Skip to main content

कतरीनाचा सलमान बाई कधी अ‍ॅशचा हा सलमान

लेखक स्वप्ना_तुषार यांनी सोमवार, 11/07/2011 12:31 या दिवशी प्रकाशित केले.
कवीवर्य ग.दि.मांची माफी मागून कतरीनाचा सलमान बाई कधी अ‍ॅशचा हा सलमान कपडे काढून दावी डोले शोले कतरीनाचा सलमान बाई कधी अ‍ॅशचा हा सलमान बिगबॉसच्या ह्या सिज़न साठी किती गाळे घाम॥ध्रु॥ एक एक बाई नवी , फॅन गाई गीत एक एक लफ़डी जोडी कुणी न धरे ह्याचा हात, बिचारा हा नाथ॥1॥ कधी अ‍ॅश तर कधी कतरीना संगे, हाच होई त्यांचा दास एक एक प्रकरणी गुंते, फ़ेस येई तोंडास, खानांचा हा खान॥2॥ चाळीशीच्या उंबरठ्यावरती एकच आहे आस आतातरी कुणी यावे कुणी घ्यावे पास, व्हावे कुणाचातरी नाथ ॥3॥ हळूहळू उघडी डोळे पाही जो सलमान वापरूनी सख्या गेल्या कापूनी माझी मान,कुठे म्हणे सलमान॥4॥
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 2500
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

कतरीनाचा सलमान बाई कधी अ‍ॅशचा हा सलमान सन्गीता बिजलानी,सोमि अलि याना विसरलात का ? ;) चाळीशीच्या उंबरठ्यावरती केव्हाच पार झालीय त्याची ;)

In reply to by स्वप्ना_तुषार

कौसल्येचा राम गीतरामायणातलं आहे ?? खरंच माझी मती भ्रष्ट झालीये, मला अजूनपर्यंत ते 'देव पावला' का 'देवबाप्पा' अशा कोणत्याशा मराठी चित्रपटातलं आहे असं वाटत होतं. माहितीबद्दल आभारी आहे. :)

In reply to by सूड

देव पावला :) आणि संगीतकार पु. ल. बाकी प्रतिसादाखाली 'ग. दि. मा. यु टू ?' असे लिहिले असतेस तर प्रतिसादाचे वजन वाढले असते.

In reply to by परिकथेतील राजकुमार

>>बाकी प्रतिसादाखाली 'ग. दि. मा. यु टू ?' असे लिहिले असतेस तर प्रतिसादाचे वजन वाढले असते. प्रतिसादांचं वजन, समेवर अलगद येणं आणि प्रतिसादानं समोरच्याला गुंगवून टाकणं हे तुमच्याइतकं जमणार आहे का आम्हाला ?? असो, पुढच्या लिखाणात नक्की काळजी घेऊ. ;)

एका ज्वलंत अशा प्रश्नावर भाष्य करणारे विडंबन आहे हे !!! - धनाजीराव वाकडे