Skip to main content

विनोद

आमचेही (देशी) गणगोत

लेखक सुनील यांनी मंगळवार, 23/09/2008 10:55 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा - मुक्तसुनीत यांचे http://www.misalpav.com/node/2920 "मने मने, अशी वेंधळ्यासारखी इकडे तिकडे काय बघतेस? ती बघ गावची चावडी. आणि तो जो माणूस उभा आहे ना, तो आहे गावचा सरपंच, तात्या अंमळ्नेरकर! " "काय म्हणालीस? त्याच्या हातातली काठी जनरल डायरच्या हंटरसारखी दिसते?" "अग, त्याच काय आहे - तात्यानं आता दुसरा घरोबा केलाय. तेव्हापासनं पहिलीच्या कडच्या काहीनी त्यांच्यावर डूख धरलाय. ते येतात कधी मधी त्याला त्रास द्यायला. त्यांना हाकलण्यासाठी ही काठी, बरे?" "तसा तात्या एकदम व्यवहारी हां.

अथ काकापुराण.

लेखक रामदास यांनी रविवार, 31/08/2008 15:02 या दिवशी प्रकाशित केले.
लग्न झालं आणि मी राव झालो.बायकोच्या धाकट्या बहिणीचं लग्न झालं आणि मी पंत झालो. काही वर्षापूर्वी काका पण झालो.नैसर्गीक क्रमानी माझी उत्क्रांती होतेआहे असं म्हणता म्हणता काकापण अचानक खुपायला लागलं.पन्नासाव्वा वाढदिवस झाला त्या दिवशी माझा पुतण्या आला होता. माझ्या हातात एक गुळगुळीत कागदात गुंडाळलेलं पुस्तक देत म्हणाला काका, आता रिटायरमेंट प्लॅनींग कर. ह्या पुस्तकात बघ सगळी माहिती दिलीय. माझी बायको नाक फेंदारत म्हणाली "हे आणि रीटायर?" "करेला और निमचढा. " "बाई बाई आताच घरी असतात तेव्हा हा धुडगुस घालतात ." बोलता बोलता जीभ चावली खरी .... पण पुतण्या टिर्‍या बडवत तासभर हसत होता.

जाने तु या जाने ना....

लेखक सौरभ वैशंपायन यांनी रविवार, 24/08/2008 22:08 या दिवशी प्रकाशित केले.
एप्रिल मध्ये हा लेख मला सुचला होता. तसं याला काय नाव द्यावं ते सुचत नव्हतं, आधी याचं नाव "दिल हि दिल मै!" असं होतं. मात्र सध्या "जाने तू..." गाजतोय, आणि त्याची थीम दे़खिल याला साजेशीच निघाली हा योगायोग आहे. हि २ जणांची पत्र आहेत. दुसरं पत्र उत्तर म्हणुन लिहिलय. काय आहे ते वाचुनच बघा आवडतं का ते! कदाचित एखाद्याच्या आयुष्यात असं झालहि असेल.....किंवा होईल हि. ---------------------------------------------------------------------------------------------- १. Hi Dear!!!!!! कशी आहेस? काय चालु आहे सध्या? अभ्यास कसा चालंलाय? नीट अभ्यास कर! सहा महिन्यांनी M.B.A. ची परीक्षा असेल ना?

सिन्थॉल साबणाच्या पत्राला निरमाताईचं उत्तर

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी मंगळवार, 12/08/2008 21:29 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय सिन्थॉल दादास, निरमाताईचा, सप्रेम नमस्कार वि.वि. तुझं पत्र मिळालं वाचून आनंद झाला.भारतात परत आल्यावर त्याचं नाव बदलल्याचं पाहून "लाईफ बॉयला" वाईट वाटणं सहाजीक आहे.परंतु त्याने, "फेअरग्लोला " मधे घेण्याचे कारण नव्हतं.डॉ.डेटॉलचे आभार मानणं आवश्यक आहे.त्यांच्यामुळे तो बरा झाला.यावरून एक सिद्ध होतं की उगीच कुणाच्या भानगडीत पडू नये.असो. बाकी तूं लिहीलेल्या सर्व आनंदाच्या बातम्या वाचून बरं वाटलं. "सर्फ" मावशीची तब्यत खूपच सुधारली आहे.काळजी नसावी. मी अलिकडे ऐकत आहे की आपल्या, "साबण जमातीची" दुसरी पिढी आंगाखांदयाने खूपच रोडावत चालली आहे.

तुमची "लाडकी" यमी आज टीव्हीवर

लेखक ३_१४ विक्षिप्त अदिती यांनी मंगळवार, 12/08/2008 11:08 या दिवशी प्रकाशित केले.
बय्राच खरडींना उत्तरं देण्यापेक्षा मी जाहीर करून टाकते की आज झी २४ तास वर माझी मुलाखत दाखवणार आहेत. पण संध्याकाळी ४:३० (भारतीय वेळेनुसार)! शक्य झालं तर रेकॉर्डींग कुठेतरी उपलब्ध करून देईन, त्या वेळी हापिसातून मिपा वाचणाय्रांसाठी! यमी /अदिती / यमी आज्जी वगैरे वगैरे वगैरे! अवांतर (पण महत्त्वाचं): माझं खरं नाव संहिता जोशी आहे (आणखी एक जोसपड मिपावरची)! :-)