Skip to main content

विनोद

पकाऊ जोक्स ... (लोकग्रहास्तव नवा धागा)

लेखक टारझन यांनी शुक्रवार, 01/08/2008 15:04 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार लोक्स ... प्राजू तैंनी सुरू केलेला धागा अंमळ तुंबलाय आणि त्यामुळे विनोबा आपले डोक्यावरचे केस ऊपटून राहिलेत .. त्यांच्या साठी .. नविन धागा सुरू करत आहे होओओओओओओओओओ तर ज्याला कोणाला आपले पाचकळ , पुचाट , फालतू , भंगार, केस ऊपटायला लावणारे विनोद खरडायचे असतिल तर फळा मोकळा आहे ... हाही फळा तुंबेल अशी आशा करतो .. केस ऊपटायला लावणारा एक विनोद (खन्ना नाही .. मेहरा .... तोपण केस ऊपटायला लावत असे) माझ्या कडुन .... राजे शिकारीला चाललेत ..

कार्यालय

लेखक विनोद इन्गळे यांनी शुक्रवार, 25/07/2008 12:39 या दिवशी प्रकाशित केले.
कार्यालय इथे पहायला मिळतील नमुने एकाहून एक भारी फरार झाले अधिकारी मोकाट कर्मचारी कुणालाही राहिलं नाही कुंणाचंही भय काम कोणी करत नाही तरी कार्यालय - विनोद इंगळे
Taxonomy upgrade extras

पुण्यातील एक झकास आणि अर्थपूर्ण पाटी

लेखक उदय सप्रे यांनी सोमवार, 07/07/2008 12:50 या दिवशी प्रकाशित केले.
परवाच पुण्यात जाऊन आलो आणि वैकुंठ स्मशानभूमीच्या प्रवेशद्वाराला लागून एक पाटी लिहिली होती : वहातुकीचे नियम पाळा (स्मशानभूमीच्या प्रवेशद्वाराकडे बाण दाखवून त्या बाणाखाली :) इकडे यायचे टाळा ! ---------------पुणे वहातुक नियामक मंडळ---------- भन्नाट "डोकॅलिटी" पुणेकरांची !

अध्यक्षपदाची फिल्डिंग!

लेखक दिनेश५७ यांनी गुरुवार, 03/07/2008 00:04 या दिवशी प्रकाशित केले.
मराठी साहित्य संमेलन सान फ्रान्सिस्कोमधे होणार की नाही, हे अजून नक्की होत नसल्यानं भल्याभल्या कवी-साहित्यिकांच्या डोळ्याला डोळा नाही. महामंडळाचे पदाधिकारी- म्हण्जे कौतिकराव- गेल्या काही दिवसांपास्नं सदस्यांची यादी खिशात घेऊनच फिरतायत. ५१ जणांची नावं फायनल करून निमंत्रणाचा कागद त्यांच्याकडे पोहोचेपर्यंत कौतिकराव कुणालाच भेटणार नाहीत, असं महामंडळाचे भालदार-चोपदार सांगत सुटल्यानं साहित्यिक वर्तुळात खळबळ उडालीय. एक बरे झालेय. आम्च्या रत्नांग्रीकरांनी हा विशय लावून धरला, हे आम्हाला एकदम आवडले. संमेलनाच्या व्यासपीठावर राजकारणी मंडळी नकोत, असा मातब्बर साहित्यिकांचा जुना आग्रह होता.

हास्यतुकडे-२

लेखक आगाऊ कार्टा यांनी गुरुवार, 26/06/2008 23:07 या दिवशी प्रकाशित केले.
बोलणारा (उघड): साहेब आपल्या रेश्मा मॅडम आज येणार नाहीत असा त्यांचा फोन आला होता. ऐकणारा (मनात): (कशी येणार? काल संध्याकळीच तर तिला जोश्याबरोबर बागेत रेडहॅंड पकडले होते.) बोलणारा (उघड): साहेब त्या सुंदर बाई आपल्या ऑफिसमध्ये का आल्या होत्या? ऐकणारा (मनात): (तुला कशाला पाहिजेत नसत्या चांभारचौकशा?) बोलणारा (उघड): साहेब देवाच्या कृपेने एकदाचा माझा मुलगा पास झाला. ऐकणारा (मनात): (मग काय गावभर पेढे वाटू?) बोलणारा (उघड): साहेब आज मी नवीन मोटरसायकल विकत घेतली. ऐकणारा (मनात): (बाकीचे काय फुकट घेतात की काय शिंच्या?) बोलणारा (उघड): साहेब ५ वर्षे झाली.

हास्यतुकडे - १

लेखक आगाऊ कार्टा यांनी गुरुवार, 26/06/2008 23:04 या दिवशी प्रकाशित केले.
स्वगत म्हणजे मनातल्या मनात विवाहाची निमंत्रण पत्रिका आल्यावर आपण हळुच "अहेर आणू नये" हे वाक्य बघतो बघतो व सर्वांनी फुकट जेवण हादडायला जायचं असं मनात ठरवतो, तश्यागत. ऐकणारा समोरच्याचे खोटेच कौतुक करत असतो. पण मनातल्या मनात काय म्हणतो ते पुढे पाहाच. बोलणारा (उघड): (आनंदाने) साहेब पेढे घ्या. ८ वर्षांनी पोर झालं.

आणखी काही पी. जे.

लेखक सचीन जी यांनी मंगळवार, 24/06/2008 15:09 या दिवशी प्रकाशित केले.
प्राजुताईनी सुरु केलेली पी. जे. ची साखळी बरीच लांबल्याने आणखी काही पी. जे. इथे देत आहे. १. कुलकर्णी, कुलकर्णी आणि कुलकर्णी असोसिएटस या कंपनीत फोन येतो - हॅलो, कुलकर्णी आहेत काय? -> ना।ही, मुंबईला गेले आहेत. हॅलो, कुलकर्णी आहेत काय? -> सॉरी, नाशिकला गेले आहेत. हॅलो, कुलकर्णी आहेत काय? -> बोलतोय ! २. एका मल्टीप्लेक्स थिएटरमधे स्क्रीन १ ला 'डर' हा चित्रपट असेल तर स्क्रीन २ ला कोणता चित्रपट असेल ? --> सोप्प आहे ! 'जीत' हा चित्रपट असेल कारण डर के आगे जीत है ! सचीन जी!!

स्त्रीप्रधान संस्कृती

लेखक सुचेल तसं यांनी सोमवार, 16/06/2008 15:17 या दिवशी प्रकाशित केले.
स्त्रीप्रधान अथवा मातृसत्ताक पद्धती: आपल्याकडे बर्‍याच काळापासुन पितृसत्ताक पद्धती आणि त्याच्या अनुषंगाने पुरुषप्रधान संस्कृती चालत आलेली आहे. गेल्या काही वर्षांपासुन मात्र स्त्रिया विविध क्षेत्रांमधे पुरुषांच्या बरोबरीने वाटचाल करीत आहेत. भविष्यकाळात कदाचित त्या पुरुषांच्या दोन पावले पुढे जाऊन प्रगती करतील. असे जर झाले तर मातृसत्ताक पद्धती (आणि त्या अनुषंगाने महिला/स्त्रीप्रधान संस्कृती) यायला वेळ लागणार नाही. त्यावेळची परिस्थिती कशी असेल ह्याचे कल्पनाचित्र रेखाटण्याचा प्रयत्न करत आहे. मुल वडिलांच्या नावाएवजी आईचे नाव लावेल.

खाना खजाना

लेखक अरुण मनोहर यांनी मंगळवार, 10/06/2008 03:49 या दिवशी प्रकाशित केले.
खाना खजाना आजकाल टी व्ही वर कुठलीही चॅनेल लावली की हटकून कोणी एक बाबा किंवा बाबी झटपट स्वयंपाकाचे धडे धडाधड देतांना दिसतात. हे सारे पदार्थ सारखे सारखे पाहून काय होते, की आमच्या बीबीला बरेच इन्स्पीरेशन मिळते. तुम्ही म्हणाल, खुषनसीब आहात! वेगवेगळे पदार्थ खायला मिळत असतील!. तुमचा काही गैरसमज होण्याआधीच सांगून टाकतो. चमचमीत पदार्थ तर राहीले दूरच, पण नुसता डाळभात जरी मिळाला तरी खूप अशी स्थिती असते. (मिपावर चमचमीत पाककृतींचे फोटो असतात हे एक बरे आहे!) टी व्ही वर इतक्या पाककृती दाखवतात, त्यातली नेमकी कोणती करायची ह्याचेच डीसीजन बीबीला घेता येत नाही.