मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

विडंबनकाव्यमाला-भाग-२

अत्रुप्त आत्मा · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
मुळ काव्य- ''मी माझा''-कवी-चंद्रशेखर गोखले...............................................विडंबन-''मग तू कुणाचा?''-सूर्यकांत खोकले माझ्या हसण्यावर जाऊ नका.......................................माझ्या शिवण्यावर जाऊ नका माझ्या रुसण्यावर जाऊ नका.......................................माझ्या उसवण्यावर जाऊ नका जरी तुमच्यात बसलो तरी...........................................मी दुकानात असलो तरी(सुद्धा?) माझ्या असण्यावर जाऊ नका......................................मला 'टेलर' म्हणुन पाहू नका.... तक्रार ही नाही की.....................................................तक्रार ही नाही,की-तो चंद्र आत डोकावतो.....................................................चंदू आत डोकावतो पण त्याचं बघुन चोंबडा...........................................पण त्याचं 'बघून' तो मेंगळ्या प्राजक्तही सोकावतो...................................................शरदही सोकावतो एकदा आकाशाचा अंकुर..........................................एकदा शेजारचा चंदू माझ्या मनात रुजला.............................................आंम्हाला बघुन लाजला पण परिस्थितीच अशी...........................................पण परिस्थितीच 'अशी' की तो मनातच कुजला...........................................की तो तिथेच बुजला... एक अशी रात्र हवी........................................एक अशी विहीर हवी जीला पहाट जोडलेली नाही.....................................जिला रहाट जोडलेला नाही अशक्यातली गोष्ट आहे..................................तांब्यातली गोष्ट आहे ही पण मी आशा सोडलेली नाही...............................पण मी बादली सोडलेली नाही पहाटेला क्षितिजावर......................................कढईच्या क्षितिजावर चांदण्यांचा गाव.......................................वड्यांचा गाव आणी कुशीत येताना सुद्धा....................................आणी सुरीत येताना झोपत असल्याचा आव.................................चपापला पाव पराग दिवेकर...........

वाचने 4866 वाचनखूण प्रतिक्रिया 16

कच्ची कैरी Wed, 07/13/2011 - 16:54
>>माझ्या हसण्यावर जाऊ नका.......................................माझ्या शिवण्यावर जाऊ नका माझ्या रुसण्यावर जाऊ नका.....................................>> माझ्या प्रतिसादावर जाउ नका ..कविता चांगली जमुन आलीये .

गणेशा Wed, 07/13/2011 - 18:32
मस्त मजा आली वाचुन .. विडंबन तसा माझा नावडता काव्य प्रकार.. तरीही तुम्ही खुप मजा आणली आहे त्यामुळॅ छान वाटले
तक्रार ही नाही,की-तो चंदू आत डोकावतो पण त्याचं 'बघून' तो मेंगळ्या शरदही सोकावतो
मस्त एकदम .. मुळ काव्यातील खालील ओळी लाजवाब
पहाटेला क्षितिजावर चांदण्यांचा गाव आणी कुशीत येताना सुद्धा झोपत असल्याचा आव

In reply to by आत्मशून्य

ह्हा ह्हा हा....हे विडंबन 'झालं' तेंव्हा आमच्या नवी पेठेतल्या विठ्ठल मंदिराजवळच्या अण्णा कडचा वडापाव नुकताच पोटात समाधिस्त झालावता....त्यामुळे ''पोटी होतं(च),ते ओठी आलं'' असं खय्रा अर्थानी झालं असावं...प्रतिसादाबद्दल आभार.

सूड Fri, 05/05/2017 - 14:42
तक्रार ही नाही,की-तो चंदू आत डोकावतो पण त्याचं 'बघून' तो मेंगळ्या शरदही सोकावतो
एकदा शेजारचा चंदू आंम्हाला बघुन लाजला पण परिस्थितीच 'अशी' की तो तिथेच बुजला..
चंदूने असं काय दाखवलं की शरद सोकावला आणि असं काय झालं की ताबडतोब दुसर्‍या कडव्यात चंदू 'बुजला'?? अवघड!! =)) =))

इना Fri, 05/05/2017 - 23:41
घ्या गुर्जी, वाईट किडे सुरू झाले ना डोक्यात हा धागा वाचून =)) घट्ट लावून घेतलेलं दार बाहेर "ओक्यूपाईड"च तोरण अहो, हे कसलं बिना गाण्याचं कार्य उरकण्याचं धोरण?