Skip to main content

विनोद

आमचा बॉस आणि आम्ही

लेखक मूखदूर्बळ यांनी रविवार, 26/10/2008 14:42 या दिवशी प्रकाशित केले.
आमचा बॉस आणि आम्ही, एकत्र राबतो. बॉस राबवतो. आम्ही 'राब'तो. आम्हाला कधीतरी ऑफीसला जायला उशीर होतो. नेमका तेंव्हाच, आमचा बॉस लवकर आलेला असतो. आम्हाला पाहून आमचा बॉस एकवार आमच्याकडे बघतो आणि एक वेळ घड्याळाकडे. आमच्या मनात विचार येतो ' घड्याळाच्या जागी आमच्या बॉसलाच लटकवावा' , पण... चेहेर्‍यावर 'आपल्याच घड्याळाचे काटे मोडल्याचा' भाव आणावा लागतो. आमचा बॉस विचारतो, "उशीर का झाला?" आम्ही सांगतो, " ट्रेन लेट" "मग तूमच्या बरोबरचे देशपांडे वेळेवर कसे?" " ट्रेन पकडायला लेट. " आम्ही उत्तरात थोडासा बदल करतो. आमचा बॉस आमच्या हजेरी बूकात एक फूली मारतो. आम्ही बॉसला मनातल्या मनात ३ ते ४ 'फूल्या' वहातो.

फक्त विचारच करा, खरे होवू नये अशी प्रार्थना करा

लेखक घाशीराम कोतवाल १.२ यांनी गुरुवार, 23/10/2008 13:56 या दिवशी प्रकाशित केले.
विचार करा (फक्त विचारच करा, खरे होवू नये अशी प्रार्थना करा) की जर महिला पुरुषांविरुद्ध आंदोलन करण्यासाठी रस्त्यावर उतरल्या तर काय काय घडेल? त्याचा हा विनोदी आढावा.... पुण्यात महिलांची पुरुषांवर लाटणे फेक. अनेक पुरुष डोक्यावर टेंगुळ येवून जखमी. अनेक पुरुष घरी जायला घाबरत आहेत. अनेक दिवस ऑफिसातच मुक्काम ठोकून. काही पुरुषांना या आंदोलनाची आधीपासूनच कल्पना असल्याने ते पोळपाट बॅगेत लपवूनच ऑफिसला निघाले होते.

आणि सावकार स्वर्गात गेला....

लेखक आगाऊ कार्टा यांनी शनिवार, 18/10/2008 17:27 या दिवशी प्रकाशित केले.
फार वर्षांपुर्वीची गोष्ट आहे. एक छोटेसे गाव होते. त्या गावात एक सावकार राहत होता. तो सावकार महाधूर्त, महाचतूर आणि मोठा डांबिस होता (पिवळा डांबिस नव्हे). गावातले लोक तसे गरीबच. त्यामुळे ते अडीनडीला सावकाराकडे पैसे मागायला येत असत. सावकार दामदुप्पटीने व्याज आकारुन पैसे देत असे. त्याची हिशेब करण्याची निराळीच तर्‍हा होती. कितिही पैसे दिले तरी सावकाराचे व्याज काही फिटत नसे. काही जणांनी त्याच्यावर पंचायतीत दावा लावून त्याला पेचात पकडण्याचा प्रयत्न केला. पण तो सावकार सगळ्यांचे बारसे जेवलेला होता. त्याच्या हिशेबाच्या वह्या आणि तो हिशेब पाहून भल्याभल्यांच्या मेंदूला झिणझिण्या येत.

विनोद - प्राचीन कथा

लेखक वारकरि रशियात यांनी बुधवार, 15/10/2008 14:57 या दिवशी प्रकाशित केले.
कालच्या काथ्याकूटात एक शब्द वाचला - 'बादरायण'. मनात सहज विचार आला की हा 'बादरायण' (संबंध) शब्द आपण वापरतो, त्याचा संदर्भ (किंवा कथा) कदाचित सर्वांना माहित नसेल. शक्य असल्यास श्लोक आणि पार्श्वभूमी लिहावी असा विचार केला. आपल्यालाही असे अनेक कथा संदर्भ (किंवा कथा) श्लोक माहित असतील. माहित असल्यास श्लोक आणि पार्श्वभूमी सह लिहा - अपेक्षा आहे चांगल्या विनोदाची !!! तर सुरु करतोय 'बादरायण' (संबंध) कथा (श्लोकासह) (पूर्वी ) एकदा एका गृहस्थाकडे बैलगाडीतून काही पाहुणे आले. बायकोला वाटले की नवर्‍याकडील पाहुणे असतील, तर नवर्‍याला वाटले की बायकोकडील मंडळी असतील !

एक फक्कड लावणी

लेखक शशिकांत ओक यांनी रविवार, 12/10/2008 11:25 या दिवशी प्रकाशित केले.
"फक्कड" लावणी रेशमाच्या बाबांनी ... रेशमांच्या बाबांनी, काल लाथा, बुक्कयांनी बाकपुरा आहे, माझा, काढीला.... हात नगा लावू माझ्या बॉडीला...
Taxonomy upgrade extras

भांगेचे प्रयोग आणि परिणाम

लेखक आगाऊ कार्टा यांनी रविवार, 05/10/2008 21:39 या दिवशी प्रकाशित केले.
हा मी जरा वेगळा विषय घेतला आहे. आत्तापर्यंत वाघ, साप, भूत असे गंभीर विषयांवर लिहिले. त्यामुळे सर्वांना भिती वाटू लागली.... भांग सर्वांना माहितच असेल. महाशिवरात्रीच्या दिवशी भगवान शिवशंकरांचा प्रसाद म्हणून घेतली जाते. मी अजून भांग प्यायलेली नाही. पण या भांगेचे झाड असते आणि भांगेची गोळी दुधात उगाळून ते मिश्रण आटवलेल्या दुधात मिसळतात असे मी ऐकले आहे.... ही भांग म्हणे प्यायलाही खूप चांगली लागते. खरे खोटे प्यायलेल्यांना माहित.असो. तर मुख्य विषय असा की ही भांग जर प्रमाणाबाहेर प्यायली तर चढते... आणि चढली की मग बघायलाच नको... पण भांग चढणे आणि दारु चढणे यात फरक आहे.

कॉफीचा कप

लेखक लिखाळ यांनी बुधवार, 24/09/2008 01:53 या दिवशी प्रकाशित केले.
आज कॉफी पिताना वाटले की चला कॉफीचा कप कॉफी संपल्यावर कसा दिसतो ते टिपून ठेवावे. आपल्याल कप कसा वाटला ते जरूर सांगा. कॅमेरा : निकॉन कूलपिक्स एस ४ समय : रात्र. फोटोत फ्लॅश वापरावा लागला. ऍपरचर शटरस्पीड कुठे कळतो? माझ्या कॅमेर्‍यात ती सोय दिसत नाही. फोटो टाकणे या प्रकाराचे विडंबन कसे करावे याचा विचार करताना हे सुचले. कसे वाटले? सर्वांनी ह.घ्यावे. --लिखाळ :)