष घरी जायला घाबरत आहेत. अनेक दिवस ऑफिसातच मुक्काम ठोकून. काही पुरुषांना या आंदोलनाची आधीपासूनच कल्पना असल्याने ते पोळपाट बॅगेत लपवूनच ऑफिसला निघाले होते.